
27/09/2025
स्व.विष्णुपंत ( तात्यासाहेब) कोठे मेमोरियल ट्रस्ट संचलित डॉ. कोठेज् हाॅस्पिटल यांच्या वतीने मा. डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांनी शिंगोली, तरटगाव, पाथरी व पूर बाधित परिसरातील वस्तीतील लोकांचे काहींचे शेती, घरांचे नुकसान झाल्यामुळे आर्थिक व्यवस्था कोलमडली असल्याने व पूरग्रस्तांना मदत म्हणून अन्नधान्यांचे कीट बनवून ५०० कुटुंबाना वाटप करण्यात आले. या कीट मध्ये साखर, रवा, शाबुदाणा, भगर, शेंगदाणे, तेल, चहा अशा पाच किलोचा हा एक कीट आहे.या प्रसंगी पाथरी गावचे सरपंच श्रीमंत बंडगर,शिंगोली गावचे सरपंच अविनाश मोटे, उपसरपंच पांडुरंग रासेराव,माजी उपसरपंच सागर मोटे,ग्रा. सदस्य. महादेव खटके,अविनाश टेळे, चेअरमन. कानिफनाथ मोटे,रोहन (दादा) खटके,अशोक खटके,रमेश खांडेकर,माऊली टेळे,माऊली कस्तुरे,राहुल मोटे.संभाजीराव शिंदे प्रशाला चे मा. प्राचार्य. वासुदेव इप्पलपल्ली सर, अंदेवाडी अप्पा, प्रभारी मुख्याध्यापक सचिन ढोपरे सर, छत्रपती अवशेट्टी सर, विनोद पवार ,विनायक खरात, दिनेश धिरडे,उपस्थित होते..