24/05/2024
भूतकाळातील कर्मानुसार वर्तमान घडत असते, तसेच वर्तमानातील कर्मानुसार भविष्य साकारत असते. मनुष्य भूतकाळात केलेल्या चुकांचा वर्तमानावर होणार दुष्परिणाम चांगले कर्म करून काही अंशी तरी कमी करू शकतो. तसेच सुंदर भविष्य घडवण्याची किमया सुद्धा तो वर्तमानातील चांगल्या कर्माने करू शकतो. म्हणजेच काय तर सर्व काही मनुष्याच्या वर्तमानातील चांगल्या आणि वाईट कर्मावर अवलंबून असते. चेहरा आणि केस ह्यांची सुंदरता राखण्यासाठी जसं आपण रोज सकाळ-संध्याकाळ आरश्यासमोर उभं राहतो, तसेच कर्म सुस्तिथित राखण्यासाठी आपण मनाच्या आरश्यासमोर उभं राहणेहि तितकेच गरजेचे असते. ह्याने आपण करत असलेल्या चांगल्या वाईट कर्मातील योग्य तो समतोल राखता येतो. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचे आहे, इतरांच चांगलं चिंतता जरी नाही आले तरी निदान दुसऱ्याचे वाईट कधीच चिंतू नये. दुसर्याचे सतत वाईट चिंतणाऱ्याचे मन हे नेहमीच कलुषित होत असते आणि एक दिवस त्या कलुषित मनाच्या विषामध्ये, त्याच्या दाहकते मध्ये मनुष्य होरपळून जावू शकतो.
आणि म्हणूनच दत्तकृपा मिळवण्यासाठी, कर्म आणि विचार चांगले ठेवुया आणि सद्वर्तनाची कास धरूया.
🕉 श्री गुरुदेव दत्त 🕉