
28/09/2025
आज 28 सप्टेंबर कर्णबधिर दिनानिमित्त ममता मूकबधिर विद्यालयातील माजी कर्णबधिर विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये येऊन कर्णबधिर दिन साजरा केला. कर्णबधिर दिनानिमित्त सर्व मुलांना खाऊ आणला होता आणि त्यासोबतच केक कापून हा साजरा करण्यात आला. त्यासोबतच त्यांनी आपण कर्णबधिर असल्याचा अभिमान बाळगावा व सांकेतिक भाषेला गर्व समजून ती वापरावी. व आपण सामान्य माणसापेक्षा कुठेही कमी नाही. अशा पद्धतीचे त्यांना मार्गदर्शन केले. या कर्णबधिर दिनानिमित्त माजी कर्णबधिर विद्यार्थी यशवंत नागणकेरी, तरबेज शेख, हैदर रंगरेज, अनस नल्लामांडू, तनिष्क माळगे, दिनेश बिराजदार या सर्वांनी मिळून या कर्णबधिर दिन साजरा केला. यासोबतच ममता मूकबधिर विद्यार्थी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या सर्वांचे कौतुक आणि आभार विद्यालाचे मुख्याध्यापिका सौ संगीता गायकवाड मॅडम यांनी केले.