Dr. Vaishali Mane, Satara

Dr. Vaishali Mane, Satara please see my page.....
Dr.Mane & Vaishali malam

*उन्हाळा आणि उन्हाळे लागणे*           उन्हाळा सुरू झाला की दोन प्रकारचे आजार कोणालाही होऊ शकतात. १) घोणा फुटणे म्हणजे ना...
19/04/2026

*उन्हाळा आणि उन्हाळे लागणे*

उन्हाळा सुरू झाला की दोन प्रकारचे आजार कोणालाही होऊ शकतात. १) घोणा फुटणे म्हणजे नाकातून रक्त येणे आणि २) उन्हाळे लागणे. बऱ्याच जणांना फक्त उन्हाळ्याच्या काळातच उन्हाळे लागतात. तर काहीजणांना मात्र उन्हाळाच काय पण हिवाळा आणि पावसाळ्यात देखील उन्हाळे लागतात. आज आपण 'उन्हाळे लागणे' या आजाराची कारणे आणि लक्षणे आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून जाणून घेऊयात.
उन्हाळी लागणे या आजाराला आयुर्वेदात 'मूत्रकृच्छ' असे म्हणतात या आजारात लघवीला अतिशय कष्टाने होते. लघवी करताना दुखते. लघवीला थोडे परंतु पुन्हा - पुन्हा होते. लघवीचे प्रमाण अतिशय थोडेच असते. ह्या आजारात लघवीची निर्मिती योग्य प्रमाणात होत असते. परंतु लघवीच्या मार्गामध्ये काही कारणाने अडथळा आल्याने वेदना जाणवते. हा अडथळा दूषित वात- पित्त- कफाचा असेल किंवा जंतुसंसर्गाचा असेल किंवा गाठीचा असेल किंवा बाहेरून दाब आल्यामुळे असेल.
*उन्हाळे लागण्याची कारणे* :--->
अति प्रमाणात व्यायाम करणे, अतिशय कोरडे पदार्थ खाणे, अतिप्रमाणात उष्ण तीक्ष्ण अशी औषधे किंवा मद्य/दारू पिणे, वेगवान वाहनातून (विशेषतः दुचाकी) बसून नियमितपणे प्रवास करणे, अतिप्रमाणात मासे खाणे, पहिले खाल्लेले अन्न पचण्याआधीच पुन्हा दुसऱ्यांदा अन्न खाणे आणि अजीर्ण होणे यामुळे उन्हाळे लागतात.
उन्हाळे लागण्याची ही जी कारणे आहेत त्यामुळे शरीरातील चाळवलेले किंवा बिघडलेले दोष मूत्रवह संस्थेमध्ये येतात आणि मूत्रमार्गात अडथळा आणतात. त्यामुळे पेशंटला लघवी करताना दुखते, लघवीला अडखळत होते, जळजळ होते, मूत्रकृच्छ हा आजार होण्याआधी काही लक्षणे जाणवतात. ओटीपोटात जडपणा जाणवतो, लघवीला थोडीशी लालसर होते, बेंबीपासून खाली पोटामध्ये लघवी करताना किंचित वेदना जाणवते. हा सूक्ष्म बदल जर लवकर लक्षात आला तर पुढे होणाऱ्या आजारावर आपण आधीच उपाययोजना करू शकतो. आयुर्वेदानुसार मूत्रकृच्छ हे एकूण आठ प्रकारचे सांगितले आहे. ....१) वातज मूत्रकृच्छ. २) पित्तजन्य मूत्रकृच्छ. ३) कफजन्य मूत्रकृच्छ. ४) त्रिदोषजन्य मूत्रकृच्छ. ५) शल्यज / अभिघातज मूत्रकृच्छ. ६) मलजन्य / पुरिषविघातज मूत्रकृच्छ. ७) मुतखड्यामुळे होणारे मूत्रकृच्छ. ८) शुक्रजन्य मूत्रकृच्छ. त्याची लक्षणे पुढील प्रमाणे ---->
*१) वातजन्य मूत्रकृच्छ :--->*
यामध्ये पुन्हा पुन्हा आणि थोडे थोडे लघवीला होते. सोबत लघवीच्या मार्गात, ओटीपोटात आणि जांघेमध्ये प्रचंड दुखणे असते .
*२) पित्तजन्य मूत्रकृच्छ:--->*
यामध्ये लघवीला पिवळे, लाल रंगाचे होते. लघवीला जळजळ होते, लघवी करताना खूप मोठ्या प्रमाणात दुखणे असते. लघवीला पुन्हा पुन्हा पण अतिशय कष्टाने होते.
*३) कफजन्य मूत्रकृच्छ :--->*
कफजन्य मूत्रकृच्छात लघवीला बुळबुळीत होते. मूत्राशयात आणि लघवीच्या मार्गात सूज असते. त्यामुळे तेथे जडपणा जाणवतो.
*४) त्रिदोषजन्य मूत्रकृच्छ :---->*
यामध्ये वरील तीनही प्रकारच्या मूत्रकृच्छातील लक्षणे जाणवतात .
*५) शल्यज / अभिघातज मूत्रकृच्छ :---->*
काही आजारामध्ये पेशंट अंथरुणाला खिळून असतो. हा कालावधी काही दिवसापासून ते काही वर्षापर्यंतचा असू शकतो. उदा.--> मणक्याचे किंवा पायाच्या हाडाचे फ्रॅक्चर, काही प्रकारचे ऑपरेशन, अर्धांगवायू किंवा काही आजार. यामध्ये रुग्ण लघवी करण्यासाठी उठू शकत नसल्याने त्यास लघवीच्या मार्गात नळी / कॅथेटर घातलेला असतो . त्यामुळे काही पेशंटमध्ये stricture म्हणजे तेथील स्थानिक पेशी आकुंचित होतात आणि लघवीला अडथळा येतो. बऱ्याच पेशंटमध्ये काही महिन्याच्या अंतराने लघवीचा मार्ग मोठा करावा लागतो याला urethral dilatation असे म्हणतात . यामध्ये देखील dilatation करण्याआधी लघवीचा मार्ग अकुंचित झालेला असतो. कधी कधी मूत्रवह संस्थेमधील मूत्रवाहिनी नलिका, मूत्राशय(लघवीची पिशवी) , लघवीचा मार्ग याला काही आघात झाला म्हणजे देखील या प्रकारचे मूत्रकृच्छ होते. यामध्ये देखील लघवीला वरचेवर आणि थोडे - थोडे होते. लघवीच्या मार्गात, ओटीपोटात तीव्र वेदना असतात.
*६) मलजन्य / पुरिषविघातज मूत्रकृच्छ :---->*
आयुर्वेदाने तेरा प्रकारच्या वेगांचे धारण करू नये असे सांगितले आहे. त्यापैकी एक मलवेग/ पुरिषवेग हा आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर संडासला आल्याची संवेदना आली की लगेच जावे. ही संवेदना कधीही दडपू नये. जर वारंवार संडासला येऊन देखील जाणे टाळले जात असेल तर त्याचा दाब पुढे मूत्राशयावर येतो. कारण मानवी शरीरात मोठ्या आतड्याच्या शेवटच्या भागात विष्ठा(संडास) साठवली जाते आणि योग्य वेळी ती बाहेर टाकली जाते. या भागाला सिकम असे म्हणतात. सिकमच्या पुढच्या बाजूस मूत्राशय म्हणजे लघवी साठवण्याची पिशवी असते. जर संडासला येऊन देखील वारंवार जाणे टाळले जात असेल तर जेथेही विष्ठा साठवली जाते तो भाग म्हणजे सिकम फुगतो. त्याचा दाब पुढे मूत्राशयावर येतो. त्यामुळे पोट फुगणे, पोट दुखणे, लघवीला अडखळत होणे अशी लक्षणे जाणवतात. त्यामुळे बऱ्याच जणांना पोट साफ झाले की लघवीच्या तक्रारी कमी झाल्याच्या जाणवतात.
*७) मुतखड्यामुळे होणारे मूत्रकृच्छ :--->*
मुतखड्यामुळे लघवीला अडथळा आल्याचा अनुभव बऱ्याच जणांना आलेला असतो. मुतखड्यामुळे जेव्हा दुखणे सुरू होते तेव्हा अगदी छातीपर्यंत वेदना जातात. सर्व अंगाला कंप सुटतो, कापरे भरतात, पोटात असह्य वेदना होतात, अगदी क्वचित या असह्य वेदनेमुळे चक्कर देखील येते‌. लघवी बरोबर मुतखडा किंवा मुतखड्याचे बारीक कण निघून गेल्यानंतर दुखणे थांबते.
*८) शुक्रजन्य मूत्रकृच्छ : ---->*
शुक्रधातू जेव्हा दूषित दोषांनी अडविला जातो तेव्हा तो मूत्रमार्गाचा अवरोध करतो, तेथे अडथळा निर्माण करतो. त्यामुळे पेशंटला अतिशय कष्टाने लघवीला होते. मूत्राशय आणि मूत्रमार्ग या ठिकाणी अत्यंत दुखते .

वैद्य वैशाली माने.9423826921
यश आयुर्वेदिक क्लिनिक,
नटराज मंदिराच्या कमानीतून आत,
कृष्णानगर सातारा.

27/03/2026
15/01/2025

पाय दाबण्याचे फायदे....*
हाताने हळूहळू पाय दाबले असता प्रसन्नता मिळते, विश्रांती मिळते, ताकद मिळते, कफ वात आणि श्रम यांचा नाश होतो, मांस रक्त आणि त्वचेची पुष्टी होते आणि सुखप्राप्ती होते.
*प्रीतीनिद्राकरं वृष्यं कफवातश्रमापहम्| संवाहनं मांसरक्तत्वक्प्रसादकरं सुखम्|*
Dr. Vaishali Mane
Yash ayurvedic clinic,
Natraj temple, krishnanagar, satara

094238 26921

*पाय दाबण्याचे फायदे....*हाताने हळूहळू पाय दाबले असता प्रसन्नता मिळते, विश्रांती मिळते, ताकद मिळते, कफ वात आणि श्रम यांच...
15/01/2025

*पाय दाबण्याचे फायदे....*
हाताने हळूहळू पाय दाबले असता प्रसन्नता मिळते, विश्रांती मिळते, ताकद मिळते, कफ वात आणि श्रम यांचा नाश होतो, मांस रक्त आणि त्वचेची पुष्टी होते आणि सुखप्राप्ती होते.
*प्रीतीनिद्राकरं वृष्यं कफवातश्रमापहम्| संवाहनं मांसरक्तत्वक्प्रसादकरं सुखम्|*
Dr. Vaishali Mane
Yash ayurvedic clinic,
Natraj temple, krishnanagar, satara

094238 26921

03/10/2024
Vaishali malam...... For more details contact 9975602151/9423826921
10/05/2024

Vaishali malam......
For more details contact 9975602151/9423826921

Address

Satara
415001

Opening Hours

Monday 4am - 8am
Tuesday 5am - 8am
Wednesday 5am - 8am
Thursday 5am - 8am
Friday 5am - 8am
Saturday 5am - 8am

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr. Vaishali Mane, Satara posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category