30/03/2019
*हे सुजाण युवका...*
डॉ.ला मारलं पाहिजे, या तुझ्या
भूमिकेबद्दल माझी तक्रार नाही..
पण तुझ्यासारख्या शेकडो
लोकांना डॉक्टरी पेशाचे नियम
आणि जीवन माहित नाही, याचं
दुर्दैव वाटते...
पर्वा कुठं तरी झालेल्या प्रकरणांत
तुझ्याच वयाची 8-10 मुलं होळी
साजरी करायला सायंकाळी बाहेर
पडली. त्यांनी खूप एन्जॉय करून
दारू प्यायली, आता दारू पिणं,
त्यांचा हक्क होता, यांत शंका नाही.
अन् येतांना रात्री 10 वाजता त्याने
मोटार सायकल रस्त्यावरून खाली
घालून भिंतीवर आपटली आणि
डोक्याला इजा करून घेतली..
बाकीच्या मित्रांनी त्याला
दवाखान्यात आणलं, घरच्यांना
पोरांच्या होळी दारू आणि
अँक्सिडेंटबद्दल माहित नव्हतं...
पोरांचं पितळ उघडं पडणार म्हणून
त्यांना राग आला ..पेशंटच्या मेंदूला
मार लागला, म्हणून डॉ ने MRI
सांगितला. आता MRI मशीन त्या
दवाखान्यात नाही, ही त्या डॉ.ची
चूक नाही. कारण, सोयी उपलब्ध
करून द्यायचं काम सरकारचं असतं.
पण, राग काढला डॉ. वर....
इथं एन्जॉय करणारे, दारू पिणारे,
रस्त्यामध्ये खड्डे करणारे, अपघात
करणारे आणि दवाखान्यात सोयी
न देणारे सरकार यांचा कुणाचाच
दोष नाही.. दोष आहे तो फक्त
उपचार करणाऱ्या डॉ.चा...??
मित्रांनो, तुम्ही जेव्हा गणपती, होळी
शिवजयंती, रंगपंचमी साजरी करत
असता, तेव्हा डॉ. त्यांचं कर्तव्य
बजावत असतो..
तुम्ही एन्जॉय करत करत दारू
पित असता, तेव्हा तो कुठल्या तरी
पेशंटला बघत असतो..
तुम्ही तुमचे सण साजरे करता तेव्हा
डॉ.ड्युटी वर असतात..त्याला भूक,
तहान, झोप, संडास म्हणजे प्रातर्विधी
कांही नसतं, 24 तास तो तिथंच
असला पाहिजे, अशी तुम्ही अपेक्षा
करता..
सरकारी दवाखान्यातील डॉ.च्या
निम्म्या जागा रिक्त असतात...
त्यामुळं तुम्हाला बाहेरून जे दिसतं,
त्याची खरी कारणं सरकारी लोक
आणि यंत्रणा आहे... कोणत्याच
दवाखान्यात पुरेशी औषधे आणि
सामान नसतं. कारण, त्याचे खरेदी
अधिकार वरच्या लोकांना असतात.
त्याबद्दल तुम्ही कांहीही करत नाहीत.
मात्र, जो डॉ केवळ पेशंटसाठी काम
करतो, त्याला तुमची मारायची ईच्छा
होते..
जे सरकारी डॉ. खाजगी दवाखाना
चालवतात, त्यांनी तसा करार केलेला
असतो, कारण त्याला कमी पगार
असतो आणि सेवा म्हणून तो तिथं
काम करत असतो, हे तुला माहित
नाही...
एकदा डॉ. झालं, की त्या कित्येकदा
कोणत्याही नातेवाईकाच्या लग्नाला
जाता येत नाही, 3 दिवसापेक्षा कधी
घरी राहता नाही. कोणताच सन कधी
साजरा करता येत नाही.
माझ्या नातेवाईकांना वाटतं, की
मी डॉ झालो म्हणून सर्वाना
विसरून गेलो. पण, या डॉक्टरीनं
असं अडकवून टाकलं, की आम्हाला
स्वतःच्या मुलांकडं लक्ष द्यायला पण
वेळ नाही..
मी कुठेच खाजगी व्यवसाय करत
नाही आणि तुमच्या सारखा एन्जॉय
पण करत नाही.. मी डॉ.आहे पण
एका प्राध्यापकापेक्षा माझा पगार
कमी आहे..पण, प्राध्यापक कधी
रात्री उठून कॉलेज मध्ये शिकवायला
जातो कां..?? पण, आम्ही जातो..
कधीही, बोलावणे येईल तेव्हा...
शेवटी डॉ. हाही माणूसच असतो. तो
कुणालाही मरू देऊ नये यासाठीच
प्रयत्न करतो, पण या जगात मृत्यूवर
कुणीच विजय मिळवू शकलं नाही,
हे तुम्ही विसरून जाता..आपल्या
घरच्यांचा मृत्यू होणं, सर्वाना दुःख
देणारं असतं. पण, तरीही डॉ.ला
मारणं हे चुकीचं आहे..
मार्क कमी पडले म्हणून शिक्षकाला
मारता कां वा मारणार कां...?
केस हरली म्हणून वकिलाला
मारता कां..?
रस्त्यात खड्डा पडला तर गुत्तेदाराला
मारता कां..?
पूल पडला तर इंजिनियरला
मारता कां..?
लोकांची कामं करत नाही म्हणून
नेत्यांना मारता कां वा मारणार कां..?
पण हजारो जणांचे जीव
वाचविणाऱ्या डॉ.ला मात्र मारावं
कां वाटतं..??
शेतकरी सुद्धा सर्व प्रकारची काळजी
घेऊन कधी कधी निसर्गाच्या कोपाने
पीक गमावून बसतो. तसा डॉ.ही
सगळी मेहनत करून निसर्गाच्या
पुढं जाऊ शकत नाही..
एका डॉ.च्या आयुष्यांत 1ते 2 पेशंट
मरतात. मात्र, तोपर्यंत त्यानं हजारो
जणांना मरणातून वाचविलेलं असतं..
देवी, प्लेग, हत्तीपाय, नारू, कुष्ठरोग
हे रोग कायमचे नाहीसे झाले ते
आपोआपच कां..?? याचे उपकार
समाज कसा फेडील..??
कुणी किराणा दुकानदार, कटींग
सलूनवाला, हॉटेल वाला कधी
मोफत सेवा देतो कां..?? पण, डॉ.
दरवर्षी शेकडो शिबिरातून मोफत
सेवा देतात..
पुढील वर्षी शिवजयंतीला मोफत
कपडे शिवून द्यायचं शिबीर ठेऊन
बघा, किती टेलर येतात..?? पण,
मोफत रुग्ण तपासणी ठेवायला डॉ.
ची टीम तुला कधीच नाही म्हणणार
नाही..?? गेल्यावर्षी आपल्या गांवात
सेवा दिलेल्या किती डॉ.ची ओळख
तुम्हाला राहिली..?? त्यांनी सेवेच्या
बदल्यात तुम्हाला कांय मागितलं..??
आज 1तास काम करायला एखाद्या
पोराला विचारून बघा, 200 रु
मागतो तो...
गेल्या वर्षी दुष्काळ निवारणासाठी
सर्वात जास्त मदत डॉ.नी केली आहे,
माहित नसेल, तर नाना पाटेकर
आणि मकरंद ला विचारा..आताही
आमिर खानच्या पाणी फौंडेशनसाठी दिवस रात्र काम करणारा एक डॉ.
आहे.. तुम्हाला माहित नसेल, तर
इंटरनेटवर डॉ.अविनाश पोळ हे नांव
टाकून बघा, त्या डॉ. ने समाजासाठी
कांय कांय केलं आहे...
तुम्हाला आरशाची एक बाजू दिसते.
पण, मागची बाजू पुर्ण काळी असते..
आपल्याला सत्य माहित नाही, तरी
अशी मारायची भाषा पुन्हा करू
नको..!!
n
उलट त्यांना आता संरक्षण हवं आहे..
एक दिवस सर्व डॉ.नी हा व्यवसायच
सोडला, तर तुम्ही कुणाच्या तोंडाकडं पाहणार...???
एवढे असून ही आम्हाला ईश्वरा ने खास मानव जातीच्या आरोग्य सेवेसाठी ची जबाबदारी टाकली याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आज च्या डॉक्टर्स डे निमित्ताने समाजाने डॉक्टर ला समजून घ्यावे एवढी साधी सी ,अपेक्षा शेवटी पुन्हा आपणास शुभेच्छा