Shri Vitthal Jyotish Karyalay

Shri Vitthal Jyotish Karyalay Everything In Computer Astrology

27/01/2024
उद्या पासून श्री क्षेत्र वाका (गूज) येथे श्रीमद् भागवत कथेचा प्रारंभ
13/11/2023

उद्या पासून श्री क्षेत्र वाका (गूज) येथे श्रीमद् भागवत कथेचा प्रारंभ

नवचंडी याग नंदुरबारयजमान - श्री नरोत्तम भाई पटेल
22/05/2022

नवचंडी याग नंदुरबार
यजमान - श्री नरोत्तम भाई पटेल

20/12/2019

🌑 कंकणाकृती सूर्यग्रहण:-


मार्गशीर्ष कृष्ण ३० शके १९४१ गुरुवार २६ डिसेंबर २०१९
स्पर्श ०८|०४
मध्य ०९|२२
मोक्ष १०|५५
पर्व ०२|५१

@ग्रहण दिसणारे प्रदेश — भारतासह संपूर्ण आशियाखंड आफ्रिकाखंडातील इथिओपिया व केनिया आणि आॅस्ट्रेलियाचा उत्तरेकडील प्रदेश या प्रदेशात ग्रहण दिसणार आहे.
केरळ, तामिळनाडू इत्यादी प्रदेशात कंकणाकृति अवस्था पहावयास मिळेल उर्वरित संपूर्ण भारतामध्ये हे ग्रहण खंडग्रास दिसेल.

@पुण्यकाल / पर्वकाल- ग्रहणस्पर्शापासून मोक्षापर्यंतचा काळ पुण्यकाल मानावा.

@ग्रहाणाचा वेध — हे ग्रहण दिवसाच्या पहिल्या प्रहरात असल्याने बुधवारी २५ डिसेंबरच्या सूर्यास्तापासून २६ डिसेंबर ग्रहण मोक्षापर्यंत वेध पाळावेत. बाल, वृध्द, आजारी, अशा व्यक्तींनी आणि गर्भवती स्त्रियांनी रात्री १२ पासून ग्रहण मोक्षापर्यंत वेध पाळावेत. वेदामध्ये भोजन करू नये. स्नान, जप, नित्यकर्म, देवपूजा, श्राद्ध कर्म ही करता येतात. वेधकाळात आवश्यक असे पाणी पिणे, मलमूत्रोत्सर्ग, झोप, इ. कर्मे करता येतात. ग्रहणपर्वकाळात म्हणजेच सकाळी ०८|०४ ते १०|५५ या कालावधीत पाणी पिणे, मलमूत्रोत्सर्ग, झोप इत्यादी कर्मे करणे करू नये.

@ग्रहणाचे राशीपरत्वे फल-
@शुभ फळ:- कर्क, तुला, कुंभ, मीन.
@मिश्रफल:- मेष, मिथुन, सिंह, वृश्चिक.
@अनिष्ट फळ:- वृषभ, कन्या, धनु, मकर. ज्यांना अनिष्टफल आहे त्यांनी व गर्भवती महिलांनी हे ग्रहण पाहू नये.

@मंत्रतंत्र पुरश्चरणासंबंधी— नवीन मंत्र घेण्यास व गृहीत मंत्राचे पुरश्चरण करण्यास सूर्यग्रहण हा मुख्यकाल आहे. पूर्वी घेतलेल्या मंत्राचे पुरश्चरण ग्रहण पर्व कालामध्ये केल्याने मंत्र सिद्ध होते.

@स्नानाविषयी — ग्रहणात सर्व उदक गंगेसमान आहे तरीही उष्णोदकाहून शीतोदक पुण्यकारक, पाणी वर काढून स्नान करण्यापेक्षा वाहते पाणी, सरोवर, नदी, महानदी, गंगा, समुद्र यांचे स्नान उत्तरोत्तर श्रेष्ठ व पुण्यकारक आहे. सूर्यग्रहणात नर्मदास्नानाचे विशेष महत्त्व सांगितले आहे. नर्मदास्नान शक्य नसल्यास स्नानाचे वेळी नर्मदेचे स्मरण करावे.

@मार्गशीर्ष महालक्ष्मीव्रत उद्यापन:-
गुरुवारी ग्रहणकालानंतर स्नान करून व्रताचे उद्यापन मार्गशीर्ष महालक्ष्मीव्रताचे उद्यापन गुरुवारी करावे. पुराणातील व्रत मार्गशीर्ष महिण्यातील गुरुवारचे असल्याने मार्गशीर्ष कृष्ण अमावास्येला मास समाप्ति होते. त्यामुळे व्रताचे उद्यापन २६ तारखेला गुरुवारीच करावे.

10/09/2019

शिवस्तुती

कैलासराणा शिव चंद्रमौळी ।
फणींद्र माथा मुकुटीं झळाळी ।
कारुण्यसिंधू भवदुःखहारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥१॥

रवींदुदानावल पूर्ण भाळीं ।
स्वतेज नेत्रीं तिमीरौघ जाळी ।
ब्रह्मांडधीशा मदनान्तकारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥२॥

जटा विभूती उटि चंदनाची ।
कपालमाला प्रित गौतमीची ।
पंचानना विश्वनिवांतकारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥३॥

वैराग्य योगी शिव शूलपाणी ।
सदा समाधी निजबोधवाणी ।
उमानिवासा त्रिपुरान्तकारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥४॥

उदारमेरु पति शैलजेचा ।
श्रीविश्वनाथ म्हणती सुरांचा ।
दयानिधी तो गजचर्मधारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥५॥

ब्रह्मादि वंदी अमरादिनाथ ।
भुजंगमाला धरि सोमकांत ।
गंगा शिरी दोष महविदारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥६॥

कपूरगौरी गिरीजा विराजे ।
हळाहळें कंठ निळाच साजे ।
दारिद्र्य दुःख स्मरणें निवारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥७॥

स्मशानक्रीडा करिता सुखावे ।
तो देवचूडामणि कोण आहे ।
उदासमूर्ती जटाभस्मधारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥८॥

भूतादिनाथ अरि अंतकाचा ।
तो स्वामि माझा ध्वज शांभवाचा ।
राजा महेश बहुबाहुधारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥९॥

नंदी हराचा हर नंदिकेश ।
श्रीविश्वनाथ म्हणती सुरेश ।
सदाशिव व्यापक तापहारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥१०॥

भयानक भीम विक्राळ नग्न ।
लीलाविनोदें करि काम भग्न ।
तो रुद्र विश्वंभर दक्ष मारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥११॥

इच्छा हराची जग हे विशाळ ।
पाळी रची तो हरि ब्रह्मगोळ ।
उमापती भैरव विघ्नहारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥१२॥

भागीरथीतीर सदा पवित्र ।
जेथें असे तारक ब्रह्ममंत्र ।
विश्वेश विश्वंभर त्रिनेत्रधारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥१३॥

प्रयाग वेणी सकळा हराच्या ।
पदारविंदी वहाती हरीच्या ।
मंदाकिनी मंगल मोक्षकारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥१४॥

कीर्ती हराची स्तुती बोलवेना ।
कैवल्यदाता मनुजा कळेना ।
एकाग्रनाथ विष अंगिकारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥१५॥

सर्वांतरी व्यापक जो नियंता ।
तो प्राणलिंगाजवळी महंता ।
अंकी उमा ते गिरिरुपधारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥१६॥

सदा तपस्वी असे कामधेनु ।
सदा सतेज शतकोटी भानू ।
गौरीपती जो सदा भस्मधारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥१७॥

कर्पूरगौर स्मरल्या विसावा ।
चिंता हरी जो भजकां सदैवा ।
अंती स्वहितसुचना विचारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥१८॥

विरामकाळी विकळे शरीर ।
उदास चित्तीं न धरीच धीर ।
चिंतामणी चिंतनि चित्तहारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥१९॥

सुखावसानीं सकळें सुखाची ।
दुःखावसानी टळती जगाचीं ।
देहावसानी धरणी थरारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥२०॥

अनुहतशब्द गगनी न माय ।
तिचेनि नादें भव शून्य होय ।
कथा निजांगे करुणा कुमारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥२१॥

शांतिस्वलीला वदनीं विलासे ।
ब्रह्मांडगोळीं असुनी न दिसे ।
भिल्ली भवानी शिवब्रह्मचारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥२२॥

पीतांबरें मंडित नाभि ज्याची ।
शोभा जडीत वरि किंकिणींची ।
श्रीवेददत्त दुरितान्तकारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥२३॥

जिवाशिवांची जडली समाधी ।
विटला प्रपंचीं तुटली उपाधी ।
शुद्धस्वरे गर्जती वेद चारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥२४॥

निदान कुंभ भरला अभंग ।
पहा निजांगे शिव ज्योतिर्लिंग ।
गंभीर धीर सुरचक्रधारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥२५॥

मंदार बिल्वें बकुलें सुवासी ।
माला पवित्र वहा शंकरासी ।
काशीपुरी भैरव विश्व तारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥२६॥

जाई जुई चंपक पुष्पजाती ।
शोभे गळा मालतिमाळ हातीं ।
प्रतापसूर्य शरचापधारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥२७॥

अलक्ष्यमुद्रा श्रवणी प्रकाशे ।
संपूर्ण शोभा वदनीं विकासे ।
नेई सुपंथे भवपैलतारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥२८॥

नागेशनामा सकळां जिव्हाळा ।
मना जप रे शिवयंत्रमाळा ।
पंचाक्षरी ध्यानगुहा विहारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥२९॥

एकान्ति ये रे गुरुराजस्वामी ।
चैतन्यरुपी शिव सूखनामी ।
शिणलों दयाळा बहुसाळ भारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥३०॥

शास्त्राभ्यास नको व्रतें मख नका तीव्रें तपें ती नको ।
काळाचें भय मानसीं धरु नको दुष्टांस शंकू नका ।
ज्याचीया स्मरणें पतीत तरती तो शंभु सोडूं नको ॥३१॥

10/09/2019

हनुमान चालीसा



श्री गुरु चरण सरोज रज, निज मन मुकुर सुधारि ।

बरनउं रघुबर विमल जसु, जो दायकु पल चारि ॥

बुद्घिहीन तनु जानिकै, सुमिरौं पवन-कुमार ।

बल बुद्घि विघा देहु मोहि, हरहु कलेश विकार ॥

----------------------------------------------------------------------------------------------------------------------

जय हनुमान ज्ञान गुण सागर । जय कपीस तिहुं लोग उजागर ॥

रामदूत अतुलित बल धामा । अंजनि पुत्र पवनसुत नामा ॥

महावीर विक्रम बजरंगी । कुमति निवार सुमति के संगी ॥

कंचन बरन विराज सुवेसा । कानन कुण्डल कुंचित केसा ॥

हाथ वज्र औ ध्वजा विराजै । कांधे मूंज जनेऊ साजै ॥

शंकर सुवन केसरी नन्दन । तेज प्रताप महा जगवन्दन ॥

विघावान गुणी अति चातुर । राम काज करिबे को आतुर ॥

प्रभु चरित्र सुनिबे को रसिया । राम लखन सीता मन बसिया ॥

सूक्ष्म रुप धरि सियहिं दिखावा । विकट रुप धरि लंक जरावा ॥

भीम रुप धरि असुर संहारे । रामचन्द्रजी के काज संवारे ॥

लाय संजीवन लखन जियाये । श्री रघुवीर हरषि उर लाये ॥

रघुपति कीन्हीं बहुत बड़ाई । तुम मम प्रिय भरतहि सम भाई ॥

सहस बदन तुम्हरो यश गावै । अस कहि श्री पति कंठ लगावै ॥

सनकादिक ब्रहादि मुनीसा । नारद सारद सहित अहीसा ॥

यह कुबेर दिकपाल जहां ते । कवि कोबिद कहि सके कहां ते ॥

तुम उपकार सुग्रीवहिं कीन्हा । राम मिलाय राजपद दीन्हा ॥

तुम्हरो मन्त्र विभीषन माना । लंकेश्वर भये सब जग जाना ॥

जुग सहस्त्र योजन पर भानू । लाल्यो ताहि मधुर फल जानू ॥

प्रभु मुद्रिका मेलि मुख माही । जलधि लांघि गए अचरज नाहीं ॥

दुर्गम काज जगत के जेते । सुगम अनुग्रह तुम्हरे तेते ॥

राम दुआरे तुम रखवारे । होत न आज्ञा बिनु पैसारे ॥

सब सुख लहै तुम्हारी सरना । तुम रक्षक काहू को डरना ॥

आपन तेज सम्हारो आपै । तीनों लोक हांक ते कांपै ॥

भूत पिशाच निकट नहिं आवै । महाबीर जब नाम सुनावै ॥

नासै रोग हरै सब पीरा । जपत निरन्तर हनुमत बीरा ॥

संकट ते हनुमान छुड़ावै । मन क्रम वचन ध्यान जो लावै ॥

सब पर राम तपस्वी राजा । तिनके काज सकल तुम साजा ॥

और मनोरथ जो कोई लावै । सोइ अमित जीवन फल पावै ॥

चारों जुग परताप तुम्हारा । है परसिद्घ जगत उजियारा ॥

साधु सन्त के तुम रखवारे । असुर निकन्दन राम दुलारे ॥

अष्ट सिद्घि नवनिधि के दाता । अस वर दीन जानकी माता ॥

राम रसायन तुम्हरे पासा । सदा रहो रघुपति के दासा ॥

तुम्हरे भजन राम को पावै । जनम जनम के दुख बिसरावै ॥

अन्तकाल रघुबर पुर जाई । जहाँ जन्म हरि-भक्त कहाई ॥

और देवता चित्त न धरई । हनुमत सेई सर्व सुख करई ॥

संकट कटै मिटै सब पीरा । जो सुमिरै हनुमत बलबीरा ॥

जय जय जय हनुमान गुसांई । कृपा करहु गुरुदेव की नाई ॥

जो शत बार पाठ कर सोई । छूटहिं बंदि महासुख होई ॥

जो यह पढ़ै हनुमान चालीसा । होय सिद्घि साखी गौरीसा ॥

तुलसीदास सदा हरि चेरा । कीजै नाथ हृदय महं डेरा ॥

॥ दोहा ॥

पवनतनय संकट हरन, मंगल मूरति रुप ।

राम लखन सीता सहित, हृदय बसहु सुर भूप ॥

10/09/2019

दत्तबावनी

जय योगीश्वर दत्त दयाळ II तूच एक जगती प्रतिपाळ II
अत्रनुसये करूनि निमित्त II प्रगटसि जगतास्तव निश्चित ॥
ब्रम्हाSच्युत शंकर अवतार ॥ शरणांगतासि तू आधार ॥
अंतर्यामी ब्रम्ह स्वरूप ॥ बाह्य गुरू नररूप सुरूप ॥
काखिं अन्नपूर्णा झोळी ।। शांति कमंडलु करकमळी ॥
कुठे षड्भुजा कोठें चार ॥ अनंत बाहू तू निर्धार ॥
आलो चरणी बाळ अजाण ॥ दिगंबरा ,उठ जाई प्राण ॥
ऐकुनि अर्जुन- भक्ती- साद ॥ प्रसन्न झाला तू साक्षात ॥
दिधली ऋद्धि सिद्धी अपार ॥ अंती मोक्ष महापद सार ॥
केला का तू आज विलंब ॥ तुजविण मजला ना आलंब ॥
विष्णुशर्म द्विज तारूनिया ॥ श्राद्धिं जेविला प्रेममया ॥
जंभे देवा त्रासविले ॥ कृपामृते त्वा हांसविले ॥
पसरी माया दितिसुत मूर्त ॥ इंद्रा करवी वधिला तूर्त ॥
ऐसी लीला जी जी शर्व ॥ केली ,वर्णील कैसी सर्व ॥
घेई आयु सुतार्थी नाम ॥ केला त्याते तू निष्काम ॥
बोधियले यदु परशुराम ॥ साध्य देव प्रल्हाद अकाम ॥
ऐसी ही तव कृपा अगाध ॥ कां न ऐकशी माझी साद ? ॥
धांव अनंता पाही न अंत ॥ न करी मध्येच शिशुचा अंत ॥
पाहुनि द्विज पत्नीकृत स्नेह ॥ झाला सुत तू नि:संदेह ॥
स्मर्तृगामी कलितार कृपाळ ॥ जडमुढ रजका तारी दयाळ ॥
पोटशुळी द्विज तारियला ॥ ब्राम्हण श्रेष्ठी उद्धरिला ॥
सहाय का ना दे अजरा ? ॥ प्रसन्न नयने देख जरा ॥
वृक्ष शुष्क तू पल्लविला ॥ उदास मजविषयी झाला ॥
वंध्या स्त्रीची सुत स्वप्ने ॥ फळली झाली गृहरत्ने ॥
निरसुनी विप्रतनूचे कोड ॥ पुरवी त्याच्या मनिंचे कोड ॥
दोहविली वंध्या महिषी ॥ ब्राम्हण दारिद्र्या हरिसी ॥
घेवडा भक्षुनि प्रसन्न क्षेम ॥ दिधला सुवर्ण घट सप्रेम ॥
ब्राम्हण स्त्रीचा मृत भ्रतार ॥ केला सजीव , तू आधार ॥
पिशाच्च पिडा केली दूर ॥ विप्रपुत्र उठविला शूर ॥
अंत्यज हस्ते विप्रमदास ॥ हरूनी रक्षिले त्रिविक्रमास ॥
तंतुक भक्ता क्षणांत एक ॥ दर्शन दिधले शैली नेक ॥
एकच वेळी अष्टस्वरूप ॥ झाला अससी , पुन्हा अरूप ॥
तोषविले निज भक्त सुजात ॥ दाखवुनि प्रचिती साक्षात ॥
हरला यवन नृपाचा कोड ॥ समता ममता तुजला गोड ॥
राम-कन्हैया रूपधरा ॥ केल्या लीला दिगंबरा ॥
शिला तारिल्या , गणिका , व्याध ॥ पशुपक्षी तुज देती साद ॥
अधमा तारक तव शुभ नाम ॥ गाता किती न होती काम ॥
आधि -व्याधि -उपाधि -गर्व ॥ टळती भावे भजता सर्व ॥
मूठ मंत्र नच लागे जाण ॥ पावे नर स्मरणे निर्वाण ॥
डाकिण ,शाकिण , महिषासूर ॥ भूतें ,पिशाच्चे ,झिंद असूर ॥
पळती मुष्टी आवळुनी ॥ धून -प्रार्थना -परिसोनी ॥
करूनि धूप गाइल नेमे ॥ दत्तबावनी जो प्रेमे ॥
साधे त्याला इह परलोक ॥ मनी तयाच्या उरे न शोक ॥
राहिल सिद्धी दासीपरी ॥ दैन्य आपदा पळत दुरी ॥
नेमे बावन गुरूवारी ॥ प्रेंमे बावन पाठ करी ॥
यथावकाशे स्मरी सुधी ॥ यम न दंडे त्यास कधी ॥
अनेक रूपी हाच अभंग ॥ भजता नडे न मायारंग ॥
सहस्र नामे वेष अनेक ॥ दत्त दिगंबर अंती एक ॥
वंदन तुजला वारंवार ॥ वेद श्वास हें तव निर्धार ॥
थकला वर्णन करतां शेष ॥ कोण रंक मी बहुकृत वेष ॥
अनुभवतृप्तीचे उद्गार ॥ ऐकुनी हंसता खाइल मार ॥
तपसि तत्वमसी हा देव ॥ बोला जयजय श्री गुरूदेव ॥

।। श्री गुरूदेव दत्त ॥

10/09/2019

मारुती स्तोत्र

भीमरूपी महारुद्रा, वज्रहनुमान मारुती |
वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना ||१||

महाबळी प्राणदाता, सकळां उठती बळें |
सौख्यकारी दुखःहारी, दूत वैष्णवगायका ||२||

दीनानाथा हरीरूपा, सुंदरा जगदंतरा |
पातालदेवताहंता, भव्यसिंदूरलेपना ||३||

लोकनाथा जगन्नाथा, प्राणनाथा पुरातना |
पुण्यवंता पुण्यशीला, पावना पारितोषिका ||४||

ध्वजांगे उचली बाहो, आवेंशें लोटला पुढें |
काळाग्नी काळरुद्राग्नी, देखतां कांपती भयें ||५||

ब्रह्मांडे माईली नेणो, आंवळे दंतपंगती |
नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा, भुकुटी ताठिल्या बळें ||६||

पुच्छ ते मुरडिले माथां, किरीटी कुंडले बरीं |
सुवर्ण कटी कांसोटी, वंटा किंकिणी नागरा ||७||

ठकारे पर्वता ऐसा, नेटका सडपातळू |
चपळांग पाहतां मोठे, महाविद्युल्लतेपरी ||८||

कोटिच्या कोटि उड्डाणें, झेपावे उत्तरेकडे |
मंद्रादिसारखा द्रोणू, क्रोधे उत्पाटिला बळें ||९||

आणिला मागुतीं नेला, आला गेला मनोगती |
मनासी टाकिले मागे, गतीसी तुळणा नसे ||१०||

अणूपासोनि ब्रह्मांडाएवढा होत जातसे |
तयासी तुळणा कोठे, मेरु मंदार धाकुटे ||११||

ब्रह्मांडाभोवते वेढे, वज्रपुच्छें करू शकें |
तयासी तुलना कैची, ब्रह्मांडी पाहता नसे ||१२||

आरक्त देखिलें डोळा, ग्रासिलें सूर्यमंडळा |
वाढता वाढता वाढे, भेदिलें शून्यमंडळा ||१३||

धन धान्य, पशूवृद्धि, पुत्रपौत्र समस्तही |
पावती रूपविद्यादी, स्तोत्रपाठें करूनियां ||१४||

भूतप्रेत समंधादी, रोगव्याधी समस्तहीं |
नासती तूटती चिंता, आनंदे भीमदर्शनें ||१५||

हे धरा पंधरा श्र्लोकी, लाभली शोभली बरी |
दृढदेहो निसंदेहो, संख्या चन्द्रकळा गुणें ||१६||

रामदासी अग्रगण्यू, कपिकुळासि मंडणू |
रामरूपी अंतरात्मा, दर्शने दोष नासती ||१७||

॥ इति श्री रामदासकृतं संकटनिरसनं मारुतिस्तोत्रं सम्पूर्णम् ॥

श्री समर्थ रामदास स्वामिकृत :- मारुती स्तोत्रें : - अनुष्टुप छंद

हनुमंता रामदूता वायुपुत्रा महाबला ।
ब्रह्मचारी कपीनाथा विश्वंभरा जगत्पते ॥१॥

कामांतका दानवारी शोकहारी दयानिधे ।
महारुद्रा मुख्य प्राणा मूळमूर्ति पुरातना ॥२॥

वज्रदेही सौख्यकारी भीमरूपा प्रभंजना ।
पंचभूतां मूळमाया तूंचि कर्ता समस्तही ॥३॥

स्थिितरूपें तूंचि विष्णू संहारक पशूपती ।
परात्परा स्वयंज्योति नामरूपा गुणातीता ॥४॥

सांगतां वर्णितां येना वेदशास्त्रा पडे ठका ।
शेष तो शिणला भारी नेति नेति परा श्रुती ॥५॥

धन्यावतार कैसा हा भक्तांलागिं परोपरी ।
रामकाजीं उतावेळा भक्तां रक्षक सारथी ॥६॥

वारितों दुर्घटें मोठीं संकटीं धांवतो त्वरें ।
दयाळ हा पूर्ण दाता नाम घेतांच पावतो ॥७॥

धीर वीर कपी मोठा मागें नव्हेचि सर्वथा ।
उड्डाण अद्भुत ज्याचें लंघिलें सागराजळा ॥८॥

देऊनी लिखिता हातीं नमस्कारी सितावरा ।
वाचितां सौमित्र अंगें राम सूखें सुखावला ॥९॥

गर्जती स्वानंदमेळीं ब्रह्मानंदें सकळही ।
अपार महिमा मोठा ब्रह्मांदीकांसि नाकळे ॥१०॥

अद्भुत पुच्छ तें कैसें भोवंडी नभपोकळी ।
फांकडें तेज तें भारी झांकिलें सूर्यमंडळा ॥११॥

देखतां रूप पैं ज्याचें उड्डाण अद्भुत शोभलें ।
ध्वजांत ऊर्ध्व तो बाहू वामहस्त कटीवरी ॥१२॥

कसिली हेमकासोदी घंटा किंकिणि भोंवत्या ।
मेखळें जडलीं मुक्तें दिव्य रत्नें परोपरी ॥१३॥

माथा मुगुट तो कैसा कोटि चंद्रार्क लोपले ।
कुंडलें दिव्य ती कानीं मुक्तामाला विराजते ॥१४॥

केशर रेखिलें भाळीं मुख सुहास्य चांगलें ।
मुद्रिका शोभती बोटीं कंकणें कर मंडित ॥१५॥

चरणीं वाजती अंदू पदीं तोडर गर्जती ।
कैवारी नाथ दीनांचा स्वामी कैवल्यदायकू ॥१६॥

स्मरतां पाविजे मुक्ती जन्ममृत्यूसि वारितो ।
कांपती दैत्य तेजासी भुभुकाराचिये बळें ॥१७॥

पाडितो राक्षसू नेटें आपटी महिमंडळा ।
सौमित्रप्राणदाताचि कपिकूळांत मंडणू ॥१८॥

दंडिली पाताळशक्ती अहीमही निर्दाळिले ।
सोडिलें रामचंद्रा कीर्ति ते भुवनतषरयीं ॥१९॥

विख्यात ब्रीद तें कैसें मोक्षदाता चिरंजिवी ।
कल्याण त्याचेनि नामें भूतपिशाच्च कांपती ॥२०॥

सर्पवृश्चिकपश्वादी विषशीतनिवारण ।
आवडी स्मरतां भावें काळ कृतांत धाकतो ॥२१॥

संकटें बंधनें बाधा दुःखदारिद्र्‍यनाशका ।
ब्रह्मग्रहपीडाव्याधी ब्रह्महत्यादि पातकें ॥२२॥

पूरवीं सकळही आशा भक्तकामकल्पतरू ।
त्रिकाळीं पठतां स्तोत्र इच्छिलें पावसी जनीं ॥२३॥

परंतु पाहिजे भक्ती संधे कांहीं धरूं नका ।
रामदासा सहाकारी सांभाळितो पदोंपदीं ॥२४॥

मारुती स्तोत्रें - :वृत्त मालिनी

भुवनदहनकाळीं काळ विक्राळ जैसा ।
सकळ गिळित ऊभा भासला भीम तैसा ।
दुपटत कपि झोंकें झोंकिली मेदिनी हे ।
तळवट धरि धाकें धोकलीं जाउं पाहे ॥१॥

गिरिवरुनि उडाला तो गिरी गुप्त झाला ।
घसरत दश गांवें भूमिकेमाजि आला ।
उडती झडझडाटें वृक्ष हे नेटपाटें ।
पडति कडकडाडें अंग घातें धुधाटें ॥२॥

थरथरित थरारी वज्र लांगूल जेव्हां ।
गरगरीत गरारी सप्तपाताळ तेव्हां ।
फणिवर कमठाचे पृष्ठिशीं आंग घाली ।
तगटित पवनाची झेंप लंकेसि गेली ॥३॥

थरकत धरणी हे हाणतां वज्रपुच्छें ।
रगडित रणरंगीं राक्षसें तृणतुच्छें ।
सहज रिपुदळाचा थोर संव्हार केला ।
अवघड गड लंका शीघ्र जाळून आला ॥४॥

सहज करतळें जो ठेरुमांदार पाडी ।
दशवदन रिपू हे कोण कीती बराडी ।
अगणित गणवेना शक्ति काळासि हारी ।
पवनतनुज पाहो पूर्ण रुद्रावतारी ॥५॥

मारुती स्तोत्रें : - वृत्त अनुष्टुप् 2

हनुमंता रामदूता वायुपुत्रा महाबला ।
ब्रह्मचारी कपीनाथा विश्वंभरा जगत्पते ॥१॥

कामांतका दानवारी शोकहारी दयानिधे ।
महारुद्रा मुख्य प्राणा मूळमूर्ति पुरातना ॥२॥

वज्रदेही सौख्यकारी भीमरूपा प्रभंजना ।
पंचभूतां मूळमाया तूंचि कर्ता समस्तही ॥३॥

स्थिितरूपें तूंचि विष्णू संहारक पशूपती ।
परात्परा स्वयंज्योति नामरूपा गुणातीता ॥४॥

सांगतां वर्णितां येना वेदशास्त्रा पडे ठका ।
शेष तो शिणला भारी नेति नेति परा श्रुती ॥५॥

धन्यावतार कैसा हा भक्तांलागिं परोपरी ।
रामकाजीं उतावेळा भक्तां रक्षक सारथी ॥६॥

वारितों दुर्घटें मोठीं संकटीं धांवतो त्वरें ।
दयाळ हा पूर्ण दाता नाम घेतांच पावतो ॥७॥

धीर वीर कपी मोठा मागें नव्हेचि सर्वथा ।
उड्डाण अद्भुत ज्याचें लंघिलें सागराजळा ॥८॥

देऊनी लिखिता हातीं नमस्कारी सितावरा ।
वाचितां सौमित्र अंगें राम सूखें सुखावला ॥९॥

गर्जती स्वानंदमेळीं ब्रह्मानंदें सकळही ।
अपार महिमा मोठा ब्रह्मांदीकांसि नाकळे ॥१०॥

अद्भुत पुच्छ तें कैसें भोवंडी नभपोकळी ।
फांकडें तेज तें भारी झांकिलें सूर्यमंडळा ॥११॥

देखतां रूप पैं ज्याचें उड्डाण अद्भुत शोभलें ।
ध्वजांत ऊर्ध्व तो बाहू वामहस्त कटीवरी ॥१२॥

कसिली हेमकासोदी घंटा किंकिणि भोंवत्या ।
मेखळें जडलीं मुक्तें दिव्य रत्नें परोपरी ॥१३॥

माथा मुगुट तो कैसा कोटि चंद्रार्क लोपले ।
कुंडलें दिव्य ती कानीं मुक्तामाला विराजते ॥१४॥

केशर रेखिलें भाळीं मुख सुहास्य चांगलें ।
मुद्रिका शोभती बोटीं कंकणें कर मंडित ॥१५॥

चरणीं वाजती अंदू पदीं तोडर गर्जती ।
कैवारी नाथ दीनांचा स्वामी कैवल्यदायकू ॥१६॥

स्मरतां पाविजे मुक्ती जन्ममृत्यूसि वारितो ।
कांपती दैत्य तेजासी भुभुकाराचिये बळें ॥१७॥

पाडितो राक्षसू नेटें आपटी महिमंडळा ।
सौमित्रप्राणदाताचि कपिकूळांत मंडणू ॥१८॥

दंडिली पाताळशक्ती अहीमही निर्दाळिले ।
सोडिलें रामचंद्रा कीर्ति ते भुवनतषरयीं ॥१९॥

विख्यात ब्रीद तें कैसें मोक्षदाता चिरंजिवी ।
कल्याण त्याचेनि नामें भूतपिशाच्च कांपती ॥२०॥

सर्पवृश्चिकपश्वादी विषशीतनिवारण ।
आवडी स्मरतां भावें काळ कृतांत धाकतो ॥२१॥

संकटें बंधनें बाधा दुःखदारिद्र्‍यनाशका ।
ब्रह्मग्रहपीडाव्याधी ब्रह्महत्यादि पातकें ॥२२॥

पूरवीं सकळही आशा भक्तकामकल्पतरू ।
त्रिकाळीं पठतां स्तोत्र इच्छिलें पावसी जनीं ॥२३॥

परंतु पाहिजे भक्ती संधे कांहीं धरूं नका ।
रामदासा सहाकारी सांभाळितो पदोंपदीं ॥२४॥

मारुती स्तोत्रें : - वृत्त अनुष्टुप् 3

श्रीगणेशाय नमः।
कोपला रुद्र जे काळी , ते काळा पाहावेचिना।
बोलणे चालणे कैचे , ब्रह्मकल्पांन्त मांडला॥१॥

ब्रह्मांडाहुनी जो मोठा , स्छुळ उंच भयानकु।
पुछ्य ते मुर्डले माथा , पावले सुन्यमंडळा॥२॥

त्याहुनी उंच वज्रांचा , स्छुळ उंच भयानकु।
त्यापुढे दुसरा कैचा , आद्भुत तुळणा नसे॥३॥

मार्तंडमंडळा ऐसे , दोनी पिंगाक्ष ताविले।
कर्करा घडिल्या दाढा , उभे रोमांच उठीले॥४॥

आद्भुत गर्जना केली , मेघचि चेवले भुमी।
फुटले गिरीचे गाभे , तुटले सींधु आटले॥५॥

आद्बुत वेश आवेशे , कोपला रण कर्कशु।
धर्म स्थापनेसाठी , दास तो उठीला बळे॥६॥

॥ श्रीसमर्थ रामदासकृतं मारुतीस्तोत्रं संपूर्णम्॥

10/09/2019

अक्कलकोट स्वामी स्तोत्र

ॐ श्री अक्कलकोटस्वामी समर्थास नम: |

ॐ नमो श्रीगजवदना | गणराया गौरीनंदना | विघ्नेशा भवभयहरणा | नमन माझे साष्टागी || १||

नंतर नमिली श्री सरस्वती | जगन्माता भगवती | ब्रम्ह्य कुमारी वीणावती | विद्यादात्री विश्वाची || २||

नमन तैसे गुरुवर्या | सुखनिधान सदगुरुराया | स्मरूनी त्या पवित्र पायां | चित्तशुध्दी जाहली || ३||

थोर ॠषिमुनी संतजन बुधगण आणि सज्जन | करुनी तयांसी नमन | ग्रंथरचना आरंभिली ||४||

श्री अक्कलकोट स्वामीराया स्मरुनी तुमच्या पवित्र पायां | स्तोत्र महात्म्य तुमचे गावया | प्रारंभ आता करतो मी || ५||

नांव गांव खुद्द स्वामींचे | किंवा त्यांच्या मातापित्यांचे | कोणालाच ठाऊक नाही साचें | अंदाज मात्र अनेक || ६||

त्यांच्या जन्मासंबंधाने, आख्यायिका लिहिली एकानें | तीच सत्य मानुनी प्रत्येकाने | समाधान मानावे || ७ ||

म्हणे उत्तर भारती एका स्थानी | घनदाट कर्दळीच्या बनीं | स्वामी प्रगटले वारुळांतुनी | लाकुडतोड्याच्या निमित्ताने || ८ ||

कुर्‍हाडीचा घाव बसून, त्याचा राहिला कायमचा वण | आगळी ती अवतार खूण | प्रत्यक्ष पाहीली सर्वांनी || ९ ||

एका भक्तानें केला प्रश्न, स्वामी तुमची जात कोण | तेव्हां दिलें उत्तर छान | स्वमुखेंच समर्थानी || १० ||

मी यजुवेदी ब्राम्हण | माझे नांव नृसिंहभान | काश्यप गोत्र राशी मीन | ऐसें स्वामी म्हणाले ||११ ||

खरें खोटें देव जाणे | बरें नाही खोलांत शिरणें | ईश्ववरी करणीची कारणें | आपण काय शोधावी || १२ ||

दत्तात्रया तुम्ही निराकार निर्गुण | नरदेह तरीही केला धारण | सकळं भूप्रदेश केला पावन | आपुल्या चरणस्पर्शाने || १३ ||

नंतर स्वामी निघाले तिथून | तीर्थयात्रेसी केले प्रयाण | दत्तात्रयाचे प्रत्येक ठिकाण | प्रत्यक्ष फिरुनी पाहिलें || १४ ||

दत्तवास्तव्य जेथे निरंतर | तो थोर पर्वत गिरनार | तेथेच गेले अगोदर | नंतर फिरले इतरत्र || १५ ||

यात्रेचे प्रवास संपले | तेव्हा मंगळवेढ्यासी आले | तेथे थोडे दिवस राहिले | दामाजीच्या गांवात || १६ ||

काही काळ तिथे गेला | पुण्यवंतांना प्रभाव कळला | जनसमुदाय भजनीं लागला | साक्षात्कारी यतीच्या || १७ ||

पुढे अक्कलकोट हें | वास्तव्याचे झाले ठिकाण | अखेरपर्यंत तिथेंच राहून | अनंत लीला दाखविल्या || १८ ||

तेजःपुंज शरीर गोमटें, सरळ नासिका कान मोठे | आजानुबाहू कौपिन छोटे | दिगंबर असती अनेकदां || १९||

स्वामी समर्थ अक्कलकोटचे | चवथे अवतार दत्तात्रयाचे | तीन अवतार यापूर्वीचे | गुरुचरित्री वर्णिले || २० ||

पहिले दत्तात्रेय, दुसरे श्रीपादवल्लभ | नृसिंहसरस्वती हे तिसरे नांव शुभ | गाणगापूर दर्शन देवदुर्लभ | जागृत दत्तस्थान ते || २१ ||

तेथे होउनी साक्षात्कार | पहावयासी येती चवथा अवतार | अक्कलकोट पुण्यभूमि थोर | जेथे प्रत्यक्ष दत्त वसे || २२ ||

अक्कलकोटी नित्य राहूनी | अगाध गूढ लीला करूनी | भक्तांसी साक्षात्कार देऊनी | गुप्त झाले अनेकदा || २३ ||

नास्तिक होते कोणी त्यांना | चमत्कार दाखविले नाना | शेवटी कराया क्षमायाचना | लागले स्वामी चरणांसी || २४ ||

स्वामी सर्वसाक्षी उदार | साक्षात दत्ताचे अवतार | कधी सौम्य कधी उग्रतर | स्वरुप दाविलें दासांना || २५ ||

ज्यांनी त्यांची सेवा केली | त्यांची कुळे पावन झाली | जन्मोजन्मीची पापें जळली | पुण्यराशी मिळाल्या || २६ ||

सत्पुरुषाची करणी अगाध | वाणी गूढ निर्विवाद | झाल्याविण कृपाप्रसाद | अर्थ त्याचा समजेना || २७ ||

स्वामींचे बोलणे थोडें | जणूं काय कठीण कोडें | अर्थ काढावे तितुके थोडे | त्यात भविष्य असे भरलेलें || २८ ||

जाणणारे तेच जाणिती | घेती त्यांच्या संकेताची प्रचिती | ज्याचा तोच उमजे चित्तीं | इतरां अर्थबोध होईना || २९ ||

कोणाकोणाला पादुका दिधल्या | कोणाला वाहिल्या लाखोल्या | कोणाच्या मस्तकी मारिल्या | पायांतल्या वाहाणाही || ३० ||

ज्याच्या त्याच्या भाग्याप्रमाणें | स्वामीनी दिले भरपूर देणें | कोणा पुत्र कोणा सोनेनाणे | कोणा जीवनदानही दिलें त्यांनी || ३१ ||

अनेकांच्या व्याधी केल्या दूर | अनेकांना दाखविले चमत्कार | अनेकांना शिक्षा घोर | केल्या त्यांनी अनेकदा || ३२ ||

सर्व साक्षी अंतर्ज्ञानी | पूर्णब्रम्ह्य ब्रम्ह्यज्ञानी | म्हणूनच हव्या त्या ठिकाणी | दर्शन दिधलें भक्ताना || ३३ ||

न सांगता सर्व जाणिले | ज्याचें त्याला योग्य उत्तर दिलें | लोण्याहुनी मृदु ह्रदय द्रवलें | दु:खी कष्टी जीवांसाठी || ३४ ||

दयेचा अथांग सागर | भक्तांसाठी परम उदार | अनेकांचा केला उध्दार | सदुपदेश दिक्षा देऊनी || ३५ ||

स्वामीराया दत्तात्रेया | तुमच्या कृपेची असावी छाया | हीच प्रार्थना तुमच्या पायां | मागणे नाही आणखी || ३६ ||

मजवरी होता कृपादृष्टी | दत्तमय भासेल सर्व सृष्टी | सुखसंपत्तीची होईल वृष्टी | सकल सिध्दी लाभती || ३७ ||

ऐसी श्रध्दा माझे मनी | उपजली आहे आतां म्हणुनीं | मिठी घातली तव चरणीं | धाव पाव समर्था तूं || ३८ ||

तुमची करावी कैसी सेवा | हे मज ठाऊक नाही देवा | ओळखुनी माझ्या भोळ्या भावा | वरदहस्त ठेवा मस्तकीं || ३९

संसार तापें पोळलों भारी, दूर करा ही दु:खे सारी | तुमच्यावीण माझा कैवारी | अन्य कोणी दिसेना || ४० ||

तुमचे पाय माझी काशी | पंढरपूर सर्व तीर्थे तशी | आहेत तुमच्या चरणांपाशी | मग यात्रेस जाऊ कशाला || ४१ ||

अक्कल्कोटचे समर्थ स्वामी | रंगून जातां त्यांचे नामीं | ब्रम्हा विष्णू शिवधामी | सर्व भक्ती पोंचते || ४२ ||

स्वामी समर्थांची मूर्ति आठवावी | त्यांचे पायी दृढ श्रध्दा ठेवावी | आणी आपली भावना असावी | मनोभावें ऐसी कीं || ४३ ||

पाठीशीं आहेत अक्कलकोट स्वामी | उगीच कशास भ्यावे मी | काहींच पडणार नाही कमी | समर्थांच्या दासासी || ४४ ||

भाग्यवान ते जे लागले भजनी | वादविवाद केले पंडितांनी | मग एकमुखानें सर्वांनी | मान्य केली थोर योग्यता || ४५ ||

वेदांताचा अर्थ लाविला | पंडितांचा ताठा जिरविला | भाविक भक्तांना दिधला | धीर अनेक संकटी || ४६ ||

स्वामी तुमचे चरित्र आगळें | अतर्क्य अलौकिक जगावेगळे | त्यांत प्रेमाचे सागर सांठले | धन्य धन्य ज्यांना उमजलें ते || ४७ ||

बाळप्पा चोळप्पादि सर्वांनी | लहान मोठ्या अधिकार्‍यांनी | गरीबांपासून श्रीमंतांनी | सेवा केली यथाशक्ती || ४८ ||

जे जे तुमच्या भजनीं लागले | त्यांचे त्यांचे कल्याण झालें | हवें हवें ते सारें मिळाले | श्री समर्थ कृपेनें || ४९ ||

पुढे संपल्या लीला संपले खेळ | ताटातुटीची आली वेळ | स्वामी म्हणजे परब्रम्ह्य केवळ | परब्रह्म्यांत मिळालें || ५० ||

शके अठराशें बहुधान्यनाम संवत्संरी | चैत्र वद्य त्रयोदशी मंगळवारी | पुण्य घटिका तिसर्‍या प्रहरी | स्वामी गेले निजधामा || ५१ ||

बोलता बोलता आला अंतकाळ | प्रकृतीत झाली चलबिचल | क्षणात पापण्या झाल्या अचल | निजानंदी झाले निमग्न || ५२ ||

वचनपूर्तींसाठी निर्णयानंतर | पांचवा दिवस शनिवार | स्वामी प्रगटले निलेगांवाबाहेर | दिलें दर्शन भाऊसाहेबांसी || ५३ ||

ऐसा यती दत्त दिगंबर | संपवूनी आपूला अवतार | निजधामा गेला निरंतर | भक्त झाले पोरके || ५४ ||

बातमी जेव्हा सर्वत्र पसरली | जनता शोकाकुल झाली | सर्व भक्तमंडळी हळहळली | अन्नपाणीही सुचेना || ५५ ||

गावोगांवीची भक्तमंडळी | अक्कलकोटी गोळा झाली | समर्थांची समाधी पाहिली | आपल्या साश्रू नयनांनी || ५६ ||

चवथा अवतार संपला | तरीही चैतन्यरुपें तिथेच राहिला | अक्कलकोट पुण्यभूमीला | क्षेत्रत्वा प्राप्त जाहलें || ५७ ||

अजूनही जे येती समाधीदर्शना | त्यांच्या व्याधी आणी विवंचना | संकटे आणी दु:खे नाना | स्वामी दूर करतात || ५८ ||

याचे असती असंख्य दाखले | अनेकांनी अनुभवले | म्हणूनी महाराजांची पाऊले | आपणही वंदूंया || ५९ ||

नम्र होउनी त्यांचे चरणीं | कळकळने करुंया विनवणी | स्वामींना यावी करुणा म्हणूनी | प्रार्थना त्यांना करुंया || ६० ||

जयजय दत्ता अवधूता | अक्कलकोट स्वामी समर्था | सदगुरु दिगंबरा भगवंता | दया करी गा मजवरी || ६१ ||

अनेकांच्या संकटी आला धावून | आता माझी प्रार्थना ऐकून | समर्थराया देई दर्शन | दूर लोटु नको मला || ६२ ||

व्यवहारी मी जगतो जीवन | अनेक पापें घडती हातून | तव नामाचें होते विस्मरण | क्षमा याची असावी || ६३ ||

सदगुरुराया कृपा करावी | तुमची सेवा नित्य घडावी | ऐसी बुध्दी मजला द्यावी | पापे सर्व पळावी || ६४ ||

सुखाचें व्हावे जीवन ऐहिक | धनदौलत मिळावी, मिळावे पुत्रपौत्रसुख | गृहसौख्य आणी वाहनसुख | अंती सदगति लाभावी || ६५ ||

तुम्ही प्रत्यक्ष कैवल्य ठेवा | म्हणुनी याचना करतों देवा | उदार मनाने वर द्यावा | आणी तथास्तु म्हणावे || ६६ ||

तुमची होतां कृपा पूर्ण | जीवन माझें होईल धन्य | म्हणुनी आलों तव पायी शरण | दत्तराया दयाघना || ६७ ||

मी एक मानव सामान्य | तुमची सेवा नित्य घडावी म्हणून | या पोथीचें करितों वाचन | दान द्या तुमच्या कृपेचे || ६८ ||

वेडीवाकुडी माझी सेवा | स्वीकारावी स्वामी देवा | वरदहस्त नित्य मस्तकीं ठेवा | हीच अंती विनंती || ६९ ||

शके अठराशे नव्याण्ण्व वर्षी | चैत्रमासीं शुक्लपक्षी | शुभ रामनवमी दिवशी || पोथी पूर्ण झाली ही || ७० ||

स्वामींचे चित्र ठेऊनी पुढ्यांत | किंवा स्वामींच्या एखाद्या मठांत | बसुनी ही पोथी वाचावी मनांत | इच्छा सफल होईल || ७१ ||

माणिकप्रभू , साई शिरडीश्वर | आणी अक्कलकोट्चे दिगंबर | एकाच तत्वाचे तीन अविष्कार | भेद त्यांत नसे मुळी || ७२ ||

एकाची करितां भक्ती | तिघांनाही पावते ती | ऐसी ठेऊनी आपली वृत्ती | पोथी नित्य वाचावी || ७३ ||

या पोथीचे करितां नित्य पठण | प्रत्यक्ष स्वामी होतील प्रसन्न | करतील सर्व मनोरथ पूर्ण | सत्य सत्य वाचा ही || ७४ ||

ॐ श्री अक्कलकोटस्वामी समर्थापर्णमस्तु || शुभं भवतु || ॐ शांति:शांति:शांति: || (ओवी संख्या ७४ )

|| " श्री अक्कलकोटस्वामी स्तोत्र ---माहात्म्य सम्पूर्ण " ||

Address

Plot No 22b, 2d Flor, Vimal Nagar, Taloda Dist. Nandurbar
Taloda
425413

Opening Hours

Monday 3pm - 8pm
Tuesday 3pm - 8pm
Wednesday 3pm - 8pm
Thursday 3pm - 8pm
Friday 3pm - 8pm
Saturday 3pm - 8pm
Sunday 3pm - 8pm

Telephone

+917972089597

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri Vitthal Jyotish Karyalay posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Shri Vitthal Jyotish Karyalay:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram