25/10/2024
निवडणूक आयुक्तांच्या अनुमतीनंतर अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा होणार..
जिल्ह्यातील शेतकरी पीक नुकसान अनुदानासाठी पाठपुरावा सुरू!
धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच नदी-नाल्यांना आलेल्या पुरामुळे अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाला अतिवृष्टी तसेच पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार त्यांनी ४ ऑक्टोबर रोजी विभागीय आयुक्तांच्या मान्यतेने राज्याच्या मुख्य सचिवांकडे पीक नुकसानीचा अहवाल सादर केला होता. मुख्य सचिवांनी त्यास मान्यता दिली आहे. निवडणूक आयुक्तांच्या मान्यतेसाठी हा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. त्यांच्या अनुमतीनंतर हेक्टरी १३ हजार ८०० रूपयांचे अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धाराशिव तालुक्यातील वाडी व वाडी बामणी येथे बैठक घेऊन
नागरिकांशी संवाद साधला. यावेळी स्थानिक प्रश्नांवर चर्चा करुन त्यांनी ग्रामस्थांच्या समस्याही जाणून घेतल्या. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी (एनडीआरएफ) व राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (एसडीआरएफ) मार्फत शेतकर्यांना नुकसानीपोटी १३ हजार ८०० रूपयांचे अनुदान दिले जाते. राज्यातील काही जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात नुकसानग्रस्त शेतकर्यांच्या खात्यावर १३ हजार ८०० रूपयांप्रमाणे अनुदानाची रक्कम जमा होण्यास प्रारंभ झाला आहे.
आपल्या धाराशिव जिल्ह्यातील ५८ पैकी ३७ महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. त्याचबरोबर ज्या ठिकाणी अतिवृष्टी झालेली नाही. अशा अनेक ठिकाणी नदी-नाल्यांना आलेल्या पुरामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिथे अतिवृष्टी झाली, तेथील पंचनामे प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर ज्या ठिकाणी अतिवृष्टी नाही, मात्र पुराच्या पाण्यामुळे शेतीचे आणि पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, तेथील पंचनामे करण्याचे निर्देश आपण जिल्हा प्रशासनाला दिले होते.
निवडणूक आयुक्तांच्या अनुमातीसाठी हा प्रस्ताव सादर करण्यात आला असून त्यांच्या अनुमतीनंतर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकर्यांच्या खात्यावर नुकसान अनुदान प्राप्त होण्याचा मार्ग मोकळा होईल. त्यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करीत आहोत.
#पीक_नुकसान #अनुदान #धाराशिव