Chywan Ayurved

Chywan Ayurved Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Chywan Ayurved, Medical and health, Opposite Rajlaxmi Talkies, Rajpath, Satara.

 #वंध्यत्व आणि    case of 36 years old female patient   ----  #12 years of   and  .      चार पाच दिवसापूर्वी पहाटे साडेच...
23/01/2023

#वंध्यत्व आणि

case of 36 years old female patient ---- #12 years of and .

चार पाच दिवसापूर्वी पहाटे साडेचार ला whats app वरती एक मेसेज आला .एवढ्या पहाटे कुणी मेसेज केला म्हणून मी पाहिलं आणि मला आश्चर्याचा धक्का बसला. माझ्या एका पेशंट ने urine pregnancy test positive आलेला फोटो मला पाठवला होता. एवढ्या पहाटे त्यांना ही बातमी प्रथम मला सांगावी वाटली यातच त्यांना याचा किती आनंद झाला होता ते मला कळले... फोन वरती बोलताना तर त्यांना काही सुचत नव्हत सतत हास्य ,आनंद या भावना भरभरून येत होत्या.

36 वर्षीय female पेशंट गेल्या 12 वर्षापासून वंध्यत्व वरती खूप उपचार घेत होती. सर्व उपचार करून झाले होते. आणि आता पुढे develop झाले होते.ज्यामुळे तर शारीरिक त्रास खूप सुरू झाला होता.त्याबरोबर मानसिक त्रास होत होता.PCOD मुळे पुढे मासिक पाळी 3 ते 6 महिन्यांनी यायला लागली होती. वजन वाढी बरोबर , संधीवात, व इतर पचनाचे व्याधी देखील सुरू झाले होते.
च्यवन आयुर्वेद मध्ये 10 दिवस संपूर्ण शरीर शुध्दीकरण चिकित्सा करून पुढे आयुर्वेद उपचार सुरू केले होते . नियमित मासिक पाळी सुरू होऊन बराच त्रास कमी झाला आणि उपचार सुरू होऊन फक्त तीन महिने झाले होते. आणि आज urine pregnancy test strong positive आली.
पेशंट ला जो आनंद झाला त्याची किंमत आज पैशात होऊ शकत नाही....

19/12/2022
02/04/2020

प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदिक उपाय.......
• रोज सकाळी हळद तुळशी गुळवेल या वनस्पतींचा वापर केल्यास आपली प्रतिकारशक्ती वाढते.
अर्धा चमचा हळद,
अर्धा चमचा तुळशी चे चूर्ण
अर्धा चमचा गुळवेल चूर्ण
हे सर्व स्टीलच्या भांड्यात घेऊन त्यामध्ये चार कप पाणी टाकावे.साधारण एक कप पाणी शिल्लक राहील एवढे उकळावे. तयार झालेला काढा गाळून घ्यावा. थंड झाल्यानंतर तो रोज सकाळी अनुशापोटी प्यावा.
रोज याचा काढा करणे शक्य नसल्यास वरील प्रमाण हे पाण्यात मिसळून पिल्यास हरकत नाही.
तुळशी आणि गुळवेल यांचे चूर्ण न मिळाल्यास भरड चूर्ण सुद्धा वापरू शकतो. भरड चूर्ण हे काढा करताना दीड चमचा वापरावा. हळद मात्र आपल्याला चूर्णाच्या स्वरूपात कायम मिळते.
12 वर्ष वयोगटाच्या पुढील सर्वांनी वरील प्रमाण वापरावे.
पाच ते बारा वर्ष वयोगटाच्या मुलांना अर्धे प्रमाण वापरावे.
हा काढा आपण जर दररोज घेत राहिल्यास हळूहळू आपली प्रतिकार शक्ती हमखास वाढते. वारंवार होणारे सर्दी खोकला किंवा हवामान बदल झाल्यानंतर होणारे रोग आपल्याला सहसा होत नाहीत. हा काढा आपण पूर्ण वर्षभर घेत राहिल्यास कोणताही साईड इफेक्ट होत नाही. याउलट आपल्याला सतत होणारे किरकोळ आजार या पासून आपला बचाव होतो. बऱ्याच जणांना धूर, धूळ, थंड पाणी,कोल्ड्रिंक्स, आईस्क्रीम खाल्ल्यास लगेच सर्दी, घसा दुखणे,खोकला यासारखे किरकोळ आजार होतात त्याचप्रमाणे आहारात दही, ताक खाल्ल्याने लगेच सर्दी होते.अशावेळी आपण हा काढा रोज घेत राहिल्यास वरील गोष्टींनी होणारा त्रास हळूहळू कमी होत जातो. सतत होणारे व्हायरल इन्फेक्शन सुद्धा हा काढा घेत राहिल्याने होत नाही. अतिशय सोपा आणि अतिशय स्वस्त असा हा उपाय आपण करत राहिल्यास वारंवार होणारा आजारावरचा खर्च वाचू शकतो.हल्ली लहान मुलांना सतत व्हायरल इन्फेक्शन होण्याचा त्रास आपण बघतो परंतु हा साधा आणि सोपा उपाय करत राहिल्यास त्यांच्या प्रकृतीत आपल्याला लगेच बदल पाहायला मिळतो आणि मुले निरोगी राहण्यास मदत होते.
डॉ. प्रकाश पवार (आयुर्वेद तज्ञ )
‘ च्यवन आयुर्वेद . सातारा
8388083887.

मणक्यांचे विकार -हल्ली ऐन तारुण्यापासून वृद्धावस्थेत घराघरात वावरणारा व्याधी ,मानेपासून कमरेच्या माकडहाडापर्यंत असणाऱ्या...
18/02/2020

मणक्यांचे विकार -
हल्ली ऐन तारुण्यापासून वृद्धावस्थेत घराघरात वावरणारा व्याधी ,मानेपासून कमरेच्या माकडहाडापर्यंत असणाऱ्या मणक्यांचे व त्या प्रत्येक दोन माणक्यामधील कूर्चा त्याचप्रमाणे मज्जातंतूंशी संबधीत मणक्यांचे विकार आढळतात . मणक्यांची हाडे झिजणे ,हाड वाढणे ,त्याचप्रमाणे कूर्चांची झीज व त्यामुळे तयार होणारी लक्षणे व मज्जातंतूंवरती पडणारे दबाव याप्रमाणे या विकाराची विभागणी केली जाते . मानेच्या मणक्यांचे विकारांर्गत मान सतत अवघडणे ,मान दुखणे, वेदना होणे ,
खांदे दुखणे ,सतत मान हलवली की चक्कर येणे ,एक किंवा दोन्ही हात दुखणे त्यातून शॉक बसल्यासारखी वेदना किंवा सतत रग लागणे , हातातून ,अंगठा किंवा करंगळीतून मुंग्या येणे ,बधीरता ,जड वाटणे ,हाताने काही उचलता न येणे यासारखी लक्षणे मुख्यतः मानेच्या मणक्यांचे विकारात आढळतात . याचे कारण वेगवेगळे असू शकते या कारणावरती आयुर्वेदामध्ये वेगवेगळे उपचार करून हे रोग बरे केले जातात . त्याचप्रमाणे कमरेच्या मणक्याच्या विकारांमध्ये सतत कंबर दुखणे ,कंबर अवघडणे ,वाकता न येणे ,कंबरेत वेदना ,चमक येणे ,फारवेळ उभे राहता न येणे ,फार अंतर चालता न येणे त्याचप्रमाणे एक किंवा दोन्ही पायात वेदना ,चमक येणे, पायात मुंग्या येणे ,पाय बधिर होणे ,जड वाटणे ,संवेदना बंद होणे अशी लक्षणे निर्माण होतात .अशा लक्षणांमागे मणक्यांचे वेगवेगळे विकार असतात . त्या त्या विकारावरती शुद्ध आयुर्वेद उपचार करून आपण रोग मुळापासून नष्ट करू शकतो .

आमवात - असाध्य नव्हे साध्य . हाताची बोटे ,मनगट ,कोपराचा सांधा ,खांदे ,पायाचा घोटा ,गुडघ्याचा सांधा ,खुब्याचा सांधा हे जर...
13/02/2020

आमवात - असाध्य नव्हे साध्य .

हाताची बोटे ,मनगट ,कोपराचा सांधा ,खांदे ,पायाचा घोटा ,गुडघ्याचा सांधा ,खुब्याचा सांधा हे जर सुजले असतील ,ठणकत असतील ,आखडले असतील तर तो आजार संधिवाताचाच एक प्रकार 'आमवात ' असू शकतो . यामध्ये सांधा लालसर होणे ,स्पर्शासहल ,सतत ठणक ,सतत रुग्णाचे गरम ताप आल्यासारखे असणे ,पित्ताचा त्रास होणे,मलावष्टंभ असणे ,भूक न लागणे ,शरीर जड वाटणे ,आळस येणे अशी लक्षणे या आजारात दिसतात . रक्ताच्या टेस्ट मध्ये RA Test ,A*O Titre अशा +ve येतात. कधी कधी त्या - ve असल्या तरीही वरील लक्षणे रुग्णात दिसतात. अशा वेळी आयुर्वेद या रोगाला आमवात असे म्हणते .
खरे तर हा रोग एकदा झाला कि तो बरा होत नाही असे समजले जाते . परंतु आयुर्वेद शास्त्र असा आजार पूर्ण बरा करू शकते . फक्त गरज आहे वेळेत उपचार करण्याची .
अशा रुग्णांनी सांध्याला तेलाने मसाज करू नये . कारण मसाज केल्याने सांध्याची सूज व ठणका वाढतो . असे सांधे शेकू नयेत ,त्याच्या जास्त हालचाली टाळाव्यात . रुग्णांनी दिवसा झोपणे टाळावे . अतिजड ,आंबट ,आंबवलेले पदार्थ खाऊ नये, दही ,ताक ,लस्सी ,थंड पाणी पिणे टाळावे . फास्ट फूड ,जंक फूड ,बाहेरचे जेवण , मैदयाचे पदार्थ ,पित्त वाढवणारे पदार्थ खाऊ नयेत . व्यायाम टाळावा .
आहारात हलके अन्न ,ताजे ,कमी तिखट ,जेवताना दोन घास कमी खावे . अति पोट भरून जेऊ नये . जेवताना किंवा जेवणानंतर लगेच पाणी पिऊ नये .

संधिवात -चढत्या वयोमानानुसार प्रत्येक शरीराला चिकटणारा सर्वसाधारण आजार आहे. आयुर्वेदिक परिभाषेत याला संधिगवात म्हणतात. श...
18/01/2020

संधिवात -
चढत्या वयोमानानुसार प्रत्येक शरीराला चिकटणारा सर्वसाधारण आजार आहे. आयुर्वेदिक परिभाषेत याला संधिगवात म्हणतात. शरीरातील वातदोष वाढल्यानंतर तो सांध्यामध्ये वेदना,सूज निर्माण करतो. अशावेळी शरीरातील सांध्याच्या हालचाली करताना वेदना निर्माण होतात. शक्यतो शरीरातील मोठ्या सांध्याच्या ठिकाणी हा व्याधी बघायला मिळतो.गुढघे ,कोपर,घोटे,मनगट,खांदे अशा सांध्याच्या ठिकाणी संधिगतवात पाहायला मिळतो. सांध्याच्या ठिकाणी थोडे जरी दाबले तरी वेदना होतात. गुडघ्यामध्ये सारखे उठ -बस करण्यामुळे तसेच अति चालणे तेथील हाडांची झीज होते. गुडघ्यामधील कुर्च्यांची झीज होते. काही काळानंतर तेथील सांध्यातील हाडे एकमेकांवरती घासली जातात. शरीरधातू पोषणाअभावी तयार होणार हा व्याधी आहे. धातूंचे क्षरण होऊन क्षरण झालेल्या धातूंच्या ठिकाणी वातदोष जाऊन ती पोकळी वाटणे भरली जाते. सतत वेदना होणे,
सांध्याच्या हालचालींना मर्यादा पडणे, सांधे आखडणे ,सांध्याचा आकार बारीक होणे ,सांधा तयार करणाऱ्या स्नायूंच्या ठिकाणी सूज येणे अशी लक्षणे संधिवातात तयार होतात. संधिवात आयुर्वेद पूर्ण बरा करू शकतो. शुद्ध आयुर्वेद उपचार घेण्याची गरज आहे.

आमवात शरीरातील मोठ्या सांध्यांना सूज आणणारा ,वेदना होऊन सांधे पूर्ण आखडविणारा आजार आहे. याचा शिरकाव शरीरात हळूहळू कधी हो...
10/01/2020

आमवात शरीरातील मोठ्या सांध्यांना सूज आणणारा ,वेदना होऊन सांधे पूर्ण आखडविणारा आजार आहे. याचा शिरकाव शरीरात हळूहळू कधी होतो आणि रुग्णाला कधी अपंगत्व आणतो कळतदेखील नाही.

हा ओळखण्यासाठी याची लक्षणे -

शरीरातील सांध्यांना सूज येणे ,सांधे लालसर होऊन गरम होणे,सांध्यांना हात लावल्यास प्रचंड वेदना होतात . शरीरात सतत आळस येतो. सतत ताप ,कणकणी आल्यासारखे वाटते. भूक मंदावते ,पित्ताचा त्रास होतो. पोट साफ होत नाही. संधिगतवात समजून अशा सांध्यांना तेल लावले किंवा शेकले तर वेदना वाढून आजार वाढतो. हा आजार गुढघे ,घोटे,मनगट ,कोपर ,खांदे यामध्ये जास्त दिसतो.

आयुर्वेद शास्त्रात यासाठी अतिशय उत्कृष्ट उपचार सांगितले आहेत ज्याद्वारे हा आजार पूर्ण बरा होतो. सहसा हा आजार असाध्य समजला जातो. निदानासाठी रुग्णाचे रक्त टेस्ट केल्यास RA टेस्ट - +ve येते. "च्यवन आयुर्वेद "या आजारावरती संपूर्णपणे शुद्ध आयुर्वेद उपचार केले जातात.

Address

Opposite Rajlaxmi Talkies, Rajpath
Satara
415002

Alerts

Be the first to know and let us send you an email when Chywan Ayurved posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Chywan Ayurved:

Share