30/04/2025
आज (वैशाख शुक्ल तृतीया, ३० एप्रिल) अक्षय्यतृतीया...
अक्षय्यतृतीया हा हिंदू धर्मीयांचा पवित्र सण. अक्षय्यतृतीया हा साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक आहे. याच दिवशी त्रेतायुगाला प्रारंभ झाला. ‘या तिथीला विष्णुपूजा, लक्ष्मीपूजा, होमहवन, दान आदी धर्मकृत्ये केल्यास अधिक आध्यात्मिक लाभ होतो’, असे मानले जाते. अक्षय्यतृतीयेपासून ‘चार धाम’ मानल्या गेलेल्या बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्रीची द्वारे खुली केली जातात.
आजच्या दिवशी इष्टदेवतेची उपासना केल्यास आपल्यावर तिच्या कृपादृष्टीचा कधीही क्षय होत नाही. या दिवशी सुरू केलेल्या कुठल्याही कार्याचा क्षय होत नाही. या दिवशी ज्या वस्तूंचे दान करतो त्या अक्षय प्रमाणात म्हणजेच विपुल प्रमाणात पुन्हा आपल्याला मिळतात, असे मानले जाते. अनेक जण या दिवशी सोने, वाहन, वास्तू, विविध वस्तू खरेदी करतात. व्यवसाय सुरू करतात. नवसंकल्प करतात. या दिवशी चैत्रगौरीचे विसर्जन करण्यात येते. त्यानिमित्त हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन केले जाते. कृषी क्षेत्राच्या दृष्टीने अक्षय्यतृतीया हा अक्षय्य – उदंड पीक देणारा म्हणून पेरणीचा मुहूर्त मानला जातो.
सर्वांना अक्षय्यतृतीयेच्या मंगलमय शुभेच्छा...
#अक्षय्यतृतीया #शुभ_मुहूर्त #पवित्र_सण #शुभेच्छा