02/04/2020
.🌿🌿गुळवेल,..( गडुचि., अम्रूता, गिलोय)🌿🌿.
🌿🌿गूळवेल . हिला अम्रुता असेहि म्हटले आहे, कारण हि तरुण ठेवणारी, म्हातारपण व रोगाचा नाश करणारी, एक प्रकारची संजीवनी बूटीच आहे,
.
🌿🌿।।कन्दोद्भवा गुडूची व कटूष्णा संनिपातहा।। विषघ्नि ज्वरभूतघ्नि वलिपलितनाशनी।।..🌿🌿
🌿🌿 गूळवेल ही अनेक वर्षे टिकणारी, एखाद्या झाडाच्या आधारे धरून वर चढणारी, नेहमीच हिरवीगार राहणारी, वेल आहे, हीचे कांड आणि पाने औषधात वापरली जातात, अनेक रोगात फार गुणकारी आहे गुळवेल, यक्रुत विकारात गुळवेल सत्व अर्धा चमचा, व हळद अर्धा चमचा व एक चमचा मध दिवसातून 3,4, वेळा देणे, मधूमेहातः गुळवेलाची मूळे मधुमेही रूग्णांची रक्तशर्करा कमी होते तसेच मधूमेहात होणारे मज्जादाह( न्युरायटिस) व अंधत्व( आँप्टिक न्यूरायटिस) इ.
उपद्रव टाळल्या जातात..
🌿🌿🌿🌿
👉👉 गुळवेलीचे चूर्ण कोमट पाण्यातून घेतल्यास घाम येउन ताप बरा होतो, कोणत्याही ज्वरात गुळवेलीचा काढा द्यावा, काढा करतांना ओली गुळवेल घ्यावी, अर्धा लिटर पाण्याचा एक अष्टमांश काढा करून तो पिण्यास द्यावा, सर्व प्रकारच्या वात- पित्- कफाच्या ज्वरात पंचभद्राचा काढा गुणकारी आहे,. गुळवेल, पित्तपापडा, नागरमोथा, व सुंठ, काडेकिराईत, पाच औषधे प्रत्येकि समप्रमाणात घेउन अर्धा लि. पाण्यात एक अष्टमांश काढा करावा,व रूग्णास द्यावा..
👉👉 सांधीवातात, व आमवातात, गूळवेलीचा व सुंठिचा काढा घ्यावा, पेराएवढा तुकडा व एक लहान सुंठ ठेचून अर्धा ली, पाण्यात उकळवून हा काढा थोडा, थोडा, रूग्णास द्यावा,आराम पडतो, गुळवेलीचे सत्व क्षयज्वर बराकरते, हे सत्व २ ग्रँम, ४, ग्रँम तूप, ८ ग्रँम खडीसाखर, व १२ ग्रँम लोणी असे एकत्रीत घ्यावे , रोज घेतल्याने क्षयरोग्याचा ताप कमी होतो,. भूक वाढते, शक्ती वाढते,
👉👉मूत्रविकारांवर उपयुक्तः। गुळवेलीचा रस, ओल्या हळदीचा रस, आवळ्याचा रस, समप्रमाणात घेतला असता, युरिन करतांनाची जळजळ, मूत्राघात, यूरिन साफ न होणे, हे सर्व त्रास बंद होतात, जेव्हा आपल्या रक्तातले प्लेटलेटस् कमी होतात, तेव्हा गुळवेल सत्व किंवा काढा घ्यावा फार लवकर त्या वाढतात,
मलेरिया, डेंगू, वायरल फ्लू, या सर्व तापात गूळवेल रस व मध दिल्यास आराम पडतो,.
👉👉. गुळवेल आपले पाचनतंत्र सुधारते, पोटासंबंधीचे आजार बरे करण्यासाठी गूळवेल प्रसिद्ध आहे, पचनसंस्था मजबूत करण्यासाठी, एक ग्रँम गुळवेल पावडर मद्ये थोडी आवळा पावडर मिसळून नियमित सेवन करावे,. मूळव्याधीचा त्रास होत असल्यास, गूळवेलाचा सत्व, ताकासोबत घ्यावा, उच्च रक्तदाबात गुळवेल अतिशय उपयुक्त ठरते, कायम गूळवेल सत्व मधासोबत घेतल्यास बी, पी, नियंत्रणात राहते,
👉👉 गुळवेल रक्ताभिसरण ऊत्तम करते त्यामूळे ह्रदयाला बळकटी येउन हार्ट अटँक येण्याची संभावना राहत नाही, गुळवेल सत्व व अम्रुतारिष्ट याकरता फायदेशीर आहे,. गूळवेलचे चूर्ण व दूध साखर स्री / पुरूषांच्या जननसंस्थेच्या अनेक विकारांवर लाभदायक ठरते,. गुळवेल कँसरसारख्या दुर्धर रोगावर गुणकारी आहे, गव्हांकुराच्या रसासोबत, गुळवेलचा रस सकाळी उपाशीपोटी, आठवड्यातून तीनदा घ्यावा,..
👉👉 दररोज सकाळ संध्याकाळ एक चमचा गुळवेल सत्व व गाईचे दूध नियमीतपणे घेतल्यास मनुष्य चिरतरूण राहतो, वारंवार जूलाब होत असल्यास सकाळी उपाशीपोटी, गुळवेलीचा रस प्यावा,, हिच्या नित्य सेवनाने मानसिक ताण कमी होतो, सर्व प्रकारच्या चर्मरोगावर शुद्ध गूग्गूळ सोबत दिल्यास आराम पडतो,.
👉👉गुळवेल हि एक उत्तम रसायन आहे, आपली प्रतिकार शक्ती सक्षम करते, ताकद, उर्जा देते,. गूळवेल सत्व घरी तयार करावे हिचे खांडरुपी तुकडे करून कुटावे व चांगले 10/12 तास पाण्यात भिजवून ठेवावे, नंतर कुस्करून ते पाणी गाळून ते भांडे उन्हात ठेवावे काही दिवसांनी त्यातील पाणी आटते व सत्व शिल्लक राहते,, हे अतिशय दिव्य औषध आहे,
👉👉कंडुलिंबावर वाढलेली गुऴवेल आयुर्वेदीक चिकत्सेत सर्वश्रेष्ठ समजली जाते
🌿🌿 अशी ही अम्रूता, दीर्घायुष्यि करणारि, शरीराची पोषण करणारी माताच आहे...गुऴवेल ही प्रत्येकाच्या बागेत आगंणात असलीच पाहीजे
🌿🌿🌺🌺🌺🌺🌿🌿