
30/06/2024
संतांची चरित्रे ॲनिमेशन स्वरुपात…
आजच्या काळात लहान मुले-मुली सोशल मीडियाला जवळ करीत आहेत. अशा मुलामुलींना आपल्या वारकरी सांप्रदायाच्या परंपरेतील संतांच्या चरित्राची माहिती व्हावी, या उद्देशाने पुण्यातील ॲड. माधवी निगडे यांच्या कैवल्य कथा या यु-ट्युब चॅनेलवर वारकरी संताच्या आध्यात्मिक ॲनिमेटेड फिल्म तयार करण्यात आल्या आहेत. यामधील चौथे पुष्प म्हणजे संत जनाबाई यांची चरित्र ओळख. हे चरित्र गोष्टीच्या आणि ॲनिमेशनच्या स्वरूपात तयार केले गेले असून माझ्या हस्ते हे प्रकाशित करण्यात आलं.