09/04/2023
"स्वमग्नता" (AUTISM)
सध्या ऐकला जाणार प्रोब्लेम आहे ना?
अगदी सर्रास या प्रोब्लेम सोबत पालक येतात....
कुणी Google ने सांगितले,कुणी शेजाऱ्यांनी सांगितले,कुणी pediatrician नी refer केले.... असे प्रकारे.....
नक्की असत काय ओ..
चला तर जाणून घेऊ नक्की आहे तरी काय?
स्वमग्नता किंवा Autism
पहिला तर हे समजून घेतले पाहिजे...
आपली मुले नॉर्मल मुलांसारखी वागत आहेत का नाहीत,
मोबाईल किंवा टीव्ही मधे किती जास्त मग्न राहत आहेत..
Working parents किंवा स्वतःचे काम चालू आहे म्हणून
मुलांना मोबाईल,टीव्ही यांसारखे व्यसन लावणारे पालक
एक च वस्तू घेऊन काहीही बडबड करत बसणे..
किंवा एखादी गोष्ट घेणे आणि लगेच च त्यामधे मुलाचा interst निघून जाणे,,
ठराविक वय उलटून गेलाय कानात ही काही दोष नाही तरीही मुल पलटून पाहत नाही..
एकही शब्द बोलत नाही...
किंवा काहीही बडबडत राहते...
सु आली शी आली सारख्या basic गरजा देखील अजून सांगता येत नाही
भूक लागली ,पाणी हवंय यांसारख्या गरजा देखील मुले सांगू शकत नाहीत...
रागावर कंट्रोल नाही...
काहीही वस्तू फेकणे तोडणे, तोंडांत घालने..
Eye concentration म्हणजे च नजर स्थिर नसणे..
यांसारखे बरीच आणखी लक्षणे आहेत
जर ती आपल्या मुलांमधे दिसत असतील तर तुम्ही योग्य त्या dr ना दाखऊन त्यावर योग्य ते निदान करून घेतले पाहिजे ..
आम्ही रिसर्च केल्यावर असे लक्षात आले आहे की याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच जात आहे....
त्यासाठी योग्य ते उपचार योग्य त्या तज्ञ कडून घेतले असतील या परिस्थिती मधे नक्कीच बदल घडून येऊ शकतो...
हा प्रोब्लेम जर योग्य वयात लक्षात आले तर त्यावर काम करणे देखील तितके सोपे होऊन जाते..
अशा परिस्थिीमध्ये चिडचिड करून, मुलांना मारून,ओरडुन काहीच बदल होणार नसतो त्यासाठी मुलांसोबत योग्य तो संवाद साधला गेला पाहिजे....
कारण योग्य त्या संवादातून च स्वमग्नाते सोबत नाते जुळू शकते...
त्यासोबत योग्य वेळी योग्य ते उपचार मिळाले असता,त्यामधे नक्की आणि नक्कीच सुधारणा घडू शकते.......
यामधील काही लक्षणे तुमच्या बाळा मधे दिसत असतील नक्कीच संपर्क साधा...
प्राजक्ता सूर्यकांत कट कोळ
स्पीच थेरपिस्ट अँड सायकॉलॉजीकल कौंसलर
😊