16/02/2022
केनियाचे माजी पंतप्रधान अमोलो ओडींगा यांची मुलगी रोजमेरीला ब्रेन कॅन्सरमुळे काही वर्षांपासून अंधत्व आले आहे. चीन, इस्राईल, दक्षिण आफ्रिका येथे उपचार घेतल्यावर पण गुण न आल्यावर ते भारतात केरळमध्ये आयुर्वेद उपचारांसाठी आलेत. कोचीजवळ कुताट्टूकुलम येथील श्रीधरीयम आयुर्वेदिक नेत्र रुग्णालयात त्यांनी उपचार घेतले. त्यांच्या मुलीच्या अंधत्वावर उपचारांचा सकारात्मक परिणाम दिसायला लागला.
नरेंद्र मोदी यांनी दिल्लीमध्ये ओडींगो यांची भेट घेतली. केनियाच्या माजी पंतप्रधानांनी भारतीय आयुर्वेदाचं कौतुक केलं. आयुर्वेदाला आफ्रिकेतही नेण्याची इच्छा दर्शवली.