28/07/2025
*उपवास की पार्टी...!?*
🌞देवाच्या नावाने बटाटा व तत्सम विदेशी आणि पचवायला भयंकर जड अशा खाद्यपदार्थांनी पोटोबा करत ’श्रावण सोमवार’च्या उपवासाचे ’रिच्युअल’ करणे याहून मोठी अंधश्रद्धा ती काय असणार !🙏🏻
🔯मूळात ’उपवास’ संकल्पनेचा फारच चुकीचा पगडा आजच्या समाज-मनावर आहे. एकतर स्वतःच्या पोटावर जाणुनबुजून पाय देणे किंवा नेहमीच्या आहारापेक्षा अधिक जड असे पदार्थ गटविणे! दोन्ही गोष्टींनी नक्की काय साध्य होते हा एक वेगळाच संशोधनाचा विषय आहे.
*🙏🏻एकादशी व दुप्पट खाशी 🙏🏻* बटाट्याचे वेफर्स खाऊन जर पुन्न्याची कमाई होत असेल व त्या पुन्न्याला वरण-भाताचा एखादा घास खाऊन ओहोटी लागत असेल, तर चित्रगुप्ताच्या दरबारी भ्रष्टाचारी कारकून कामाला लागले असावेत यात शंका नाही.🙏🏻
SVM Ayurveda
*पण मग उपवास म्हणजे तरी नक्की काय?* याठिकाणी आयुर्वेदामध्ये निर्दिष्ट एक संदर्भ आढळतो–
*’उपावृतस्य पापेभ्यः सहवासो गुणे हि य:।*
*उपवासः स विज्ञेयो न शरीरस्य शोषणम्॥’*
अर्थात् आपण आपल्या व्यक्तिमत्त्वातील, मनातील नकारात्मक बाबींपासून सजगतेने दूर जाण्याचा प्रयत्न करत मनःशांतीसाठी पूरक अशा गुणांजवळ येण्याचा प्रयत्न करणे म्हणजे उपवास.
*∆शरीराचे शोषण करणे म्हणजे उपवास नव्हे!* उलटपक्षी जर मनाला शांत करायचे असेल तर शरीर स्वस्थ असणे अत्यंत आवश्यक आहे. आजारी मनुष्य चित्तशुद्धीसाठी फार काळ प्रयत्नशील राहू शकत नाही.
आपल्या शरीराचे सर्व व्यापार सुरळीत चालण्यामागे महत्त्वाची भूमिका आपल्या पचनसंस्थेची असते. या पचनसंस्थेला साजेसा, पण तरीही सकस आहार घेतला तर आजारी पडण्याची वेळ येणार नाही. याच पचनसंस्थेची ताकद ग्रीष्म ऋतू व त्यानंतर येणाऱ्या वर्षा ऋतूमध्ये कमी होत असते. या ऋतुबदलांचा आदर करून योग्य असा आहार घ्यावा ही खरं तर निसर्गाचे अपेक्षा! या अपेक्षापूर्तीसाठी आपल्या संस्कृतीमध्ये चातुर्मासाची युक्तीपूर्वक योजना केली आहे. चातुर्मासातील चार महिन्यांमध्ये तब्येत सांभाळण्यासाठी आहार-बदल अपेक्षित आहेत, ते उपवासाच्या रूपाने सांगितले आहेत. उपवास म्हणजे भूक मारणे असे अपेक्षित नसून, हलके मात्र स्वास्थ्य टिकवून ठेवण्याची क्षमता असलेले पदार्थ युक्ती कालानुरूप घेणे होय. *धरलेला उपवास सोडताना, वसुलीच्या मानसिकतेने खाण्यावर ताव मारण्यास सुरुवात होणार असेल तर या उपासाचा या काय फायदा ...!?*
“उपवास – आपल्या संस्कृतीचा इंटरमिटंट फास्टिंगचा मूळ फॉर्म्युला!”
SVM Ayurveda
✅ श्रावण सोमवार उपवास का करावा?
*1.पचनसंस्थेला विश्रांती –* दररोज खाल्लेल्या अन्नामुळे सतत काम करणाऱ्या पचनसंस्थेला ब्रेक मिळतो.
*2.डिटॉक्स आणि शरीरशुद्धी –* उपवासाद्वारे शरीरातील अपायकारक पदार्थ बाहेर टाकले जातात. शरीरातील *Autophagy system* अँक्टिव्हेट होते, म्हणजे ती नको असलेल्या पेशींना मारते उद्या. 🦀 कॅन्सर सेल, शरीरातील अतिरिक्त चरबी इत्यादी.
*3.इंटरमिटंट फास्टिंगचा नैसर्गिक प्रकार* – उपवास म्हणजेच आधुनिक ‘intermittent fasting’
*4.मनःशांती आणि एकाग्रता –* उपवासादिवशी मानसिक स्पष्टता अधिक जाणवते.
*5.आध्यात्मिकता*– मन, वाणी आणि कर्म यांचे संयम ठेवण्याचा दिवस.
एकादश इंद्रियांवर विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याचा हाच तो दिवस.
*6.साधेपणा आणि स्वावलंबन –* शारीरिक-मानसिक शिस्त वाढते.
*7.आरोग्य टिकवण्याचा नैसर्गिक मार्ग* – वजन नियंत्रण, साखरेचा समतोल राखण्यासाठी मदत.
SVM Ayurveda
*“तुमचं शरीर, मन आणि आत्मा – तिघांचंही रिफ्रेश बटन = उपवास.*
*उपवासाला मग नेमकं खायचं तरी काय...!?*
ऋतू नुसार मिळणारी गावरान, रसायन विरहित फळांचे सेवन करावे. राजगिरा लाडू, रताळे, भगर, लाह्या इत्यादी उपवासाला खावे.
☠️शाबुदाणा, मीठ, तिखट, साखर, तेल, तूप यांचा कमीत कमी वापर उपवासात असावा.❌
🚩 श्रावण सोमवारच्या आरोग्यदायी शुभेच्छा 🎉
वैद्य अविनाश भारती
श्री विश्व मकरंद
आयुर्वेद पंचकर्म चिकित्सालय
आर एल पार्क, सिल्लोड.
7972929454.