15/11/2025
🌸बालदिनाच्या निमित्ताने रेणुका हॉस्पिटल शेवगाव येथे(सुईविरहित लसीकरण) "needle free technology"ने टायफॉईड लसीकरण शिबीर पार पडले... 50 मुलांनी याचा लाभ घेतला..बालकांचा प्रतिसाद खूप छान होता 👍👍
🌸आता सुईचा वापर न करता इंजेक्शन देणं शक्य झाले असून, वैद्यकीय क्षेत्रात हे तंत्रज्ञान क्रांती घडवणारे ठरू शकते. लहान मुलांना विशेषतः सुईची भीती वाटत असल्याने त्यांच्यासाठी ही पद्धत वरदान ठरणार आहे. 'नीडल' फ्री इंजेक्शन' या नावाने ओळखली जाणारी ही नवीन प्रणाली प्रभावी ठरत आहे. या पद्धतीत सुईचा पूर्णतः वापर टाळला जातो. त्याऐवजी औषध त्वचेखाली पाठवण्यासाठी उच्च दाबाचा वापर केला जातो. औषध थेट स्नायूंमध्ये किंवा त्वचेखाली पोहोचते. त्यामुळे वेदना कमी होतात, सूज येत नाही आणि संसर्गाचा धोका कमी होतो.