15/07/2025
“समोसा, जिलेबी आणि लाडू सिगारेटसारखेच धोकादायक!” – आरोग्य मंत्रालयाचा इशारा
सरकारकडून काय सांगितलं गेलं आहे?
आरोग्य मंत्रालयाने नुकताच एक अलर्ट जारी केला आहे:
“समोसा, जलेबी, लाडू यामधील वापरले जाणारे साखर, मैदा आणि तेल – हे पदार्थ आरोग्यासाठी सिगारेटसारखेच घातक आहेत.”
हा इशारा खूप गंभीर आहे, कारण हे पदार्थ आपण दररोज खातो – तेही ‘चव’ म्हणून, पण नकळत आजारी बनतोय.
या पदार्थांमध्ये काय काय धोके लपले आहेत?
साखर (Sugar):
• साखर शरीरात गेल्यावर इन्सुलिनचं नियंत्रण बिघडवतं.
• मधुमेह, लठ्ठपणा, हार्ट अटॅक, त्वचाविकार याचा धोका वाढतो.
• अनेक फूड्समध्ये ‘हिडन शुगर’ असते – जसं की सॉस, ब्रेड, बिस्किट, कोल्ड ड्रिंक.
मैदा (Refined Flour):
• मैदा बनवताना त्यातले सगळे नैसर्गिक घटक काढले जातात.
• त्यामुळं तो केवळ “खराब कॅलरी” असतो – पोषण काहीच नाही.
• अपचन, गॅस, ऍसिडिटी, वजनवाढ, PCOD, लिव्हर फॅट हे त्याचे दुष्परिणाम.
रिफाइंड व वनस्पती तेल (Refined Oils & Vanaspati):
• रिफाइंड तेल हे केमिकल वापरून बनवलं जातं.
• सूर्यफूल तेल, सोया तेल, पाम तेल, तसेच वनस्पती तूप (vanaspati) हे सर्व अत्यंत प्रोसेस्ड व आर्टिफिशियल असतात.
• यामुळं कोलेस्टेरॉल, फॅटी लिव्हर, हृदयरोग, सूज (inflammation) निर्माण होतो.
वारंवार तळलेलं तेल (Repeatedly Heated Oil):
• हॉटेल, गाडीवर, स्टॉलवर जे तेल पुन्हा पुन्हा तापवलं जातं – ते टॉक्सिक बनतं.
• अशा तेलात तयार केलेले समोसे, भजी, वडा, चिप्स खाल्ल्यास कॅन्सरचा धोका सुद्धा असतो.
• अशा तेलात ट्रान्स फॅट्स वाढतात – जे शरीरासाठी अत्यंत घातक आहेत.
थोडक्यात सांगायचं तर…
जे आपण रोज जे जंक फूड खातो – ते चविष्ट वाटतं, पण शरीरात हळूहळू विषा सारखं काम करतंय! वजन वाढवते आजार तयार करते
आणि म्हणूनच आरोग्य मंत्रालयाने यावर सिगारेटप्रमाणे अलर्ट जारी केला आहे.
मग उपाय काय?
साखरेऐवजी – गूळ, मध, खजूर
मैद्याऐवजी – गहू, नाचणी, बाजरी, ज्वारी
तेल पुन्हा पुन्हा तापवणं टाळा
बाहेरचं तळलेलं खाणं शक्यतो कमी करा
घरगुती, नैसर्गिक आणि पारंपरिक आहाराकडे वळा
आजकालचे आजार हे चविष्ट खाण्याच्या नावाखाली होत आहेत.
आजारांची मुळं आपल्या ताटात लपलेली आहेत.
म्हणूनच सावध व्हा, सजग व्हा आणि आरोग्यदायी आयुष्य जगा!
डॉ.अभिजीत निकम
सिद्धामृत आयुर्वेद हॉस्पिटल विटा
📲 Instagram: .abhijeet_nikam
▶️ YouTube: Siddhamrut Ayurveda
9960495989