Pragati Hospital Oncology Services

Pragati Hospital Oncology Services Everything in Cancer awareness, prevention, early diagnosis, treatment and second opinion.

23/02/2023

Cancer Simplified " या सदरातील प्रश्नोत्तर मालिकेतील या भागात डाॅ विवेक कुलकर्णी यांनी , कॅन्सर वरील प्रमुख तीन उपचार पद्धतींची माहिती दिली आहे. त्याचप्रमाणे सर्जरी म्हणजे ऑपरेशनचा वापरकॅन्सरच्या उपचारात केव्हा केला जातो याची माहिती दिली आहे. त्याचप्रमाणे पुनर्निर्माण व सुघटन शस्त्रक्रिया म्हणजेच प्लास्टिक सर्जरी यांची गरज केव्हा पडते ते सांगितले आहे.

16/01/2023

Cancer Simplified " या सदरातील प्रश्नोत्तर मालिकेतील या भागात डाॅ विवेक कुलकर्णी यांनी ,
पेट सी टी स्कॅन या तंत्रज्ञानाचा वापर केंव्हा चालू झाला व या संशोधनामुळे गुंतागुंतीच्या, किचकट उपचारपद्धतीला योग्य दिशा देणे व उच्चतम परिणाम मिळवणे कसे सोपे झाले हे सविस्तर सांगितले आहे, तसेच सर्व पेशंटना या आधुनिक तपासणीची आवश्यकता नसते हे सुद्धा नमूद केले आहे.

28/12/2022

" Cancer Simplified " या सदरातील प्रश्नोत्तर मालिकेतील या सदरात डाॅ विवेक कुलकर्णी यांनी , कॅन्सरच्या तपासणी दरम्यान बायाॅप्सी व्यतिरिक्त CA -125, PSA, X ray, C T scan आणि MRI या तपासण्यांची आवश्यकता कधी भासते व न्याय बुद्धीने याचा वापर केल्यास पेशंटला लवकर रिलीफ मिळवून देण्याचे काम कसे सोपे होते या बद्दल सांगितले आहे.

10/12/2022

" Cancer Simplified " प्रश्नोत्तर मालिकेतील या भागात ,
कॅन्सरचे निदान कसे केले जाते?
कॅन्सरचे पक्के निदान करण्यासाठी कोणकोणत्या चाचण्या उपलब्ध आहेत?
तसेच बायाॅप्सीबद्दलचा लोकांमधे विनाकारण निर्माण झालेला गैरसमज दूर करण्याबद्दल डाॅक्टर विवेक कुलकर्णी यांनी मोलाचे भाष्य केले आहे..

05/12/2022

" Cancer Simplified " या सदरात कॅन्सर बद्दलची धोक्याची चिन्हे , "Caution" या इंग्रजी शब्दाच्या सहाय्याने कशी समजावून घ्यायची व लक्षात ठेवायची या बद्दल सोप्या शब्दात डाॅ. विवेक कुलकर्णी यांनी सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
कॅन्सरचे लवकर निदान झाले तर उपचाराचे परिणाम उत्तम असतात यासाठी हा व्हिडीओ आवर्जून पहावा व "Caution" हा शब्द कॅन्सरच्या अनुशंगाने समजावून घ्यावा हे अपेक्षित आहे.

स्तन कॅन्सर  : स्तन  स्व-परीक्षा कशी करावी ?( Breast self examination)▪️महिन्यातील ठराविक दिवशी पाळी झाल्यानंतर स्वच्छ उ...
30/10/2022

स्तन कॅन्सर : स्तन स्व-परीक्षा कशी करावी ?
( Breast self examination)
▪️महिन्यातील ठराविक दिवशी पाळी झाल्यानंतर स्वच्छ उजेडात आरशासमोर उभे रहावे.
▪️उभे राहून, उभे राहून हात पूर्ण उंच करून व हात कमरेवर दाबून अशा तीन प्रकारे तपासणी करावी.
▪️खालील गोष्टी डोळ्याने पहाव्यात व हाताच्या तळव्याने चाचपून पहाव्यात.
अ) स्तनांचा आकार, स्तनाग्रांचे ओढले जाणे,लालपणा.
ब) स्तनामध्ये गाठ.
क) कातडीतील खळगा , लालपणा इ.
ड) स्तनाग्रांमधून रक्त किंवा अन्य स्त्राव
▪️कोणतेही शंकास्पद लक्षण दिसल्यास त्वरीत डाॅक्टरी सल्ला घ्यावा.

स्तन कॅन्सर : निदान ▪️स्तन स्व - तपासणी ( स्व - परीक्षा )▪️डाॅक्टरांकडून तपासणी ▪️स्तनातील गाठीमधून पाणी काढून किंवा    ...
29/10/2022

स्तन कॅन्सर : निदान

▪️स्तन स्व - तपासणी ( स्व - परीक्षा )
▪️डाॅक्टरांकडून तपासणी
▪️स्तनातील गाठीमधून पाणी काढून किंवा
पूर्ण गाठ काढून तपासणी करणे.

Happy Diwali.
26/10/2022

Happy Diwali.

Happy Narak Chaturdashi.
24/10/2022

Happy Narak Chaturdashi.

Happy Dhanteras from Pragati Hospital,Vishrambag, Sangli.
22/10/2022

Happy Dhanteras from Pragati Hospital,Vishrambag, Sangli.

स्तन कॅन्सर -: लक्षणे▪️स्तनामधे न दुखणारी गाठ.▪️स्तनामधे किंवा स्तनाग्राच्या आकारात बदल.▪️स्तनाग्रांमधून रक्त येणे.▪️काख...
21/10/2022

स्तन कॅन्सर -: लक्षणे

▪️स्तनामधे न दुखणारी गाठ.
▪️स्तनामधे किंवा स्तनाग्राच्या आकारात बदल.
▪️स्तनाग्रांमधून रक्त येणे.
▪️काखेमध्ये गाठ येणे.

स्तन कॅन्सर-: रिस्क फॅक्टर ▪️घरात आई किंवा बहीण यांना स्तन कॅन्सर असणे.▪️वाढते वय.▪️लठ्ठपणा. ▪️पाळी लवकरच्या वयात सुरू.▪...
20/10/2022

स्तन कॅन्सर-: रिस्क फॅक्टर

▪️घरात आई किंवा बहीण यांना स्तन कॅन्सर असणे.
▪️वाढते वय.
▪️लठ्ठपणा.
▪️पाळी लवकरच्या वयात सुरू.
▪️उशीरा रजोनिवृत्ती.

स्तनाचा कॅन्सर -: वयोगट साधारण वयोगट - ३० ते ५० वर्षे. पुर्वी हाच वयोगट ५० ते ७० वर्षे होता. याचा अर्थ असा की आता अधिक त...
19/10/2022

स्तनाचा कॅन्सर -: वयोगट

साधारण वयोगट - ३० ते ५० वर्षे.
पुर्वी हाच वयोगट ५० ते ७० वर्षे होता.
याचा अर्थ असा की आता अधिक तरूण स्त्रिया स्तनकॅन्सर ग्रस्त होत आहेत.
२२ पैकी एक स्त्री आयुष्यात केंव्हातरी स्तनकॅन्सरग्रस्त होते.

ऑक्टोबर महिना हा जागतीक स्तन कॅन्सर जागृती महिना म्हणून पाळण्यात येतो ●स्तनाचा कॅन्सर हा भारतामध्ये एक महत्त्वाचा आजार आ...
18/10/2022

ऑक्टोबर महिना हा जागतीक स्तन कॅन्सर जागृती महिना म्हणून पाळण्यात येतो
●स्तनाचा कॅन्सर हा भारतामध्ये एक महत्त्वाचा आजार आहे.
●स्त्रियांच्या सर्व प्रकारच्या एकूण कॅन्सर केसेसमध्ये
स्तन कॅन्सरचे प्रमाण २५ ते ३१ % आहे.

17/10/2022

" Cancer Simplified " या सदरातला प्रश्नोत्तर स्वरूपातला तिसऱ्या क्रमांकाचा व्हिडीओ आम्ही आपणासाठी तयार केला आहे.
या भागात कॅन्सर होण्याची प्रमुख कारणे काय आहेत ?,
या बद्दल सर्वांना समजेल अशा सोप्या भाषेत सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न डाॅ. विवेक कुलकर्णी यांनी केला आहे.जेणेकरून जनजागृती होईल व काही प्रमाणात तरी कॅन्सरला आळा बसवण्याच्या आमच्या प्रयत्नांना यश मिळेल.

12/10/2022

" Cancer Simplified " या सदरातला हा प्रश्नोत्तर स्वरूपातला दूसरा व्हीडीओ आपणासाठी तयार केला आहे.
सर्वसामान्य पेशींचे कॅन्सरच्या पेशींमधे रूपांतर कसे होते व या प्रक्रीयेचे गाठीमधे रूपांतर कसे होते?
तसेच या चर्चेत, कॅन्सरचा उपचार यशस्वी व्हावा या साठी फॅमिली फीजीशीयन व पेशंटनी काय खबरदारी घ्यावी याविषयीच्या महत्वाच्या माहीतीचा समावेश आहे.

Address

Sangli
416415

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 1pm

Telephone

+919422403802

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pragati Hospital Oncology Services posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Pragati Hospital Oncology Services:

Share

Category