24/01/2026
मोबाईल-लॅपटॉप जास्त वापरता? | Blue Light Glasses: Fact की Myth?
आजकाल ब्लू फिल्टर किंवा ब्लू ब्लॉकर चष्मे बाजारात खूप लोकप्रिय झाले आहेत. ज्यांना मोबाईल, कॉम्प्युटर किंवा LED स्क्रीनचा जास्त वापर करावा लागतो, त्यांना डॉक्टर हे चष्मे सुचवतात. पण यामागची शास्त्रीय कारणे काय आहेत? चला जाणून घेऊया. ब्लू लाईट ही सूर्यप्रकाशात आणि कृत्रिम प्रकाशात असते. विशेषतः LED लाईट्स, मोबाईल, लॅपटॉप स्क्रीन्समध्ये ब्लू लाईटचे प्रमाण जास्त असते. जेव्हा हे ब्लू लाईट डोळ्यांवर पडते, तेव्हा रेटिनातील गँग्शन सेल्स सक्रिय होतात. यामुळे मेंदूत melatonin हार्मोनची निर्मिती कमी होते. Melatonin ही झोपेची हार्मोन आहे, जी रात्री आपल्याला झोप आणते. दिवसा ब्लू लाईट मेंदूला अलर्ट ठेवते, जे चांगले आहे. पण संध्याकाळी किंवा रात्री स्क्रीन वापरल्यास melatonin कमी होऊन झोप उशिरा येते किंवा कमी होते. याशिवाय, व्हिडिओ किंवा कंटेंटमुळे होणारा मेंटल एंगेजमेंट देखील झोपेवर परिणाम करतो. ब्लू फिल्टर चष्मे हे ब्लू लाईट काही प्रमाणात ब्लॉक करतात, ज्यामुळे डोळ्यांना warm रंग दिसतात आणि डोळ्यांना आराम मिळतो. वैज्ञानिकदृष्ट्या, डिजिटल स्ट्रेन पूर्णपणे कमी होत नाही, पण बऱ्याच लोकांना हे चष्मे आरामदायक वाटतात. संध्याकाळी खास उपयुक्त, दिवसा वापरू शकता. पूर्ण ब्लू लाईट काढत नाहीत, फक्त तीव्रता कमी करतात. रात्री स्क्रीन वापरायची असेल तर नक्की घ्या. पण सर्वांत महत्वाचे - स्क्रीनचा वापर कमी करा!
These days, blue filter or blue blocker glasses have become very popular in the market. Doctors recommend these glasses to people who have to use mobile phones, computers, or LED screens a lot. But what are the scientific reasons behind this? Let's find out. Blue light is present in sunlight and artificial light. Especially in LED lights, mobile phones, and laptop screens, the amount of blue light is high. When this blue light falls on the eyes, the ganglion cells in the retina get activated. This reduces the production of melatonin hormone in the brain. Melatonin is the sleep hormone that helps us fall asleep at night. During the day, blue light keeps the brain alert, which is good. But if you use screens in the evening or at night, melatonin decreases, leading to delayed or poor sleep. Additionally, mental engagement from videos or content also affects sleep. Blue filter glasses block blue light to some extent, making colors appear warm to the eyes and providing relief. From a scientific perspective, they don't completely reduce digital strain, but many people find them comfortable. They're especially useful in the evening, but you can use them during the day too. They don't remove blue light entirely, just reduce its intensity. If you need to use screens at night, definitely try them. But most importantly—reduce screen time!