
16/08/2025
आज (श्रावण कृ. ८ – १६ ऑगस्ट) श्रीकृष्ण जन्माष्टमी / गोकुळाष्टमी…
श्रीराम आणि श्रीकृष्ण यांनी मानवरूपात जन्म घेतला असला, तरी त्यांच्या अलौकिक सद्गुणांमुळे हिंदू संस्कृतीमध्ये त्यांना परमेश्वरस्वरूप मानले जाते. हजारो वर्षांपूर्वी आजच्याच पवित्र रात्री, मथुरेतील कंसाच्या बंदिशाळेत, मध्यरात्री माता देवकीच्या पोटी, भगवान श्रीकृष्ण जन्मास आले. वसुदेव त्यांचे पिता. गोकुळात यशोदा आणि नंद यांनी श्रीकृष्णाचे मोठ्या वात्सल्यभावनेने पालनपोषण केले. भगवान विष्णूंचा आठवा अवतार असलेले श्रीकृष्ण प्रेम, करुणा, नीतिमत्ता आणि बुद्धीचे प्रतीक आहेत.
सज्जनांचे रक्षण, दुर्जनांचा विनाश, अधर्माचा नाश आणि धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी श्रीकृष्णाचा जन्म झाला, अशी श्रद्धा आहे. खोडकर, मोहक व माखनचोर स्वरूपातील रूप असो, राधा व गोपिकांवर निर्मळ प्रेम असो, कुरुक्षेत्रावरचा गीतेचा उपदेश असो, द्रौपदीचा बंधू, सुदामा आणि पांडवांचा सखा असण्याची भूमिका – प्रत्येक रुपात त्यांनी एक नवा आदर्श घालून दिला.
आज, जन्माष्टमीनिमित्त त्यांच्या जीवनातील प्रेम, कर्तव्य, तत्त्वज्ञान आणि भक्ती याचा आदर्श घेऊन जीवन सुंदर करू या. सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमी / गोकुळाष्टमीच्या मंगलमय शुभेच्छा..!
"हरे कृष्ण, हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण, हरे हरे..."
#भगवान_श्रीकृष्ण #माता_देवकी #वसुदेव #मथुरा #द्वारका #श्रीकृष्णजन्माष्टमी #गोकुळाष्टमी #प्रणाम #शुभेच्छा