16/11/2023
भारतीय संस्कृतीचा मोठा आणि महत्त्वाचा सण दिवाळी. आज पर्यंत ब्युटी अँड वेलनेस या सदरामध्ये त्वचेचे केसांचे शरीराचे वेगवेगळे असे सौंदर्यशास्त्राच्या थेरपी अथवा ट्रीटमेंट बघत आलो आहोत. सरळ साध्या सोप्या भाषेत सर्वांना याची जाणीव व्हावी आपण आपल्या केसांवर शरीरांवर त्वचेवर ब्युटी पार्लर्स सलोन अथवा स्पा मध्ये जाऊन जेव्हा काही ट्रीटमेंट अथवा प्रक्रिया करून घेत असतो तेव्हा त्याबद्दलची जाणकार माहिती असणे हे खूप गरजेचे असते त्यासाठीच ही माहितीपूर्ण लेखमाला सादर करत आज पर्यंत आपण वेगवेगळ्या सौंदर्य साधनांच्या प्रक्रियांचा माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. शरीराच्या सौंदर्यामध्ये चेहऱ्याबरोबर केस आणि शरीर तेवढेच महत्त्वाचे आहे. यामध्ये चेहर्यासाठी फेशियल केसांसाठी केसांसाठी कटिंग कलरिंग स्टायलिंग, शरीरासाठी वेगवेगळे बॉडी थेरपीचे प्रकार आज पर्यंत आपण पाहिले. आजचा हा खास लेख आपल्या दिवाळी सणासाठी, भारताच्या परंपरेतच मसाज ला अनन्यसाधारण महत्त्व आहे याच परंपरेतील आपल्या महाराष्ट्राचा सर्वात महत्त्वाचा सण दिवाळी ज्याची सुरुवातच होते अभ्यंग स्नानाने, या अभ्यंग स्नानामध्ये,उटणे आणि तेल लावून चोळून मळून स्त्री व पुरुष यांना आंघोळ घातली जाते. यालाच स्पा थेरपीमध्ये उबटन मसाज असे म्हटले जाते. उबटन मसाज मध्ये शरीरावर केल्या जाणाऱ्या मसाजच्या हालचालींना शास्त्रीय नावाने एफलराज असे प्रामुख्याने म्हटले जाते. एफलराज या हालचालीला शरीरावरती हाताचा पूर्ण तळवा वापरून केली जाते. शरीरावरील कोणत्याही भागावर खालून वरच्या दिशेने आपला हात वापरून हि हालचाल करण्यात येते. हातामध्ये उबटन घेऊन ठराविक पद्धतीने हलकासा दबाव देऊन एकालयीत उबटन मसाज हा करण्यात येतो. यामध्ये वापरण्यात येणारे उठणे हे अतिशय मऊ सुगंधीत असते, त्यामध्ये अनेक वनौषधींचे मिश्रण असते,जसे की, त्यामध्ये नागरमोथा, सुगंधी कचोरा, मुलतानी माती, आंबेहळद,मसूर,डाळ,चंदन,
जायफळ पावडर,जटामासी, वाळा या आयुर्वेदाच्या औषधी चुर्णांचे मिश्रण केलेले असते. हे उठणे उबटन मसाजच्या आधी एक तासभर तेलामध्ये भिजवून ठेवावे लागते,उबटण साठी वापरण्यात येणारी तेल ही आयुर्वेदिक अथवा आरोमॅटिक असते, यामध्ये साधारणता बदाम तेल, रोजकेड तेल, लावेंडर, बर्गमोट या प्रकारची तेल उबटन मसाज मध्ये वापरण्यात येतात. या तेलांचा समप्रमाणात मिश्रण करून त्यामध्ये उटणे भिजत घातले जाते. तास दोन तास हे छान भिजले की मग उबटन थेरपी साठी वापरण्यात येते. या चारही तेलांचे वेगळे वेगळे असे औषधी गुणकारी उपयोग आपल्याला या मसाज च्या माध्यमातून मिळतात. उटण्यामध्ये अनेक औषधी वनस्पतींची भुकटी असल्