26/07/2025
आंतरराष्ट्रीय युवा दिन निमित्त युवक युवती यांच्यामध्ये एच आय व्ही एड्स विषयी जनाजागृती व्हावी या उद्देशाने जिल्हा एड्स प्रतिबंध नियंत्रण विभाग, जिल्हा शासकीय सामान्य रुग्णालय, रत्नगिरी व उपजिल्हा रुग्णालय दापोली यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित रेड रन मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते सदर मॅरेथॉन रेड रन स्पर्धा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते. सदर मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन दापोलीचे उपविभागीय अधिकारी श्री. विजयकुमार सूर्यवंशी, दापोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.महेश तोरस्कर जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्री सचिन पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉ. पवन सावंत जे सी आय सदस्य डॉ. सुयोग भागवत, मोहित शिंदे,के के व्ही, श्री. शिगवण सर एजी हायस्कूल, डॉ.माधुरी साठे दापोली होमिओपॅथी कॉलेज, प्रा.लाड दापोली अर्बन कॉलेज प्रा. जालिंदर पाटील राजे कॉलेज प्रा.ग्रामकर वराडकर कॉलेज तसेच सर्व वैद्यकीय अधिकारी सर्व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्री सचिन पाटील, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर पवन सावंत, डॉक्टर महेश भागवत, डॉक्टर बनसोडे, इन्चार्ज सिस्टर मळेकर, एन वाय जाधव, श्री पांडुरंग उबाळे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ सागर बुरटे, आयसीटीसी समुपदेशक उपजिल्हा, रुग्णालय कळंबनि विलास मस्के आयसीटीसी रत्नागिरी समुपदेशक श्री सतीश कांबळे उपजिल्हा रुग्णालय दापोली येथील वैद्यकीय अधिकारी व इतर सर्व कर्मचारी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी यांनी मेहनत घेतली. सदर मॅरेथॉन रेड रन या स्पर्धेमध्ये
मुले प्रथम क्रमांक यश शिर्के, द्वितीय क्रमांक अथर्व चव्हाण, तृतीय क्रमांक प्रथम गोवले, चौथा क्रमांक सुनील रेवाळे, पाचवा क्रमांक आयुष बर्जे,
मुलीमध्ये प्रथम क्रमांक रेशम कोळंबे, द्वितीय क्रमांक दीक्षा कडू, तृतीय क्रमांक सानिया नेवरेकर, चौथा क्रमांक सिद्धी चीन काटे,आकांक्षा रामाने