08/10/2025
🏮🪔 बहुविकलांग मुलांच्या हस्तकलेतून साकारले दिवाळीचे सौंदर्य: आकाशकंदीलांनी उजळला आनंद 🪔🏮
ज्यांना स्वतःच्या दैनंदिन गरजाही पूर्ण करणे कठीण आहे, चालताना, बोलताना, ऐकताना, पाहताना खूप संघर्ष करावा लागत असून देखील स्वतःच्या अंधःकारमय प्रवासातून मार्ग काढत एक आशेचा, सकारात्मकतेचा दीप ज्यांनी आपल्या स्पर्शातून, कृतीतून जिवंत केला आहे अशा डेफब्लाईंड मुलांनी बनविलेल्या पणत्या, आकाशकंदील, विविध शोभेच्या वस्तु यांचे प्रदर्शन व विक्रि स्टॉल #हॉटेल_बालाजी_सरोवर_प्रिमियर येथे आयोजित करण्यात आला होता. ही संधी बालाजी सरोवर ची संपूर्ण टिम व सौ. निलगंगा शिंदे ( HR- Manager ) यांनी दिली त्याबद्दल त्यांचे विशेष आभार.. !!
या विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मदतीने विविध रंगीबेरंगी साहित्य वापरून सुंदर आणि आकर्षक आकाशकंदील, पणत्या तयार केल्या आहेत. दिवाळीच्या निमित्ताने त्यांनी स्वतः तयार केलेल्या वस्तूंमधून आत्मविश्वास, कौशल्य आणि कला यांची सुंदर झलक पाहायला मिळते.
या उपक्रमातून मिळणारे उत्पन्न मुलांच्या विकासासाठी आणि त्यांच्या उपक्रमांना चालना देण्यासाठी वापरण्यात येणार आहे.
सोलापूर शहरातील नागरिकांनी #नॅब_डेफब्लाईंड_प्रोजेक्ट, इंदिराभवन, आश्विनी हाॅस्पिटल समोर, सोलापूर येथे भेट देऊन एक दिवाळी खरेदीचा अर्थपूर्ण अनुभव घ्यावा, असे आवाहन आम्ही करतो.
ही दिवाळी केवळ प्रकाशाची नाही, तर प्रेरणेचीही ठरणार आहे – ज्यात दिव्यांनी नव्हे, तर जिद्दीने घर उजळणार आहे.