18/08/2022
होमिओपॅथी म्हणजे काय ?
याचा विचार करण्यापूर्वी प्रथम औषध म्हणजे काय हे समजले पाहिजे . जगातील कोणताही असा एक पदार्थ की जो प्राणीमात्रांच्या शरीरात गेल्यावर त्या शरीराच्या रचनेमध्ये किंवा क्रियेमध्ये तद विशिष्ट फरक उत्पन्न करतो तो पदार्थ औषध आहे असे समजावे . कारण त्याच्या अंगी अशी शक्ती असल्याशिवाय त्याचा रोगग्रस्त शरीरावर काही परिणाम होणार नाही . अशा औषधांची रोग बरे करण्याकरता योजना करण्याचे शास्त्र त्याला चिकित्सा शास्त्र म्हणतात . या चिकित्सा पद्धती अनेक आहेत यामध्ये होमिओपॅथी ही एक चिकित्सा पद्धती आहे . Similia similibus curanture हे या पद्धतीचे तत्व आहे . उदाहरणार्थ, एखादे औषध साधारण सशक्त मनुष्यास काही वेळा दिल्यानंतर जसली लक्षणे उत्पन्न होतात तसलीच लक्षणे रोगाच्या योगाने एखाद्या झाल्यास त्याला ते औषध देऊन बरे करावयाचे याला होमिओपॅथी म्हणतात . डॉ. सॅम्युअल हनिमन यांनी 19व्या शतकाच्या आरंभी या तत्त्वाचा शोध लावला तेव्हापासून गेल्या १०० वर्षात सर्व जगभर या तत्त्वाचा प्रसार होऊन हेच खरे चिकित्सा तत्व आहे असे ठरले आहे . कारण बाकीच्या पद्धतीची तत्वे सारखी पालटत चालले आहेत उलट होमिओपॅथीचे तत्व शंभर वर्षाच्या अनुभवाने काही फरक न होता कायम राहिले आहे.
डॉ देवदत्त पटवर्धन.