12/08/2024
आज दूसरा श्रावण सोमवार - २०२४ . आजची शिवामूठ तिळाची.
आनंदानी, प्रेमानी फक्त मूठभर भगवंताला अर्पण केल्याने, दिल्याने देखील भरभराट होते.
आजच्या काळात पिंडीवर न वाहता धान्य दान केले तरी चालेल. त्याने ही सर्व फायदे मिळतीलच.
Grain bank मध्ये आपल्या धान्याची मूठ वाहा. संकल्प नक्की करा. मात्र विधायक संकल्प हं!
त्या निमित्त थोडी तिळाच्या गुणधर्मांची माहिती देखील बघू.
तुम्ही वाचा आणि शेअर ही करा. हे ज्ञान वृद्धिंगत व्हावे ही इच्छा!! मात्र Edit न करता आणि नावासकट शेअर करा.
तीळ
तीळ 2 प्रकारचे असतात. काळे आणि पांढरे. काळे तीळ अधिक पौष्टिक असतात. काळ्या तिळाचे गुण अधिक तीक्ष्ण असतात.
तिळाचे काही प्रमुख गुण थोडक्यात बघू.
*दंत्य – दातांच्या आरोगयास उत्तम; *अग्नि वर्धक, दीपन – अग्नि मांद्यावर उत्तम. पचन सुधारण्यास उपयोगी. *मेधा वर्धक – अर्थात बुद्धी वर्धक, स्मृतीवर्धनासाठी देखील उपयुक्त. * व्रण शोधन्य – व्रण, जखम बरी होण्यास उत्तम. *वृष्य – वीर्य आणि बळ वर्धक. * स्रोत शोधन – सर्व स्रोत (channels) शुद्धी होते. *त्वच्य – त्वचेचे आरोग्य सुधारते. *बल्य – मांस, मेद आणि अस्थि यांचे बल वर्धनास तीळ, तिळाचे तेल उत्तम. *केश्य – केसांचे आरोग्य सुधारते. *रस - मधुर आणि तिख्त (म्हणजे कडू) *अनुरस – कशाय म्हणजे तुरट *विपाक – मधुर, म्हणजे पंचनानंतर शरीरास मधुरता देते. *वीर्य – ऊष्ण *वात आणि कफ दोषांचे शमन करते. मात्र पित्त वाढवते. म्हणून थंडी आणि पावसाळ्यात सेवन करण्यास उत्तम. *सूक्ष्म – केश वाहिन्यांपर्यंत पोचते, व्यवयी – शरीरात पटकन शोषले जाते, तीक्ष्ण, विशद (clear), गुरु - जड, सार – सारक.
ज्यांची पित्त प्रकृती आहे त्यांनी किंवा पित्त प्रकोप झाला असेल तर मात्र तीळ खाऊ नयेत किंवा कमी खावेत.
प्रकृतीस ऊष्ण आणि सारक असल्याने गर्भवती स्त्रियांनी तिळाचे अति सेवन टाळावे.
आधुनिक विश्लेषणानुसार तिळात vitamin D, E, K, B1, B6, iron, magnesium, potassium, calcium, zinc, copper, manganese, protein and dietary fibre विपुल प्रमाणात मिळते. तसेच omega-3, omega-6, and omega-9 fatty acids यांचे प्रमाण balanced असून शरीरास पोषक असते. त्यामुळे हृदयाच्या आरोगयास उत्तम.
तिळाचे हे सर्व गुण आपल्यात सहज रुजावे म्हणून शिवाला याचा अभिषेक करायचा. शिवाचा आवडता महिना म्हणजे श्रावण. म्हणून श्रावणात एवढी शिव व्रतं आपण करतो. मनापासून पूजा केल्याने, आपल्यातले सत्त्व जागे ठेवायला, बलशाली व्हायला मदत मिळते, मानसिक बळ ही वाढते.
तरी नित्य खाण्यात तीळ नक्की असतील हे पाहून घ्या.
मंजिरी गोखले
7506825067
#शिवामूठ