मूळव्याध-Piles clinic

मूळव्याध-Piles clinic गुद मार्गातील (piles, fissure and fistula) आजार वर "संपूर्ण चिकित्सा= कोष्ठ शुद्धीकरण+ समुळणाशिनी

Free opd consultation
02/03/2023

Free opd consultation

30/09/2022
29/09/2022

धन्यवाद उत्तम प्रतिसाद दिल्याबद्दल,
आम्ही आपली अशीच सेवा करत राहू.
30 रूग्णांना यशस्वी उपचार
मूळव्याध.... मुक्ती... आयुष्य भरासाठी

29/09/2022

मूळव्याध सारखे आजार वाढण्याचे कारण....
१. आजार सांगण्यास लाज वाटणे.
२. वैद्याचा सल्ला न घेता जाहिरात बघून औषधे घेणे
३. मेडिकल मध्ये जाऊन आयुर्वेदीक औषधी घेणे (निदान न करता)
४. मूळव्याध ची जागा न तपासता उपचार घेणे (निदान न करता)
५. तात्पुरती वेदना शामक/ पैन किलर औषध घेणे परत दुर्लक्ष करणे....... यामुळे आजाराचे वय आणि आजाराची स्टेज वाढून तो ऑपरेशन कडे जातो...... लगेच उपचार घ्या, लगेच बरे व्हा.
धन्यवाद....
Dr Pakale 8169310493

28/09/2022

गैरसमज 4

मला शौच्याच्या ठिकाणी गाठ / कोंब लागतो पण मला कधीच त्रास होत नाही?
मग उपचार कशाला?

उत्तर
वेळेत घेतलेले निर्णय पुढील मोठे संकट टाळतो.
आजार आहे उपचार घ्या.
शत्रुची वाट पाहू नका.
मूळव्याध specialist डॉक्टरांना च दाखवा.

28/09/2022

गैरसमज 3

मला कधीतरी वर्षातून त्रास होतो?
Painkiller खाल्लं की बरे वाटते!

उत्तर
पण त्रास होतो ना.
याचा अर्थ आजार बरा झाला का? नाही!
मग आजाराचे वय का वाढवता, लवकर उपचार घेवून औषध ने बरे व्हा. ऑपरेशन कडे आजार घेवून जावू नका

28/09/2022

गैरसमज 2
मला मांसाहार खाल्ला की च त्रास होतो
बाकी काही प्रॉब्लेम नाही

उत्तर
मसाल्याचे, मांसाहार खाल्याने त्रास सर्वांना होतो का, नाही ना! म्हणजे तुम्हाला पाचन संबंधी त्रास आहे तो तपासून घ्या हेच परत मूळव्याध सारखे आजार देतात.
आजार लपवू नका. योग्य डॉक्टरांना दाखवा

28/09/2022

गैरसमज
शौचावाटे रक्त पडणे म्हणजे मूळव्याध च असतो

उत्तर
मूळव्याध, फिशर, अब्सेस, फिस्टुला, रक्तातील आजार,कॅन्सर मध्ये
शौच मार्गातून रक्त जाऊ शकते.
म्हणून तपासणी केल्याशिवाय pilex सारख्या गोळ्या घेवून फरक पडत नाही.

फिशर म्हणजे काय गुद मार्गात (a**l ca**l) मध्ये वारंवार शौच्याला आल्यामुळे (जुलाब असेल तरीही), शौचाला कडक होत असेल किंवा ...
23/09/2022

फिशर म्हणजे काय
गुद मार्गात (a**l ca**l) मध्ये वारंवार शौच्याला आल्यामुळे (जुलाब असेल तरीही), शौचाला कडक होत असेल किंवा संडास चा आकार मोठा असेल तर संडास (stool) चा सतत पडणारा दाब गुद मार्गात जखम किंवा मोठी चीर करतो यालाच फिशर म्हणतात.
त्यामुळे गु द मार्गात...
*वेदना
*रक्तस्राव
*सूज
*जळजळ होते.

शेवटाची गोष्ट
सतत चीर वर दाब पडल्यानं त्यावरची त्वचा खाली येवून गुद मार्गाच्या जवळ गाठ बनते, याला sentinel pile असे म्हणतात म्हणजे खोटा मूळव्याध.
याची ट्रीटमेंट करण्याची गरज नसते.

फिस्टुला (भगंदर) म्हणजे काय?संडासच्या मार्गात (a**l ca**l)  एक क्रिप्ट (खोली/रिकामी पोकळी, जागा) असते.  क्रिप्ट मध्ये जं...
23/09/2022

फिस्टुला (भगंदर) म्हणजे काय?
संडासच्या मार्गात (a**l ca**l) एक क्रिप्ट (खोली/रिकामी पोकळी, जागा) असते.
क्रिप्ट मध्ये जंतूचा प्रादुर्भाव (इन्फेक्शन) झाल्याने त्याच्यात सूज आणि पू (पस) तयार होतो.
तयार झालेला पस (पु) संडास च्या मार्गातून बाहेर न पडता, मासामध्ये (muscle) हाडाच्या दिशेने जातो त्यामुळे भुयारी मार्ग (Tunnel) तयार होतो आणि तो संडास च्या जवळ गाठ तयार करतो त्याला फिस्टूला म्हणतात

फिस्टूला मध्ये
गाठ लागणे, गाठ मध्ये वेदना, गाठीतून पस/पू जाणे, संडास मधून रक्तस्त्राव, ताप यासारखी लक्षणे दिसतात

मूळव्याध म्हणजे फक्त गाठ नाही तर त्या गाठीमध्ये रक्तवाहिन्या (अशुद्ध) असणे महत्वाचे असते.सतत चा पडणारा दाब (वजनदार वस्तू...
23/09/2022

मूळव्याध म्हणजे फक्त गाठ नाही तर त्या गाठीमध्ये रक्तवाहिन्या (अशुद्ध) असणे महत्वाचे असते.

सतत चा पडणारा दाब (वजनदार वस्तू उचलल्याने, प्रसव वेदना, संडास ला जोर लावणे) संडास कडक होणे यामुळे गुद मार्गातील रक्तवाहिन्या फुगतात, सूज येते कधी कधी फाटून रक्त स्त्राव येतो.
याला मूळव्याध म्हणतात.यात चीर पडत नाही

Address

Yashodhan Nagar Bus Stop
Thane
400604

Opening Hours

Monday 3pm - 6pm
Tuesday 3pm - 6pm
Wednesday 3pm - 6pm
Thursday 3pm - 6pm
Friday 3pm - 6pm
Saturday 3pm - 6pm

Telephone

+918169310493

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when मूळव्याध-Piles clinic posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to मूळव्याध-Piles clinic:

Share