26/06/2025
आज कुतवळ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, तुळजापूर च्या १० व्या वर्धापन दिनी मागे वळून पाहताना...आई तुळजाभवानी च्या कृपेने आम्हाला तुळजापूर तसेच काही प्रमाणात लोहारा तालुक्यासाठी काम करताना आपल्या सर्वांचे आशीर्वाद, आमच्या कार्यावर दाखविलेल्या विश्वासाची आठवण आणि अनेकांचे बहुमोल सल्ले यांच्यामुळेच आज दहाव्या वर्षात पदार्पण करताना अतीव आनंद आणि रुग्णांच्या विश्वासासाठी आणखी काम करण्याच्या हुरूप येतोय...
माझ्या दिवंगत *बाबांची* ( प्रदीप कुतवळ ), *आईची* आणि माझ्या संपूर्ण परिवाराची खंबीर साथ त्यांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरताना त्यांना झालेला आनंद पाहताना तो क्षण अगदीच अमूल्य होता.
या हॉस्पिटलच्या अगदी पहिल्या दिवसापासून आमच्यासाठी म्हणून कायम आमच्या पाठीशी उभे असलेले आमचे *मामाश्री सुरेश ( आप्पा ) पाटील, दहिवडीकर, आमचे काकाश्री नंदकिशोर कुतवळ* यांचेही योगदान खूप महत्वाचे आहे आणि राहणार आहे.
आमचे मित्र *अमर नाना चोपदार* यांचा वेळोवेळी सल्ला आणि आशीर्वाद मोलाचे आहेत.
तसेच *माजी मंत्री मधुकरराव चव्हाण* साहेब यांचे प्रेम आणि आशीर्वाद आमच्यावरील विश्वास अत्यंत बहुमोल आहे.
या १० वर्षामध्ये काम करत असताना बरेचसे अत्यवस्थ रूग्णांची सेवा करण्याची संधी मिळाली, विविध क्लिष्ट ऑपरेशन करण्याची संधी आणि त्याला आम्हाला आमचे मित्र डॉ दयानंद चौरे सर( सर्जन), डॉ गणेश पाटील ( अस्थिरोग तज्ञ), विनोद बर्वे ( अस्थिरोग तज्ञ),डॉ चंद्रकांत क्षीरसागर( भूलतज्ञ ), प्रसेनजीत पडवळ ( भूलतज्ञ), डॉ खंदारे मॅडम ( मेंदूरोग तज्ञ ), संतोष कारदगे ( त्वचारोग ), आनंद खडके ( नेत्ररोग ), अनिल वायकुळे ( नेत्ररोग) यांची मिळालेली साथ मोलाची आहे.
आपण सर्वांनीच कोरोना सारखा वाईट काळ पाहिला,अनुभवला आणि खंबीरपणे आपण सर्वांनी त्याला एकजुटीने हरविले... त्याकाळामध्ये जेव्हा आपण सर्वजण एका अवघड परिस्थितीला तोंड देत होतो , त्यावेळी आम्हा डॉक्टरांना या हयातीत न भूतो न भविष्याति अशी काम करण्याची गरज असताना आम्हाला आपणा सर्वांची सेवा करण्याची संधी मिळाली आणि आम्ही ती आमच्या सोबत काम केलेल्या आमच्या कर्मचारी, सिस्टर, ब्रदर , अनेक समाजसेवक, आमचे हितचिंतक, आणि कोरोना सोबत लढलेल्या प्रत्येक रुग्णामुळेच कुठलीही भीडभाड न ठेवता काम करू शकलो हेच भाग्य समजतो..यापुढे तसा काळ कोणालाही पाहण्याची वेळ येऊ नये हीच प्रार्थना करतो.
तसेच हॉस्पिटल च्या सर्वेसर्वा सुवर्ण पदक विजेत्या डॉ मयुरी ढोकणे- कुतवळ या स्वतः नेत्ररोग विभागात लोकांना सेवा देत आहेत, १५ ऑगस्ट निमित्त दर वर्षी मोफत नेत्ररोग शिबिर आयोजित केले जाते तसेच मोतीबिंदू, डोळ्यावरील पडद्याच्या शस्त्रक्रिया , अगदी माफक दरात केल्या जातात.
तसेच डायबिटीस आणि ब्लड प्रेशर मुळे डोळ्याच्या पडद्यावर होणाऱ्या परिणामांची तपासणीसाठी लागणाऱ्या fundus फोटोग्राफी ची सुविधा आपण आता इथेच तुळजापूर मध्ये सुरुवात करीत आहोत..
या वर्धापन दिनी आम्ही लवकरच आपल्या सेवेत रक्तपेढी ( Blood Bank ) सुरू करण्याचा संकल्प घेतो जेणेकरून रुग्णांना इथून पुढे रक्ताची किंवा रक्त घटकांची गरज भासल्यास धाराशिव किंवा सोलापूर जाण्याची गरज पडणार नाही. येणाऱ्या पावसाळ्यात उद्भवणाऱ्या डेंग्यू सारख्या साथीच्या रोगामध्ये लागणाऱ्या प्लेटलेट्स, प्लाझ्मा आता आपल्याला येथेच मिळतील आणि तेही लवकरात लवकर मिळतील याची दक्षता आम्ही घेऊ. आपले आशीर्वाद असेच आमच्या सोबत असूद्या
धन्यवाद