Umesh Chavhan

Umesh Chavhan Building a better world through equitable access to healthcare and social services.

Umesh Chavhan is a multifaceted personality who has made significant contributions to society as a social worker, author, entrepreneur, and philanthropist. He is widely recognized for his efforts to improve the lives of the underprivileged and marginalized people in his community. As the President of Rugna Hakk Parishad and Pruthvi Medical Foundation, Umesh has been instrumental in providing healthcare services to the needy and promoting health awareness programs. He is also the Chairman of Maharajat Urban Kalyan Nidhi Bank Ltd, which provides financial support to the economically weaker sections of society. As a Director of R H P Hospital Pune and R H P Media and Production Pvt Ltd, Umesh has been instrumental in providing quality medical care and creating awareness through various media channels. Umesh is also the Project Head of National Labour Health of Labour Survey 2023-2027, which aims to improve the health and well-being of the labor force in the country. In addition, he is the President of Mahatma Gandhi Award Committee 2023 and Jijai Ramai Award Committee 2023, which recognizes and honors individuals who have made significant contributions to society. Umesh's unwavering commitment to social causes has earned him the respect and admiration of many, and his work continues to inspire others to make a positive impact in their communities.

05/12/2024

महापरिनिर्वाणदिनी रक्तदान करूया- अभिनेता प्रभाकर मोरे
#वर्ष_११_वे #महापरीनिर्वाण_दिन #महामानवाला_अभिवादन

माणुसकी प्रति करूया रक्तदान! #महामानवाला_अभिवादन    #वर्ष_११_वे  #महापरीनिर्वाण_दिन
05/12/2024

माणुसकी प्रति करूया रक्तदान!
#महामानवाला_अभिवादन #वर्ष_११_वे #महापरीनिर्वाण_दिन

मित्रानो, कॅन्सर रुग्णांवर मोफत उपचार आणि औषध व इंजेक्शन मिळतात.
28/11/2024

मित्रानो, कॅन्सर रुग्णांवर मोफत उपचार आणि औषध व इंजेक्शन मिळतात.

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना स्मृतिदिनी रुग्ण हक्क परिषदेचे अभिवादन.पुणे - स्त्री शिक्षणाचे जनक, थोर समाज सु...
28/11/2024

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना स्मृतिदिनी रुग्ण हक्क परिषदेचे अभिवादन.

पुणे - स्त्री शिक्षणाचे जनक, थोर समाज सुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिनी रुग्ण हक्क परिषदेच्या वतीने महात्मा फुले वाडा येथे अभिवादन सभा आयोजित करण्यात आज आली.
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास रुग्णहक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी अजय विरकर, संतोष गायकवाड, अशोक बहिरट, रुग्ण हक्क परिषद पुणे शहर अध्यक्ष अपर्णा मारणे साठ्ये, अमृता जाधव यांच्यासह परिषदेचे पदाधिकारी प्रमुख उपस्थित होते.
महात्मा ज्योतिबा फुले यांना केंद्र सरकारने भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान 'भारतरत्न' दिलाच पाहिजे, अशी मागणी यंदाही रुग्ण हक्क परिषदेच्या वतीने उमेश चव्हाण यांनी बोलताना केली.

I have reached 24K followers! Thank you for your continued support. I could not have done it without each of you. 🙏🤗🎉
28/11/2024

I have reached 24K followers! Thank you for your continued support. I could not have done it without each of you. 🙏🤗🎉

बुधवार दि. २५ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी ठीक - ०२. ०० वाजता. मुंबई मराठी पत्रकार संघ येथे.   #रुग्णहक्क
24/09/2024

बुधवार दि. २५ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी ठीक - ०२. ०० वाजता. मुंबई मराठी पत्रकार संघ येथे.

#रुग्णहक्क

आपली प्रत आजच मागवा!
17/09/2024

आपली प्रत आजच मागवा!

सहा. पोलीस आयुक्त श्री. सतीश गोवेकर साहेबांना राष्ट्रपती पदक सन्मान मिळाल्याबद्दल त्यांचा ग्रँड पृथ्वी मेडिकल फाउंडेशन च...
20/08/2024

सहा. पोलीस आयुक्त श्री. सतीश गोवेकर साहेबांना राष्ट्रपती पदक सन्मान मिळाल्याबद्दल त्यांचा ग्रँड पृथ्वी मेडिकल फाउंडेशन च्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. मिलिंद गायकवाड, लोक जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष श्री. संजय आल्हाट, रुग्ण हक्क परिषद पुणे शहराध्यक्ष सौ.अपर्णा मारणे साठ्ये, उपाध्यक्ष आशिष गांधी आणि सलीमभाई शेख आणि रुग्ण हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण उपस्थित होते.

भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!
15/08/2024

भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!

मोठमोठ्या बलाढ्य पंचतारांकित हॉस्पिटलचे बिल नेमके माफ कसे होते? लाखो रुपयांचे उपचार मोफत कसे मिळतात? मोफत उपचारांविषयी क...
07/08/2024

मोठमोठ्या बलाढ्य पंचतारांकित हॉस्पिटलचे बिल नेमके माफ कसे होते? लाखो रुपयांचे उपचार मोफत कसे मिळतात? मोफत उपचारांविषयी कोर्टाचे आदेश नेमके काय आहेत? रुग्ण हक्क परिषदेचा समाजसेवेचा नेमका फॉर्मुला काय? शासनाचे आदेश आणि योजना कोणत्या? हॉस्पिटलचे बिल माफ करण्याविषयी आणि मोफत उपचारांच्या विषयी तुमच्या सर्वांच्या मनात असणाऱ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे माझ्या 344 पानी पुस्तकात तुम्हाला मिळतील. हॉस्पिटलचे बिल माफ कसे करावे? या पुस्तकाच्या दुसऱ्या सुधारित आवृत्तीचे प्रकाशन करताना अत्यंत आनंद होत आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण, शिवसेनेच्या फायर ब्रँड नेत्या सुषमाताई अंधारे, माझी साहित्य संमेलन अध्यक्ष प्राचार्य डॉ. श्रीपाल सबनीस, माझी विशेष पोलीस महानिरीक्षक महाराष्ट्र राज्य श्री. चंद्रशेखर दैठणकर (IPS), भानुप्रताप बर्गे, डॉ. अमोलजी देवळेकर, मिलिंद गायकवाड, संगीता पाटील, जान महंमद पठाण, अपर्णा मारणे साठ्ये, आशिष गांधी, इकबाल शेख आणि राजाभाऊ कदम आणि आपण सर्व मित्र मंडळी सहकारी तुमच्या सर्वांच्या साथीने सहकार्याने शुक्रवार दिनांक 9 ऑगस्ट 2024 रोजी क्रांतीदिनी हा कार्यक्रम पुण्यात संपन्न होत आहे, तरी आपण उपस्थित रहावे ही नम्र विनंती!
उमेश चव्हाण, लेखक
#रुग्णहक्क

रुग्ण हक्क परिषद रुग्णांच्या अधिकारांची चळवळ आहे, रुग्ण हक्क परिषदेत सहभागी व्हा - उमेश चव्हाण१) डॉक्टरांचे संरक्षण व रु...
16/07/2024

रुग्ण हक्क परिषद रुग्णांच्या अधिकारांची चळवळ आहे, रुग्ण हक्क परिषदेत सहभागी व्हा - उमेश चव्हाण

१) डॉक्टरांचे संरक्षण व रुग्णांच्या न्याय हक्कासाठी लढणारी भारतातील पहिली 'आय एस ओ' मानांकित संघटना म्हणजेच रुग्ण हक्क परिषद होय. रुग्ण हक्क परिषद या संघटनेचे महाराष्ट्रातील 36 पैकी 22 जिल्ह्यांमध्ये प्रभावी संघटन आहे. प्रत्येक गावात, शहरात, तालुक्यात, जिल्ह्यात रुग्ण हक्क परिषद ही संघटना रुजली आहे.

२) रुग्ण हक्क परिषदेची स्थापना अभ्यासू सामाजिक व राजकीय कार्यकर्ते, लेखक व व्याख्याते नेते उमेश चव्हाण यांनी 18 मार्च 2012 रोजी केली. गेली 14 वर्षे यशस्वीरित्या रुग्ण हक्क परिषद महाराष्ट्र राज्यासह गोवा, गुजरात, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश आणि दिल्ली या राज्यातही कार्यरत आहे.

३) भारतीय संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रपिता महात्माजी गांधी यांच्या विचाराने रुग्ण हक्क परिषदेचे कार्य प्रभावित झालेले आहे. सेवा, त्याग, संघर्ष ही मूल्ये अंगीकारून सत्य व अहिंसेच्या मार्गाने कार्यक्रम मिळावे, सभा व आंदोलने केली जातात.

४) सन २०२० ते २०२३ या तीन वर्षात महिला व गरीब असंघटित कामगारांचे तळागाळात फिरून रुग्ण हक्क परिषदेने सर्वेक्षण केले. या सर्वेक्षनातून सव्वा दोन लाख रुग्णांची माहिती नोंदविण्यात आली. राज्यातील महिला मुले व गरीब नागरिकांच्या संदर्भातील महाराष्ट्र राज्याचे चित्र वेदनादायी आहे. गंभीर आहे, हे सर्वेक्षनातून दिसते. शासकीय दवाखाने अधिक मजबूत व्हायला हवेत आणि महानगरपालिकांची रुग्णालये खाजगी हॉस्पिटल पेक्षा भक्कम व्हायला हवीत, यासाठी रुग्ण हक्क परिषदेच्या माध्यमातून नेहमीच पाठपुरावा करण्यात येतो.

५) ज्याप्रमाणे डॉक्टरांच्या संरक्षणासाठी कायद्याची निर्मिती केलेली आहे, त्याअर्थी रुग्णांच्या संरक्षणासाठी देखील कायदा निर्माण व्हायला हवा, ही रुग्ण हक्क परिषदेची प्रमुख मागणी आहे. रुग्णांना पैसा अभावी हॉस्पिटल मधून डिस्चार्ज न देणे, डिपॉझिट भरले नाही म्हणून उपचार सुरू न करणे, रुग्णांना कोणत्याही शासकीय योजनांची माहिती न देणे, रुग्णाजवळील पैसे संपल्यानंतर त्यांना जबरदस्तीने डिस्चार्ज घेण्यास भाग पाडणे, पैशाअभावी औषधे व इंजेक्शन रुग्णास न देणे, रुग्णाचा व रुग्णांच्या नातेवाईकाचा अपमान करणे, रुग्णांना मारहाण करणे अशा घटना नेहमीच हॉस्पिटलमध्ये घडताना दिसतात त्यामुळे रुग्णांच्या संरक्षणासाठी देखील फौजदारी संहितेचा रुग्णहक्क संरक्षण कायदा झाला पाहिजे, ही रुग्ण हक्क परिषदेची प्रमुख मागणी आहे.

६) रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी लिहिलेल्या 'रुग्णांचे हक्क कार्य व भूमिका' या पुस्तकाच्या चार आवृत्त्या प्रकाशित झालेल्या आहेत तर 'हॉस्पिटलचे बिल माफ कसे करावे?' या ग्रंथाच्या दोन आवृत्ती प्रकाशित झालेल्या आहेत. या पुस्तकाच्या पंधरा हजाराहून अधिक प्रती छापल्या गेल्या, बेस्ट सेलर किताब मिळविलेले पुस्तक आहे. हॉस्पिटलचे बिल माफ कसे करावे हे विक्रमी खपाचे पुस्तक म्हणून लोकप्रिय ठरलेले पुस्तक आहे. रुग्ण हक्क परिषदेच्या कार्यातून संशोधन करून निर्माण केलेले हे अत्यंत प्रभावशाली पुस्तक आहे.

७) कोविड महामारीच्या कठीण प्रसंगांमध्ये जेव्हा बेड उपलब्ध होत नव्हते, ज्यावेळी रेमडीसेव्हअर सारखे इंजेक्शन उपलब्ध होत नव्हते, जेव्हा ॲम्बुलन्स उपलब्ध होत नव्हत्या, जेव्हा ऑक्सिजनचे किंवा आयसीयूचे बेड उपलब्ध होत नव्हते, जेव्हा डॉक्टर्स किंवा नर्सेस उपलब्ध होत नव्हत्या त्यावेळी रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी परिषदेच्या कार्यकर्त्यांच्या सहयोगाने पुण्यातच छत्रपती शिवाजी महाराज कोविड-19 हॉस्पिटल निर्माण केले होते. कोविड काळात सगळीकडे रुग्णांची लाखो रुपयांची लूट होत असताना रुग्ण हक्क परिषदेने निर्माण केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल मध्ये रुग्णांसाठी मोफत उपचारांची व्यवस्था करून सर्वसामान्य रुग्णांना मोठा दिलासा त्या गंभीर परिस्थितीत दिला होता.

८) दर्जेदार उपचार मिळवण्याचा हक्क आणि समाधान मिळवताना खाजगी आणि धर्मदाय हॉस्पिटलमध्ये उपचार आणि शस्त्रक्रिया घेणाऱ्या हजारो नागरिकांना मा. उच्च न्यायालयाच्या आदेशाने निर्माण केलेल्या गरीब रुग्णांसाठीच्या मोफत उपचारांच्या योजनेतून कोट्यावधी रुपयांचे उपचार व शस्त्रक्रिया गरिबांना मिळवून दिल्या. रुग्ण हक्क परिषदेच्या वतीने सुमारे 20 हजाराहून अधिक रुग्णांवर मोफत उपचार व मोफत शास्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. कोट्यावधी रुपयांचे उपचार हजारो रुग्णांना मोफत मिळवून दिले आहेत.

९) पुण्यातील मुस्लिम बहुल परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोंढवा येथे रुग्ण हक्क परिषदेच्या कार्यकर्ते पदाधिकारी व सहकाऱ्यांच्या साथीने गरिबांवर मोफत उपचार मिळविण्याच्या हेतूने भव्य दिव्य हॉस्पिटलची निर्मिती सन 2021 साली करण्यात आली.

१०) शासनाच्या त्रुटींवर नेमकेपणाने बोट ठेवणे, विविध मागण्यांसाठी पत्रव्यवहार करणे, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तालुका कमिटी व जिल्हा कमिटीच्या वतीने स्थानिक परिसरातील आरोग्याचे प्रश्न सोडविणे, शासकीय अधिकाऱ्यांकडे कायदेशीर पद्धतीने प्रश्न सोडविण्यासाठी उपाययोजना व पाठपुरावा करणे, शेकडो हजारो लोकांच्या साथीने रस्त्यावर उतरून आंदोलन करणे, गावोगावी रुग्ण हक्क परिषदेच्या शाखांचे नामफलक उभे करणे, कार्यकर्त्यांसाठी कार्यशाळा शिबिरांचे आयोजन करणे, धाडसी निडर व बुद्धिमान कार्यकर्ते तयार करणे हीच रुग्ण हक्क परिषदेची ओळख आहे.

११) रुग्ण हक्क परिषदेच्या वतीने महात्मा गांधी सेवा पुरस्कार आणि शिवसन्मान गौरव पुरस्कार दरवर्षी समारंभ पूर्वक प्रदान करण्यात येतात. दरवर्षी जागतिक डॉक्टर दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाण दिनी विक्रमी रक्तदान कार्यक्रमाचे गेली १० वर्ष सातत्याने आयोजन केले जाते.

१२) रुग्ण हक्क परिषद ही संघटना जनमानसात प्रभावीरीत्या प्रसिद्ध झाल्यानंतर, रुग्ण हक्क परिषदेला जनाधार मिळण्यास सुरुवात झाल्यानंतर अनेकांनी 'रुग्णहक्क' हे दोन शब्द वापरून वेगवेगळ्या संघटना व संस्था निर्माण करण्याचे तसेच रुग्ण हक्क परिषदेच्या कार्यप्रणालीची चोरी करण्याचे प्रताप केले, तथापि त्यांना कोणत्याही प्रकारचे यश आले नाही. रुग्ण हक्क परिषद हीच संघटना सर्वप्रथम निर्मित झालेली डॉक्टरांचे संरक्षण व रुग्णांच्या हिताची शिखर संघटना आहे, याबद्दल समस्त जनतेला जाहीर आहे.

*- अधिक माहितीसाठी -*
रुग्ण हक्क परिषद केंद्रीय कार्यालय, १३६, दुसरा मजला, माती गणपती जवळ, सिताफळ बाग कॉलनी, नारायण पेठ, पुणे - ४११०३०

*फोन नं -*
8956185700/01/2/3

12/07/2024

अधिकाऱ्यांची मजा आणि रुग्णांना सजा; भ्रष्ट आरोग्य अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी रुग्ण हक्क परिषदेचे ढोल बजाव आंदोलन

पुणे - रुग्णांच्या हक्काच्यासाठी, भ्रष्टाचार करणाऱ्या लाचखोर आरोग्य अधिकाऱ्यांच्या विरोधात झोपलेल्या पुणे मनपा आयुक्तांना जागे करण्यासाठी रुग्ण हक्क परिषद पुणे शहर कमिटीच्या वतीने आज जोरदार ढोल बजाव आंदोलन करण्यात आले. पुणे महानगरपालिकेची अखंड बारा वर्षे रुग्णांना दिलासा देणारी शहरी गरीब योजना खिळखिळी करणाऱ्या आणि शहरी गरीब योजनेची बिले मंजूर करून घेण्यासाठी कोट्यावधी रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या भ्रष्ट सहाय्यक आरोग्य अधिकाऱ्यांच्या विरोधात आज रुग्ण हक्क परिषद आणि आंदोलनात सहभागी पक्ष संघटनांच्या वतीने जोरदार ढोल बाजाओ आंदोलन करण्यात आले.
पुणे मनपा समोर जोरदार ढोल बजाव आंदोलनाचे नेतृत्व रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी केले. यावेळी भीमछावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्याम गायकवाड, निलेश गायकवाड, लोक जनशक्ती पार्टीचे शहराध्यक्ष संजय अल्हाट, रुग्ण हक्क परिषदेच्या पुणे शहराध्यक्ष अपर्णा मारणे साठ्ये, दलित पॅंथरचे पुणे शहराध्यक्ष राहुल गायकवाड, घनश्याम मारणे, सामाजिक कार्यकर्ते रेश्मा जांभळे, कविता डाडर, प्रभा अवलेलू, अरुणा हरपळे, अनिल गायकवाड, भीमराज फडके, नीलम गायकवाड, युवक क्रांती दलाचे सुदर्शन चखाले, रोहन गायकवाड, आशिष गांधी, विकास साठे, गायक अशोक गायकवाड, के. सी. पवार, फारूक तांबोळी, हालीमा शेख, दिलीप ओव्हाळ आदींनी पुणे महानगरपालिकेच्या शहरी गरीब योजनेच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात ढोल वाजवत जोरदार आंदोलन केले.
यावेळी रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण म्हणाले की, गेली दहा वर्षे शहरी गरीब योजनेचे एक लाख रुपये डिस्चार्जच्या दिवशी सुद्धा रुग्णाला मिळायचे, मात्र आता रुग्ण ज्या दिवशी ऍडमिट असेल त्या दिवशीच कार्ड काढले असेल तरच लाभ मिळतो यामुळे अनेक रुग्णांना आर्थिक त्रासातून कर्जबाजारी व्हावे लागत आहे.
यावेळी पुणे महानगरपालिकेचे आरोग्य विभागाच्या सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. मनीषा विनोद नाईक यांच्या भ्रष्टाचारी कार्यपद्धती विरोधात अनेकांनी ताशेरे ओढले. डॉ. मनीषा नाईक यांची काळ्या पैशांची वसुली करणारे लिपिक मनोज पानसे आणि आरोग्य विभागातील शिपाई बाबा इनामदार डॉ. मनीषा नाईक यांच्यासाठी मोठ्या पंचतारांकित हॉस्पिटल कडून शहरी गरीब योजनेची बिले मंजूर करून घेण्यासाठी कोट्यावधी रुपयांची लाच वर्षभर गोळा करतात, त्यांचे निलंबन करून चौकशीची मागणी देखील यावेळी करण्यात आली.
भीमछावा संघटनेचे अध्यक्ष श्याम गायकवाड आणि लोक जनशक्ती पार्टीचे संजय अल्हाट यांनी रुग्णांच्या हक्काची सनद आणि बॉम्बे नर्सिंग होम ऍक्टचे उल्लंघन केले जात असल्याचा गंभीर आरोप केला तर हॉस्पिटलला परवानगी देण्यासाठी, हॉटेल, लॉज आणि फाईव्ह स्टार- सेव्हन स्टार हॉटेलला परवानगी देण्यासाठी आणि बांधकाम पूर्ण झालेल्या इमारतीला आरोग्य विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी लाखो रुपयांची लाख सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. मनीषा विनोद नाईक त्यांच्या हस्तका मार्फत घेतात, असा गंभीर आरोप देखील आंदोलनकर्त्यांनी यावेळी केला.
रुग्ण हक्क परिषदेच्या वतीने झालेल्या जोरदार ढोल बजाव आंदोलनामुळे पुणे महानगरपालिका परिसरामध्ये आरोग्य विभागात चालणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई तात्काळ केली जावी, असे देखील मत अनेकांनी व्यक्त केले.

#रुग्णहक्क

Address

Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when Umesh Chavhan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Umesh Chavhan:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram