24/02/2024
_*पशु पोषणामध्ये पाण्याचे महत्व*_
पशु पोषणात पाण्याला ऑक्सिजन नंतर दुसऱ्या क्रमांकाचे महत्व आहे . गायीला जेवढी तहान असेल तेवढे पाणी ती पेयील .
पाणी दाखवण्याच्या वेळा . आपल्याला वेळ मिळेल तेव्हा पाणीदाखवले जाते , तहान असेल तेव्हा नाही . आणि यामुळेच पोषणात सर्वात स्वस्त असलेले पाणी सुद्धा आपण मुबलक प्रमाणात आपल्या गायींना देऊ शकत नाही. मुक्त संचार गोठ्यामुळे पाणी समोर असण्याचे प्रमाण जरी वाढले असेल तरी गाय आवश्यक तेवढे पाणी पिते का ? हा सुद्धा एक संशोधनाचा विषय आहे
_पशूच्या शरीरामध्ये पाण्याचे प्रमाण ५० ते ९० टक्क्यापर्यंत असते . वयानुसार हे प्रमाण कमी अधिक प्रमाणात असते . भ्रूण अवस्थेत हे प्रमाण ९५%, जन्मावेळी ७५-८०%, तर प्रौढ अवस्थेत हे प्रमाण ५० ते ६०% एव्हढे असते . _
_*पाण्याचे कार्य *_
1.पाणी चाऱ्यामधील महत्वाचा घटक आहे , तो खाण्यासाठी मऊ बनवते
2.पाण्यामुळे शरीराचे तापमान संतुलित राहते
3.अन्नद्रव्यांचे शरिरात शोषण आणि शरीराच्या वेग वेगळ्या भागामध्ये प्रवाहित करण्याचे काम पाणी करते
4.शरीरातील विविध श्राव आणि रसांमधील महत्वाचा घटक पाणी असते
5.शरीरातील टाकाऊ पदार्थांना बाहेर टाकण्याचे काम पाण्याच्या माध्यमातून केले जाते
6.विविध अन्नघटक शरीरामध्ये विरघळण्यासाठी पाण्याचा उपयोग होतो
7.शरीरातील अनेक रासायनिक अभिक्रिया पाण्याच्या माध्यमात घडून येतात
8.अंतर्गत पेशींना आकार देण्याचे काम पाणी करते तसेच पेशी अंतर्गत अन्नद्रव्याचे परिवहन करण्याचे काम पाणी करते
9.शरीरातील आम्ल- आम्लारी संतुलन पाण्यामुळे होते
10.कानाद्वारे ऐकण्याचे तसेच डोळ्याद्वारे पाहण्याच्या काम मध्ये पाण्याचे महत्वाचे कार्य आहे
11.शरीरातील विविध नाजूक उतींना स्वरक्षण देण्याचे काम पाणी करते त्यांना धक्क्यातून तसेच इजा होण्यापासून संरक्षण देते.
_एका गायीला दररोज शरीर संगोपनासाठी ३० ते ४० लिटर तसेच दूध उत्पादनासाठी प्रति लिटर १८०० मिली पाण्याची आवश्यकता असते . म्हणजेच प्रतिदिन १० लिटर दूध देण्याऱ्या गायींसाठी सर्वसाधारण ५० ते ६० लिटर पाण्याची आवश्यकता असते_
गायीच्या पाण्याच्या गरजेवर परिणाम करणारे घटक
1.वातावरण : उष्ण आणि दमात वातावरणात पाण्याची गरज वाढते तसेच थंड वातावरणात पाण्याची गरज कमी होते
2.आहार बदल : कोरडा आहार पाण्याची गरज वाढवतो. आहारातील मिठामुळे पाण्याची गरज वाढते .
3.३-४ किलो पाण्याची गरज प्रति किलो शुष्क आहारासाठी आवश्यक असते .
4.प्राण्याचे वय , लिंग, वाढीचा टप्पा , उत्पादन, आरोग्य, तापमान , पाणी पिण्याच्या वेळा यानुसार पाण्याचे प्रमाण कमी अधिक होऊ शकते .
_*प्रशांत गागरे *_
एम एस (फार्मासुटिकल सायन्सेस ), लंडन
व्हर्चू ऍनिमल हेल्थ
*यासारखी आणखी माहिती नियमित हवी असल्यास
आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा . *
आमचे इंस्टाग्राम पेज फॉलो करा , यु ट्यूब चॅनल सब स्क्राइब करा
http://www.youtube.com/
https://www.instagram.com/virtue_animal_health?utm_source=qr&igsh=MzNlNGNkZWQ4Mg%3D%3D
https://www.facebook.com/profile.php?id=100063649314311&mibextid=ZbWKwL
Share your videos with friends, family, and the world