11/08/2025
फुटलेल्या हृदयाची दुरुस्ती -अविस्मरणीय ऑपरेशन डॉक्टर विजय अंधारे सोलापूर महाराष्ट्र - हृदयविकाराच्या आघातानंतर हार्ट अटॅक आल्यामुळे हृदयाच्या स्नायूंना इजा होऊन हृदय फुटले तर मनुष्य जगण्याची शक्यता शून्य टक्के असते उपचारा भावी असे रुग्ण शंभर टक्के वेळा मृत्यूच पावतात ऑपरेशन केले तरी यातील 30 ते 70 टक्के रुग्ण मृत्यू पावतात हृदय विकाराच्या आघात आपण हृदयाचे स्नायू हे खूप खराब झालेले असतात त्यामुळे त्यांच्यावर कुठलाही टाका बसू शकत नाही ते हृदयाला पडलेले छिद्र व त्यातून होणारा रक्तस्त्राव बंद करायचा प्रयत्न केला तर सर्व टाके तुटून जातात आणि स्नायू अजून डॅमेज होतात त्यामुळे हृदय अजून फाटत जाते आणि पेशंटचं ऑपरेशन थिएटरमध्ये टेबलावरच मृत्यू होण्याची शक्यता असते अमेरिकेसारख्या विकसित देशांमध्ये सुद्धा अशा कंडिशन मध्ये ऑपरेशन न करता पेशंट वाचण्याची शक्यता काहीच नसते आणि ऑपरेशन केले तरीसुद्धा मृत्यू दर जवळपास 63% पर्यंत आहे अशीच एक घटना मार्कंडेय रुग्णालयांमध्ये नुकतीच झाली एक रुग्ण हृदयविकाराचा अटॅक आल्यामुळे शश्रुत हॉस्पिटल बार्शी येथे ऍडमिट झाला असता त्याचे ब्लड प्रेशर फक्त 60 आहे आणि पेशंटची अवस्था अर्धवट शुद्धीमध्ये आहे हे पाहून हृदयाचे स्कॅनिंग करण्यात आले तर त्या स्कॅनिंग मध्ये असे दिसून आले की हृदयाभोवती रक्ताच्या गाठी जमा आहेत हृदयाच्या कप्प्यांवर त्या प्रेशर करत आहेत ईसीजी केला असता असे दिसून आले की पेशंटला हृदय विकाराचा अटॅक आलेला आहे या रुग्णास तातडीने सोलापूरला हलवण्यात आले पेशंट इमर्जन्सी विभागात आला असता पेशंटची बीपी लागत नाही अशा प्रकारचा फोन कॉल डॉक्टर विजय अंधारे यांना आल्यानंतर मार्कंडेय रुग्णालयातील डॉक्टर सय्यद या कार्डिओलॉजिस्टच्या मदतीने त्यांनी तात्काळ सर्व तपासण्या करून घेतल्या असता हृदयविकाराच्या आघातामुळे हृदयाला इजा होऊन हृदयाचा एक भाग फाटून हा रक्तस्त्राव झाला आहे असे दिसून आले नातेवाईक हे उच्चशिक्षित असल्याने डॉक्टर अंधारे ने त्यांना तात्काळ समुपदेशन करून या प्रकारच्या कंडिशन मध्ये काय रिझल्ट असतात याबद्दल संपूर्णपणे कल्पना दिली . कुठलीही जास्त अपेक्षा न करता पेशंट वाचवण्याचा एक टक्के जरी शक्यता असेल तर आपण प्रयत्न करूया या अटीने या पेशंटला तात्काळ ऑपरेशन थेटर मध्ये 45 मिनिटात सर्व तयारी करून शिफ्ट करण्यात आले ऑपरेशन करताना छातीचे हाड कट करून हृदय ओपन करण्यात आले . हृदयाच्या वरती आवरण असते ते कट केल्यानंतर जवळपास एक लिटर रक्त बाहेर आले आणि पेशंटचे रक्तदाब साठ वरून हळूहळू 100 आणि नंतर 130 च्या वरती गेला त्यानंतर हृदयाची सर्व तपासणी करण्यात आली की हे रक्त कुठून येत आहे तपासणी यंत्र असे लक्षात आलं की हृदयाच्या मागील भागातून उजव्या साईडची जी रक्तवाहिनी असते त्यातील एक फांदी बंद असल्यामुळे त्या भागातील रदयाचे स्नायू खराब होऊन हृदयाला भोक पडले आहे आणि तिथून रक्तस्त्राव होत आहे डॉक्टर विजय अंधारे यांनी आपल्या अनुभवाचा वापर करत बायो ग्लू आणि ट्रिपल पॅच टेक्निक वापरून हृदयावरच्या आवरणाचा एक पॅच बनवून पी टी एफ नावाच्या मटेरियल चा एक पॅच घेऊन हे जे छिद्र आहे ते बंद केले व त्या छिद्राच्या आजूबाजूचा हृदयाचा जो भाग खराब झाला आहे त्याला पॅच आणि ग्लु ने सपोर्ट दिला हृदयाच्या आजूबाजूचे सर्व रक्त बाहेर काढून परत रक्त जमले तर बाहेर यावे म्हणून छातीमध्ये नळ्या ठेवून मग छातीचे हाड बंद करण्यात आले ही ओपन हार्ट सर्जरी जवळपास दोन तास चालली ऑपरेशन नंतर पहिले सहा तास पेशंटची कंडिशन ही अतिवस्त होती पेशंट स्टेबल नव्हता हृदयाचे ठोके चुकत होते म्हणून यांना पेसमेकर ही लावण्यात आला हळूहळू 24 तासानंतर पेशंटची कंडीशन पूर्णपणे स्टेबल झाली आणि त्यानंतर पुढील सात दिवसांमध्ये पेशंटची पूर्ण रिकवरी झाली आज पेशंट आठव्या दिवशी ऑपरेशन नंतर व्यवस्थित घरी जात आहे पेशंटच्या अंजॉग्रफी केली असता त्याच्या उजव्या रक्तवाहिनी मध्ये ब्लॉक असल्याचे दिसून आलेले आहे आता सध्या त्याच्यासाठी औषधे चालू आहेत पुढे जाऊन त्यांना त्याच्यासाठी सिंगल वेसल एन्जोप्लास्टीचा सल्ला पण देण्यात आलेला आहे अशा प्रकारची दुर्मिळ घटना सोलापूर सारख्या शहरांमध्ये हृदय शस्त्रक्रिया करून पेशंटला वाचवण्यात यश आले आहे की समस्त सोलापूरकरांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे.Its heroic attempt by surgical teams all over world. I am really proud of mssrn team who stood by me during the procedure with swift action 💕या शस्त्रक्रियेस मध्ये सर्जन डॉक्टर विजय अंधारे यांनी प्रमुख भूमिका बजावली. डॉक्टर मंजुनाथ डफळे यांनी भुलतज्ञ म्हणून काम पाहिले. लहू सुपेकर यांनी परफ्युजिनिस्ट म्हणून काम पाहिले डॉक्टर सुप्रिया खिलारे डॉक्टर आरती त्र्यंबके डॉक्टर प्रज्वल कन्ना डॉक्टर कोमल हटीकटी डॉक्टर राजे पांढरे डॉक्टर बबीता या डॉक्टरांचा या शस्त्रक्रियेमध्ये सहभाग राहिला सिस्टर इनचार्ज मुबीना, तेजस्विनी केशव अश्विनी यांनी या शस्त्रक्रियेमध्ये सहभाग घेतला