Dr Pawar ayurved, panchkarma & Garbhsanskar kendra

Dr Pawar ayurved, panchkarma & Garbhsanskar kendra Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Dr Pawar ayurved, panchkarma & Garbhsanskar kendra, Doctor, near ram mandir, on congress bhavan Road, Sangli.

20/01/2026

*डोळ्यांमध्ये दिसणारा रक्तातील संधिवात* ... प्रभावी आणि यशस्वी आयुर्वेद उपचार...

रक्तातील दोष कधी कोठे जाऊन काय दंगा करतील याचा काही नियम नाही 😳
वरील रुग्णांमध्ये रक्तातील संधिवात जेव्हा डोळ्यांमध्ये दिसू लागला तेव्हा डोळ्याला असा रक्तवर्ण आला व डोळ्याला अंधुक दिसू लागले.

असे दिसताच गगनबावडा जवळील ही रुग्णा तातडीने आपल्या दवाखान्यात दाखवण्यास आली.

लगेचच आपल्या आयुर्वेदातील या अवस्थेतील ब्रह्मास्त्र म्हणजे त्या ठिकाणी डोळ्याच्या बाहेर कोनाजवळ जलोका Leech Therapy लावून *रक्त मोक्षन हे पंचकर्म केले.*

सोबत आश्चोतन चिकित्सा( डोळ्यामध्ये औषधी सोडणे) व पोटातून रक्त दुष्टी आणि वात कमी करणारी औषधांची उपायोजना केली.

अवघ्या चार दिवसांमध्ये 50% कमी होऊन *फक्त 10 दिवसांमध्ये 100% डोळ्यातील रक्त वर्ण कमी झाला.*

अनुभवापानुसार स्टेराईड चा हेवी डोस देऊन सुद्धा इतक्या लवकर डोळा नॉर्मल होत नाही.

*हीच किमया...*
गुरमुखातून मिळालेल्या ज्ञानाची...
त्यानुसार निदान करून केलेल्या चिकित्सेची...
आणि आयुर्वेदाची आहे...

टीम डॉ. पवार आयुर्वेद,
पंचकर्म व रिसर्च सेंटर,
राम मंदिर चौक, सांगली
9168337771

10/01/2026

सुगी ओल्या हरभरा वटाणा पावट्याच्या शेंगांची,
आयुर्वेद म्हणतो कमी खा, देऊन फोडणी तुपाची

सहज एक कुतुहल म्हणून या आठवड्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला सहज विचारलं .."काल रात्री काय जेवला?" तर आश्चर्य म्हणजे उत्तरा दाखल जवळपास 90% पेक्षा जास्त लोकांनी ओला वाटाणा, हरभरा किंवा पावटा हेच उत्तर दिलं

साहजिक आहे ...आता सीझन आहे आणि सगळीकडे या गोष्टी मुबलक प्रमाणात उपलब्ध झालेल्या आहेत , शेतकरी राजाच्या तर शिवारातच या भरभरून आलेल्या आहेत. आणि या हिरवेगार शेंगा आणि दाणे पाहिले असता त्या खायचा मोह कोणाला बरे होणार नाही???
*पण आयुर्वेद काय सांगतो?*
तर सामान्यपणे हे वाटाणा, हरभरा पावटा हे जे मोठे दाणे आहेत हे
🦚अत्यंत वात वाढवणारे असतात 🦚कडधान्यांमध्ये हे पचायला अत्यंत जड ,पोटात मुक्काम करणारे.
🦚 व्यवस्थित पोट साफ होऊ न देणारे पोटातील गॅस वाढवणारे
🦚 वात वाढवणारे व दुखणे वाढवणारे असतात.

त्यामुळे या पदार्थांचे अतिप्रमाणामध्ये सेवन करणे हे आयुर्वेदाने निषेध सांगितले आहे.

*मग खायचा असेल तर खायचे कसे??*" तर एक तर या यांचे प्रमाण आहार मध्ये कमीच असावे, सलग खाणे टाळावे. कधीतरी खाल्ल्यास चालू शकेल. त्यातून हे दाणे भाजी करण्यापूर्वी हलके चेचून तूप टाकून चांगले भाजून घ्यावेत आणि मग याची भाजी करावी. याची भाजी करत असताना फोडणी तुपामध्ये द्यावी. शिवाय भाजी ताटात वाढून घेतल्यानंतर वरती तूप घालून खावे.

थोडक्यात काय या दाण्यांची भाजी अगदी कमी प्रमाणात कधीतरी चवीपुरती खाऊ शकता पण त्यासाठी त्याच्या जोडीला मुबलक तूप घ्यावे लागेल म्हणजे त्रास होणार नाही.
डॉ.सचिन पवार एमडी आयुर्वेद
डॉ पवार आयुर्वेद
पंचकर्म व रिसर्च सेंटर
राम मंदिर -काँग्रेस भवन रोड,
सांगली 9168337771

20/12/2025

© डॉ.सचिन पवार
एमडी आयुर्वेद सांगली

*थंडी आणि कोरडी त्वचा...*
*आयुर्वेद काय सांगतो????*

वातावरणामध्ये प्रचंड थंडी पडलेली आहे आणि या थंडी सोबतच कोरडेपणा ही भरपूर असल्यामुळे प्रत्येकाची त्वचा ही आता रेषा युक्त कोरडी, आणि त्या कोरडेपणामुळे अंगावरती कोरडी खाज उठणे अशी बनलेली आहे.
थंडीमध्ये जर आपण आपल्या त्वचेची काळजी घ्यायची असेल तर त्याच्यामध्ये आयुर्वेदानुसार आम्ही सामान्यपणे 3 उपाय सुचवतो..
*1. अभ्यंग तेल जिरवणे-जास्त कोरडी त्वचा*
*2. शतधौत घृत लावणे- नाजूक व गोरी त्वचा*
*3. कुंकूमादी तेल लावणे - कोरडी व काळवंडलेली त्वचा.*

*🌱1. अभ्यंगस्नान :* ज्यांची त्वचा खूपच कोरडी झाली आहे त्यांनी
सिद्धतेल, अभ्यंग तेल किंवा अगदी घरातील खोबरेल तेल कोमट करून हलके अंगाला जिरवून गरम पाण्याने आंघोळ करणे. अंग धुण्यासाठी दिवाळीतील उटणे,मसूर/ हरभरा डाळीचे पीठ वापरले असता त्वचेला कोरडेपणा येत नाही व वरील अनावश्यक तेलकटपणा निघून जातो.
जसे आपण दिवाळीमध्ये अभ्यंग स्नान करतो, तसेच अभ्यंग स्नान पुढील 2 थंडीचे महिने दररोज करणे गरजेचे आहे.

*🌱2. शतधौत घृत:* ज्यांची त्वचा नाजूक व गौरवर्णी आहे आणि त्यामध्ये थोडा कोरडेपणा जाणवत असेल तर त्यांनी शतधौत घृत म्हणजे शंभर वेळा तांब्याच्या ताटामध्ये घासून धुतलेले तूप त्वचेला लावावे. त्यांनी त्वचेचा कोरडेपणा कमी होतो व ग्लो पुर्वीप्रमाणे मिळतो. ( ❤️ यामध्ये वडपिंपळउंबराच्या सालींच्या काढ्याने सिद्ध शतधौत घृत सुद्धा केरळच्या कंपन्यांचे उपलब्ध आहे.)

*🌱3. कुंकुमादि लेपम् cream :* ज्यांची त्वचा थंडीने कोरडी पडून काळवंडलेली आहे त्यांनी कुंकूमादी लेपम् याचा आवर्जून वापर करावा. हा लेप( क्रीम) लावत असताना हाताला थोडे खोबरेल तेल लावून त्यावरती कुंकूमादि लेपम् हि क्रिम घेऊन त्वचेवरती हलके जिरवावे. (चेहऱ्याला लावून वाफ घेतली असता विशेष उजळपणा येतो.) याने त्वचेतील कोरडेपणा कमी तर होईलच शिवाय *त्वचा उजळ सुद्धा* होईल.

थोडक्यात थंडीच्या दिवसांमध्ये वातावरणातील थंड व रुक्ष म्हणजे कोरडा गुण वाढल्यामुळे त्वचेचे रक्षण करायचे असल्यास त्वचेला स्नेह अत्यंत गरजेचे आहे मग ते बाहेरून लावणे असू दे किंवा तुपासारखे पदार्थ पोटात घेणे असू दे. सोबतीला मनाचा स्नेह ❤️असेल तर अजून उत्तम.
टीम
डॉ. पवार आयुर्वेद, पंचकर्म व रिसर्च सेंटर राम मंदिर- काँग्रेस भवन रोड, सांगली

02/12/2025
सोरायसिस:ज्याचं नाव जरी ऐकलं तरी अंगावर काटा येतो अशा एक तपापासून असणाऱ्या जीर्ण त्वचा विकारातून मुक्तता...            आ...
28/05/2025

सोरायसिस:ज्याचं नाव जरी ऐकलं तरी अंगावर काटा येतो अशा एक तपापासून असणाऱ्या जीर्ण त्वचा विकारातून मुक्तता...

आयुष्याची आठ-दहा वर्षे फक्त अंग खाजवत घालवलेले बरेच रुग्ण आपण या आजाराने त्रस्त असलेले पाहतो. औषधोपचाराने तात्पुरता फरक पडतो पण पुन्हा तेच.
पण
जर, शुद्ध *आयुर्वेदिक औषधे व उत्तम पथ्य* पाळल्यास हा आजार समूळ बरा होऊ शकतो...

आम्ही आयुर्वेदाने असं काय वेगळं करतो की त्वचा विकार मुळापासून बरे होतात???? कसे बरे???*

जसे *दूधाप्रमाणे त्यावरची साय असते*, चांगले दूध असेल तर चांगली साय , खराब दूध असेल तर खराब साय. अगदी *तसेच रक्ताप्रमाणे त्वचा असते*. शरीरामध्ये चांगले रक्त असेल तर चांगली त्वचा , खराब रक्त असेल तर खराब त्वचा . त्यामुळे खराब त्वचा म्हणजेच त्वचा विकारांमध्ये जर आपण रक्ताला चिकित्सा केली ,
*रक्त शुद्ध होण्याचे चिकित्सा* केली व आयुर्वेदाच्या नियमाप्रमाणे आहार सेवन केला, *पथ्य पाळली* तर सर्व त्वचा विकार मुळापासून बरे केले जाऊ शकतात.

डॉ. पवार आयुर्वेद पंचकर्म आणि रिसर्च सेंटर, सांगली येथे नैसर्गिक आणि पारंपरिक उपचारांचा लाभ घ्या.

📍Shantikunj ,Near Cosmos Bank, Ram Mandir Corner, Sangli.

📞 9168337771
Diabetes|Blood Skin Diseases|Obesity


❤️❤️

डोळ्यात गेलेल्या रक्तातील संधिवातावर ..केली आयुर्वेदाने मात.डॉ. पवार आयुर्वेद पंचकर्म आणि रिसर्च सेंटर, सांगली येथे नैसर...
23/05/2025

डोळ्यात गेलेल्या रक्तातील संधिवातावर ..
केली आयुर्वेदाने मात.

डॉ. पवार आयुर्वेद पंचकर्म आणि रिसर्च सेंटर, सांगली येथे नैसर्गिक आणि पारंपरिक उपचारांचा लाभ घ्या.

📍Shantikunj ,Near Cosmos Bank, Ram Mandir Corner, Sangli.

📞 9168337771
Diabetes|Blood Skin Diseases|Obesity


❤️❤️

Visible healing, natural results – Ayurveda works!डॉ. पवार आयुर्वेद पंचकर्म आणि रिसर्च सेंटर, सांगली येथे नैसर्गिक आणि प...
16/05/2025

Visible healing, natural results – Ayurveda works!

डॉ. पवार आयुर्वेद पंचकर्म आणि रिसर्च सेंटर, सांगली येथे नैसर्गिक आणि पारंपरिक उपचारांचा लाभ घ्या.

📍Shantikunj ,Near Cosmos Bank, Ram Mandir Corner, Sangli.

📞 9168337771
Diabetes|Blood Skin Diseases|Obesity


❤️❤️

फक्त २ महिन्यांत सोरायसिस पूर्णपणे गायब!डॉ. पवार आयुर्वेद पंचकर्म आणि रिसर्च सेंटर, सांगली येथे नैसर्गिक आणि पारंपरिक उप...
11/05/2025

फक्त २ महिन्यांत सोरायसिस पूर्णपणे गायब!

डॉ. पवार आयुर्वेद पंचकर्म आणि रिसर्च सेंटर, सांगली येथे नैसर्गिक आणि पारंपरिक उपचारांचा लाभ घ्या.

📍Shantikunj ,Near Cosmos Bank, Ram Mandir Corner, Sangli.

📞 9168337771
Diabetes|Blood Skin Diseases|Obesity


❤️❤️

Visible results in just 2.5 months with Ayurvedic care.डॉ. पवार आयुर्वेद पंचकर्म आणि रिसर्च सेंटर, सांगली येथे नैसर्गिक ...
23/04/2025

Visible results in just 2.5 months with Ayurvedic care.

डॉ. पवार आयुर्वेद पंचकर्म आणि रिसर्च सेंटर, सांगली येथे नैसर्गिक आणि पारंपरिक उपचारांचा लाभ घ्या.

❤️❤️

2 Months. Pure Ayurveda. Total Healing!डॉ. पवार आयुर्वेद पंचकर्म आणि रिसर्च सेंटर, सांगली येथे नैसर्गिक आणि पारंपरिक उपच...
17/04/2025

2 Months. Pure Ayurveda. Total Healing!

डॉ. पवार आयुर्वेद पंचकर्म आणि रिसर्च सेंटर, सांगली येथे नैसर्गिक आणि पारंपरिक उपचारांचा लाभ घ्या.


❤️❤️

Address

Near Ram Mandir, On Congress Bhavan Road
Sangli
416416

Telephone

+91 91683 37771

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr Pawar ayurved, panchkarma & Garbhsanskar kendra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category