Saish Physiotherapy stroke prevention and rehabilitation clinic

  • Home
  • India
  • Satara
  • Saish Physiotherapy stroke prevention and rehabilitation clinic

Saish Physiotherapy stroke prevention and rehabilitation clinic physiotherapist

27/06/2025
*माहिती फिजिओथेरपी ची( Physiotherapy Awareness)*NeuroPhysiotherapy (मेंदू मज्जातंतू व नसा यांचे उपचार) आपल्या सर्व शारीर...
18/08/2023

*माहिती फिजिओथेरपी ची( Physiotherapy Awareness)*

NeuroPhysiotherapy (मेंदू मज्जातंतू व नसा यांचे उपचार)
आपल्या सर्व शारीरिक क्रिया Control करणारा बॉस म्हणजे मेंदू. त्यामुळे यातील बिघाड म्हणजे काळजीपूर्वक उपचार आणि योग्य अचूक वेळ हे महत्त्वाचे. करण म्हणतात यथा राजा तथा प्रजा!!
या system चे भाग म्हणजे लहान व मोठा मेंदू(Cerebrum ,Cerebellum), मज्जातंतू (Spinal Cord),(Nerves )नसा .... या कोणाचेही आजार, विकार, अकार्यक्षमता यामुळे जी लक्षणे दिसतात त्यांवर फिजिओथेरपी मधील उपाय उपयुक्त ठरतात.

यातील काही ठळक आजार पुढील प्रमाणे:-
1.Stroke (पक्षाघात, पॅरॅलिसिस,अर्धांगवायू, )
2.Seizures(फिट येणे)
3.Parkinson's Syndrome (हातापायांना कंप येणे)
4.Head Injury (मेंदू व डोक्याला होणारी अपघाती इजा)
5.Vertigo ( चक्कर)
6.Migrane(अर्धशिशी)
7.Tumors of Brain and Spinal cord ( कर्करोग)
8.Peripheral Neuropathy ( हातापायांची आग, मुंग्या येणे, संवेदना जाणे)
8.Facial palsy (चेहर्‍याचा पॅरॅलिसिस)
9.GBS
10.Vestibular syndrome
11.Myopathies (नासाच्या दाबामुळे होणारे त्रास)
12. मणक्याचे आजार, चकती दबणे

उपलब्ध उपचार:-
1.NDT (Neuro Developmental Technique)
2.PNF (Proprioceptive Neuromuscular facilitation)
3.CIMT(Constraint Induce Movement Therapy)
4.SI ( Sensory Integration Therapy)
5.Vestibular Rehabilitation Techniques
5.Rood's Approach for Tone Facilitation or inhibition
6.McKenzie
7.Brunstorm' Movement therapy
8.Kinesiotherapy for the particular condition
9 Electrotherapy for the particular condition
Etc

वरील कोणत्याही आजारांसाठी फिजिओथेरपिस्ट ना संपर्क करा

Dr Devayani Mukund Moghe
MPT(NEUROSCIENCE),COMT MIAP
Fellow in Diabetic foot care
Contact :9518386101
Saish Physiotherapy and Neurorehabilitation clinic
124,Cooper colony camp satara

04/08/2023

💡Spinal manipulation added to thoracic exercise was more effective than thoracic exercise alone for improving pain and quality of life at the end of 8th session of care.

👉🏻 This is from the new paper " The Effects of Spinal Manipulation Added to Exercise on Pain and Quality of Life in Patients with Thoracic Spinal Pain: A Randomized Controlled Trial" by Waqas et al 2023

📚 Do you struggle to stay on top of new research?

😫 You're not alone!

✅ Physio Network’s Research Reviews make it easy for you to keep up to date and provide better care for your patients. Try it for free for 7 days now!

🔗 https://physio.network/7dayfreetrial

—---------

Disclaimer: Sharing a study is NOT an endorsement. You should read the original research yourself and be critical.

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 💐 संकल्प तसेच कागदावर किंवा मनात न राहता कार्यसिद्धी व्हावी म्हणून नवीन वर्षात पुन्हा ले...
02/01/2023

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 💐
संकल्प तसेच कागदावर किंवा मनात न राहता कार्यसिद्धी व्हावी म्हणून
नवीन वर्षात पुन्हा लेखनास सुरवात!!

*आजचा विषय : बेलस् पाल्सी आणि फेशियल पाल्सी*

हिवाळ्यात हा त्रास बरेच जणांना होतो. थंड हवेतील प्रवास, कानातील इन्फेक्शन, दातांचा त्रास किंवा इतर इन्फेक्शन मुळे चेहर्‍याच्या स्नायूंना कंट्रोल करणारी nerve म्हणजेच Facial Nerve हिला सूज येते. त्यामुळे चेहर्‍याचा डावा किवा उजवा अर्धा भाग वाकडा दिसू लागतो, डोळ्यातून सतत पाणी वाहते, डोळा संपूर्ण बंद न होता उघडा राहतो ओठांच्या कमकुवत स्नायू मुळे तोंडातून पाणी बाहेर सांडते .
या सारखी लक्षणे दिसतच घाबरून जाऊ नये. त्यावर त्वरित डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावेत.
तसेच फिजिओथेरपी मधील इलेक्ट्रिकल स्टीम्यूलेशन , कायनेसियो थेरपी आणि इतर अत्याधुनिक थेरपी यांमुळे आशा आजारात फरक पडतो.
या आजाराचे दोन प्रमुख प्रकार असतात व त्याची कारणे भिन्न आहेत
1.Upper Motor Neuron palsy
2.Lower Motor Neuron palsy (Bell's Palsy)
Facial Nerve la कोणत्या ठिकाणी इजा होईल त्यावरून त्याचे निदान केले जाते. तसेच त्या प्रकारावर आजाराची तीव्रता,बर होण्याचा कालावधी हे ठरते.
क्रमशः......

लेखन:
डॉ देवयानी मुकुंद मोघे
(Neurophysiotherapist)

World diabetes day 14 th November
14/11/2022

World diabetes day 14 th November

आपले शरीर हे साधारण 11 संस्था चे बनले आहे. त्यामधील एक मुख्य संस्था म्हणजे Musculoskeletal system(अस्थी व स्नायू संस्था)...
04/08/2021

आपले शरीर हे साधारण 11 संस्था चे बनले आहे. त्यामधील एक मुख्य संस्था म्हणजे Musculoskeletal system(अस्थी व स्नायू संस्था)
आपल्या शरीरात सर्वसाधारणपणे जन्माच्या वेळेस 640 ते 850 प्रकारचे स्नायू तसेच 270 हाडे असतात. वाढत्या वयात ही हाडे जोडली गेल्यामुळे (fusion) साधारणपणे 206 इतकी होतात. Physiotherapy
या दोन्ही पासून सांधे बनतात. त्यामध्ये हाताचे व पायाचे सांधे तसेच मणके यांचा समावेश होतो. हाडांचे मुख्य कार्य म्हणजे शरीरास भक्कम असा आकार व आधार देणे (Robust skeleton).
स्नायू, लिगामेंटस,मेनीस्सकस अशा soft tissue pasun शरीराची हालचाल प्रणाली तयार होते.
स्नायूंमध्ये लवचिकता (flexibility),ताकद(strength),ऊर्जा (power),सहनशक्तीचा (Endurance) अशा पद्धतीचे गुणधर्म दिसून येतात.
हाडांची व सांधेची health ही स्नायूंच्या मजबूती वर अवलंबून असते.
अशा निरोगी हाडे व स्नायूंची आजच दखल घ्या! फिजिओथेरपी च्या मदतीने आपले आरोग्य निरोगी बनवा
Health is wealth! निरोगी आयुष्य ही खरी संपत्ती !
Physiotherapy

Dr Devayani Mukund Moghe
MPT(Neuroscience) fellow in diabetic foot care ,COMT, MIAP
Contact: 9518 386 101

*मणक्याचे व मज्जातंतू चे आजार, विकार*भाग 2मागील लेखात आपण पाठदुखी ,मान दुखी यांची लक्षणे व त्याची कारणे पाहिली. फिजिओथेर...
03/05/2021

*मणक्याचे व मज्जातंतू चे आजार, विकार*
भाग 2
मागील लेखात आपण पाठदुखी ,मान दुखी यांची लक्षणे व त्याची कारणे पाहिली. फिजिओथेरपी मध्ये यावरील उपचार पाहू.
फिजिओथेरपी ही विना औषधोपचार उपचार पद्धती आहे.यामध्ये प्रामुख्याने दोन प्रकारच्या पद्धतींचा समावेश होतो
*Electro therapyम्हणजे काही उपचारात्मक Therapeutic Currents चा वापर*
1.पाठदुखी साठी मुख्यतः लक्षणांच्या कालावधी नुसार (Acute /Chronic)
गरम किंवा थंड शेक ( Heat or Cryotherapy) यांचा वापर केला जातो. सामान्यतः पाठीच्या मणक्याचे आजार यामध्ये गरम शेक उपयोगी ठरतो.
2. दुखणे कमी करण्यासाठी TENS (Transcutaneous Electrical Nerve Stimulation)
3.दुखणे किंवा त्यामुळे हातापायातून येणार्‍या मुंग्या यासाठी IFT (Interferential Therapy)
4.Intermittent Traction मणक्याचे ट्रक्शन
5.Advance Electrical therapy (Matrix rhythm therapy, PEMF Etc)अत्याधुनिक यांत्रिक उपचार

*Exercises Therapy म्हणजे शास्त्रोक्त व्यायाम व त्याबरोबर केले जाणारे शरीर रचनेतील बदल*
यामधे प्रामुख्याने (Active Exercises) पेशंट ne स्वतः करायचे व (Passive Exercises)म्हणजे फिजिओथेरपिस्टनी पेशंट्स कडून करवून घ्यायचे असे व्यायाम प्रकार समाविष्ट होतात.
मणक्याच्या दुखण्यामध्ये स्वरूप, कालावधी, तीव्रता पाहून पुढील उपचार केले जातात
•Postural corrections and Kinetic chain realignment
शरीर रचना सुयोग्य करणे
•पाठीच्या स्नायूंची मजबुतीकरण करणे (Strength training)
•आखडलेल्या स्नायूंना ताण देऊन सरळ करणे (Stretching exercises)
या प्रकारे आजाराचे स्वरुप पाहून त्याप्रमाणे Tailormade ( रुग्णाच्या आवश्यकतेनुसार) उपचाराचा शिष्टाचार (Treatment Protocol) ठरवला जातो .
या पद्धतीच्या पारंपरिक (Conventional) तसेच अत्याधुनिक (Advance) उपचार पद्धतींचा वापर करून बहुतांश वेळा मणक्याच्या समस्या Physiotherapy ने बर्‍या केल्या जातात.

[कोणतेही उपचार किंवा व्यायाम वैद्यकीय सल्ल्यानुसार करावेत ]
अधिक माहितीसाठी संपर्क:

लेखन
*डॉ.देवयानी मुकुंद मोघे*
MPT Neuroscience, COMT
Fellowship in Dibetic foot care
*Saish Physiotherapy clinic satara*
Contact 📱📞 *9518386101*

जागतिक आरोग्य दिन लेखन शृंखला भाग 1*मणक्याचे व मज्जातंतू चे आजार, विकार*पाठीचा कणा (spine) व त्यामधून जाणारा मज्जातंतू(s...
16/04/2021

जागतिक आरोग्य दिन लेखन शृंखला
भाग 1
*मणक्याचे व मज्जातंतू चे आजार, विकार*
पाठीचा कणा (spine) व त्यामधून जाणारा मज्जातंतू(spinal cord) हा मानावी शरीरातील महत्त्वाचा भाग समजला जातो. याच कण्यामुळे मानव हा 'दोन' पायांवर उभे राहू, चालू शकणारा प्राणी आहे (bipedal 🧍‍♂️ 🧍‍♀️).
पाठीचा कणा हा 33 मणके (vertebrae) 23 डिस्क यांचा बनलेला आहे. याचे प्रामुख्याने 5 भाग केले जातात
1.Cervical spine मानेचे मणके
2.Thoracic spine छातीचे मणके
3.lumbar spine पाठीचे मणके
4.Sacaral spine कंबरेचे मणके
5.Coccygeal माकड हाड
मणक्याचे त्रास हे सर्व वयोगटात दिसून येतात. त्यांचे स्वरुप, तीव्रता त्यायोगे असणारे उपचार हे विविध पद्धतीचे असतात.
कमी वयात (Early age group) मध्ये आढळून येणारे आजार हे बैठी जीवनशैली(sedentary life style)कामाचे स्वरुप (occupational disorders), बसण्याची पद्धत (posture),चालण्याची पद्धत (Gait pattern) इत्यादी कारणांमुळे होतात.
वृद्धापकाळाने येणारे (Geriatric)त्रास हे मणक्याची झीज (Degenerative changes), त्यामुळे डिस्क वर येणारा ताण इत्यादी अनेक कारणामुळे होतात. सर्वसामान्यपणे परिचित (spondylosis)हा मानेच्या व पाठीच्या मणक्यांची झीज झाल्यामुळे होतो.
इतर समस्या
•spondylitis(मणक्याचा वातरोग ), •spondylolisthesis (मणके सरकणे ),
•मणक्यामध्ये संसर्ग (infectional diseases of spine)
•रचना बिघडणे (scoliosis, kyphosis)
•disc सरकणे (PIVD)
•मणक्याचा व्यास कमी होणे(canal stenosis)
इत्यादी .

■लक्षणे ■
पाठ, मानेचे दुखणे (neck and back pain)
कंबर दुखणे (lower back pain)
हात पायातून मुंग्या येणे (tingling)
हाता पायामध्ये बाधीरपणा येणे (numbness)
संवेदना कमी होणे (sensory loss)
हातामधील ताकद कमी होणे (loss of motor functions)
स्नायू आखडणे(Muscle spasm)त्यामुळे कण्याची हालचाल कमी होणे (decreased range of motion)
इत्यादी
अशा सर्व व्याधीवर व त्यामुळे येणार्‍या व्यंगावर फिजिओथेरपी मध्ये उपचार केले जातात.
पुढील भागात यावरील उपचार पाहूयात..

क्रमशः..........

लेखन
डॉ.देवयानी मुकुंद मोघे
MPT Neuroscience, COMT
Saish Physiotherapy clinic satara
Contact 📱📞9518386101

Address

Satara

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

+919518386101

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Saish Physiotherapy stroke prevention and rehabilitation clinic posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share