
22/07/2023
केंद्रीय राज्यमंत्री *मा.श्री. कपिल पाटील साहेब* यांच्या संकल्पनेतून " *आरोग्य वारी* " या मोहीमेस सुरुवात केली आहे. या मोहीमेद्वारे मुरबाड , वाडा व शहापूर यांसारख्या अतिग्रामीण भागात जाऊन फिरत्या दवाखान्याद्वारे लोकांना वैद्यकीय सेवा पुरविणे व आयुषमान भारत सारख्या सरकारी योजनांची माहिती करून देण्यास सुरुवात केली आहे. या मोहीमेसाठी कपिल पाटील फाऊंडेशन कडून सुसज्ज असे दोन मोबाईल क्लिनिक तयार केले असून या क्लिनिकमध्ये एक क्लिनिक प्रमाणे सर्व सुविधा उपलब्ध आहेत. दिनांक १५ / ०७ / २०२३ मुरबाड तालुक्यातील टोकावडे विभागातील अतिग्रामीण भागात जाऊन सुमारे ८० रुग्णांची तपासणी करून त्यांना औषधे देण्यात आली. एवढ्या व्यस्त जीवनशैलीत देखील मा.श्री. कपिल पाटील साहेब यांची लोकांना उपयुक्त असलेल्या सुविधांबद्दल व पुरविण्याची असलेली जाणीव अभिमानास्पद व कौतुकास्पद आहे. अशा अनेक गोरगरिब रुग्णांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात भिवंडी तालुका वैद्यकीय सेलचे अध्यक्ष डॉ. राजेश भोईर (90822 90655) यांना संपर्क करून आरोग्य शिबिराची तयारी व गावोगावी क्लिनिक सेवा कशी देता येईल यासाठी मदत करावी.🙏