27/12/2020
नमस्कार……….
बंधू आणि भगिनींनो तुम्हाला सर्वाना आमचा नमस्कार……..!!!
वैद्यकीय औषधे ही आपल्या सर्वांच्या आयुष्यातील एक अविभाज्य घटक आहे. एकवेळ मनुष्य सर्व गोष्टीमध्ये तडजोड करू शकतो परंतु औषधांच्या बाबतीत अजिबात तडजोड नाही करू शकत, कारण औषधांचा थेट संबंध हा आपल्या जीवनाशी असतो. आणि अश्या परिस्थितीत खिशाला न परवडणारी औषधे देखील आपणाला नाईलाजाने खरेदी करावीच लागतात. आणि आता तर परिस्थिती अतिशय विदारक आहे कारण, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तर कित्येक लोकांनी आपला जीवदेखील गमावला आहे, कुटुंबच्या कुटुंब उध्वस्त झाली आहेत, या सर्व गोष्टींवर नियंत्रण आणण्यासाठी नाईलाजाने शासनालाही टाळेबंदी करावी लागत आहे, या मुळे परिस्थिती अजूनच गंभीर झाली आहे, लोकांचा आर्थिक बाबतीत कणा मोडला आहे, कित्येक लोक बेरोजगार झाले आहेत, बऱ्याच लोकांचे संसार कोलमडले आहेत, आणि अजूनही कोरोना थैमान घालत आहे, पूर्ण जगात अजून यावर लस उपलब्ध नाही आहे, आणि कोरोनाचे सावट अजून किती दिवस राहील याची कुणालाच शाश्वती नाही. आणि हे सगळं होत असताना आपल्या कुटुंबातील सभासदांना जे रक्तदाब, मधुमेह, दमा, अस्थमा, सर्दी, खोकला, ताप या सारख्या नैसर्गिक आजार हे चालूच आहेत, या वर भरमसाठ खर्चही होत आहे, या सर्व गोष्टींवर विचार करून गेली कित्येक दिवस आम्ही लोकांना स्वस्तात औषधी सेवा कशी उपलब्ध करून देता येईल, या वर मार्ग शोधत होतो, डोक्यात हाच विचार सतत चालू होता , संबंधित क्षेत्रातील लोकांशी विचार विनिमय करत होतो आणि यातूनच एक कल्पना डोक्यात आली की सर्व सामान्य लोकांसाठी काही तरी करावं आणि मग आम्ही मेडीक्विक जेनेरिक लाईफकेअर एल.एल.पी. या संस्थेची आम्ही २३ ऑक्टोबर, २०२० रोजी स्थापना केली. आम्ही आपल्या सर्वांच्या सेवेसाठी घेऊन येत आहे “Mediquick- स्वस्त आणि प्रभावी औषधालय”. सध्या आम्ही मनोरमा नगर, ठाणे पश्चिम या आमच्या राहत्या विभागात प्रथम शाखा उघडली आहे. आणि भविष्यात जास्तीत जास्त लोकांपर्यंत आम्हाला माफक दरात औषध घेऊन पोहचायच आहे. त्यासाठी आम्ही वेगवेगळ्या आमच्या शाखा उघडणार आहोत. आणि निश्चित आम्हाला या गोष्टींची खात्री आहे को लोक या सेवेचा पुरेपूर फायदा करून घेतली.
आता तुम्ही विचार करत असाल की आपल्या आसपास बरेच मेडिकल आहेत, मग तुम्ही कशी काय औषधे स्वस्त देऊ शकता, म्हणजे स्वस्त असल्यामुळे औषधांची गुणवत्ता तर खराब नसेल ना, यातून काही त्रास तर होणार नाही ना, आणि म्हणूनच आम्ही तुमच्या या प्रश्नाचे उत्तर देण्यास बांधील आहोत.
तर ऐका, औषध म्हणजे नेमकं काय? तर औषध म्हणजे त्यात वापरली जाणारी घटक पदार्थांची मात्रा. कोणतही औषध जेव्हा पहिल्यांदा निर्माण केलं जातं तेव्हा त्या साठी त्या कंपनीला अतिशय जास्त प्रमाणात खर्च करावा लागतो, जस कित्येक वर्षे संशोधन केलं जातं, औषधांचे प्रत्येक वयोगटानुसार तपासणी केली जाते, औषधांचे चांगले आणि वाईट परिणाम तपासले जातात, यासाठी खूप वर्ष जातात, त्यानंतर औषध निर्माण होत, आणि औषध निर्माण करणारी संस्था त्या औषधांची स्वतःच्या नावाने अन्न आणि औषध प्रशासन विभागा मध्ये नोंद करते, आणि काही काळा साठी हे औषधे फक्त हीच संस्था विक्री करू शकते, या मुळे होत काय की औषध संशोधन करण्यापासून ते बाजारात विक्री करण्या पर्यंत चा सर्व खर्च हा त्या औषधाच्या किंमती मध्ये जोडला जातो, त्यामुळे औषध अर्थातच महाग होते, परंतु जेव्हा त्या संस्थेची औषधावरील अधिकाराची काल मर्यादा संपते तेव्हा त्या औषधाचे घटक पदार्थांची मात्रा हे प्रमाण वापरून इतर नामांकित संस्था तेच औषधं स्वतः निर्माण करतात तेव्हा त्यांना खर्च खूप कमी येतो कारण सर्व संशोधन हे आधीच झालेलं असतं, आणि त्या मुळे मग या औषधांची किंमत कमी होते आणि बाजारात माफक दरात उपलब्ध होत, आणि हीच उत्कृष्ट दर्जाची औषधे आम्ही तुमच्या साठी माफक दरात घेऊन येत आहोत.
... तर मग आता उशीर कशाला करता, या आपल्या हक्काच्या “Mediquick- स्वस्त आणि प्रभावी औषधालय” या औषध वितरण दुकानात आणि औषधे खरेदी करून आपले अमूल्य पैसे वाचवा.
धन्यवाद.....!!!