08/07/2022
*ॲनिमिया (रक्ताल्पता) -स्त्रियांमधील एक दुर्लक्षित विकार*
डॉ. नीता संजय यादव, सातारा
(9405593596)
(लेखिका महिलांविषयक आरोग्य तज्ज्ञ असून महिलांसाठी विविध सामाजिक उपक्रमही राबवत असतात.)
इंट्रो
*ॲनिमियामध्ये रक्तातील तांबड्या पेशींची म्हणजे RBCची संख्या कमी होते, तसेच RBC मधील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होत असते. ऍनिमिया हा विकार रक्ताल्पता, पांडूरोग (रक्ताच्या कमतरतेमुळे शरीर पांढरे पडते), रक्तक्षीणता, अरक्तता या अन्य नावांनीसुद्धा ओळखला जातो. रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण तपासून ऍनिमियाचे निदान केले जाते.*
हिमोग्लोबिन हे ऑक्सिजनला तांबड्या पेशींमार्फत शरीरातील उतींपर्यंत पोहचवण्याचे महत्वाचे कार्य करत असतो. मात्र कोणत्याही कारणाने ची संख्या कमी झाल्यास किंवा रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते तेंव्हा शरीरातील विविध अवयवांच्या उतींपर्यंत ऑक्सिजनचा पुरवठा योग्य प्रकारे होत नाही. अयोग्य आहार यांमुळे आपल्याकडे अनेक लोक ऍनिमियाने त्रस्त आहेत. विशेषतः सर्व वयोगटातील महिलांमध्ये ॲॅनिमियाचे प्रमाण चिंताजनक असे आहे. जेव्हा शरीरामध्ये ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या लाल रक्त पेशी पुरेशा नसतात. त्यामुळे ऍनिमिया. विविध प्रकारच्या ऍनिमियामध्ये लोहाच्या कमतरतेमुळे होणारा ॲनिमिया कॉमन आहे. कोणा व्यक्तीला ॲनिमिया झाला तर त्यास ऍनिमिक म्हणतात. यामध्ये त्वचा फिकट होते.
*ॲनिमियाचे प्रकार-* लाल रक्त पेशींचे रक्तामधील प्रमाण कमी होते. याची कारणे -
1. शरीर पुरेसे हिमोग्लोबिन तयार करत नाही.
2. हिमोग्लोबिन तयार होते पण ते नीट काम करत नाही.
3. पुरेशा लाल रक्त पेशी शरीरात तयार करत नाही.
4. शरीर लाल रक्त पेशी खूप जलद गतीने ब्रेक करतात.
तसेच, Iron deficiency anaemia, sickle cell anaemia हे पण प्रकार आहेत. स्त्रियांना मासिक पाळीचे वेळी होणारा आणि बाळंतपणाचे वेळी होणारा रक्तस्त्राव, तसेच गर्भाशयाच्या पिशवीमध्ये होणारे फायब्रॉइड्स हे ॲनिमियाचे मोठे कारण आहे. तसेच उपासमार, काही जुनाट आजार, कुपोषण, रक्त पातळ होणारी काही औषधे यांनी पण रक्त कमी होते.
*ॲनिमियाची लक्षणे -* ॲनिमियाची अनेक लक्षणे दिसतात. थकवा, दम लागणे, थंडी वाढणे, तसेच चक्कर, डोकेदुखी, वारंवार तोंड येणे, फिकट, कोरडी त्वचा, लगेचच ओरखडले जाणारी त्वचा, पायांमध्ये अस्वस्थपणा, हृदय गती जोरात धडधडणे.
*शरीरावर होणारे परिणाम-* शरीर थकलेले वा थंड वाटणे, तुटकी वा चमचा च्या आकाराची नखे, केस गळणे, चव बदलणे, कानामध्ये आवाज येणे. वेगवेगळ्या ॲनिमियामध्ये वेगवेगळ्या समस्या होतात. Sickle cell anaemia मध्ये हृदय व फुफ्फुसाचे प्रश्न असतात. जर ॲनिमियाचे वेेळीच उपचार नाही केले तर हृदयगती अनियमित होणे, हृदयाचा आकार वाढणे, हृदय अवसाद होणे हे होते. इन्फेक्शन लवकर होतात. डिप्रेशन लवकर येते.
रक्त कमी असेल तर अन्न नसणाऱ्या अखाद्य वस्तू खाल्ल्या जातात, चघळल्या जातात. जसे की खडू, माती खाणे, बर्फ चघळणे. खूप दिवस ॲनिमिया राहिल्याने आयुष्य मर्यादा कमी होते. लठ्ठ व्यक्तींना अनिमिया झाला तर ॲनिमियामुळे वजन कमी होते. कॅन्सर, वजन कमी करण्याचे पोटाचे ऑपरेशन यामध्ये पण ऍनिमिया होतो. जर ॲनिमिया गरोदरपणामध्ये असेल तर अपुऱ्या दिवसांमध्ये डिलिव्हरी होणे, कमी वजनाचे बाळ होणे बाळाला आयर्न लेवल कमी असणे हे होते. हे टाळायचे असेल तर गर्भावस्थेमध्ये लोहाच्या गोळ्या, लोहाने परिपूर्ण असणारा आहार, vit. B12, vit. B9 जीवनसत्व असणारी औषधे घ्यावीत. ॲनिमियाचे कारण शोधून उपचार करणे खूप महत्त्वाचे आहे.
*ॲनिमिया होण्याची कारणे -*
1. लोहाच्या कमतरतेमुळे
2. तळीं इ12 कमी असणारा आहार वा vit B12 चे शोषण न होणारा असा pernicious anaemia आजार
3. Folic acid युक्त नसणारा आहार
4. थॅलेसेमिया, सिकल सेल ॲनिमिया, असे अनुवंशिक रक्तविकार.
5. ज्यामधे लाल रक्त पेशी फुटतात.
6. हार्मोनचे असंतुलन होणारे जुने आजार ज्यामुळे लाल रक्तपेशी तयार होत नाहीत.
7. जुनाट दीर्घकालीन आजार.
8. ज्यामध्ये रक्त कमी होते असे आजार. व्रण,अल्सर, रक्ती मुळव्याध, अन्ननलिका दाह.
*ॲनिमिया कसा ओळखावा -* रक्ताच्या काही चाचण्या करून हे समजते. उलल मध्ये ीलल किती आहेत, त्यांचा साइज, शेप हे पण कळते. Vit. B12,vit B9,iron यावरून ही समजते. रक्त लघवीच्या तपासण्या, शौचावाटे रक्त जात असेल तर f***l occult blood test, colonoscopy हे करावे लागते. त्यामुळे आतड्यामधील रक्तस्त्राव समजतो.
*ॲनिमियावरील उपचार-* तोंडावाटे लोहाची औषधे, लोहयुक्त अन्न, ते शोषणासाठी मदत म्हणून Vit. C. यांचे सेवन. जुनाट किडनी आजार असतील तर शिरेवाटे देणे. रक्त भरणे. इतर कारणे असतील, इतर आजार असतील तर ते दुरुस्त करणे. जसे की पोटातील रक्तस्त्राव आणि इतर कारणे. जेनेटिक कारणांमध्ये जसे की सिकल सेल एनीमिया, थॅलेसेमिया यामध्ये बोन मॅरो ट्रान्सप्लांट करावे लागते. जुनाट किडनी विकारांमध्ये लोहाची औषधे, इंजेक्शने व या हार्मोनचे इंजेक्शन बे बोन मॅरोला रक्तकण तयार होण्यासाठी सांगण्यास द्यावे लागते. कॅन्सरचे उपचार चालू असतील तर रेडिएशन, केमोथेरपी यामध्ये ॲनिमिया होतो. त्यासाठी लोहाची, विटामिन बी ची औषधे लागतात.
*ॲनिमियाचा प्रतिबंधक कसा करावा?*
अनुवांशिक ॲनिमियाला काही प्रतिबंध नाही. तरीही आयर्नची कमतरता, विटामिन बी 12 ची कमतरता, इ9 ची कमतरता चांगले अन्न खाऊन भरून काढता येते. त्यामुळे अन्नामधील आयर्न शोषला जातो पाणी पुरेसे प्यावे लागते.
*काळजी काय घ्यावी?*
पोषकतत्वयुक्त संतुलित आहार घ्यावा. विशेषता लोह, फॉलिक एसिड, जीवनसत्व बी 12 ह्या पोषकतत्वांनी युक्त आहार घ्यावा. मद्यपान, धुम्रपान इ. व्यसनांपासून दूर राहावे.गर्भावस्थेमध्ये ॲनिमिया उत्पन्न होऊ नये यासाठी डॉक्टरांनी दिलेली लोह आणि फॉलिक एसिडची औषधे वेळच्यावेळी घ्यावीत. मासिक पाळीमध्ये अधिक स्त्राव येत असल्यास स्त्रीरोग तज्ञांद्वारा उपचार करुन घ्यावेत. सकस आरोग्यपूर्ण आहार,पुरेसे पाणी पिणे,नियमित व्यायाम, रसायनांचा संसर्ग टाळणे,इन्फेक्शन होऊ नये म्हणून वारंवार हात धुणे,दातांची नियमित काळजी घेणे, दंतवैद्यक दाखविणे, काही लक्षणे सापडली तर डॉक्टरांना दाखवणे.
*असा असावा आहार -* पालक, पिस्ता, मटण, शेंगा, हिरव्या पालेभाज्या, विटामिन सी, बेरीज, मिरे, टोमेटो, मनुके.याशिवाय दूध व दुधाचे पदार्थ, नारळ, शेंगदाणे, तीळ, गुळ, मसूर डाळ, मोड आलेली कडधान्ये, सुखामेवा, अंडी, मांस, मासे, चिकन यांचाही आहारात समावेश असावा. यांमुळे हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढण्यास मदत होते.