
11/03/2023
आज माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान आणि डॉ.केळकर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने "स्तनाचा कॅन्सर टाळावा यासाठी तपासणी व मार्गदर्शन" शिबिर संपन्न झाले.शिबिराची सुरुवात डॉ रणजीत केळकर यांनी पाहुण्यांना फुलझाड देऊन व दीपप्रज्वलन करून झाली.
कोल्हापूर येथील मोरया हॉस्पिटलमधील सर्जन डॉ. संगीता काटे - निंबाळकर यांनी एकूण 85 महिलांची तपासणी केली. त्याचप्रमाणे
आपल्या मार्गदर्शनात त्यांनी ,'स्तनाच्या कॅन्सर बाबत महिलांमध्ये असलेली भीती, स्वतः कशी तपासणी करावी, कॅन्सर वरील आधुनिक उपचार व शस्त्रक्रिया याबाबत मार्गदर्शन केले. तसेच महिलांच्या शंकांचे निरसनही केले. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा डॉ.संजीवनी केळकर, उपाध्यक्षा माधवी देशपांडे, खजिनदार डॉ. शालिनी कुलकर्णी, आरोग्य विभाग प्रमुख डॉ. केतकी देशपांडे व डॉ. सुपर्णा केळकर उपस्थित होते.