04/04/2025
हेल्थ, वेल्थ, करिअर आणि रिलेशनशिप या चार स्तंभावरच मानवी आयुष्याचा डौलारा उभा आहे. मला माझा जीवनसाथी कसा हवा ?
त्याच शिक्षण, नोकरी, व्यवसाय, जमीन-जुमला या सर्वाआधी तो / ती कोण आहे ? यापेक्षा ती व्यक्ती कशी आहे याचा आपण विचार करत नाही.
आपण किंवा आपले आई वडील त्या व्यक्तीला असलेला पगार, बंगला, कार, फ्लॅट, सोने नाणे, जमीन-जुमला अशी संपत्ति पाहतो.
लहानपणापासूनच आपण आपल्या वैवाहिक जीवनाची स्वप्न पाहत आलेलो आहे. आपला होणारा नवरा, होणारी बायको यांच्याकडून आपण भरपूर अपेक्षा ठेवत असतो.
यामुळे, जवळजवळ सर्व विवाहित जोडप्यांच्या नवीन आयुष्याच्या सुरुवातीलाच मिठाचा खडा लागतो. कारण, स्वप्नांच्या दुनियेपलीकडील वास्तविक दुनियेत आपण जगत असतो.
छोट्या छोट्या गोष्टीतून वाद उद्भवणे, मुलग्याच्या व मुलीच्या सासरकडच्या होणाऱ्या गोष्टीमधून अडचणी येणे, दोघांच्या स्वभावाच्या नवीन पैलूंची ओळख होणे, नवीन नाजूक नातं हाताळताना चुका होणे
मुलीला दीर-सासू-ननंद-सासरे यांच्यासोबत नातं निर्माण करायला अडचण येणे, तिचं मन मोकळेपणानं न बोलने, त्याचं बिनधास्त राहणे, इत्यादी अनेक गोष्टीमधून नवीन नात्यांमध्ये हळूहळू दुरावा यायला लागतो.
याच छोट्या छोट्या गोष्टींमधून पुढे जाऊन कधी कधी घटस्फोटासारख्या मोठ्या गोष्टीला आपल्याला तोंड द्यावे लागते. अलीकडच्या काळामध्ये घटस्फोटांच्या प्रमाणात प्रचंड वाढ होण्याचे हेच कारण आहे.
समाजामधील कोणत्याही वैवाहिक दांपत्याला या समस्येला सामोरे जाव लागू नये, यासाठीच साज फाउंडेशन घेऊन आली आहे एकदिवसीय कार्यशाळा.
ही कार्यशाळा कोणासाठी आहे ?
लग्नासाठी इच्छुक तरुण-तरुणी आणि ज्या जोडप्याला लग्न होऊन दीड वर्षे किंवा त्यापेक्षा कमी काळ झाला आहे अशांसाठी.
या कार्यशाळेमध्ये काय काय असणार आहे, याविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच संपर्क साधा साज फाउंडेशनला.
साज फाउंडेशन गेली 20 वर्षे विवाह इच्छुक तरुण-तरुणी, नवदांपत्य आणि लग्न होऊन बरीच वर्षे झालेली दांपत्य अशा सर्वांना मार्गदर्शन करण्याचं काम करत आहे. धन्यवाद !
तारीख : 6 एप्रिल 2025
ठिकाण : हॉटेल लोटस, सांगली
साज फाऊंडेशन,
अ 6, अमेय हाऊसिंग सोसायटी, परांजपे हाऊसिंग स्कीम,
माधवनगर रोड, सांगली.
9011060102
9404814505