28/04/2024
Severe ARDS आणि Prone ventilation
35 वर्षाची माय आणि तिच्या कुशीत असणारी 2 लेकरे पाहून Intubate करण्याचा निर्णय घेतला.....
या दम्यामुळे मी हैराण झाले आहे ..तेच ते शेवटचे दोन शब्द...
झालं असं की गेले 4-5 दिवस ताप,खोकला ,त्याच्यात भरीस भर म्हणून जुलाब झाले,,,रात्रभर दम लागत होता,बोलणे ही मुश्किल झालेलं...
सकाळी सकाळी माझ्याकडे आले, ऑन रूम एअर SpO2 -35% आणि BP-90/50 ,emergency protocol नुसार सर्व treatment सुरू झाली....ऑक्सिजन लावून सुद्धा गाडी 65%च्या वर जायला तयार नव्हती....chest xray मध्ये फक्त left upper zone फक्त नीट दिसत होता...बाकी सगळा pneumonia...
तातडीने ICU मध्ये घेऊन Bipap लावला ,पण तो काही केल्या सहन होईना ...नातेवाईकांना समजावून सांगितले आणि अखेर व्हेंटिलेटर लावायला तयार झाले कारण मानसिक आणि आर्थिक बाजू महत्वाच्या असतात....
माझ्यासाठी जिकिरीचे होते intubate करणे,,कारण फुफ्फुसांची ऑक्सिजन वहन क्षमता कमालीची खालावलेली असते....कारण कितीही ऑक्सिजन आपण दिला तरीही शरीरात ऑक्सिजन वाढत नाही...आणि अशा परिस्थिती मध्ये cardiac arrest/हृदय बंद पडते.
सुदैवाने असे काही झाले नाही...पेशंट व्हेंटिलेटर वर घेतला,त्यात तिचे प्रेशर हळू हळू कमी व्हायला लागलेलं...त्यामुळे प्रेशर ची इंजेक्शन्स infusion pump ने सुरू झाली ..
तरीही तिचा ऑक्सिजन काही केल्या वाढायच नाव घेई ना... फार फार तर 70-75% पर्यंत वाढत होता ..
एवढं चालू असताना लॅब रिपोर्ट आले....त्यात तर multi organ dysfunction... सगळा गुंतागुंत वाढत होता..
अशावेळी माझा दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल मधील अनुभव कामी आला,,ventilator ची काही सेटिंग्ज बदलली,high PEEP दिला आणि prone ventilation द्यायचा निर्णय घेतला...परत एकदा नातेवाईकांचे councelling केलं...कारण निदान 24 ते 36 तास तरी prone ventilation दिले तर फायदा होतो...
आपल्या कोकणात नेहमीच ठरलेलं असते ,नातेवाईक मुंबई मध्ये असतात ,ते सांगत असतात मुंबई ला घेऊन या,इथेही प्रकार काही वेगळा नव्हता अर्ध्या वाटेत अँब्युलन्स आली पण होती मुंबई ला जायला....परंतु सुदैवाने सगळे कॅन्सल झालं.कारण पेशंट चा prognosis काय आहे ,हे सगळे मी त्यांना सांगितले होते.
असो....
Prone ventilation दिल्यावर ऑक्सिजन जवळपास 80-85% पर्यंत पोचला..क्वचित 90 %क्रॉस करत होता...
त्यात प्रेशर अजून पडायला लागले,दुसरे प्रेशर साठी इंजेक्शन सुरू झाले.. त्यात पेशंट चा ताप वाढायला लागला 105F पर्यंत...कोणतेच तापाचे औषध कामी येई ना..
परत एकदा सगळ्या नातेवाईकांची मीटिंग घेऊन पेशंट ची परिस्थिती सांगितली...कारण आता तर hopes मला ही नव्हत्या...
मगाशी म्हटल्याप्रमाणे त्यांना मुंबई ला पेशंट घेऊन जायचा होता...मग कोणा सामाजिक कार्यकर्त्याला वाटले गोव्याला घेऊन जाऊ पेशंट ला...cardiac ambulance आली आणि पेशंट ला शिफ्ट केलं...तोपर्यंत प्रेशर 50 पर्यंत खाली आले होते ..एवढीच आशा करतो की गोव्यापर्यंत तरी सुखरूप पोहोचू दे...
अशा रीतीने राजापूर तालुक्यातील पहिले prone ventilation झाले.
डॉ.मकरंद जोशी .MD
जोशी हॉस्पिटल राजापूर