02/09/2022
*बाळ आणि आईसाठी स्तनपानाचे महत्व*
*जागतिक स्तनपान सप्ताह का साजरा केला जातो?*
डॉ. नीता संजय यादव.
(9405593596)
(लेखिका महिलांविषयक आरोग्य तज्ज्ञ असून महिलांसाठी विविध सामाजिक उपक्रमही राबवत असतात.)
इंट्रो
वर्ल्ड अलायन्स फॉर ब्रेस्टफीडिंग ऍक्शन (डब्ल्यू ए बी ए) च्यावतीने 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताहाच्या वार्षिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. जगभरातील नवीन मातांमध्ये स्तनपानाविषयी जागृती निर्माण करणे, त्याचे समर्थन करणे आणि प्रोत्साहन देणे हा ह्यामागील हेतू आहे. जागतिक स्तनपान सप्ताह का साजरा केला जातो?
जगभरात सर्वत्र स्तनपान करणाऱ्या मातांचे संरक्षण, समर्थन आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी जागतिक स्तनपान सप्ताह आयोजित करून तो साजरा केला जातो.
1992 मध्ये पहिल्यांदा जागतिक स्तनपान सप्ताह साजरा करण्यात आला आणि त्या काळापासून, जगभरातील संस्थांद्वारे त्यास मान्यता मिळाली. जागतिक स्तनपान सप्ताहाचा इतिहास
जेव्हा जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) आणि युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रन्स इमर्जन्सी फंड (युनिसेफ) यांनी स्तनपानाचे संरक्षण, प्रोत्साहन आणि समर्थन करण्यासाठी इनोसेन्टी डिक्लरेशन म्हणून ओळखले जाणारे एक निवेदन तयार केले तेव्हा स्तनपानाचे महत्त्व जागतिक स्तरावर ओळखले गेले. इनोसेन्टी डिक्लरेशन एक औपचारिक दस्तऐवज आहे आणि ते उद्दीष्ट साध्य करण्यासाठी तयार केले गेले होते, त्यामध्ये खालील गोष्टींचा समावेेश केला गेलेला होता.
मातांना स्तनपान चालू ठेवण्यासाठी प्रोत्साहन देणे
बाळासाठी अनुकूल हॉस्पिटल उपक्रम वडिलांना माता, आरोग्य सेवा कामगार आणि समुदायाला पाठिंबा देण्यासाठी मार्गदर्शन आणि शिक्षण स्तनपान करणाऱ्या मातांचे संरक्षण आणि समर्थन करण्यासाठी कायदे आणि धोरणे तयार करणे. जगभरातील स्तनपान करणाऱ्या समुदायाला एकत्र करणे, स्तनपानास सार्वजनिक समर्थन वाढवणे आणि इनोसेन्टी घोषणेची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी जागतिक स्तनपान सप्ताह साजरा करतात. तुम्ही खालीलपैकी एक किंवा अधिक गोष्टी करू शकता.
1. आपल्या लहान मुलाला स्तनपान करा जागतिक स्तनपान आठवडा साजरा करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे, अर्थातच, आपल्या लहान बाळाला स्तनपान देणे आणि त्याचे पोषण करणे! आपल्या सर्वांना माहीत आहे की आई आपल्या बाळाला पाजण्यासाठी सदैव तयार असते, त्यासाठी विशिष्ट तारखांची आणि उत्सवाची गरज नसते. जर तुम्ही सध्या बाळाला स्तनपान देत असाल तर ह्या आठवड्यात सुद्धा तुम्ही ते उत्साहाने केले पाहिजे.
2. विविध एजन्सीद्वारे प्रायोगिक कार्यक्रम, व्याख्याने किंवा वॉक
जागतिक स्तनपान सप्ताहा दरम्यान जागरूकता निर्माण करण्यासाठी अनेक संस्था वॉक, सेमिनार इत्यादी प्रायोजित करतात. त्यासाठी आपला पाठिंबा दर्शविण्यासाठी लोगो असलेले टी शर्ट, बांगड्या याचे वाटप करतात.
3. स्तनपानाच्या सुट्टीसाठी जा. आपल्या दिनचर्येतून थोडा वेळ काढून कुटुंबासह सुट्टीवर जा. दररोजच्या कामांमध्ये आणि चिंतांमध्ये न अडकता ह्या कालावधीत तुमच्या बाळाला स्तनपान दिल्याचा आनंद घ्या, थोडा वेळ काढा आणि आराम करा, योगा, ध्यान किंवा आपल्या मनाला, शरीराला आणि आत्म्याला नवचैतन्य देणारी कोणतीही क्रिया करा. विशेषत: या महत्त्वाच्या काळात हे अगदी गरजेचे आहे. काही वेळा काही अडचणींमुळे तुम्ही प्रवास करू शकत नसल्यास तुम्ही घरीच छोट्या सुट्टीचे नियोजन करू शकता. शेवटी, आपल्या लहान बाळासोबत आणि आपल्या पतीसोबत आराम करण्यासाठी आणि दर्जेदार वेळ घालवण्यासाठी घर हे एक परिपूर्ण ठिकाण आहे!
स्तनपान संदर्भात काही गैरसमजुती
1. उजव्या स्तनामध्ये अन्न असते आणि डाव्या स्तनामध्ये पाणी असते-
ही चुकीची समजूत आहे. बाळाला स्तनपान करताना प्रथम पाण्यासारखे द्रवपदार्थ येतात. नंतर फॅट्स असणारे दूध असते. त्यामुळे बाळाला एका वेेळी एकच ब्रेस्ट पूर्णपणे पाजणे. म्हणजे सर्व प्रकारचे पोषक घटक मिळतील आणि बाळाचे पोट भरेल. बाळाची वाढ व्यवस्थित होईल.
2. प्रसूतीनंतरचे सुरुवातीचे दूध बाळाला देऊ नये, ही कल्पना चुकीची आहे,ते आता सिद्ध झाले आहे. पहिल्या दुधाला गोल्डन मिल्क म्हणतात. इमिनोलोबिलिन जास्त असते. ते अगदी थोडेसे आले, चमचाभर मिळाले,थेंब भर मिळाले, कितीही कमी प्रमाण असू दे तरी ते पॉवरपॅकड आहे. शक्तीने पूर्णपणे भरलेले आहे. पोषण मुलांनी भरलेले परिपूर्ण असे ते आहे. कॅलरीजने पूर्ण बाळाची सुरुवातीची भूक कमीच असते.गोल्डन मिल्कचे प्रमाण कमीच असते. त्याला कोलेस्ट्रुम असेही म्हणतात. ते दूध बाळाला पुरेसे आणि पूरक आहे.
3. स्तनाचा आकार लहान असेल तर दूध कमी येईल-प्रसूतीनंतर येणाऱ्या दुधाची तीव्रता ही स्तनाच्या आकारावर अवलंबून नसते. स्तना मध्ये दोन प्रकारच्या पेशी असतात, एडीपोज टिशू आणि सिक्रेटिव्ह टिशू. दूध बनवणारे सिक्रेटिव्ह टिशू ह्या पेशी सर्वांनाच असतात. सर्वांना फॅट कमी जास्त असते. फॅट जास्त असतील तर स्तनाची साईज जास्त असते. फॅट कमी असेल तर स्तनाची साईज कमी असते दूध बनण्याची कॅपॅसिटी फॅटवर अवलंबून नसते. सिक्रेटिव्ह टिशूवर असते.
4. दूध पिल्यावर दूध वाढते, दुधावर दूध पडते-हे संपूर्णपणे चुकीचे आहे. जेवढे बाळ स्तनपान करेल तेवढे ते जास्तीचे येईल. बाळाचे तोंड स्तनाला लागले की मेंदूकडून दूध स्त्रवण्याची आज्ञा मिळते आणि ते वात्सल्य स्त्रवते आणि पान्हा फुटतो. बाळाच्या नुसत्या आठवणीने ही अनेक वेळा दूध गळू लागते. दूध हे स्तनपान करून, ब्रेस्ट पंपने, हाताने पिळून काढू शकता. फक्त दूध पिल्याने दूध वाढत नाही.
5. पहिल्या बाळाला पाजू शकले नाही आता दुसऱ्याला पण तसेच होणार - यासंदर्भात एक्सपर्टची मदत घ्या. डॉक्टरांना भेटा पहिले वेळी काय समस्या झाली होती ज्यामुळे दूध पाजू शकला नाहीत. दुसऱ्या वेळी हा प्रॉब्लेम येईलच असे नाही आणि त्यासाठी आधीच तयारीत राहणे. समस्या येऊ नये म्हणून काळजी घेणे. समस्या आली तर काय उपाय करायचे त्याची आधीच तयारी हवी. कदाचित वेगळी अवस्था असेल पहिले वेळी. दुसरे वेळी ती समस्या असेलच असे नाही. योग्य मदतीने आणि सल्ल्याने तुम्ही योग्य ती काळजी घ्या.
6. स्तनपानाचे वेळी विशिष्ट गोष्टी खाव्यात - घरातील म्हातारी माणसे ज्येष्ठ माणसे,वयस्कर लोक फोर्स करतात हेच खा, ते खाऊ नको,असे कर,पाणी कमी पी,दूध पातळ येईल. तर नेहमी लक्षात ठेवा,आपल्या भुकेप्रमाणे कमी जास्त जसे असेल तसे खावे आणि नेहमीचे अन्न जी आपल्याला सवय आहे,आपण जे खात आलो आहे, ते नेहमीच खा. तहान लागली की पाणी प्या. घाम आला की भूक वाढेल तसे जेवण जाईल. आजारी पडू नये असा आहार घ्यावा.
7. बाळाला वीस मिनिटे स्तनावर ठेवावे लागेल-असे काही नसते स्तनावर ठेवायची वेळ आणि स्तनपानाची वेळ ह्या वेगवेगळ्या असू शकतात बाळाला पकडून ठेवले तरी सुद्धा तो पीत नसेल तर अर्धा अर्धा तास ठेवूनही काही अर्थ नाही. बाळाची भूक किती आहे,ओढण्याची ताकद किती आहे,ओढण्याची वेळ किती आहे हा वेगवेगळा असू शकतो पंधरा मिनिटांपासून 45 मिनिटापर्यंत ही वेळ असू शकते. बाळाचे मागणीनुसार स्तनपान करावे.
8. स्तनपानाचे काळामध्ये आई कोणतेही औषध घेऊ शकत नाही-
हे पण पूर्णपणे चुकीचे आहे. अशी अनेक औषधे आहेत ती आई घेऊ शकते.जी औषधे बाळ घेऊ शकते ती औषधे आई घेऊ शकते. आई आजारी असताना डॉक्टरांकडे गेली तर डॉक्टरांना सांगा, बाळ अंगावर पिते आहे. त्यानुसार डॉक्टर औषध योजना करतील विनाकारण त्रास काढायची गरज नाही. गरज असेल तिथे चालणारी औषधे घेऊ शकता, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार.
9. एक वर्षानंतर बाळाला आईच्या दुधाची गरज नसते - WHOअनुसार वयाची दोन वर्षे बाळाला आईच्या दुधाची गरज असते. वयाचे एक वर्षानंतर कदाचित बाळाची खाण्याची गरज जास्त असेल, परंतु आईच्या दुधातले घटक बाळाच्या वाढ आणि विकासासाठी आवश्यक असतात. कमीत कमी दोन वर्षे दूध पाजू शकतात.
10. आई आजारी असेल तर स्तनपान करायचे नाही - आई आजारी असताना बाहेरून जी लक्षणे दिसतात,ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी हे आधीपासूनच त्याचे व्हायरस आईच्या शरीरामध्ये काही दिवस आधी असतात. तेव्हा बाळ आईजवळ असते. त्यामुळे ते आधीच बाळ व्हायरस बॅक्टेरिया यांना एक्स्पोज झालेले असते.आजारी असतानाच स्तनपान केले जाते.
तेव्हा बाळाच्या शरीरामध्ये एंटीजन गेलेले असतात. नंतरही स्तनपान करत राहिले तर बाळाला आईच्या दुधातून अँटिबोडीज मिळतात.
स्तनपान करताना येणाऱ्या अडचणी
1. बाळ दूध पीत नाही,ओढू शकत नाही ही कॉमन समस्या-
याची काय कारणे असू शकतील? अगदी साधे कारण हे असते की, बाळाची पोझिशन नीट नसते. आईची डिलिव्हरी नुकतीच झालेली असते. बाळासोबत आईपण नव्याने जन्माला आलेली असते हे लक्षात ठेवायला हवे. बाळाला जवळ घेताना त्याचे डोके, खांदे आणि कंबर एका रेषेमध्ये असावे. स्तनपान करताना बाळाचे नाक दबू नये याची काळजी घ्यावी. स्तन पिणे, हे ओढणे, गिळणे आणि श्वसन याचे संतुलन को-ऑर्डिनेशन आहे. बाळ नीट श्वास घेऊ शकत नसेल तर,तो नीट ओढू शकत नाही म्हणून त्याचे नाक नेहमी फ्री असावे. बाळाची पोझिशन नीट नसेल तर डाव्या हाताने बाळास पकडणे,क्रॉस फील मेथड किंवा फुटबॉल होल्ड मेथड असे पकडले तर जास्त मदत होईल.
2. स्तनपान न देऊ शकण्याचे दुसरे कारण असे असू शकते की आईला चपटे निपल किंवा इन्वर्टेड खोल निपल असतात. क्रॉस्फिडल किंवा फुटबॉल होल्ड ट्राय केला असेल तरीही बाळ पीत नसेल तर कदाचित निपलशिल्डची गरज पडेल. निपल शील्ड एक प्लास्टिकचे शील्ड असते, सिलिकॉनचे असते. ठराविक टेक्निकने ते आपण वापरू शकता. तुमचे डॉक्टर तुम्हाला शिकवतील. हे एखाद्या आठवड्यापुरते वापरायचे असते.बाळाचे तोंड लागले की ते सहजपणे दूध पिऊ शकते. एक आठवड्यानंतर तुम्ही हळू हळू बाळ शील्ड शिवाय दूध पिईल हे पाहिले पाहिजे.
3. सर्वात कॉमन प्रश्न-
निपलमध्ये वेदना आहेत हे नॉर्मल आहे काय ? स्तनपान करताना कधीही वेदना, हर्ट वाटले नाही पाहिजे. जर वेेदना आहे तर नक्कीच नीट पहावेे की बाळाची पकड नीट आहे काय ? फ्लॅट निपल आहे काय?बाळाची जीभ अपुरी पडती आहे काय?ती टंग टाईज वा लीप टाईज मुळे अशी होते. त्यामुळे जीभ नीटपणे बाहेर येत नाही आणि बाळ नीटपणे स्तनपान करू शकत नाही. नीट पाहून ठरवून हे कसे नीट होईल ते पहावेे.फार तर दूध काढून टाकावे.
4. स्तनामध्ये वेदना,सूज, एंगोर्जमेंट वेगवेगळ्या अवस्थांमध्ये होते. जेव्हा दूध भरते, तेव्हा ते नॅचरली होते. प्रसुतीनंतर तीन ते पाच दिवस होते. तेव्हा दुधाचा फ्लो एकदम वाढतो. तसेच बाळ कधी नीट पिऊ शकत नाही,तेव्हा पण असे होते. बाळाच्या भुकेपेक्षा जास्त दूध येत असेल तर, तसेच बाळाचे दूध सोडवताना पण दूध साठते. दूध साठले की वेेदना होतात. आधी दूध हाताने वा ब्रेस्ट पंपने काढू शकतो.गरम पाण्याने शेकून मग ते इझिली निघेल. त्यासाठी टॉवेेल गरम पाण्यात बुडवून गरम पाण्याने शेकून घ्यावे. नंतर दूध काढून मग कोल्ड पॅक लावू शकता.गरम पाण्याने शेकून दुधाच्या वाहिन्या नलिका ग्रंथी प्रसारित पावतात मग दूध काढावे दूध काढल्यानंतर बर्फ कापडात गुंडाळून कोल्ड पॅक लावावा. त्याने सूज कमी होईल. फ्रोजन वाटाणे वा फ्रोजन कोबी पण लावू शकता. पत्ता कोबी फ्रिजमध्ये ठेवून मग ब्रा च्या आतमध्ये सूज लवकर कमी होण्यासाठी लावतात.
5. सर्व आईंना वाटते की माझ्या बाळाचे वजन कमी आहे. दुसऱ्या मुलांची अजिबात तुलना करू नका. तुलना ही जन्माचे वेळचे वजनाशी करा. पाच महिन्यात जन्मतःचे वजन असेल,त्याच्या डबल वजन व्हावेे.एक वर्षाच्या होईपर्यंत तिप्पट वजन होणार आहे आणि दोन वर्षात जन्माच्या वजनाच्या चौपट वजन होणार आहे. जन्मतः वजन कमी असेल तर कमीच वजन भरेल.कोणत्या मुलाचे वजनाची कधी तुलना करू नका. जर वजन कमी असेल तर त्याचे कारण शोधावे.े कधी बाळे आजारी असल्याने नीट पिऊ शकत नाहीत.को-ऑर्डिनेशन झाले नाही तरी पण नीट पिऊ शकत नाहीत. काहीच कारण नसेल तर बाळाला दूध आवडत नाही.24 तासांमध्ये सहा वेळा बाळाची मूत्र प्रवृत्ती झाली असेल, तर वजन वाढते आहे,तर दूध पुरेसे आहे असे समजावे. ब्रेस्ट फीडिंगचे बाळांचे दुग्धपान मोजू शकत नाही. ते युरीन आउटपुट वरून समजते.
दूध वाढण्याचा एकच उपाय, जागतिक नियम आहे. जितके आपण देतो तितके आपण मिळवतो.तसेच जितके स्तनपान कराल तितके ते वाढेल. जेवणाच्या वेेळा पाळाल,भूक लागेल तेवढे खा,दुधाचा पुरवठा वाढण्यासाठी प्रेस फीड कराव्ेो. बाळ छोटे असेल, प्री मॅच्युअर, nionetalआयसीयू मध्ये मध्ये असेल तर, जितके वेेळा बाळ पिते तितके वेेळा दूध एक्सप्रेस करा. अशावेळी दर दोन-तीन तासांनी दूध काढावे लागेल तरच ते वाढेल.