14/11/2025
#माऊलींचेपालखीचे_स्वागत
वाऱ्यांत पांडुरंगाचा नामगुजारा दाटला,
दिंडीच्या पावलागणिक भक्तीचा गंध दरवळला.
वारकरी चालती चरणी ठेवून विश्वास,
आळंदीची वाट उजळे, भावनेचा प्रकाश.
करुणेच्या छायेखाली ही पवित्र वारी,
पावलोपावली भासे विठ्ठलाची वारी.
या निष्ठेच्या प्रवासाला मनापासून वंदन,
वारकऱ्यांच्या सेवेस आम्हा श्री गणेशात वंदन...!
कार्तिकी वारी साठी अनेक दिंड्या या आळंदीकडे मार्गस्थ झालेल्या आहेत. आज शिरूर येथील श्री गणेशा हॉस्पिटल येथे आलेल्या माऊलींच्या पालखीचे मोठ्या भक्ती भावाने स्वागत करण्यात आले. हॉस्पिटलच्या स्टाफ च्या वतीने पाद्यपूजन करण्यात आले यावेळी श्री गणेशा मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल चे संचालक डॉ.अखिलेश राजुरकर यांनी पालखीतील वारकऱ्यांचे स्वागत करून विनापूजन केले. यावेळी हॉस्पिटलचे स्टाफ व वारकरी उपस्थित होते.