11/02/2024
Hello,
हल्ली वरचेवर भेट होतीये आपली... हल्ली बरेच फॉरवर्ड मेसेज व्हाट्सअप, फेसबुक वर फिरत असतात कधी कधी वाटतं एखाद वेळेस तरी असं होईल का, की माझाच Article मला फॉरवर्ड म्हणून आलाय😀😀 त्यादिवशी होईल माझी स्वप्नपूर्ती😍 हाहाहा विनोदी आहे.. पण आहे..
आयुष्यात आणि त्यातही करिअर मध्ये सपोर्ट आणि ॲप्रिसिएशन ची खूप गरज असते... बऱ्याच वेळा लोकांकडे टॅलेंट असतं, काहीतरी करून दाखवायची कुवत असते, पण सपोर्ट नसतो किंवा योग्य मार्गदर्शन मिळत नाही आणि केलेल्या गोष्टीचं कौतुक करणं खूप गरजेचं असतं... तुमच्याही घरी कोणी कधीही अगदी छोटीशी गोष्ट केली तरी आपण तोंडभरून कौतुक करावं त्याने एक Boost मिळतं..
माझे मागचे दोन-तीन लेख फूड आणि डायट यावर लिहिलेले होते.. आपण फास्टफूड बद्दलही पाहिलं.. बऱ्याच लोकांना पटलं काहीना पटलं असेल पण फॉलो कसं करावं?? ते कळत नसेल.. त्याच लेखात मी शेवटी लिहिलं होतं गोष्टी आपल्याला पटतात समजतात, त्या जेव्हा करायची वेळ येते तेव्हा मात्र आपण मागे फिरतो नाहीतर आज माझा Cheat Day आहे असं म्हणतो....
Cheat Day, म्हणजे थोडक्यात "कधी तरी चालतं हो" आजचा आपला विषय जरी हा नसला तरी ह्यावर सुद्धा बोलण्याची तितकीच गरज वाटते... कोणा दुसऱ्यापेक्षा आपल्या शरीराला आपणच चांगलं ओळखतो.. आपल्या शरीराला काय खाणं-पिणं सुट होतं ते आपल्याला व्यवस्थित माहिती असतं.. त्यासाठी कोणा डॉक्टर, डायटीशियन, न्यूट्रिशनिस्ट किंवा अगदी माझ्यासारख्या शेफ ची काहीच गरज नसते... ही सगळी मंडळी तुम्हाला एक डायट प्लान करून देऊ शकतात, पण आपणच तो नीट पाळायला हवा... आपल शरीर बरोबर आपल्याला हवे ते पोषक घटक अन्नातून घेत असतात आणि काही कमी वाटलं तर आजार रूपात आपल्याला दाखवून देतात, 'बाबा रे हे कमी खा, हे जरा जास्त खा... हो पण ऐकेल तो माणूस कुठला... नियम मोडणं हिच माणसाची प्रवृत्ती... नाही तर, सगळेच शहाणे असते तर नियम हा शब्दच अस्तित्वात नसता...
आपण आपल्या दुसऱ्या मुद्द्यावर येऊया बॅलन्स डाएट पण हेही माझं बरंच सांगून झालय त्यामुळे यावर फार काही बोलणार नाही... हल्ली बरीच जणं कॅलरी - कॅलरी करतात... आता "कॅलरी" म्हणजे नेमकं काय?? कशात किती असते?? वगैरे बेसिक नॉलेज तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करीन.. बाकी कमेंट बॉक्स आहेच... तुम्हाला माहितीच आहे मी सगळ्यांच्या प्रश्नाचं नेहमीच स्वागत करतो, पण बहुतेक वेळा सगळ्यांना नीट समजतं त्यामुळे कमेंट फक्त कौतुकाने भरलेल्या असतात त्यासाठी तुमचे खूप आभार...❤😇🙏🙏
बॅलन्स डाएट चा विषय निघालाच आहे तर त्याबद्दल थोडं बोलू... बॅलन्स डाएट मध्ये प्रामुख्याने चार रंगाचे पदार्थ येतात आणि त्यानुसार ते खाल्ले ही जावेत... रंगावरून एक गोष्ट आठवली... हॉटेल मॅनेजमेंट कंप्लीट केलेल्या नवीन Graduates ना शिकवण, त्यांचे बेसिक्स क्लिअर करणं, त्यांना प्रत्येक गोष्टीचं नॉलेज देणं... ट्रेनिंग सेशन घेणं हा सुद्धा माझ्या कामाचा एक भाग आहे... ही मुलं कधी काय प्रश्न विचारतील याचा काही नेम नसतो त्यामुळे तुम्हाला कायम अपडेटेड राहावं लागत... काहीही Unexpected प्रश्न विचारतात हे, नवीन जॉबला लागलेले किंवा अगदी कॉलेज ट्रेनी सुद्धा.. त्यामुळे प्रॅक्टिकल सोबत आमचं वाचन सुद्धा पक्क असाव लागत... तर असाच एक दिवस पिझ्झा ची ऑर्डर बनवत असताना, त्या मुलाने प्रश्न विचारला...'Chef, ये मार्गारिटा पिझ्झा को.. मार्गारिटा पिझ्झाही क्यों बोलते है'??? आता हा काय ऑर्डर च्यावेळेस विचारण्याचा प्रश्न आहे का??? मुळात हा काय प्रश्न आहे का?? नशिबाने मी बऱ्याच इटालियन Chefs सोबत आधी ही काम केलय आणि इटलीला सुद्धा बऱ्याचदा जाऊन आलोय त्यामुळे त्याचे उत्तर माहीत होतं हो, पण ऐन वेळी असा बॉम्ब टाकला की कधीकधी पंचाईत होते ना...
बरं त्यांच्या अपेक्षाही चूक नसतात हा आपला शेफ आहे.. ह्याच्या अंडर आपण काम करतो त्यामुळे त्याला सगळं माहिती असणार आणि ते असायलाही हवं... तर उत्तर असयं मार्गारिटा नावाची राणी आणि तिचे पर्सनल शेफ यांनी लोकल इन्ग्रेडियंट वापरून म्हणजे.. टोमॅटो, चीज आणि बेसील वापरुन पिझ्झा बनवला आणि तो तिला प्रचंड आवडला... पुढे हा पिझ्झा तिच्याच नावावरून प्रसिद्ध झाला... दुसरी गोष्ट अशी, हा पिझ्झा इटलीच्या फ्लॅग ला रिप्रेझेंट करतो... रेड कलर म्हणजे टोमॅटो सॉस, व्हाईट कलर म्हणजे चीज आणि ग्रीन कलर म्हणजे बेसिल ची पानं म्हणून इटालियन Cuisine चा भाग म्हणून हा पिझ्झा वर्ल्ड फेमस आहे... तर असही काय काय आम्हाला रोज सहन कराव लागतं, पण हीच मुलं मोठे शेफ सुद्धा होतात तरीही आम्हाला विसरत नाहीत हे पाहून खूप आनंद होतो... पुन्हा बॅलन्स डाएट वर येऊया ना😅😅
फुड सायन्स हे पूर्वी साध्या सोप्या भाषेत सांगितलं जायचं जेणेकरून एखाद्या अडाणी माणसाला सुद्धा ते सहज समजू शकेल... रंगांची ओळख आपल्याला लहानपणापासून असते त्यामुळे लिहिता वाचता जरी येत नसलं, तरी हा एक छोटासा उपाय.... आपला चौरस आहार योगायोगाने चौरंगी सुद्धा आहे... तुम्ही अगदीच रंगांच्या शेडमध्ये जाऊ नका.. वेगळे रंग या स्वरूपात बघा.. पांढरा, पिवळा, हिरवा आणि लाल पांढरा रंगाचा.. भात, कांदा-लसूण, अंड, दूध, फ्लॉवर.... पिवळ्या रंगात.. पोळी, वरण, फळं, लिंबू.... हिरव्या रंगात.. सगळ्या प्रकारच्या पालेभाज्या, फळभाज्या आणि लाल रंगात.. टोमॅटो, गाजर, लाल मिरची आणि मांस अशी साधारण वर्गवारी आपण करू शकतो... हे झालं अगदी सामान्य माणसाचं....
आता उच्चशिक्षित किंवा हाय प्रोफाईल लोक सारखं कॅलरी कॅलरी बडबडत असतात... नेमकं काय आहे हे प्रकरण?? गाडीला पेट्रोल, मोबाईल ला चार्जिंग, तसंच शरीराला सुद्धा ऊर्जेची गरज असते... हीच एनर्जी किंवा ऊर्जा कमी-जास्त होणं म्हणजेच कॅलरी Gain किंवा Burn करणं... एखाद्या पदार्थात किती कॅलरी आहेत हे त्यातल्या मेन न्यूट्रिशनल पार्ट्स मधून ठरवलं जातं... नंतर पदार्थांमध्ये Protein Carbs आणि Fat प्रामुख्याने बघितले जातात... त्या पदार्थात हे 3 idiots किती आहेत ते पाहिलं जातं... Carbs आणि Protein भाऊ-भाऊ... यांच्या एक ग्राम मध्ये साधारण चार कॅलरी असतात आणि Fat म्हणजे जाड माणसं नाहीत हं... स्निग्ध पदार्थ, यांच्या एक ग्राम मध्ये साधारण नऊ कॅलरीज असतात... हे बेसिक प्रमाण घेऊन तुमच्या रोजच्या जेवणात त्याचा किती समावेश आहे, उदाहरण द्यायचं झालं तर ब्रेड च्या एका स्लाईस मध्ये 10 ग्रॅम प्रोटीन 15 ग्रॅम Carbs आणि 05 ग्रॅम Fat असतील... समजा तुम्ही चार स्लाईस खाल्ल्या तर बघा बरं गुणाकार करून.. तुम्हीच करा, मला ते गणित म्हटलं की जाम कंटाळा येतो😅😜 तर अशा मोजायचा असतात कॅलरीज.. आपण जितक्या कॅलरी Intake करतो त्यापेक्षा जवळजवळ दुप्पट कॅलरी Burn करायच्या असतात आणि ते फक्त कष्टाची काम करून किंवा व्यायामाने शक्य आहे म्हणून, जेवणासोबत नियमित व्यायामही करायला हवाच... तर आणि तरच तुमचं वजन Control मधे राहील..
परदेशातून काही गोष्टी घेण्यासारख्या आहेत रेसिपी स्टँडर्डायझेशन.... भारतात याची खूप कमतरता जाणवते आणि आपल्या इथे पिझ्झा-बर्गर ला जेवढी मान्यता आणि पोपुलारिटी मिळाली तेवढी आपल्या, एक बटरचिकन सोडलं तर बाकी कोणत्याही डिश ला वर्ल्ड मध्ये मान्यता मिळू शकलेली नाही... कारण आपली कोणतीच रेसिपी स्टँडर्ड नाहीये.. कोणी असं बनवतं, तर कोणी तसं... आपली साधी बटाट्याची भाजी; आहे का काही स्पेसिफिक रेसिपी, नाहीये.. शंभर प्रकारे बनवता येते.. पण आपल्या भारतात फेमस आहे नाही का?? हाच एक Drawback आहे... भारतीय Cuisine जगभरात फेमस असूनही स्टँडर्डायझेशन नसल्याने त्याला काही Value नाहीये..
रेसिपी स्टँडर्डायझेशन होतं म्हणजे नेमकं काय की ठराविक पदार्थात काय काय पडतं, त्याचं प्रमाण फिक्स होतं आणि त्यापासून मिळणाऱ्या कॅलरीज काउंट करणं, ट्रॅक करणं, आणि कंट्रोल ठेवणं सोपं जातं आता तुमचं तुम्हालाच वजन कमी करता येईल... पण आपण सगळेच सढळ हातानी स्वयंपाक करणारी लोकं... जेवण बनवणं खाऊ घालणं प्रेमाचं आणि पुण्याचं काम समजणारे... त्यामुळे भारतात रेसिपी स्टँडर्डायझेशन होणं जरा कठीणच आहे... म्हणूनच डायट करताना आपल्याला परदेशी सॅलडचा वगैरे आधार घ्यावा लागतो... तीथलं घ्यायचं असेल तर भारताने नक्कीच स्वच्छता घ्यायला हवी... परदेशात खाद्यपदार्थ जिथे बनतात तिथली स्वच्छता हेल्दी Atmosphere ह्या गोष्टी असणं आणि त्यासाठीचे नियम खूपच Strict आहेत... भारतात ते तेवढ्या प्रमाणात अनुभवायला मिळत नाहीत, म्हणूनच बहुदा आपली Immunity Power त्यांच्यापेक्षा जास्त असावी...😁😁😁 हाहाहा....
काय मग कसा वाटला लेख होईल ना थोडाफार फायदा?? परत भेटूच लवकर... तोपर्यंत...
हेल्दी खा आणि हेल्दी रहा❤😇
©✍🏻Chef Aniruddha Ranade
The Artisan Chef - Culinary Reinvent