Nana pharm

Nana pharm Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Nana pharm, Pharmacy / Drugstore, Sangamner.

07/10/2015

शेतकरी बांधवाने प्रथम आपले शेत हे एक कंपनी आहे असे ठरवून घ्या.
कंपनीला एक चांगले नाव देवून टाका
कंपनीला उद्योग म्हणून नोंद करा
कंपनीचे बँक खाते उघडा
कंपनीचा प्रकल्प अहवाल तयार करा
मग बँक लोन साठी कोणतीही बँक तयार असेल .
कंपनी कर्मचारी भरती करा आपले घरचेच कर्मचारी
चालतील किमान चार तरी असावे .
आपले क्षेत्र ५ एकर असेल तर फारच उत्तम पाण्यासाठी एक पाच गुंठ्याचे शेत तळे तयार करा असले तर फार उत्तम .
आता आपल्या कंपनीचा पाणी प्रश्न मिटला असेल तर लांबी रुंदी मोजून ९ गुंठे क्षेत्राचे २० प्लॉट तयार करा सर्व प्लॉट सारखे लांबी रुंदीचे व समोर १० फुट ते २० फुट कच्चा रस्ता तयार करावे .रस्ता
नंतर केला तरी चालेल जागा सोडून द्या .
आता आपले उत्पादन ठरुवून घ्या
कांदा,मिरची,टमाटे ,बटाटे,वांगे , लसुन,पालक,मेथी,
कोथांबीर,कोबी,गाजर ,वाटाणे ,बीट ,काकडी,भेंडी,गवार ,कारले,भोपळे,दोडके,वाल हे साधारण तीन ते सहा महिने घेणारे वान आपण आपल्या उत्पादनात लोंकाची गरज व आपली कमीत कमी खर्च व जास्त उत्पन मिळेल असे वान निवडून उद्योग सुरु करावा पूर्ण वेळ कंपनीला द्या .
आता आपण रस्ता सोडणार व प्लॉट पाडणार तर वेगळे वेगळे प्लॉट पाडत असताना ५ एकर जमिनीची साईज नुसार आपण ९ गुंठे चे २० प्लॉट पाडणार तर आपल्याकडे २० गुंठे रस्ता व प्लॉट लेआऊट करताना आपल्यालाला या कंपनीला जवळपास १०००० फुट लांबीचे कुंपण करावे लागणार ते कुंपण तुम्ही फळझाडे लागवड करून करावे १० फुटावर इक झाड असे १००० फळ झाडे लागवड करावे त्यात २० प्रकारचे प्रत्यकी ५० फळझाडे प्रमाणे लावावीत ती अश्या प्रकारची असावी कि त्याची फळे कुठेही सहज विकली जातात व प्रत्येक महिन्याला आपल्याला त्यातून किमान चार प्रकारची फळे बाजारात विकता आली पाहिजे.
त्याची निवड करताना नारळ,फणस,आंबा,चिकू,पेरू,संत्र,मोसंबी,लिंबू,पपई ,केळी ,बदाम,काजू,सीताफळ,रामफळ,जांभूळ,द्राक्ष,अंजीर,आवळा ,डाळिंब,अप्पेल बोर याप्रमाणे करावी.
आता आपल्याकडे २० फळझाडे व २० भाजी पाला प्रकार चे उत्पादन असेल आपले प्रतेक उत्पादन हे मर्यादित व चांगल्या प्रतीचे व सेंद्रिय खतापासून तयार झालेले असेल त्याची गरज सर्वांनाच असेल व गरज हि मागणी ची जननी आहे व सर्वच गरजेच्या वस्तू एकाच जागेवर मिळाल्या तर जास्त मागणी असेल तर चांगला ग्राहक आपल्या शोधात असेल .
तर कुठली भाजी व फळ काय दरात विकायची हे आपली कंपनी ठरवणार त्यामुळे कुणी आपल्याला दबाव अनु शकत नाही .त्यामुळे बहु उपयोगी फळ व भाजीपाला आपण उत्पादन करून शेती मध्ये खरच सोने पिकवू शकतो .
काही त्रुटी असेल तर योग्य मार्गदर्शन घ्या पण सवतः ठरवून टाका मी माल योग्य भाव मिळाला तर विकेल .
जर आपली शेती हायवे वर असेल तर फार सुंदर
नाही तर कंपनीचे एक विक्री संकुल छोठी मंडी (मौल) तयार करा .
रोज आपलाच माल आपल्याच मंडी (मौल )मधे विक्री झाला तर आपल्याला हवा तो माल आपण आपल्या कंपनीत तयार करू व आपल्याला हवा तो भाव मिळाला तर विकू हा निर्धार करवा लागेल .
यासोबत कंपनी कडे तळे असेल त्यात मासे पाळता येतील व ते उत्पादन आपल्या मंडी (मौल) मध्ये सहज विकेल .
जर आपले काही पशुधन असेल तर फार चांगले
नाही तर प्रगती नुसार पाच ते दहा देशी गाय पालन करून दुध मंडी (मौल) मध्ये आरामात विकले जाणार ते पण चांगल्या भावात वरील भाजी पाल्यात जे रिजेक्ट होईल ते गाय खातील त्यामुळे त्यांना दुसरा चारा बघण्याची आवशकता नाही .
शेणखत ,गोमुत्र कंपनीला फार मुबलक प्रमाणात मिळेल त्यातून सर्व भाजी पाला सेंद्रिय खतापासून तयार झालेला असेल आपल्याला काही सांगणे गरजेचे नाही कि रासानिक खताच्या वापरामुळे आपण दररोज थोड्या प्रमाणात जहर खात आहोत .
ज्यांना उभय आहार चालतो त्यांनी गावरान प्रजातीचे कुकुट पालन करून अंडी व चिकन आपल्या मंडी (मौल) विक्री करून हवा तो भाव मिळवता येणार .
अशी हि योजना आहे .
काही त्रुटी असेल तर मार्गदर्शन करावे
आपला आभारी असेल .
उमेश कोल्हे
भ्रमण ध्वनी 9561321200

07/10/2015

👍 नक्की वाचा...आणि शेअर करा!!!

⚡⚡1) जवळचे पैसे कधीतरी संपणारच; पण ते संपण्याआधी कमावण्याचे मार्ग शोधून ठेवावेत.
- नारायण मूर्ती⚡⚡

⚡⚡2)जर तुमच्या कडे दोन रुपये असतील तर एक रुपयाची रोटी घ्या आणि एक रुपया चे पुस्तक घ्या...
रोटी तुम्हाला जगण्यास मदत करेल तर पुस्तक तुम्हाला जगावे कसे ते शिकवेल..
--डाॅ. बाबासाहेब आंबेडकर ⚡⚡

⚡⚡3) यश मिळविण्यासाठी कोणत्या मार्गाने जावे, हे मी सांगू
शकणार नाही. पण स्वतःला
ओळखून स्वतःला, स्वतःसाठी,
स्वतःकडून नेमके काय हवे आहे;
हे शोधणे म्हणजेच यशाच्या जवळ जाणे होय.
-- विश्वनाथन आनंद⚡⚡

⚡⚡4) नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही, तोपर्यंत सगळे काही शक्य आहे.
-- धीरूभाई अंबानी⚡⚡

⚡⚡5) पैसा हा खतासारखा आहे.
तो साचवला, की कुजत जातो आणि गुंतवला तर वाढायला मदत करतो.
-- जे. आर. डी. टाटा⚡⚡

⚡⚡6) पहिले यश मिळाल नंतर तुम्ही स्वस्त बसू नका. दुसर्‍या प्रयत्नात जर अपयश आले तर संपूर्ण जग म्हणणार की पहिल यश तुम्हाला केवळ नशीबाने मिळेल....
-- डाॅ. अब्दुल कलाम⚡⚡

⚡⚡7) चुका दाखविताना त्या कमी कशा करायच्या हे ही सांगितले,
तर त्याचा परिणाम चांगला होतो.
- बिल गेट्स⚡⚡

⚡⚡8) मी विशिष्ट प्रदेशाचा, देशाचा ही भावना गळून पडण्यासाठी ता-यांकडे बघा; कारण तेव्हा तुम्ही एका अवकाशाचे झालेला असता.
- कल्पना चावला⚡⚡

⚡⚡9) कुणीतरी येऊन बदल घडवतील, याची वाट बघत
बसण्यापेक्षा स्वतःच होणा-या
बदलाचा भाग व्हा.
-- बराक ओबामा⚡⚡

⚡⚡10) माझ्याकडून काही महत्त्वाचे शोध लागले. याचा अर्थ
मी कुणी वेगळा, हुशार आहे असा होत नाही. तर वाट पाहण्याची, प्रयत्न करण्याची तयारी माझ्यात इतरांपेक्षा जरा जास्त होती इतकेच.
-- आयझॅक न्यूटन⚡⚡

⚡⚡11) मानवाचा दानव होणे ही त्याची हार; मानवाचा महामानव होणे, हा त्याचा चमत्कार आणि मानवाचा "माणूस' होणे; हे त्याचे यश आहे.
-- सर्वपल्ली राधाकृष्णन⚡⚡

04/10/2015
30/09/2015

ऍझोला पौष्टिक पशुखाद्य.......!

चाराटंचाईच्या काळात ऍझोलाचा जनावरांच्या आहारात वापर करावा. ऍझोलाचा वापर केल्याने पशुखाद्य पौष्टिक बनते. ऍझोलामध्ये पिष्टमय पदार्थ व तेलाचे प्रमाण अत्यल्प आहे. यामधील प्रथिने, तंतुमय पदार्थ आणि लिग्नीनचे प्रमाण कमी असल्यामुळे ऍझोला जनावरांना सहज पचते.

ऍझोलामध्ये नत्राबरोबर प्रथिने, जीवनसत्व (अ आणि ब) तसेच क्षारतत्त्वे (कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, लोह, तांबे व मॅग्नेशियम) मुबलक प्रमाणात असतात. ऍझोलामध्ये प्रथिनांचे प्रमाण 25 ते 30 टक्के, खनिजे 10 ते 15 टक्के आणि 7 ते 12 टक्के प्रमाणात अमिनो आम्ले असतात. ऍझोलामध्ये पिष्टमय पदार्थ, तेलाचे प्रमाण अत्यल्प आहे. या वनस्पतींमधील प्रथिने व तंतुमय पदार्थ व लिग्नीनचे प्रमाण कमी असल्यामुळे ऍझोला जनावरांना सहज पचते. जीवनसत्वे बी-12, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, तांबे, जस्त, बीटा कॅरोटीन या घटकांचे प्रमाणही चांगले असल्यामुळे दुधाच्या गुणवत्तेमध्ये वाढ होते.

ऍझोलाचे उत्पादन -
- ऍझोलाचे उत्पादन घेण्यासाठी झाड किंवा 50 टक्के शेडनेटच्या कृत्रिम सावलीमध्ये जमिनीत 10 फूट लांब, 5 फूट रुंद व 9 इंच खोल आकाराचा वाफा तयार करावा. वाफ्याचा पृष्ठभाग समपातळीत करून घ्यावा. या वाफ्यामध्ये 120 गेज गुणवत्तेचा प्लॅस्टिक पेपर पसरावा. त्यामध्ये पाणी सोडून ऍझोला कल्चर मिसळावे.
- एका जनावराला दररोज दोन किलो याप्रमाणे ऍझोला खाऊ घालण्यासाठी दोन वाफे तयार करावे लागतील.
- झाडाच्या मुळ्या प्लॅस्टिक पेपरमध्ये जाऊन पेपर खराब होऊ नये म्हणून खताच्या रिकाम्या गोण्यांचे आच्छादन वाफ्यामध्ये सर्व बाजूने टाकून यावर प्लॅस्टिक पेपर अंथरावा.
- यानंतर प्लॅस्टिक पेपरवरती सर्व कडांना विटांचा थर द्यावा. वाफ्यामध्ये पाऊस व इतर पाणी जाऊ नये, यासाठी पर्यायी चर काढावा.
- वाफा तयार झाल्यावर त्यात 10 ते15 किलो चांगली सुपीक काळी मातीचा थर टाकावा. यानंतर 10 लिटर पाण्यात 4 किलो न कुजलेले ताजे शेण, 40 ग्रॅम सुपर फॉस्फेट व 40 ग्रॅम खनिज मिश्रण एकत्रित चांगले मिसळून घ्यावे. तयार झालेले एकजीव मिश्रण खड्ड्यात अंथरलेल्या मातीवरती ओतावे.
- यानंतर 6.5 ते 7.5 टक्के सामू असलेल्या स्वच्छ पाणी वाफ्यामध्ये जवळपास चार ते पाच इंच उंचीपर्यंत साठवावे.
- वाफ्यातील पाण्यात एक ते दोन किलो ताजे व शुद्ध ऍझोला कल्चर टाकावे.
- स्वच्छ सूर्यप्रकाश, 20 ते 28 अंश सेल्सिअस तापमान, 70 ते 80 टक्के आर्द्रता आणि 6.5 ते 7.5 टक्के सामू असलेल्या पाण्यात ऍझोलाची चांगली वाढ होते. जास्त क्षार असलेल्या पाण्यामध्ये ऍझोलाची वाढ होत नाही.
- साधारणपणे 15 दिवसांत ऍझोलाची पूर्ण वाढ होऊन वाफा पूर्णपणे भरला जातो. वाफा पूर्णपणे भरल्यानंतर प्रति दिवस 300 ते 500 ग्रॅम प्रति चौरस मीटर या प्रमाणात ऍझोलाचे उत्पादन मिळते. एका वाफ्यातून 1.5 ते 2 किलो ऍझोलाचे उत्पादन मिळू शकते.

वाफ्याचे व्यवस्थापन -
- ऍझोलाची चांगली वाढ होण्यासाठी दर आठ दिवसांनी एकदा 1 ते 1.5 किलो ताजे शेणे, 50 ग्रॅम खनिज मिश्रण व 30 ग्रॅम सुपर फॉस्फेट पाण्यात एकजीव करून मिसळावे.
- दर 15 दिवसांनी वाफ्यातील 25 टक्के पाणी बदलून स्वच्छ पाणी भरावे. पाणी बदलल्यानंतर वरीलप्रमाणे मिश्रण पाण्यात मिसळावे.
- दर दोन महिन्यानंतर वाफ्यातील 50 टक्के माती बदलून नवीन चांगली काळी माती टाकावी.
- दर सहा महिन्यांनंतर ऍझोलाचा वाफा स्वच्छ करावा. याप्रमाणे काळजी घेतली तर ऍझोलाचे चांगले उत्पादन मिळते.
- वाफ्यातील पाण्याची पातळी चार ते पाच इंच उंचीपर्यंत कायम ठेवावी.
- दर सहा महिन्यांतून वाफ्यातील ऍझोलाचे कल्चर बदलत राहावे.

ऍझोला जनावरांना देण्याची पद्धत -
- पूर्ण वाढ झालेल्या ऍझोलाचा आकार जवळपास 1 ते 3 सें. मी. असल्यामुळे ऍझोला काढण्यासाठी 1 ते 2 सें. मी. आकाराच्या छिद्राच्या प्लॅस्टिक गाळणीचा वापर करावा.
- ऍझोला जनावरांना खाण्यासाठी देण्यापूर्वी प्लॅस्टिकच्या बादलीमध्ये चांगले धुवावे. त्यामुळे ऍझोलाचा शेणाचा वास निघून जाईल. जनावराच्या प्रचलित खाद्यात ऍझोला 1ः1 या प्रमाणात मिसळून द्यावे. एकदा सवय झाल्यावर ऍझोला जनावरास जसेच्या तसेसुद्धा खायला देता येते. प्रती जनावरांस 1.5 ते दोन किलो ऍझोला प्रति दिन या प्रमाणात द्यावे.

ऍझोला वापरावयाचे प्रमाण -
जनावरांचा प्रकार ----------------- ऍझोला प्रति जनावर प्रति दिवस
गाय व म्हैस ------------------- 1.5 ते 2 किलो,
शेळी व मेंढी ----------------- 300 ते 400 ग्रॅम,
कोंबडी ----------------------------- 20 ते 30 ग्रॅम.

ऍझोला वनस्पती पशुखाद्यात वापरण्याचे फायदे -
- ऍझोलाचा पशुखाद्यात वापर केल्यामुळे 20 ते 25 टक्के पशुखाद्यावरील खर्च कमी होऊन 10 ते 15 टक्के दूध उत्पादनात वाढ होते.
- प्रथिने, क्षारतत्त्वे, जीवनसत्वाचे अधिक प्रमाण असल्यामुळे ऍझोला दुधाळ जनावरासोबतच इतर जनावरांसाठी पर्यायी संपूर्ण आहार बनू शकते.
- वासरांच्या आहारात वापर केल्यास वासरांच्या वजनात चांगली वाढ होते.
- कोंबड्यांच्या आहारात याचा वापर केल्यास अंडी आणि ब्रॉयलर कोंबड्यांच्या मांसाचे उत्पादन वाढते.
- ऍझोलाच्या वाफ्यामधून काढलेले पाणी नत्रयुक्त असल्यामुळे पिकांस उपयुक्त ठरते.

#मी शेतकरी #

13/09/2015

💴💸💵💸💴💸💵जर तुमच्याकडे शेती असेल तर नक्की वाचा 👇👇👇👇🌴🌴🌴🌴🌴🌴🌴👉 BIG - VISION 👈🌴🌴🌴🌴🌴🌴🌴कुठलीच बैंककुठलीच कंपनीकिवा कुठलाच बिझनेस इतके उत्पन्न तुम्हाला देऊ शकणार नाही...🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 'साउथ आफ्रीकन महागुनी ट्री' 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴१ झाड़ १० वर्षात ७० ते ९० फुट सरळ वाढते७० सेंटीमीटर परिघ होतोसध्या प्रचलित असलेले वुडन फ्लोरिंग,फर्नीचर, संगीत वाद्य, जहाज बांधनीसाठी उत्तम लाकुड़ मिळतेफक्त पहीले 12 महीने पाण्याची व संगोपनाची गरज असते.,नंतर ही झाडे हवेतील बाष्पीभवनावर जगतात.ही आफ्रीकन झाडे सुपिक,नापीक,मुरमाड व खडकाळ जमिनीवरही येतात.३ वर्ष आंतर पिक घेता येते.या झाडाची पाने, साली व फळापासून कॅंसर व मधुमेहची उत्तम औषधी बनविल्या जातात.या झाडला चौथ्या वर्षी फळे येतात. ₹१३००/- प्रति किलो फळ१ झाड़ 20 ते 22 किलो फळं देते20 किलो x 1300/- = ₹26000/-लाकुडआजचा भाव ₹२५००/- रु. प्रति घनफुट१ झाड़ 60 घनफुट लाकुड़ देते.₹२५००/- × 60 = ₹1,50,000/-१ झाडाने ₹ 50,000/- चे जरी लाकुड दिले तरी 500 झाडे ₹ 2,50,00,000/- देणार!आणि दरवर्षी एका झाड़ाने तीन किलो जरी फळ दिले तरी ₹३९००/- × 500= 19,50,000/- दरवर्षी चौथ्या वर्षी पासून सरासरी ₹19,50,000/- दरवर्षी पुढील 6 वर्षेआहे ना फायदेशिर...मग ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांना दयाआपला शेतकरी मित्र प्रगती करू शकेल.अर्ध्या एकरसाठी 500 झाडेखर्च ₹ 1,10,000/-१ एकरसाठी 1000 झाडेखर्च ₹ 2,20,000/-" ही सर्व झाडे कंपनी एग्रीमेंट करुन स्वतः विकत घेते.. काही शंका असतील तर खाली दिलेल्या नंबर वरती फोन करा.."📲Somnath Gadhave 8600404790 "🌴🌱🌴🌱🌴🌱🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 प्लीज तुमच्या ओळखिच्याशेतकऱ्यांना फॉरवर्ड करा 🙏👆🌴👌🌴👍🙏

20/08/2015

☝एकदा अर्जुन ने श्री कृष्णला सांगितले :-
भिंतीवर काहीतरी असे लिहा की,
आनंदात वाचले तर दु:ख होईल आणि
दु:खात वाचले तर आनंद होईल....

प्रभु श्री कृष्णाने लिहिले :-
👉"ही वेळही निघुन जाईल"👈

शुभ सकाळ

19/08/2015

शेती विषयक दोन शब्द÷
मित्रहो शिक्षणाशीवाय शेती करणे शक्य नाही. कारण शेती क्षेत्राचे नाव मागे राहण्याचे एकमेव कारण म्हणजे न शिकलेले शेती करतात आणि शिकलेले नोकरी, परंतु शिपाईच्या नोकरीपासून ते कंपन्यामध्ये हार्डवर्कींगच्या कामापर्यंत 50टक्के नोकर्या अशा आहेत जिथे शिक्षणाची आवश्यकता नाही. म्हणून न शिकलेले बाहेर आणि शिकलेले शेतीत पाहिजे. परंतु जो शिकला तो नोकरी आणि न शिकलेला शेती आणि इथूनच शेती या क्षेत्राला ग्रहन लागले. मित्रांनो शिक्षणाशीवाय शेती शक्य नाही . शेती सारखी दूसरी कोणतीही नोकरी नाही हे लक्षात घ्या. कारण कोणत्याही नोकरीला बाॅस असतो, येथे आपनच आपले बाॅस आहोत.वर्षातले 365 दिवस आपलेच असतात आणि नोकरीमध्ये फक्त रविवार आपले असतात.कोणत्याही नोकरीमध्ये आपल्या जागेवर मजूर लाऊन काम केले जाऊ शकत नाही. परंतु शेतीमध्ये आपण मजूर लाऊन काम करून घेउ शकतो. नोकरीमध्ये आपण मजूर असतो कोणताही निर्णय घेणे आपल्या हातात नसते हे लक्षात घ्या. मनुष्याला जगण्यासाठी जे अन्न लागतं ते फक्त मातीतच पिकतं,आणि त्याला पिकवणारे आहोत आपण.म्हणून शेतकऱ्याचे शिक्षण अवश्यक आहे. शेतकऱ्यांना रोग,किडी, अन्नद्रव्याची कमतरता, ओळखता आली पाहिजे.शेतात फिरत असताना बारकाईने निरीक्षण करा. स्वतः स्वताच्या अनुभवातून एवढे शिका की,वेगळ शिक्षण घेण्याची आवश्यकता नसली पाहिजे. ठामपणे सांगा मी शेती करतो.आपण शेती करतो,याचा अभिमान बाळगा. विश्वास ठेवा शेती क्षेत्रात नक्कीच यशस्वी व्हाल.
:- एक कुषी पदवीधर

17/08/2015

चुनखडीयुक्त जमिनीतुन स्फुरद,लोह,पोटॅश,जस्त,तांबे,मॅंगनीज अन्नद्रव्ये मुळाकडुन उचलली जात नाहीत,या अन्नद्रव्यांची पुर्तता फवारणीतुन करावी

Address

Sangamner

Telephone

8888215256

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nana pharm posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share