03/07/2025
रत्नागिरी टेस्ट ट्यूब बेबी सेंटरमधे 6 जुलै रोजी मोफत तपासणी शिबीर
रत्नागिरी । प्रतिनिधी
कोकणातील अत्याधुनिक रत्नागिरी टेस्ट टयूब बेबी अॅन्ड रिसर्च सेंटरच्या वंध्यत्वावरील मोफत तपासणी शिबिर रविवारी दि. 6 जुलै रोजी होणार असून प्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. तोरल शिंदे रुग्णांची तपासणी करणार आहेत.
रत्नागिरी शहरातील शिवाजी नगर येथील धन्वन्तरी रुग्णालयातील अत्याधुनिक रत्नागिरी टेस्ट ट्युब बेबी अॅन्ड रिसर्च सेंटरमध्ये होणाऱ्या या शिबिरामधे माता आणि पिता होण्यासाठी इच्छुक जोडप्याना टेस्ट ट्यूब बेबी उपचाराची आवश्यकता असल्यास रत्नागिरी टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये उपलब्ध पर्यायांची माहिती दिली जाते. त्याशिवाय पीसीओडी संदर्भातील समस्या, गर्भनलिका तपासणे, स्त्रीबीज तयार न होणे व न फुटणे, गर्भाशयाच्या गाठी व गर्भाशय काढणे, वारंवार आययूआय, टेस्ट ट्यूब बेबी यशस्वी न होणे, गर्भ रुजू न होणे, वारंवार होणारे गर्भपात, पाळीच्या तक्रारी, स्त्रियांचे वजन आणि त्यामुळे येणाऱ्या समस्या, पुरुषांमध्ये असलेली शुक्राणूंची संख्या व हालचाली कमी असणे, तसेच सर्व प्रकारच्या लैंगिक समस्यांवर डॉ. तोरल शिंदे या शिबिरामध्ये मोफत मार्गदर्शन करतात.
हे शिबीर या महिन्यात रविवार दि. 6 जुलै रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत धन्वन्तरी रुग्णालयात होणार असून या शिबिराचा निपुत्रीक जोडप्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन धन्वंतरी रूग्णलयातर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी रत्नागिरीत 02352- 355059, 9527044901 या क्रमांकावर संपर्क साधा.
---
Free infertility camp Ratnagiri
IVF and PCOD treatment
Fertility specialist Ratnagiri
Dr. Toral Shinde gynecologist
Best IVF center in Konkan
Vandhyatva shibir Ratnagiri
Dhanvantari Hospital Ratnagiri