Taloda Chemist And Druggist Association

Taloda Chemist And Druggist Association health regarding

25 सप्टेंबर 2025 रोजी जागतिक फार्मासिस्ट दिन तळोदा तालुका केमिस्ट अँड ड्रगजिस्ट असोसिएशनच्या वतीने उत्साहात साजरा करण्या...
26/09/2025

25 सप्टेंबर 2025 रोजी जागतिक फार्मासिस्ट दिन तळोदा तालुका केमिस्ट अँड ड्रगजिस्ट असोसिएशनच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला. 🎉💊👏

या दिनानिमित्त तळोदा तालुक्यातील सर्व केमिस्ट बांधवांनी आपल्या मेडिकल स्टोअरवर एप्रन परिधान करून समाजाप्रती आपली जबाबदारी अधोरेखित केली. प्रत्येक केमिस्टने रुग्णांना योग्य मार्गदर्शन व पेशंट कौन्सिलिंग करताना औषधांचा योग्य वापर, दुष्परिणामांबद्दलची माहिती आणि आरोग्याची काळजी घेण्याचे महत्त्व समजावून सांगितले.

कार्यक्रमाची खास वैशिष्ट्ये म्हणजे प्रत्येकाने स्वतःचा छोटासा व्हिडिओ तयार करून या उपक्रमाचे दस्तावेजीकरण केले. या व्हिडिओंमधून केमिस्ट समाजाचे आरोग्य रक्षणकर्ते म्हणून किती महत्त्वाची भूमिका बजावतात हे स्पष्ट झाले.

तळोदा तालुका केमिस्ट अँड ड्रगजिस्ट असोसिएशनच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, यामुळे आरोग्यविषयक जनजागृतीला एक नवा वेग मिळाला आहे.

03/09/2025
🌸✨ गणपती बाप्पा मोरया ✨🌸प्रिय केमिस्ट बांधवांनो,सर्वप्रथम या वर्षीच्या गणेशोत्सवात तुम्ही दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाह...
03/09/2025

🌸✨ गणपती बाप्पा मोरया ✨🌸

प्रिय केमिस्ट बांधवांनो,
सर्वप्रथम या वर्षीच्या गणेशोत्सवात तुम्ही दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून मनापासून समाधान मिळाले. विसर्जन सोहळा आणि स्नेहभोजनाला दिलेला तुमचा सहभाग खरंच प्रशंसनीय होता. 🙏

लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची सुरुवात केली, ती संकल्पना होती – “सर्वांनी एकत्र येऊन समाजात ऐक्य व बंधुता टिकवणे.”
याच परंपरेला पुढे नेत, आपल्या तळोदा तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनमध्ये गणेशोत्सव साजरा करण्याची संकल्पना आपले कायदे पंडित वकील साहेब श्री. विष्णूभाऊ मोरे यांनी मांडली. पाहता पाहता आता या उपक्रमाला चार वर्षे पूर्ण झाली असून, दरवर्षी उत्सव अधिक उत्साहाने व आनंदाने साजरा होत आहे. 🌺

यंदाही मोठ्या संख्येने बांधव उपस्थित राहिले, पण तरीही काही बांधवांची उपस्थिती राहिली. चला, जाऊ द्या… हे वर्ष संपले, पण पुढील वर्षी आपण अधिक जोमाने, एकदिलाने, आणि प्रत्येकाच्या सहभागाने हा उत्सव साजरा करू या! 🎉

🙏 एक विनंती –
ज्यांची वर्गणी अद्याप बाकी असेल त्यांनी कृपया ती लवकरात लवकर रुद्र मेडिकल येथे जमा करावी.

कार्यक्रमाचे फोटो/व्हिडिओ ज्यांच्याकडे असतील त्यांनी कृपया शेअर करावेत जेणेकरून हा उत्सवाची सुंदर आठवण सर्वांपर्यंत पोहोचेल. 📸🎥

चला, गणरायाच्या कृपेने आपली ही परंपरा अखंड सुरू राहो आणि आपल्या संघटनेचे बंधुत्व, एकात्मता आणि उत्साह वर्षागणिक वाढत जावो, हीच मंगलकामना!

🚩 गणपती बाप्पा मोरया – पुढच्या वर्षी लवकर या! 🚩

---

✨🚩 गणपती बाप्पा मोरया 🚩✨काल दिनांक 29 ऑगस्ट 2025 रोजी आपल्या तळोदा तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन तर्फे आयोजित श्र...
03/09/2025

✨🚩 गणपती बाप्पा मोरया 🚩✨

काल दिनांक 29 ऑगस्ट 2025 रोजी आपल्या तळोदा तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन तर्फे आयोजित श्री गणपती बाप्पाचे विसर्जन मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने पार पडले. विसर्जन सोहळ्याला असंख्य केमिस्ट बांधव आपल्या परिवारासह उपस्थित राहून बाप्पाच्या दर्शनाचा लाभ घेतला.

🙏 सर्व केमिस्ट बांधवांनी एकच प्रार्थना केली –
“अखंड भारतातील प्रत्येक नागरिक सुखी, समाधानी, निरोगी राहो आणि समाजात ऐक्य, सौहार्द व आनंदाचे वातावरण नांदो.”

यावेळी उपस्थित सर्वांनी पुढील वर्षी गणरायाचे आगमन आणखी मोठ्या उत्साहाने, एकत्रितपणे व अधिक भव्यदिव्य स्वरूपात करण्याचा संकल्प व्यक्त केला.

गणपती बाप्पाच्या कृपाशिर्वादाने आपल्या संघटनेला अधिक बळकटी मिळो, सर्वांच्या जीवनात आरोग्य, समृद्धी व आनंद नांदो हीच मंगलकामना!

🚩 गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या..! 🚩

🙏🌸✨दिनांक 29 ऑगस्ट 2025 रोजी आपल्या लाडक्या गणरायाच्या विसर्जन निमित्त एक भव्य सत्यनारायण पूजन आयोजित करण्यात आले होते. ...
03/09/2025

🙏🌸✨
दिनांक 29 ऑगस्ट 2025 रोजी आपल्या लाडक्या गणरायाच्या विसर्जन निमित्त एक भव्य सत्यनारायण पूजन आयोजित करण्यात आले होते. या पूजनाचे मानकरी श्री यादव जिरे (मालक, वक्रतुंड मेडिकल स्टोअर) होते.

या पवित्र प्रसंगी तळोदा तालुक्यातील सर्व केमिक बंधू मोठ्या उत्साहाने व श्रद्धेने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी केला.

गणपती बाप्पा मोरया! 🙏🌺

✨🙏 गणराय आगमन 🙏✨आज दिनांक 27 ऑगस्ट 2025 रोजी तळोदा तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन यांच्या वतीने पार्थिव श्री गणेश ...
03/09/2025

✨🙏 गणराय आगमन 🙏✨

आज दिनांक 27 ऑगस्ट 2025 रोजी तळोदा तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन यांच्या वतीने पार्थिव श्री गणेश मूर्तीची स्थापना विधिवतपणे विद्या सहयोग मेडिकल, तळोदा येथे करण्यात आली.

ही स्थापना आपल्या माननीय वकील साहेब विष्णूभाऊ मोरे यांच्या हस्ते पार पडली. या मंगल प्रसंगी तळोदा तालुक्यातील असंख्य केमिस्ट बांधव आपल्या परिवारासह उपस्थित होते.

गणरायाच्या आगमनाने सर्वत्र आनंदाचे वातावरण लाभले आहे.
गणपती बाप्पा मोरया! 🙏✨

तळोद्यात असिस्टंट कमिशनर ड्रग ऑफिसर श्रीमती अश्विनी जमादार यांची प्रेरणादायी भेटप्रत्येक केमिस्ट बांधवाला पाच झाडे लावण्...
21/08/2025

तळोद्यात असिस्टंट कमिशनर ड्रग ऑफिसर श्रीमती अश्विनी जमादार यांची प्रेरणादायी भेट

प्रत्येक केमिस्ट बांधवाला पाच झाडे लावण्याचे आव्हान

तळोदा, 20 ऑगस्ट 2025 :
आज तळोदा तालुक्यात जिल्ह्याच्या असिस्टंट कमिशनर ड्रग ऑफिसर माननीय श्रीमती अश्विनी जमादार मॅडम यांनी भेट दिली. या प्रसंगी त्यांनी केमिस्ट बांधवांसाठी एक हरित उपक्रम जाहीर करत प्रत्येक केमिस्ट बांधवाने किमान पाच झाडे लावावीत असे आव्हान केले.

राज्य शासनाच्या आदेशानुसार लावलेली झाडे जगवणे व त्यांचे प्रत्येक महिन्याला फोटो ड्रग ऑफिसपर्यंत संघटनेच्या माध्यमातून पाठविणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. झाडे मेडिकलच्या आवारात, राहत्या घरी, शाळेत, प्रशासकीय इमारतीत किंवा दवाखान्यात लावता येतील, असे सांगण्यात आले.

या उपक्रमाचा अवचित्त साधून तळोदा तालुक्यातर्फे श्रीमती अश्विनी जमादार मॅडम यांचा सत्कार करण्यात आला. उपस्थित सर्व केमिस्ट बांधवांनी वृक्षारोपण कार्यक्रमात मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवण्याची ग्वाही दिली.

कार्यक्रमाला केमिस्ट बंधू देवेंद्र गुरव, नचिकेत पिंपरी, नितीन मगरे, यादव जीरे, हेमकांत चौधरी व पलाश जैन उपस्थित होते.

या निर्णयामुळे तळोदा तालुक्यात हरित क्रांतीला नवे बळ मिळणार आहे. 🌳🌱

🩸 भव्य रक्तदान शिबिर – एक जीव वाचवण्याची प्रेरणादायी गोष्ट! 🩸दिनांक २५ जून २०२५, स्थळ – स्वस्तिक हॉस्पिटल, तळोदासारथी फा...
01/07/2025

🩸 भव्य रक्तदान शिबिर – एक जीव वाचवण्याची प्रेरणादायी गोष्ट! 🩸

दिनांक २५ जून २०२५, स्थळ – स्वस्तिक हॉस्पिटल, तळोदा
सारथी फाउंडेशन, तळोदा तालुका डॉक्टर असोसिएशन, आणि महाराष्ट्र युवा क्रांती फाउंडेशन पोलीस मित्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य ब्लड कॅम्प उत्साहात पार पडला.

या वेळी एक अतिशय महत्त्वाचा आणि प्रेरणादायक क्षण घडला –
श्री. देवेंद्र कालिदास गुरव
(जिल्हा सहसचिव – नंदुरबार जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन)
यांनी तालुक्यातील पहिले ब्लड स्टेम सेल डोनेट करणारे व्यक्ती म्हणून नवा आदर्श निर्माण केला.

त्यांच्या या पवित्र निर्णयामुळे एका लहान चिमुकल्याचा अमूल्य जीव वाचला, आणि म्हणूनच त्यांच्या कार्याचा विशेष सत्कार करून गौरव करण्यात आला.

🌟 हा एक संदेश आहे समाजाला – केवळ रक्तदानच नव्हे, तर स्टेम सेल डोनेशनसुद्धा आयुष्य वाचवू शकते!
श्री. देवेंद्र गुरव यांच्या कृतीने अनेकांना प्रेरणा मिळेल, आणि नव्या जीवांना आशा मिळेल.

🙏 तळोदा तालुका तुमच्यावर अभिमान बाळगतो!

*आभार.. 🙏🙏**तळोदा ता. केमिस्ट & ड्रगीस्ट असोसिएशन तळोदा**दिनांक:  १ मे २०२५**मा. आ. आप्पासाहेब जगन्नाजी शेंदे साहेब यांच...
01/05/2025

*आभार.. 🙏🙏*

*तळोदा ता. केमिस्ट & ड्रगीस्ट असोसिएशन तळोदा*
*दिनांक: १ मे २०२५*

*मा. आ. आप्पासाहेब जगन्नाजी शेंदे साहेब यांचा संकल्पनेने उभारण्यात आलेल्या पाणपोईच्या लोकार्पण सोहळ्याच्या यशस्वी आयोजनानंतर, तळोदा ता. केमिस्ट & ड्रगीस्ट असोसिएशन तळोदा तर्फे सर्व मान्यवर पाहुणे, पोलीस निरीक्षक साहेब, अजयभाऊ कोळी, सामाजिक संस्था, हितचिंतक आणि गावकऱ्यांचे मन:पूर्वक आभार व्यक्त करीत आहोत.*

*आपल्या उपस्थितीने, मार्गदर्शनाने व शुभेच्छांनी कार्यक्रमास एक नवा ऊर्जा व प्रेरणा मिळाली. समाजहिताच्या कार्यात आपण दिलेले सहकार्य आमच्यासाठी अत्यंत मोलाचे आहे.*

*आपल्या या सेवाभावातूनच आम्हाला सामाजिक कार्यासाठी नवी दिशा मिळाली असून, आम्ही *आगामी काळातही असेच विधायक उपक्रम हाती घेणार आहोत. त्या प्रत्येक उपक्रमात आपले सहकार्य व साथ याची आम्हाला नितांत आवश्यकता आहे.*

*कार्यक्रमात उपस्थित आपले केमिस्ट बंधू लक्ष्मणभाऊ पाटील, ऍडव्होकेट विष्णू मोरे, वैद्य देवेंद्र गुरव, माजी अध्यक्ष नचिकेतभाऊ पिंपरे, नितिन मगरे, कुणाल साळी,रोहित सूर्यवंशी, स्वप्नील पाटील, हेमकांत चौधरी, सुरज पावरा,मच्छिन्द्र पाडवी, विनल वसावे.*

*पुढील कार्यातही आपण सर्वांनी अशीच साथ द्यावी, प्रेरणा द्यावी व समाजहिताच्या या प्रवासात आमच्या सोबत खंबीरपणे उभे राहावे, हीच मनापासून अपेक्षा.*

*आपल्या शुभेच्छा आणि सहकार्याबद्दल पुन्हा एकदा मन:पूर्वक धन्यवाद!*

*आपला*
*अध्यक्ष*
*सौरभ माळी*
*तळोदा ता. केमिस्ट & ड्रगिस्ट असोसिएशन तळोदा*

---

Address

Taloda, Tel. Taloda Dist. Nandurbar
Taloda
425413

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Taloda Chemist And Druggist Association posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share