
10/11/2024
---------------------
*आवळीभोजन*
----------------------
*लक्ष्मी देवींनी सुरु केलेली परंपरा*
आवळीचे झाडाखाली विष्णूपूजन करावे
कार्तिक शुद्ध दशमीपासून पौर्णिमेपर्यंत एखाद्या दिवशी आवळीच्या झाडाखाली स्वयंपाक करून इष्टमित्रांसह भोजन करतात.
पूजाविधी आवळीपूजनाप्रमाणेच असतो.
महाराष्ट्रात व कर्नाटकात देवस्थान असेल त्या ठिकाणची देवाची मूर्ती पालखीत बसवून आवळीच्या झाडाखाली आणतात. मग देवाला तेथे महानैवेद्य करून भोजन झाल्यावर सायंकाळी देव मिरवणुकीने देवळात परत नेतात.
-----------------------------
*आवळा नवमी कथा*
-------------------------------
आवळा नवमीला आवळ्याच्या झाडाची पूजा करून त्याखाली भोजन ग्रहण करण्याची परंपरा स्वत: देवी लक्ष्मी यांनी सुरू केली होती.
*या संदर्भात एक कथा आहे की*
जेव्हा देवी लक्ष्मी पृथ्वी भ्रमणासाठी आली तेव्हा रस्त्यात त्यांना प्रभू विष्णू आणि शिव या दोघांची सोबत पूजा करण्याची इच्छा जागृत झाली. परंतू देवी लक्ष्मी यांनी विचार केला की विष्णू आणि शिव यांची सोबत पूजा कशा प्रकारे शक्य आहे. तेव्हा देवी लक्ष्मीच्या ध्यानात आले की तुळस आणि बेल यांचे गुण आवळ्याच्या झाडात आढळतात. तुळस विष्णूंना प्रिय आहे तर बेल पत्र महादेवाला.
तेव्हा आवळ्याच्या झाडाला प्रभू विष्णू आणि शिव यांचे प्रतीक मानून देवी लक्ष्मी यांनी आवळ्याच्या झाडाची पूजा केली.
पूजेमुळे प्रसन्न होऊन प्रभू विष्णू आणि शिव प्रकट झाले. तेव्हा देवी लक्ष्मीने भोजन तयार करून आवळ्याच्या झाडाखाली दोन्ही देवांना जेवू घातले. नंतर स्वत: भोजन ग्रहण केले. ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी कार्तिक शुक्ल नवमी तिथी होती.
तेव्हापासून ही परंपरा सुरू आहे." ----------------------------------------
-----------------------------------------
*आवळा नवमी पूजा विधी*
-----------------------------------------
_*आवळा नवमी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमीला साजरी केले जाते याला अक्षय नवमी देखील म्हणतात.*_
या दिवशी स्त्रिया आवळ्याच्या झाडाखाली बसून संतान प्राप्ती आणि संतान रक्षेसाठी पूजा करतात. आवळा नवमीला आवळ्याच्या झाडाखाली बसून भोजन करण्याची देखील परंपरा आहे. या दिवशी स्नान, पूजन, आणि अन्न इतर दान केल्याने अक्षय फळ प्राप्ती होते.
पौराणिक मान्यतेनुसार कार्तिक शुक्ल पक्षाच्या नवमी ते पौर्णिमा पर्यंत प्रभू विष्णू आवळ्याच्या झाडावर निवास करतात. या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा केल्याने व दान-पुण्य केल्याने अक्षय पुण्य प्राप्ती होते. इतर दिवशी केलेल्या दानापेक्षा आवळा नवमीला केलेलं दान अधिक पटीने लाभ प्रदान करणारे ठरतं.
या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा केल्यावर झाडाला 108 वेळा प्रदक्षिणा घातल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात असे म्हटले गेले आहे. पूजा- अर्चना केल्यानंतर खीर, पुडी, भाजी आणि मिठाईचं नैवेद्य देखील दाखवलं जातं. अनेक धर्मप्रेमी आवळा पूजन केल्यावर झाडाच्या सावलीत ब्राह्मण भोजन करवतात.
*या दिवशी स्त्रिया अक्षता, फुलं, चंदन इतर सामुग्रीने पूजा-अर्चना केल्यावर पिवळा दोरा गुंडाळत झाडाची प्रदक्षिणा घालतात.*
*या प्रकारे करा पूजा*
या दिवशी सकाळी उठून स्नानादिने निवृत्त होऊन व्रत संकल्प करा.
नंतर धात्री वृक्ष अर्थात आवळ्याच्या झाडाखाली पूर्वाभिमुख होऊन बसून
*'ॐ धात्र्ये नम:*
' मंत्र जपत आवळ्याच्या झाडाच्या मुळात दुधाची धार सोडत पितरांना तरपण करावे.
कापूर आणि तुपाचा दिवा लावून आरती करून प्रदक्षिणा घालावी.
पूजा-अर्चना केल्यावर खीर, पुरी, भाजी आणि मिठाईचं नैवेद्य दाखवावा.
आवळ्याच्या झाडाला 108 प्रदक्षिणा घालाव्या.
आवळ्याच्या झाडाखाली विद्वान ब्राह्मणांना भोजन करवून दक्षिणा द्यावी.
स्वत: झाडाखाली बसून भोजन करावे.
या दिवशी आवळ्याचं झाडं घरी लावणे शुभ मानले गेले आहे. तसं तर पूर्व दिशेत मोठे झाडं लावू नये परंतू या दिशेत आवळ्याचं झाडं लावल्याने सकारात्मक ऊर्जेचं प्रवाह वाढतो. तसेच घराच्या उत्तर दिशेला देखील हे झाड लावणे योग्य ठरेल.
या दिवशी पितरांच्या शीत निवारणासाठी हिवाळ्यातील कपडे व ब्लँकेट्स दान करावे.
मुलांची स्मरण शक्ती वाढावी किंवा ज्या मुलांचे अभ्यासात मन लागत नसेल अशा मुलांच्या पुस्तकात आवळा आणि चिंचेच्या झाडाचे हिरवे पाने ठेवावे.
-----------------------------------------------
बहुगुणी आवळाडोक्यापासून पायापर्यंत अशाप्रकारे करा आवळ्याचा उपयोगआमलकी एकादशीकेस गळणेकेस पांढरे होणेडोळ्यां.....