
09/06/2024
*नमस्ते* 💐💐,
* ८ जून, जागतिक ब्रेन 🧠 ट्यूमर (अवेअरनेस) जागरूकता दिन...*
मेंदूच्या गाठी या प्रामुख्याने मेंदूच्या खालील पेशींमध्ये निर्माण झालेल्या असतात.
१. सपोर्टिंग सेल्स (supporting glial cells)
२. मेनिंजियेल सेल्स (meningeal cells)
३. पिटूटरी ग्रंथी च्या गाठी (pituitary tumor)
४. न्युरोनल सेल्स (neuronal cells)
५. जन्मतः असणाऱ्या गाठी (craniopharyngioma/ Rathkes/epidermoid cyst)
आणि
५. बाहेरील अवयवातून उगम झालेली गाठ जी रक्तवाहिन्यांद्वारे मेंदूमध्ये येऊन वाढते.(metastasis).
मेंदूतून प्रथमतः निर्माण होणाऱ्या गाठी या मेंदू आणि मज्जा रज्जू आणि नसांना सोडून सहसा करून शरीरामध्ये इतर अवयवांमध्ये पसरत नाही ही जमेची बाजू असते.
मेंदूच्या गाठींचे स्टेजिंग होत नसते, त्या ऐवजी मेंदूच्या गाठींची ग्रेडिंग होते. गाठीच्या पेशींचे दुप्पट व्हायचे प्रमाण यावरून ही ग्रेडिंग ठरली जाते.
एकूण चार ग्रेड मध्ये विभाजन केलेले आहे.
यामध्ये ग्रेड वन म्हणजे सौम्य कॅन्सर ची गाठ जी पूर्णतः बरी करता येते आणि ग्रेड फोर म्हणजे तीव्र कॅन्सर ची गाठ जी पूर्णतः बरी करता येत नसते पण ठराविक कालावधी पर्यंत उपचारांनी गाठीवर नियंत्रण ठेवले जाऊ शकते.
मेंदूतील गाठींची लक्षणे म्हणजे; सतत डोके दुखणे आणि डोके दुखण्याची तीव्रता वारंवार वाढत जाणे, डोळ्यासमोर अंधारी येणे, झटके येणे म्हणजेच फिट्स येणे, चक्कर येणे, डबल दिसणे, दृष्टीदोष, तोल जाणे, आकलन क्षमता कमी होणे, बोलणे विस्कळीत होणे, बेशुद्ध पडणे, मंदरित्या हातापायाची हालचाल/ताकद कमी होणे इत्यादी मेंदूतील दाब वाढल्याने निर्माण होणारी लक्षणे असतात.
मेंदूतील गाठी या वयाच्या कोणत्याही टप्प्यात येऊ शकतात शिवाय स्त्री आणि पुरुष या दोघांमध्ये या गाठींचे आढळणे जवळपास एकसमान असते.
सहसा करून या गाठी कॅन्सरच्या असण्याचे प्रमाण हे कमी असते. पण मेंदूतल्या प्रत्येक भागातील महत्त्वाचे कार्य लक्षात घेता; गाठ काढता येण्याची मर्यादा भरपूर असते. त्यामुळे गाठ जरी कॅन्सर प्रमाणे न वाढणारी असेल तरी, ती आजूबाजूचा सामान्य मेंदू (नॉर्मल ब्रेन) हाताळून पूर्णतः काढता येणे दरवेळी शक्य नसते.
'आपल्याला एखादी मेंदूची गाठ झालेली आहे' याबद्दल धास्ती घेण्याची गरज नाही. मेंदूच्या गाठीचा आजार अंगावरती काढणे चुकीचे आहे. असे केल्यास सहजासहजी उपचार करून बाहेर येणाऱ्या गाठीच्या व्याधींचा स्वरूप हा उपचार करण्याच्या पलीकडे (inoperable) जातो. म्हणून ब्रेन ट्यूमरचे निदान झाल्यावर त्वरित पुढच्या उपचाराला सुरुवात करण्याची गरज असते.
विकसित तंत्रज्ञान ज्यामध्ये ऑपरेशन दरम्यान लागणारा सर्जिकल मायक्रोस्कोप म्हणजे दुर्बीण, इत्यादी(intraoperative neuro monitoring, realtime intraoperative ultrasound traking etc) मेंदूच्या गठींवर ऑपरेशन सहज शक्य झाले आहे. अत्यंत प्रगत अशा रेडिएशन थेरेपी आणि सहजासहजी देता येतील अशी विकसित कीमोथेरेपी या उपचार पद्धतीने मेंदूच्या गाठींवर खूप काळ नियंत्रण ठेवता येतो.
- *डॉ. अमोल विजय देगावकर*
मेंदू मणका व नसांचे तज्ञ न्युरोसर्जन
मेंदू मणका गाठींचे शस्त्रक्रिया तज्ञ
(फेलोशिप टाटा हॉस्पिटल, मुंबई)
सोलापूर न्यूरो स्पाईन सेंटर.
8080721314
यूट्यूब चॅनल -
https://www.youtube.com/-spine8259