
30/09/2024
"श्रोतेच या कार्यक्रमाचे खरे शिल्पकार आहेत." - 'मन की बात'ची दशकपूर्ती कार्यक्रमाच्या यशाचे श्रेय पंतप्रधानांनी जनतेला बहाल केले..
एका अध्ययनानुसार या कार्यक्रमामुळे ६०% श्रोत्यांमध्ये राष्ट्र विकासाची तळमळ निर्माण झाली आहे. देशाविषयी सकारात्मक भावना त्यांच्यामध्ये निर्माण होऊन प्रतिदिवशी होणाऱ्या देशाच्या प्रगती विषयी लोकांमध्ये आस्था निर्माण होत गेली..
१० वर्षांपूर्वी ३ ऑक्टोबर २०१४ ला विजयादशमीच्या दिवशी मन की बातचा पहिला कार्यक्रम प्रसारित झाला आणि या वर्षी ३ ऑक्टोबर २०२४ रोजी जेव्हा कार्यक्रमाची दशकपूर्ती होत आहे, तो नवरात्रीचा पहिला दिवस असणार आहे, हा एक पवित्र आणि सुवर्ण योगायोग आहे..
क्रीडा, शिक्षण, अर्थकारण, राजकारण, जागतिक घडामोडी इथपासून थेट शेवटच्या घटकाच्या व्यक्तीच्या प्रगतीपर्यंत असंख्य घडामोडी नागरिकांसमोर मांडत एक सकारात्मक दृष्टिकोन आणि भूमिका माननीय पंतप्रधान यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून सातत्याने देशाला दिली..
माननीय पंतप्रधानांच्या अत्यंत उद्बोधक, प्रेरणादायी आणि अंतर्मुख करणाऱ्या वक्तृत्व शैलीमुळे प्रत्येक कार्यक्रमातून नागरिकांची उत्कंठा आणि कार्यक्रमाविषयी आवड नेहमीच वाढती राहिली.. विकास कामे आणि इतर प्रगती कशा पद्धतीने करता येऊ शकते यासाठी नागरिकांची मते, सूचना वेळोवेळी या कार्यक्रमामधून मागवल्या गेल्या. ज्यामुळे कोट्यावधी नागरिकांचा देखील यात प्रत्यक्ष सहभाग लाभला असे म्हणता येईल. आज मन की बात हा कार्यक्रम भारताच्या २२ भाषांसहित विदेशातील १२ भाषांमध्ये सुद्धा ऐकला जातो..
गेल्या रविवारी संपन्न झालेल्या कार्यक्रमात "श्रोतेच या कार्यक्रमाचे खरे शिल्पकार आहेत." असे म्हणत पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी साहेबांनी विनम्रपणे या अद्वितीय कार्यक्रमाचे श्रेय नागरिकांना समर्पित केले..
कोणतेही काम माननीय पंतप्रधानांनी हाती घेतले तर ते अखंडपणे सुरू ठेवणे हा त्यांचा अत्यंत मौल्यवान असा गुण आहे. एखादे काम १० वर्षे सलग चालविणे हे काम वाटते तेवढे सोपे निश्चित नाही. त्यासाठी अनेक अडचणींचा देखील सामना वेळप्रसंगी करावा लागत असतो.. मात्र या सर्वांवर मात करत सातत्याने हा कार्यक्रम चालू राहिला.. कोव्हिड काळात असंख्य नागरिकांना यातून नवीन स्फूर्ती लाभली.
ी_बात