Life surgical and maternity home wadibhokar road

  • Home
  • Life surgical and maternity home wadibhokar road

Life surgical and maternity home wadibhokar road Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Life surgical and maternity home wadibhokar road, Hospital, .

30/05/2025
28/02/2025

*"सातत्य आणि उत्कृष्टतेचा मंत्र"*

सर्वोत्तमता ही अशी गोष्ट आहे की जी आपल्याला इतरांपासून वेगळे स्थान देऊ शकते. सुप्रसिद्ध विनोदी कलाकार स्टीव्ह मार्टिन यांनी एक अत्यंत प्रेरणादायी सल्ला दिला: "Be so good they can’t ignore you." म्हणजेच, इतके उत्कृष्ट व्हा की लोक तुम्हाला दुर्लक्षित करू शकणार नाहीत. या विचारातच मोठे तत्वज्ञान आहे—स्वतःला इतके सक्षम आणि सिद्ध करा की जग तुम्हाला ओळखण्यास भाग पडेल.
संस्कृत सुभाषितांमध्येही हा विचार प्राचीन काळापासून सांगितला गेला आहे: "उद्यमेन हि सिद्ध्यन्ति कार्याणि न मनोरथैः। न हि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगाः॥" महत्त्वाची कार्ये केवळ इच्छेने सफल होत नाहीत, त्यासाठी परिश्रम आवश्यक आहेत. झोपलेल्या सिंहाच्या तोंडात हरण आपोआप येत नाही. हा संदेश आपल्याला सांगतो की कठोर मेहनत आणि सातत्यपूर्ण प्रयत्न केल्याशिवाय यश मिळत नाही.
"Excellence is not an act, but a habit." असे अरिस्टॉटल म्हणतात. म्हणजेच, चांगुलपणा, कौशल्य आणि प्राविण्य हे एकदाच साध्य करून थांबण्याचे नसून, ती एक सवय असली पाहिजे. प्रत्येक दिवशी स्वतःला अधिक चांगले बनविण्यासाठी केलेली धडपडच आपल्याला अतुलनीय यश देऊ शकते.
कधी कधी मोठे प्रयत्न करूनही त्वरित यश मिळत नाही. निराशा येऊ शकते, पण सातत्य हीच यशाची गुरुकिल्ली आहे. "The difference between ordinary and extraordinary is that little extra." हा विचार हेच सांगतो की सामान्यतेवर मात करून असामान्य होण्यासाठी थोडेसे अधिक कष्ट घ्यावे लागतात.
संस्कृतमध्ये याचे सुंदर वर्णन असे केले आहे: "नहि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगाः।" झोपलेल्या सिंहाच्या तोंडात हरण कधीच येत नाही. याचा अर्थ असा की आपण काही मिळवायचे असल्यास कृती करावी लागेल. याच विचाराशी साधर्म्य साधणारा आणखी एक इंग्रजी कोट आहे: "Success is not final, failure is not fatal: it is the courage to continue that counts." म्हणजेच, यश किंवा अपयश हे अंतिम नाही, तर सातत्य आणि धैर्य महत्त्वाचे आहे.
यश म्हणजे एका रात्रीत मिळणारी जादू नसते. तो एक सातत्यपूर्ण प्रवास असतो. स्टीव्ह मार्टिन म्हणतात तसंच, तुम्ही इतके उत्कृष्ट बना की लोक तुम्हाला दुर्लक्षित करू शकणार नाहीत. त्यासाठी तुम्हाला दररोज स्वतःला विकसित करावे लागेल. "Be like a stonecutter, steadily chipping away, day after day." हाच विचार सांगतो की नियमित प्रयत्नांमधूनच महानता साध्य होते.
आणखी एक सुंदर संस्कृत सुभाषित याला पूरक आहे: "अल्पस्य हेतोः बहु हन्ति लोभो हन्ति श्रियं शीलमथापि साधून्। लोभस्य पापस्य च कारणं हि विनाशकाले विपरीतबुद्धिः॥" स्वतःच्या अल्प फायद्यासाठी जर कोणी अनावश्यक लोभ करतो, तर त्याचे मोठे नुकसान होते. त्यामुळे सातत्य आणि संयम यावर भर द्यावा.
अशा प्रकारे, सातत्य, धैर्य, आणि उत्कृष्टतेची आस हीच आपल्याला जीवनात अविस्मरणीय बनवू शकते. त्यामुळे, यशाचा पाठलाग करू नका—इतके उत्कृष्ट बना की यश स्वतः तुमच्याकडे चालत येईल!

10/10/2024

पन्नास पेक्षा जास्त वयाची नैराश्याने (डिप्रेशनने) ग्रासलेली एक व्यक्ती होती. त्यांची पत्नी त्यांना घेऊन एका मनोचिकित्सकाकडे (सायकॕट्रीस्ट) गेली.
पत्नी म्हणाली :- "हे खूपच निराशाग्रस्त आहेत. यांच्या नैराश्यामुळे घरातील वातावरण बिघडले आहे."
मनोचिकीत्सकाने त्यांना तपासले. त्यात त्यांना सर्व काही ठीक दिसले. आता त्यांनी बोलायला सुरुवात केली. काही खाजगी प्रश्नही विचारले आणि त्यांच्या पत्नीला बाहेर बसायला सांगितले.
त्या व्यक्तीला बोलते केले...
"खूप त्रासात आहे...
काळजीच्या ओझ्याने दबला गेलोय... नोकरीचा ताण... मुलांच्या शिक्षण आणि त्यांना नोकरी मिळेल की नाही याची काळजी.. घरासाठी घेतलेले कर्ज, गाडीसाठी घेतलेले कर्ज...कशातच मन लागत नाही...लोक मला खूपच यशस्वी व्यक्ती समजतात... पण खरंतर माझ्याकडे काहीच नाही....मी खूपच निराश आहे..." वगैरे म्हणत संपूर्ण जीवनाचे पुस्तकच उलगडून सांगितले.
मग त्या विद्वान चिकित्सकाने काही विचार केला आणि विचारले, "दहावीला असताना कोणत्या शाळेत शिकत होतात ?"
त्या व्यक्तीने शाळेचे नाव सांगितले.
चिकित्सक म्हणाले:-
"तुम्हाला त्या शाळेत जावे लागेल. तेथून तुमच्या दहावीच्या वर्गाची नोंदवही (रजिस्टर) घेऊन या, आपल्या मित्रांची नावे बघा आणि त्यांना शोधून त्यांच्या आजच्या स्थितीची माहिती मिळवायचा प्रयत्न करा. सर्व माहिती एका वहीत लिहून काढा व एका महिन्याने ती माहिती घेऊन मला येऊन भेटा."
ती व्यक्ती आपल्या जुन्या शाळेत गेली, खुप विनंत्या करुन नोंदवही (रजिस्टर) शोधली व त्याची प्रत बनवून आणली. त्यात एकशेवीस नावे होती. महिनाभर दिवस-रात्र प्रयत्न केले तरीही मोठ्या मुश्किलीने आपल्या पंचाहत्तर ते ऐंशी वर्गमित्रांच्या विषयीच माहिती जमा करु शकले.
त्यांना मोठे आश्चर्य वाटले....
त्यातील पंधरा मित्रांचा मृत्यू झालेला होता... सात मित्र/मैत्रीणी विधवा/विधुर आणि दहा घटस्फोटीत होते... बारा जण नशेच्या अधिन झाले होते, जे बोलण्याच्या लायकीचेही नव्हते. काहींचा तर ठावठिकाणाही माहित होत नव्हता.... पाच तर इतके गरीब होते की विचारता सोय नाही... सहा इतके श्रीमंत निघाले की विश्वासच बसत नव्हता.
काही कॅन्सरने पिडीत होते, काहींना अर्धांगवायू झाला होता, कुणाला साखरेचा, कुणाला दमा तर कुणी हृदयविकाराच्या आजाराने त्रस्त होते.
एक दोघांचा अपघात होऊन हात/पाय किंवा मणक्याचे हाड मोडून अंथरुणावर पडून होते.... काहींची मुलं वेडी,व्यसनी, रिकामटेकडी,कामातून गेलेली निघाली... एक कारागृहात कैदेत होता....
एक पन्नास वय झाल्यावर स्थिरस्थावर झाला होता म्हणून आता विवाहबद्ध होण्याच्या विचारात होता तर एक अजूनही स्थिरावू शकला नव्हता दोन घटस्फोट होऊन तिसरे लग्न करायच्या बेतात होता....

महिन्याभरात दहावी इयत्तेची नोंदवही (रजिस्टर) भाग्याची व्यथा स्वतः ऐकवत होती...

चिकित्सकाने विचारले :- "आता सांगा, तुम्हाला नैराश्य (डिप्रेशन) कसलं आलं आहे?"

या व्यक्ती च्या लक्षात आले की 'त्याला कुठला आजार नाही, त्याची आर्थिक स्थिती चांगली आहे, तो भुकेने मरत नाही, मेंदू अगदी ठणठणीत आहे, कोर्ट पोलिस स्टेशनशी कधीही संबंध आला नाही, त्याची पत्नी-मुलं खूप चांगले आहेत, स्वस्थ आहेत, तोही स्वस्थ आहे, डाॅक्टर दवाखान्याची कधी गरज पडली नाही, मुलांची त्यांच्या करिअरच्या दृष्टीने प्रगतीही चांगली आहे'

त्याला असे जाणवले की जगात खरंच खूप दुःख आहे आणि मी खूप सुखी आणि भाग्यवान आहे, तेव्हा नैराश्य येण्यापासून दूर रहाण्यासाठी-
*दुसऱ्याच्या ताटात ढुंकून पहाण्याची सवय सोडून आपल्या ताटातील भोजन प्रेमाने ग्रहण करावे.*
*तुलनात्मक विचार करु नये,सर्वांची वेळ व नशिब वेगवेगळे असते*
आणि अजून एक गोष्ट.... *सांगितलेल्या* *-ऐकलेल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करावे..*

*वाचण्यात आलेला सुंदर लेख*

नक्की संग्रही ठेवावे

मानवी जीवन हे अमृत आहे .
त्याचा स्वीकार करा प्रेमाने स्वीकार करा
😊😊🌹🌹😊😊

29/09/2024

Cp
*दहावी नंतर शाळा सोडलेल्या मराठी मुलानं दोन हजार कोटींची आयटी कंपनी उभी केली*

Story of Quick Heal Antivirus's Birth

नाव कैलास काटकर. गाव मूळच सातारा जिल्ह्यातलं रहिमतपूर. राहायला पुण्याच्या शिवाजीनगर मधल्या नरवीर तानाजीवाडी मध्ये. वडील फिलिप्स कंपनीमध्ये हेल्पर, आई घरकाम करणारी. एक लहान भाऊ आणि एक बहिण. असं हे पाच जणांचं कुटुंब नतावाडीतल्या एका छोट्याशा खोलीत राहायचं.

कैलाश सगळ्यात थोरला. त्यामुळे सगळ्यांच्या अपेक्षा त्याच्याकडूनच. पुस्तकं घ्यायला पैसे नाहीत, फी भरायला पैसे नाहीत. कसबस रडत खडत दहावी पर्यंत पोहचला. पण दहावीनंतर पुस्तकी शिक्षणाला रामराम ठोकला आणि खऱ्या शिक्षणाला सुरवात केली. आयुष्य शिकवत असलेलं व्यावहारिक शिक्षण.

तसं कैलासला लहानपणापासूनच घरातल्या बिघडलेल्या वस्तू सोबत खटपट करायची आवड होती. वडिलांचं बघून बघून सहावीमध्ये असतानाच रेडियो दुरुस्त करायला सुरवात केली होती. त्याबद्दलचा एक महिन्याचा कोर्ससुद्धा केला होता.काही तरी करू असा आत्मविश्वास होता. दहावीच्या निकालाची वाट न बघता नोकरी शोधायला सुरवात केली.

एक दिवस त्याला पेपर मध्ये एक जाहिरात दिसली, एका कंपनीमध्ये कॅलक्युलेटर दुरुस्त करणाऱ्याची आवश्यकता होती. कैलासने आयुष्यात कधी कॅलक्युलेटर बघितलासुद्धा नव्हता. त्याने तरी अप्लाय केले. नशिबाने मुलाखतीसाठी आलेल्या पंचवीस जणांमधून त्याची निवड झाली. अंगभूत खटपटेपणा कामी आला. त्या कंपनीत कॅलक्युलेटर दुरुस्तीचं काम तर शिकलाच, शिवाय बँकांमधल लेजर पोस्टिंग मशीन, फसेट मशिन अशा वेगवेगळ्या मशिनरी दुरुस्त करायला यायला लागल्या.

किती जरी झालं तर खटपट्या माणूस नोकरीत किती दिवस शांत बसेल?

नोकरी सोडली आणि मंगळवार पेठेत स्वतःचा दुरूस्तीच दुकानं सुरु केलं. सोबत एक हरकाम्या मुलगा सुद्धा ठेवला. त्यांची दिवसभर वेगवेगळ्या मशीन सोबत झटापट चालायची. पैसे बऱ्यापैकी मिळू लागले. एक दिवस कैलासला एका बँकेत एक नवीनच मशीन दिसलं. त्याने चौकशी केली, कोणी तरी सांगितलं,

” याला कॉम्प्युटर म्हणतात. आता येणार युग कॉम्प्यूटरचं असणार आहे.”

कैलाश विचारात पडला. येणार युग जर कॉम्प्युटरचं आहे तर आपल्याला शिकून घेतलं पाहिजे. पण शिकायचं कुठे हा सुद्धा प्रश्न होता.

नव्वदच्या दशकातला तो काळ. कॉम्प्यूटरने नुकताच भारतात चंचू प्रवेश केला होता. त्याच्या येण्यान आपल्या नोकऱ्या जातील म्हणून डाव्या-उजव्या संघटना एकत्र लढा देत होत्या. कॉम्प्यूटर प्रचंड महाग होते आणि फक्त मोठ्या ऑर्गनायझेशनमध्येचं दिसायचे. कैलाशला कोणी कॉम्प्यूटरच्या जवळ देखील येऊ देत नव्हत.

एकदा चान्स मिळाला. पुण्यात फर्ग्युसन कॉलेज रोडवर टाईम्स ऑफ इंडियाचं ऑफिस आहे. त्यांचे तीन प्रिंटर बंद पडले होते. दुरुस्तीला आलेल्यांनी सांगितलं ते फेकुनच द्यायच्या लायकीचे उरले आहेत. ऑफिसवाल्यांनी तशीच तयारी केली होती. पण योगायोगाने कैलाश तिथे आले होते. त्यांनी पैजेवर ते मशीन दीड तासात दुरुस्त करून दाखवले.

टाईम्स ऑफ इंडियानं फक्त प्रिंटरचं नाही तर कैलाशच्या हातात आपले कॉम्प्यूटरसुद्धा देऊन टाकले. दोन वर्षाचा दुरुस्तीचा करार केला. कैलाशच्या आयुष्यातला तो टर्निंग पॉइंट ठरला. टाईम्स ऑफ इंडियाच बघून बाकीच्या कंपन्या, बँकादेखील त्यांना काम देऊ लागल्या. पुण्यात कॉम्प्यूटर हार्डवेअर दुरुस्तीमध्ये कैलाश काटकर हे नाव प्रसिद्ध झालं.

स्वतःच शिक्षण अर्धवट सुटल पण कैलाश यांनी आपल्या भावाबहिणीच्या शिक्षणाच्या बाबतीत कोणतीच तडजोड केली नाही. धाकटा भाऊ संजयसुद्धा हुशार होता. त्याला त्यांनी मॉडर्न कॉलेजमध्ये कॉम्प्यूटर इंजिनियरिंगला प्रवेश घ्यायला लावला. तो देखील दिवसभर कॉलेजकरून संध्याकाळी भावाच्या कामात मदत करत होता.

त्याकाळी व्हायरस हे प्रकरण नव्यानेचं उदयास आले होते. साथीच्या रोगाने जसे माणसे आजारी पडतात त्याप्रमाणेच कॉम्प्यूटरदेखील एखाद्या विशिष्ट प्रोग्रॅमचा प्रादुर्भाव झाला तर आजारी पडतात. मग ते आजारी पडू नयेत यासाठी असत रोगप्रतिबंधकारक औषध यालाच म्हणतात अँटी व्हायरस.

या व्हायरसच्या साथीची लागण झालेले बरेच कॉम्प्यूटर पुण्यात दुरुस्तीला कैलाश यांच्याच दुकानांत यायचे. लोक सांगायचे की तुम्हीच याला दुरुस्त करा. पण हा विषय होता सॉफ्टवेअरचा. हार्डवेअर वाले त्यात करणार. काहीतरी करून कैलाश ते कॉम्प्यूटर सुरु करून द्यायचे.त्यांच्या धाकट्या भावाने संजयने सारख्या सारख्या लागण होणाऱ्या व्हायरसवर उपाय म्हणून एक टूल बनवले होते. जे त्यांच्या कस्टमरला खूप आवडले.

त्याच वेळी कैलास काटकर यांच्या बिझनेस माइंडमध्ये आयडिया आली की हा अँटी व्हायरसचा धंदा बराच पैसा कमावणार. त्यांनी भावाला एक स्पेशल कॉम्प्यूटर घेऊन दिला. नतावाडीमधल्या त्या वस्तीतल्या एका खोलीच्या घरात संजय काटकर अँटी व्हायरस बनवायच्या मागे लागला. दीड वर्षे लागली पण मराठी माणसाच स्वतःचं अँटी व्हायरस तयार झालं. त्याला नाव देण्यात आलं

*क्विक हील.*

*साल होत १९९५.*

संजयनी स्वतःच या अँटी व्हायरसचा लोगो डिझाईन केला,पकेजिंग तयार केलं. कैलास काटकर कंपन्याच्या दारोदारी फिरून आपल प्रोडक्ट खपवू लागले. कॉम्प्यूटरमधल्या डाटाची नासाडी करणाऱ्या व्हायरसवर उतारा असलेला अँटी व्हायरस असण किती गरजेचे आहे हे पटवून संगे पर्यंत त्यांना नाकीनऊ यायचे पण त्यांनी जिद्द सोडली नाही.

त्याकाळात पुण्यात बऱ्याच आयटी कंपन्या सुरु होत होत्या. आयटीपार्क उभं राहत होत. अशा सगळ्या नव्या जुन्या कंपन्यांना परदेशी अँटी व्हायरस पेक्षा चांगलं आणि स्वस्त असलेलं हे देशी अँटी व्हायरस पसंतीस पडलं. क्विक हिल अँटी व्हायरस बरोबर अनेक कंपन्यांनी वर्षाचे करार केले.

अजून मोबाईल फोन देखिल आले नव्हते अशा काळात आफ्टर सर्विसला देखील भरपूर महत्व होतं. कैलाश काटकर यांनी मेहनतीने आपले ग्राहक सांभाळले. पुण्याबरोबर नाशिक, मुंबई येथे देखील आपली टीम उभी केली. वेगवेगळ्या शहरात जाण्याचाही त्यांना फायदा झाला. क्वालिटीच्या जीवावर स्पर्धेच्याकाळातही क्विकहिल मोठी झाली. *मंगळवर पेठेत असणाऱ्या ऑफिसमधून कधी एक लाख स्क्वेअर फुट च्या ऑफिसमध्ये रुपांतर झाले कळले देखील नाही.*

*आज क्विकहिल हे भारतीय आहे, पुण्यात तयार झालंय यावर कोण विश्वास ठेवणार नाही.*

तिथ तेराशेच्या वर कर्मचारी काम करतात. फक्त भारतातच नव्हे तर परदेशातही त्यांचे ऑफिसेस उघडलेले आहेत. आज ऐंशीहून अधिक देशातल्या कॉम्प्यूटरमध्ये हे देशी अँटी व्हायरस बसवेल दिसेल. *आणि हे सगळ साम्राज्य उभ केलंय एका दहावीनंतर शाळा सोडलेल्या मराठी मुलान.*

*👉विशेष माहिती :* हा उद्योजक मराठी माध्यमातून शिकला होता. हे आजकालच्या पालकांनी लक्षात घ्यावे.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏C/P

20/09/2024

मोसाद ही गुप्तचर संस्था आणी त्याची कार्यपद्धती ही जेम्स बाँडच्या चित्रपटाला लाजवेल अशी आहे असं म्हणलं तर अतिशयोक्ती ठरू नाही . “ऑपरेशन बिलो द बेल्ट “ हे युद्ध शास्त्रात शतकानूशतकं लक्षात राहील असं ऑपरेशन काल मोसादनी पार पाडलं आणी हिजबोल्लाच्या दहशतवाद्यांवर शब्दशः कमरेखाली घाव घातला .

लेबनान आणी सीरीयामधे काल जे पेजरचे स्फोट झाले ते इस्रायलनी केले हे इस्रायल कधीच मान्य करणार नाही . परंतू हे करण्याची क्षमता जगात फार कमी संस्था आणी देशांकडे आहे . इस्रायल आणी खासकरून मोसाद ही नक्कीच त्यातली एक संस्था आहे.

मराठी माध्यमातून ह्याबद्दल आजदेखील थातूर मातूर बातम्या येत आहेत. नक्की हे स्फोट कसे झाले हे देखील कोणी ठामपणे सांगू शकत नसलं तरी विश्वसनीय वृत्तसंस्थांमधली माहीती संकलीत करून तुमच्यासमोर मांडतो आहे.

पण त्या आधी पेजर म्हणजे काय या बद्दल थोडंसं. पेजर हे खालील फोटोत आहेत तसं छोट साधन असतं . ह्याला छोटा डिस्प्ले असतो आणी त्यावर मेसेज फक्त येतो . ज्या व्यक्तीला तुम्हाला मेसेज पाठवायचा आहे ती व्यक्ती कॉल सेंटरला फोन करून मेसेज देते आणी सर्विस प्रोव्हायडर तो मेसेज तुमच्या पेजरवर पाठवतो.

भारतात साधारण १९९९ पर्यंत पेजर बर्‍यापैकी वापरले जात होते . पण मोबाईल साठी मोठी बाजारपेठ असल्यामुळे भारतात मोबाईल सेवेत झपाट्यानी सुधारणा झाली त्यामुळेच कित्येक जणांनी साध्या फोनवरून थेट मोबाईल कडे ऊडी मारली , मधला पेजरचा टप्पा न घेता. याला “लिपफ्रॉग “ असा शब्द आहे . म्हणजेच बेडूकऊडी मारून प्रगतीचा एक टप्पा पुर्णतः टाळून अथवा अत्यंत कमी काळात पार पाडून पुढच्या टप्प्यावर जाणे.
अमेरीकेला सेवा चालू झाल्यापासून बहुतांश लोकाकंडे मोबाईल सेवा पोचवायला जवळपास एक दशक लागलं . भारतात मात्र हे निम्म्याहून कमी काळात झालं . मी स्वतः पेजर वापरला आहे . माझ्या आठवणी प्रमाणे त्याचा नंबर ९६२४ २५५८६८ होता.

आता लेबनान सीरीया मधे काय झालं ते बघूया. स्मार्टफोन हॅक होऊ शकतात किंवा ट्रेस केले जाऊ शकतात म्हणून हिजबोल्ला ह्या दहशतवादी संघटनेनी मोबाईल न वापरता पेजर वापरायचा निर्णय घेतला. हे पेजर गोल्ड अपोलो नावाच्या तैवानी कंपनीचे होते .

पेजरला ट्रिपल ए प्रकारच्या बॅटरीज लागतात. जगात सत्तावन्न ईस्लामीक देश आहेत पण त्यातला एकही देश ट्रिपल ए बॅटरीज बनवत नाही .इराण आणी पाकिस्तान अणू बाँब बनवू शकतात पण बॅटरीज नाही . ह्यांना सगळ्या जगावर राज्य करायचं आहे पण बॅटरीज बनवणं काही जमलं नाही अजून .

गोवा क्रॉनीकल ह्या संस्थेच्या सॅव्हियो रोडरीग्स यांच्या म्हणण्यानुसार हिजबोल्लानी ह्या बॅटरीज “बी अँड एच फोटोज “ नावाच्या कंपनीच्या ऑनलाईन स्टोअर वरून खरेदी केल्या. इथे आता मोसादचा प्रवेश होतो . “बी अँड एच फोटोज “ ही कंपनी त्यांची पार्सल “डि एच एल “ मार्फत पाठवते . मोसादनी हे पार्सल मधल्या मधे लंपास करून त्या बॅटरीज मधे स्फोटकं व त्या स्फोटकांना ट्रिगर करणारी चीप बसवली. हे स्फोटक किस्का ३ होतं असं गोवा क्रॉनीकल म्हणतं . काही वृत्त वाहिन्यांवर “पि ई टि एन “ नावाचं स्फोटक होतं असं म्हणतात . एका विशिष्ट वेळेला सर्व पेजरला एकच मेसेज केला गेला आणी एकाचवेळी अंदाजे तीन हजार पेपर्सचा स्फोट झाला. पेजर हा सहसा कमरेच्या पट्ट्यावर लावला जातो अथवा ट्राऊसरच्या खिशात ठेवला जातो . स्वाभाविकच स्फोट झाल्यावर कोणकोणत्या अवयवांना दुखापत होईल हे वेगळं सांगायची गरज नाही.

पण खरी अडचण पुढेच आहे . गुप्तांग अथवा वृषण निकामी होणं ( अथवा इतरांकडून केलं जाणं ) हे इस्लाममधे हराम आहे म्हणजे गंभीर जखमी झालेल्यांना जन्नतचा रस्ताच बंद .( आणी तसही गुप्तांगच नसेल तर जन्नत मधे जाऊन बहात्तर हुर कशा ऊपभोगणार? ) . त्यामुळे मोसादचा हल्ला हा शरीरापेक्षा जास्त मानसीकतेवर होता.

नऊ ते दहा अतीरेकी मेले , पाचेकशे अंधळे झाले , तीन एक हजार जखमी झाले . त्यामुळे आकड्यात हा हल्ला फार घातक वाटत नसला तरी ह्या हल्ल्यानी जी भिती दहशतवाद्यांच्या मनात निर्माण केली ती जास्त महत्वाची आहे . शिवाजीमहाराजांनी लाल महालात शाईस्ताखानावर केलेल्या हल्ल्याची आठवण व्हावी अशाच प्रकारचा परीणाम ह्या हल्ल्यानी साध्य झालाय.

ईराणचा राजदूत देखील जखमी झाला आहे .ईराणचा राजदूत हिजबोल्लाचा पेजर का वापरत होता हा देखील एक रोचक प्रश्न आहे .

ह्या हल्ल्यानी हिजबोल्लाची संपर्क यंत्रणा कोसळून पडली आणी पुढचे काही दिवस तरी ती पूर्वपदावर येणार नाही.

अत्यंत कल्पक युद्ध तंत्र, काळजीपूर्वक केलेली योजना आणी त्याहून अधीक ऊत्तम अंमलबजावणी ह्या साठी “ऑपरेशन बिलो द बेल्ट “ कायम वाखाणले जाईलच.
ह्यावर “पेज एम फाॅर मर्डर “ असा चित्रपट देखील निघू शकेल.

ह्यात आपल्यासाठी देखील एक धडा आहे . ईलेक्ट्राॅनीक ऊपकरणे हा एक बाँब आहे त्यामुळे एकतर शत्रूराष्ट्राकडून अशी ऊत्पाने विकत घेणं नक्कीच धोक्याचं आहे . तसंच अशा ऊत्पादनांची पुरवठा साखळी ( सप्लाय चेन ) ही सुरक्षीत आहे ह्याची खात्री करून घेणं आवश्यक आहे . होता होईतो परीचीत व विश्वासार्ह दुकानदारांकडूनच अशा वस्तू घ्याव्यात हे चांगलं पण त्याहूनही भारतीय, किमानपक्षी भारतात ऊत्पादन झालेली ऊत्पादनं घ्यावीत. न जाणो एखाद दिवस सर्व “बि वाय डी “ कार्स अथवा विवो फोनचे असेच स्फोट झाले तर ?

माझं म्हणणं अतिरंजित वाटेलही कदाचित . “पुढच्यास ठेच मागचा शहाणा” हे धोरण धोक्याचं नक्कीच नाही .

शोधन भावे

( पोस्ट शेअर करायला परवानगीची आवश्यकता नाही .
“जे मेले ते पण कुणाचे तरी वडील होते “ ह्या प्रकारचं ज्ञान कमेंट मधे पाजळू नये . ज्ञान पाजळातचं असेल तर वेळ काढून गाझा पट्टीत जावे व तीथे ज्ञानदान करावे . हे जमत नसेल तर बलुचिस्तान, खैबर पख्तुनख्वा असे जवळचे पर्याय ऊपलब्ध आहेत.)

20/09/2024

*कपालभाती🧘‍♀️ प्राणायाम*

खरे तर ही शुद्धी क्रिया आहे.
ज्या प्राणायाम मध्ये *मस्तिष्क म्हणजेच कपाळावर आभा, तेज ,ओज प्रकाश वाढतो तो प्राणायाम म्हणजे*
कपालभाती
कपाल म्हणजे *मस्तिष्क* भाती म्हणजे *आभा ,तेज, प्रकाश.*

*कपालभाती करण्याची क्रिया*
कोणत्याही एका ध्यानात्मक आसनात बसावे जसे *पद्मासन ,सिद्धासन ,सुखासन , स्वस्तिकासन व स्थिरसुखमासनम्* [ तुमच्या शरीराच्या क्षमतेनुसार तुम्ही बसू शकता उदा.एखाद्याला जमिनीवर बसताच येत नाही तर खुर्चीवर ,पलंगावर बसूनही करता येतो.]

*प्राणायामाची विधी*
भस्त्रिका पेक्षा थोडी वेगळी आहे *भस्त्रिका मध्ये रेचक व पूरक एक समान श्वास उच्छवासवर* भर दिला जातो.

*कपालभाती मध्ये फक्त रेचक म्हणजे श्वास बाहेर सोडण्याचे काम केले जाते [ उच्छवास ]*
यामध्ये श्वास घेण्याचा प्रयत्न केला जात नाही.
*शरीराला आवश्यक तेवढा ऑक्सिजन आत जातो.*
पोटाचे स्वाभाविक आकुंचन-प्रसरण होत असते
श्वास बाहेर सोडणे यावरच पूर्ण भर असतो.
*कपालभाती करत असताना शक्यतो आपले लक्ष मणिपूर चक्र [ नाभीच्या जवळपास ] केंद्रित करणे आवश्यक आहे.*

कपालभाती करत असताना *शिवसंकल्प*
कपालभाती करत असताना मनात असा विचार करायला हवा की *जसा मी श्वास बाहेर सोडतो आहे त्याबरोबर शरीरातील समस्त रोग , विकार बाहेर निघत आहेत नष्ट होत आहेत.*

ज्यांना
जे शारीरिक रोग असतील ते दोष,विकार काम ,क्रोध ,लोभ ,मोह ,
इर्षा राग व द्वेष आदीना मी बाहेर सोडत आहे अशी भावना करायला पाहिजे.

*कपालभाती करण्याचा कालावधी*
तीन मिनिटात पासून सुरु करून पंधरा मिनिटात पर्यंत. आपल्या क्षमतेनुसार एक एक तासही करू शकता.

*कोणी करू नये*
*1)* गरोदर माता भगिनींनी मासिक धर्मात किंवा ऋतुचक्रात करू नये.

*2)* हृदय रोग अँजियोग्राफी,अँजिओप्लास्टी किंवा बायपास सर्जरी ऑपरेशन झालेले असेल तर त्यांनी वैद्याचा सल्ला घ्यावा.
/ असे लोक मंद ,मध्यम गतीने करू शकतात.

*कपालभाती मुळे होणारे लाभ*
*1)* मस्तिष्क व मुखावर तेज ओज आभा व सौंदर्य वाढते.
समस्त कफ रोग ,अस्थमा , श्वास, ॲलर्जी, सायनस आदी रोग नष्ट होतात.

*2)* हृदय फुफ्फुसे ,मेंदूचे समस्त रोग बरे होतात.

*3)* लठ्ठपणा, मधुमेह , गॅस, मलावरोध, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी संबंधित सर्वरोग निश्चितपणे दूर होतात.

*4)* मधुमेह औषधाशिवाय बरा होतो.
वाढलेले वजन एका महिन्यात चार ते पाच किलो कमी होते.

*5)* हृदयाच्या धमणीत आलेले अडथळे किंवा ब्लॉकेज दूर होतात.
मन स्थिर शांत आनंदी होते.

*6)* नकारात्मक विचार नष्ट होऊन सकारात्मक विचार प्रदान होतात.

*7)* आमाशय, यकृत स्वादुपिंड, आतडी, किडनीचे आरोग्य सुधारते.

*8)* पोटासाठी पुष्कळ आसणे करून जो फायदा होत नाही. ते ह्यामुळे सगळ्या आसनांचा लाभ मिळतो.

*9)* अशक्त आतड्यांना बळकटी मिळते.

पतंजली योग समिती कंधार
*करा योग 🧘‍♀️राहा निरोग*
🙏🌹🧘‍♀️🧘‍♂️😷🇮🇳

21/07/2024

*उद्योग रत्न मा.रतनजी टाटांनी (आता वय 94 वर्ष) लंडन मध्ये दिलेल्या व्याख्यानातील सुंदर ओळी!*
✍🏻1. श्रीमंत होण्यासाठी तुमच्या मुलांना शिकवू नका तर त्यांना आनंदी राहण्यासाठी शिकवा ज्यामुळे मोठ झाल्यावर त्यांना वस्तूंचं महत्त्व आणि मूल्य कळेल किंमत नाही.
2. 🌷तुमचं जेवण तुम्ही तुमचं औषध समजून घ्या नाहीतर औषधच तुम्हाला जेवण म्हणून घ्यावं लागेल.
3. 🌷जी व्यक्ती तुमच्यावर प्रेम करते ती तुम्हाला कधीही सोडून जाणार नाही कारण तुम्हाला सोडून जाण्याची शंभर जरी कारणं असली तरीही त्या व्यक्तीला एकच कारण असं सापडेल की ज्यामुळे ती व्यक्ती तुम्हाला सोडून जाणार नाही.
4. 🌷मानव असणं आणि मानवता असणं या मध्ये खूप फरक आहे.
5. 🌷ज्या वेळी तुमचा जन्म होतो त्यावेळी तुमच्या वर प्रेम केलं जातं आणि ज्यावेळी तुम्ही मृत व्हाल त्या वेळी ही तुमच्या वर प्रेम केलं जाईल. मधील काळात तुम्हाला असच चालवून घ्यावं लागेल.
6. 🌷तुम्हाला वेगात चालायच असेल तर एकटं चाला पण दूरवर चालत जावे लागणार असेल तर एकत्र चाला.
7. 🌷जगातील सर्वात चांगले सहा डॉक्टर १) सूर्यप्रकाश २) विश्रांती ३) व्यायाम ४) योग्य आहार ५) आत्मविश्वास ६) मित्र.......
आयुष्याच्या सगळ्या टप्प्यांवर यांना सांभाळा आणि आरोग्यदायी जीवन जगा.
8. 🌷जेव्हा तुम्ही चंद्र पाहता त्यावेळी तुम्ही देवाचं सौंदर्य पाहता, जेव्हा तुम्ही सूर्य पाहता त्या वेळी तुम्ही देवाचं सामर्थ्य पाहता,ज्यावेळी तुम्ही आरसा पाहता त्यावेळी तुम्ही परमेश्वराची सर्वोत्कृष्ट निर्मिती पाहता.... म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा!
आपण सगळे जण प्रवासी आहोत आपला अंतिम मुक्काम आधिच ठरलेला आहे हे जीवन ही एक सहल समजून आनंद घ्या.🙏🙏
आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे......👇👇🙏👇👇
*। मित्रांना शेअर* *करा ।*

09/07/2024

*हॉस्पिटलचं बिल कसं ठरतं.?*

- डॉ सचिन लांडगे.
भुलतज्ञ, अहमदनगर.

सध्या जळगाव मधल्या एका बँकर असलेल्या व्यक्तीची हॉस्पिटल बिलाविषयीची पोस्ट, आणि त्याला एका डॉक्टरांनी दिलेले उत्तर व्हायरल होतेय.

त्या निमित्ताने माझ्या एका जुन्या लेखातला काही अंश -

समाजात एकंच गोष्ट वेगवेगळ्या दर्जाची मिळत असते.. पैसे देऊन आपल्याला जास्त दर्जाच्या सेवा घेता येतात.. *चहा पाच रुपयाला पण मिळतो, आणि पाचशे रुपयाला पण मिळतो..! आपण आपल्या 'शौक'नुसार आणि 'खिशा'नुसार ठरवायचे की टपरीवरचा चहा प्यायचा की "ताज हॉटेल" मधला प्यायचा..*

जसं 'ताज'ला चहा पिऊन तुम्ही ओरड करू शकत नाहीत की आम्हाला लुटले म्हणून.. तसंच, ब्रीचकँडी किंवा फोर्टीस मध्ये जाऊन तुम्ही ओरड करू शकत नाही की आम्हाला लुटले म्हणून..
कुठल्याही ठिकाणी संभाव्य बिलाची साधारण पूर्वकल्पना देतात.. *तुमच्या खिशाला परवडत नसेल तर जाऊ नका.. इतकं साधं गणित आहे..!*

सरकारी हॉस्पिटलमध्ये अगदी पाच रुपयांचा केसपेपर काढला की गोरगरिबांचे कसलेही ऑपरेशन होते.. इतरही सेवाभावी संस्था आणि ट्रस्टची अनेक हॉस्पिटल अत्यल्प दरात उपचार देतात.. तिथेही आपण जाऊ शकतो..

पण लोकांना १.डॉक्टरही अनुभवी आणि बेस्ट पाहिजे असतो.. २.तो सहज आणि हवा तेंव्हा उपलब्धही पाहिजे असतो.. ३.हॉस्पिटलमध्ये एसी पासून गरम पाण्यापर्यंत आणि नर्सपासून स्वीपरपर्यंत सगळ्या सोयी अपटुडेट हव्या असतात.. ४.सगळ्या मशिनरी आणि तपासण्यांच्या सोयी एकत्र पाहिजे असतात.. ५.आणि बिल मात्र कमी पाहिजे असतं..!! नाहीतर डॉक्टर लुटारू..!! कसं जुळणार हे गणित.?

*डॉक्टरांच्या अनुभवानुसार* किंवा *उपलब्ध सोयीसुविधां नुसार* खाजगी हॉस्पिटलचे दर ही कमी अधिक होत असतात.. *त्यात अमुक कोणी लुटतो किंवा कुणी समाजसेवा करतं अशातला भाग नसतो..* ज्या डॉक्टरला जिथंपर्यंत परवडतं तेवढं कमी तो करू शकतो..

दहा बेडच्या हॉस्पिटलसाठी नियमाने अकरा सिस्टर लागतात.. (एका वेळी तीन, आणि तीन शिफ्टच्या नऊ, साप्ताहिक सुट्टी आणि रजा यासाठी अतिरिक्त दोन), पण अकरा ऐवजी तीनच सिस्टर ठेवल्या, चार ऐवजी दोनच वॉर्डबॉय ठेवले, नॉर्मस् प्रमाणे सगळ्या मशिन्स न घेता फक्त अति गरजेच्या मशिनरी घेतल्या, आणि बाकीच्या सुविधा पण जेमतेमच ठेवल्या तर पेशंट बिल खूपच कमी ठेवता येतं.. याचा अर्थ असा नसतो की जास्त बिलिंग असणारे बाकीचे हॉस्पिटल्स पेशंटला लुटतात.. तिथं सुविधा आणि मशिनरी जास्त असतील म्हणून त्यांना तितक्या कमी पैशात उपचार किंवा ऑपरेशन करणे शक्य नसेल.. हाच त्याचा अर्थ असतो.. तुमच्या पेशंटला लागो अथवा न लागो, कुठल्याही दुर्घटनेसाठीची जी बॅकअप सिस्टीम असते, ती तर ready ठेवावीच लागते ना..!!
एक उदाहरण सांगतो, Defibrillator ही जीवरक्षक मशीन काही डॉक्टरच्या आयुष्यात एकदाही लागत नाही, पण प्रत्येक हॉस्पिटलमध्ये ते ठेवणं कम्पल्सरी आहे, आणि त्याची किंमत 2 ते 6 लाख रुपये आहे!! ते रोज चार्ज-डिस्चार्ज करणं अपेक्षित असतं आणि त्याची वॉरंटी दोन वर्षे असते..
अशा कित्येक गोष्टी असतात ज्यापासून समाज अनभिज्ञ असतो.. पण त्या गोष्टी डॉक्टरांच्या खर्चात पडत असतात..

समजा, गर्भाशयाची पिशवी काढायच्या ऑपरेशनला सगळ्या सुविधा असलेल्या हॉस्पिटलला कमीतकमी वीस हजार लागत असतील उदाहरणार्थ.. पण तेच ऑपरेशन, एखाद्या अजिबात सोयी सुविधा उपलब्ध नसलेल्या, कसल्याच मशिनरी उपलब्ध नसणाऱ्या, कामगारवर्ग पण पुरेसा नसलेल्या, आणि ऑपरेशनसाठी लागणाऱ्या धाग्यांपासून ते अँटिबायोटिक पर्यंत सगळं non-branded वापरणाऱ्या एखाद्या हॉस्पिटलला तेच ऑपरेशन दहा हजारात देखील परवडते..!

आता समाज असं म्हणतो की, तिथं तर दहा हजारातच ऑपरेशन होतं, मग आमच्या इथले बाकीचे हॉस्पिटल्स किती लुटतात.!!

दोन हॉस्पिटल मधील बिलिंगच्या या तफावतीसाठी खूप गोष्टी कारणीभूत असतात.. त्याची कल्पना जनसामान्यांना येणं शक्य नाही.. मोक्याच्या ठिकाणी असलेला हॉस्पिटलचा प्लॉट, बिल्डिंग, मेंटेनन्स, वीज, पाणी, स्टाफ, सरकारी फी आणि टॅक्सेस यांपासून ते तिथल्या वैद्यकीय सुविधा, मशिनरी, आणि वापरत असलेल्या इतर गोष्टी त्यात समाविष्ट असतात.. यावर बिलिंग ठरते.. या गोष्टींची कॉस्ट कमी जास्त झाली की बिलिंगमध्ये पण तफावत दिसते.. (तरी यात डॉक्टरांची फिस आणि त्यांचा अनुभव याची कॉस्ट नाही धरली..)

म्हणून, माझ्या स्वतःच्या आईचे ऑपरेशन असेल तर मी ऑपरेशन कोणते आहे, त्यासाठी किमान कितपत सुविधा लागतात आणि डॉक्टर कोण आहे यावर हॉस्पिटल ठरवेल.. दहा हजाराकडेही जाणार नाही आणि कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये जाऊन अडीच लाखही घालणार नाही..

*हॉस्पिटल म्हणजे एक "स्मॉल स्केल इंडस्ट्री" असते..* जी चालवणं अत्यंत जिकरीचं असतं..

उदाहरणादाखल सांगतो, आमच्या इथल्या एका 50 बेडच्या अद्ययावत हॉस्पिटलचा मेंटेनन्स 26लाख महिना आहे.. पेशंट येवो अथवा न येवो, 'बेड ऍक्युपन्सी' कितीही राहो, मेंटेनन्स, बिलं, टॅक्सेस, भाडे आणि स्टाफ व ड्युटी डॉक्टरांच्या पगारापोटी महिन्याच्या तीस तारखेला 26 लाख तयार ठेवावे लागतात! त्या डॉक्टर मित्रानं मला सांगितलं, महिन्याच्या साधारण 22-26 तारखेपासून त्याचा प्रॉफिट सुरू होतो..

म्हणूनच *"मेडिकलचं सगळं तर आम्हीच आणलंय, मग तरी हॉस्पिटलचं बिल इतकं कसं झालं?"* असं म्हणणाऱ्यांना तर मला परत पहिलीपासून शाळेत पाठवावं वाटतं..
असो..
__ __

अजून एक, मला एकाने प्रश्न विचारला की, इथं हॉस्पिटलला माझे अपेंडीक्स चे ऑपरेशन झाले, मला 15000 खर्च आला, पण सरकारच्या MJPJAY योजनेत आमच्या शेजाऱ्याचे ऑपरेशन झाले, त्यात हॉस्पिटलला शासनाकडून 10,000/- च मिळतात असे ऐकलेय, मग मला पाच हजारांना लुटले का?

असं वाटणं साहजिक आहे.. पण
1. अशा योजनेत डॉक्टरनी ऑपरेशन करणे हे केवळ चालत्या गाडीत प्रवासी घेण्यासारखे आहे.. त्या ऑपरेशन च्या निमित्ताने हॉस्पिटलचे नाव ही होते आणि भविष्यात त्या पेशन्टचे इतरही ओळखीचे लोक तेथे ट्रीटमेंट ला येऊ शकतात..
2. अशा योजनांच्या ऑपरेशन च्या वेळी डॉक्टर औषधे आणि इतर साहित्य जरा कमी रेटचे वापरून (sub-standard म्हणत नाही मी) आपला "लागत खर्च" (investment cost) कमी करतात.. पण म्हणून सरसकट सगळ्यांसाठीच तसं करणं शक्य नसते..

गाडी चाललीच आहे तर एखादा प्रवासी फुकट नेणे किंवा कमी तिकिटात नेणे, हे जमू शकते.. पण सगळेच प्रवासी कमी तिकिटात नेणे जसे शक्य नसते, त्याप्रमाणेच एखादया योजनेतले ऑपरेशन्स कमीत करणे किंवा एखादे ओळखीतल्याचे किंवा गरीबाचे ऑपरेशन कमीत करणे डॉक्टरला जमते.. पण म्हणून सगळेच तसे करा म्हणत असतील तर ते शक्य नाही.. म्हणून अशा वेळी बाकीच्यांनी 'लुटले' वगैरे असं म्हणणं संयुक्तिक नाही.. एखाद्या खरेच गरीब असलेल्या पेशंटचे उपचार बरेच डॉक्टर maintenance cost च्या ही खाली, फक्त इन्व्हेस्टमेंट कॉस्ट विचारात घेऊन करत असतात, पण म्हणून सगळ्यांनाच डॉक्टरनी असं करावं असं जर समाजाचं म्हणणं असेल तर ते योग्य नाही..

*एखादा बिल कमी करायला आला आणि तो खूपच गरीब वाटला तर डॉक्टर त्याचे काही बिल कमी करतात, याचा अर्थ त्यांनी ते आधीच वाढवून लावलेले नसते.. ते त्यांच्या नफ्यातून किंवा मेंटेनन्स कॉस्ट मधून पैसे कमी करत असतात..* पण सरसकट तसं करणं शक्य नाही, आणि आधीच पेशंट्स कमी असलेल्या हॉस्पिटलना तर ते शक्यच नाही..
__ __

बहुतेक सर्व डॉक्टर रोज काहीना काही रुग्ण फ्री तपासतात, किंवा पैसे नसतील तर 'राहू दे राहू दे' म्हणतात.. मला सांगा, समाजातला कुठला अन्य व्यावसायिक किंवा व्यापारी तुमची ओळखपाळख नसताना त्यांची फीस तुम्हाला 'राहू दे, राहू दे' म्हणतो बरं..?

माझ्या पाहण्यातले कितीतरी डॉक्टर्स फक्त औषधांच्या खर्चावर ऑपरेशन करून देतात, प्रसंगी औषधे सुध्दा आपल्या जवळची मोफत वापरतात.. खूपच गरीब असलेल्या पेशंटला स्वतःचे पैसे आणि क्रेडिट वापरून पुण्यामुंबईत ट्रीटमेंटची सोय करून देणारेही बरेच आहेत..

*वैद्यकीय क्षेत्र हे असे एकमेव क्षेत्र आहे, ज्यात डॉक्टरला समाजसेवा करण्यासाठी घरदार सोडण्याची किंवा वेगळं काही करण्याची गरज नसते..*
*त्यांनी स्वतःचा व्यवसाय जरी सचोटीने केला तरी ती समाजसेवाच असते..*
__ __

अजून एक कायम गाऱ्हाणं ऐकू येतं, डॉक्टर जुन्या ठिकाणी होते तर बिल एवढं एवढं यायचं, नवीन बिल्डिंगमध्ये गेले तर लगेच त्यांनी लुटणं सुरू केलं, लगेच त्यांनी त्यांचं बिलिंग वाढवलं..
मला एक सांगा, नवीन प्लॉट किंवा बिल्डिंग डॉक्टरला कुणी भेट म्हणून दिलीय का हो? बरं बिल्डिंगचं जाऊ द्या, नविन ठिकाणी गेल्यावर त्याचं वीज बिल वाढलंय, नवीन मशिनरी घेतल्यात, सुविधा वाढविल्यात, स्टाफ वाढवलाय.. ह्या सगळ्यामुळं त्याचा मेंटेनन्स पण खूपच वाढलाय..
मग ही वाढीव मेंटेनन्स कॉस्ट त्यानं बिलिंग मधून नाही घ्यायची तर कुठून घ्यायची बरं.? काय अपेक्षा आहे लोकांची? कुठून ऍडजस्ट करावा त्यानं हा वाढीव खर्च? कुक्कुटपालन वगैरेचा जोडधंदा त्यानं हॉस्पिटलला चालू करावा की काय.!!
(इतर कुठला व्यावसायिक त्याच्या व्यवसायातील इन्व्हेस्टमेंट कॉस्ट आणि मेंटेनन्स कॉस्ट ग्राहकांकडून घेत नाही सांगा बरं!!)

लोकांच्या ह्या मानसिकतेमुळं नवीन ठिकाणी शिफ्ट झाल्यावर कितीतरी डॉक्टरांची प्रॅक्टिस कमी झालीये.. म्हणून, कितीतरी जण नवीन जागेत गेल्यावर वर्ष दोन वर्षे तरी ह्या भीतीपोटी बिलिंग वाढवत नाहीत, प्रसंगी तोटा सहन करतात..
__ __

माझे एक नातेवाईक मला म्हणाले, अरे त्या XYZ डॉक्टरनं मला तपासायला हात सुद्धा लावला नाही, माझे रिपोर्ट बघितले आणि गोळ्या लिहून दिल्या, आणि तपासणी फी शंभर रुपये घेतली..
मी त्यांना म्हणालो,
1. ह्या शंभर रुपयात त्यांच्या ओपीडीचे भाडे, किंवा बांधकाम खर्च असतो, वीज पाणी एसी आणि विविध प्रकारच्या परवानग्या, रिसेप्शनिस्टचा पगार असा इतरही खर्च त्यात असतो..
2. आणि महत्वाचं म्हणजे त्यांच्या पेनाच्या शाईत एक विशिष्ट प्रकारची माती मिसळावी लागते..

मग ते आश्चर्याने म्हणाले, कसली माती..?

मी म्हणालो- दोन मिनिटात तुम्ही सांगितलेल्या लक्षणांवरून तुमचा आजार ओळखून त्यावर तुमच्या वय वजन आणि रिपोर्टनुसार योग्य ते औषध लिहून देण्यासाठी जे शिक्षण आणि अनुभव लागतो, तो मिळविण्यासाठी त्यांनी जी आपल्या आयुष्याची माती केली आहे, ती माती मिसळावी लागते, तिची किंमत असते ती..!!
असो..
__ __

लोकांना वाटतं डॉक्टर खोऱ्याने ओढतात.. पण खोरे असण्याचे दिवस आता गेलेत.. प्रत्येक स्पेशालिटीत शंभरात दहाबारा जणच् चांगलं कमवित असतात, आणि समाजाच्या डोळ्यासमोर तेच येतात.. आणि मग जनरलाईझ्ड स्टेटमेंट होते की डॉक्टर लोक खोऱ्याने ओढतात म्हणून.. खरंतर निम्म्याहून अधिक जण हॉस्पिटलचा मेंटेनन्स आणि इन्कम याची सांगड घालायला झगडत असतात..

खरंतर महाविद्यालयीन मुलांच्या हॉस्पिटलला शैक्षणिक सहली काढायला हव्यात..
१. तिथलं कामकाज कसं चालतं, २.ट्रीटमेंट कशी असते, ३.डॉक्टर आणि स्टाफवर कसले ताण असतात, ४.तिथं मशिन्स कोणत्या कोणत्या असतात, ५.बिलिंग कसं असतं, ६.सगळी सिस्टीम कशी चालते.. हे पाहायला लावावं वाटतं.. .. आणि निबंधाचे विषय पण "डॉक्टरसोबतचा एक दिवस" , "आयसीयु ड्युटीची एक रात्र" किंवा "मी डिलिव्हरीला मदत केली तेंव्हा.." अशा प्रकारचे असायला हवेत..
तरच जनता वैद्यक साक्षर होईल..

मित्रांनो, डॉक्टरांवर विश्वास ठेवा, त्यांना समजून घ्या.. तुम्ही 'ग्राहक' बनला, तर डाॅक्टर 'दुकानदार' बनतील.. तुम्ही "माणूस" समजून डॉक्टरांशी बोला, मग डाॅक्टर अवश्य "देवमाणूस" बनतील..!!

धन्यवाद..

- डॉ सचिन लांडगे, भुलतज्ञ,
अहमदनगर.

**

05/07/2024

*आर्टिफिशिअल इंटेलिजन्स .. तिसऱ्या स्फोटाच्या उंबरठ्यावर ..*
*- अच्युत गोडबोले*

*आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता काय करू शकते, ह्याची चुणुक जगाला दिसू लागली आहे ..!!*

*ह्या तंत्रज्ञानाचे ‘गॉडफादर’ म्हणवले जाणारे डॉ. जेफ्री हिंटन ह्यांनी त्याविषयीची भीती व्यक्त केली आहे. ‘एआय’ काय आहे, ते विनाशक का होऊ शकते याविषयी ..*

👇

*"कृत्रिम बुद्धिमत्तेविषयी (एआय) मी जे काम केले, त्याबद्दल मला थोडा खेदच वाटतो" हे उद्गार आहेत ‘एआय’ तंत्रज्ञानाचे ‘गॉडफादर’ असे बिरूद लाभलेले डॉ. जेफ्री हिंटन ह्यांचे ..!!*

*गुगल मधून राजीनामा देताना, 'आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’, आणि त्या तंत्राच्या भयावह शक्यता ह्या विषयी बोलताना नोकरीमध्ये असताना मर्यादा येतील, म्हणून राजीनामा देत आहे ..!!"*

*मी ह्याला ‘तिसरा स्फोट’ म्हणतो ..!!*

*सन १८९६च्या आसपास ‘डायनामाइट’चा शोध लावणाऱ्या आल्फ्रेड नोबेलचा स्फोट पहिला ..!!*

*सन १९४५ मध्ये ‘मॅनहॅटन प्रोजेक्ट’मधील अणुबॉम्बचा शोध लावणारा ओपेनहाइमरचा स्फोट दुसरा ..!!*

*आल्फ्रेड नोबेलच्या भावाचे निधन झाल्यानंतर, आल्फ्रेडचेच निधन झाले आहे असे समजून एका वृत्तपत्राने, ‘मृत्यूच्या व्यापाऱ्याचे निधन’ अशी बातमी छापली ..!!*

*आपण मेल्यावर जग आपल्याला कसे ओळखेल, आठवेल ह्या विषयीची ‘याची देही, याची डोळा’ जाणीव झाल्यानंतर उपरती झालेल्या आल्फ्रेडने, पाप-क्षालनासाठी ‘नोबेल पारितोषिका’ची घोषणा केली ..!!*

*गंमत म्हणजे ह्याच नोबेल पारितोषिकासाठी १९४६, १९५१, १९६७ असे तीन वेळा नामांकन मिळालेल्या; परंतु पुरस्कार मिळू न शकलेल्या रॉबर्ट ओपेनहाइमरने अणुबॉम्ब बनवला. त्याचा स्फोट ‘डायनामाइट’पेक्षा कित्येक पट विध्वंसक होता. त्यानंतर त्या संशोधनाच्या विनाशक शक्तीमुळे, ओपेनहाइमरने खेद व्यक्त केला होता ..!!*

*आताचा डॉ. जेफ्री हिंटन ह्यांचा राजीनामा आणि त्यानंतरची 'खेदयुक्त काळजी' हा ‘एआय’ तंत्राच्या अजूनही अव्यक्त; पण नजीकच्या भविष्यातील महास्फोटाची जणू नांदीच ..!!*

*इतकी वर्षे ‘गूगल’मध्ये कार्यरत असूनही, त्याने आत्ताच राजीनामा देण्याची मला तीन कारणे वाटतात. पहिले म्हणजे ..*

*‘एआय’मुळे नजिकच्या काळात जवळजवळ ६० ते ८० टक्के नोकऱ्या कमी होण्याचे भाकित वर्तविले जात आहे ..!! त्यामुळे प्रचंड सामाजिक अस्थैर्य निर्माण होईल ..!!*

*दुसरे म्हणजे, अलीकडेच ‘चॅट जीपीटी’ आणि ‘लार्ज लँग्वेज मॉडेल’ने (एलएलएम) घातलेला धुमाकूळ ..!!*

*आणि ..*

*तिसरे म्हणजे, ह्या अत्यंत प्रगत ‘एआय’मुळे तयार होत असलेल्या विध्वंसक शस्त्रांची भीती ..!!*

*‘स्वार्म तंत्रज्ञान’, म्हणजे अनेक छोटे ड्रोन एकत्रित काम करतात ..!! एखाद्या व्यक्तीचे छायाचित्र दिल्यास, हे सारे छोटे ड्रोन एकत्र काम करून त्या व्यक्तीला ठार करू शकतात ..!! ह्या हल्ल्यातून बचाव होणे शक्य नाही ..!!*

*ही तिन्ही कारणे ज्या तंत्रज्ञानामुळे शक्य झाली त्यात, डॉ. हिंटन यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे ..!!*

*‘चॅट जीपीटी’ आणि ‘डीप फेक’ तंत्रज्ञानासारख्या गोष्टींमुळे, सोशल मीडियावर बनावट छायाचित्रे, व्हिडिओ, मजकूर यांचा अनिर्बंध सुळसुळाट होण्याची नुसती शक्यताच नव्हे, तर अनेक शास्त्रज्ञांना खात्री वाटते ..!! हे अत्यंत प्रगत तंत्रज्ञान वाईट हेतू असणाऱ्या, आसुरी महत्त्वाकांक्षेने प्रेरीत लोकांच्या हाती पडल्यास, जगाचा विनाश अटळ आहे, याबाबतही त्यांच्यात एकवाक्यता आहे ..!!*

*याच्याही पुढे जात ..*

*'जगाचा विनाश होईल का ..??*

*ह्यापेक्षा ..*

*‘कधी होईल' ..??’*

*एव्हढेच विचारणे आपल्या हातात आहे, अशी भीतीही अनेक विचारवंत व्यक्त करीत आहेत ..!!*

*ह्याच प्रकारची विधाने, काळजीयुक्त भाषणे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि प्रसिद्ध तंत्रज्ञ-उद्योजक इलॉन मस्क, बिल गेट्स करीत आहेत ..!! आपण ती ऐकत आणि वाचत आहोत ..!!*

*व्हाइट हाउसने नुकतेच ‘गूगल’चे सुंदर पिचाई आणि ‘मायक्रोसॉफ्ट’चे सत्या नाडेला ह्यांना ‘एआय’चा जबाबदारीपूर्वक वापर करणे आणि त्यासाठीचा आराखडा करणे, ह्यासंबंधी बोलावले होते. त्या बैठकीत ‘ओपन एआय’च्या (‘चॅट जीपीटी’ची जनक कंपनी) सॅम आल्टमनबरोबरच अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिसही उपस्थित होत्या. ‘विश्वासार्ह एआय’साठी व्हाइट हाउसने १४ कोटी डॉलर जाहीर केले आहेत ..!!*

*‘एआय’ची उपशाखा असणारी ‘न्यूरल नेटवर्क’ खूप जुनी आहे. ‘न्यूरल नेटवर्क’ अती-प्रगत करण्यात, तिचे २०१२मध्ये ‘डीप लर्निंग’मध्ये रूपांतर करण्यात, डॉ. हिंटन ह्यांचे मोलाचे योगदान आहे. ह्या ‘डीप लर्निंग’ प्रकारामुळे आज ही परिस्थिती ओढावली आहे ..!!*

*डॉ. हिंटन म्हणतात की, हे तंत्रज्ञान मानवापेक्षाही पुढे जाईल, अशी शक्यता आहे आणि ती खूप भयावह आहे ..!!*

*काही दिवसांपूर्वी ‘सॅमसंग’ कंपनीने ‘चॅट जीपीटी’च्या वापरावर बंदी घातली ..!!*

*वॉरन बफे या गुंतवणूक क्षेत्रातील अग्रेसर सीईओने तर ‘एआय’ला ‘दुसरा अणुबॉम्ब’ म्हटले आहे ..!!*

*‘एआय’ तंत्रज्ञानामुळे ६० ते ८० टक्के लोकांच्या हातचे काम जाईल, ते बेरोजगार होतील, ह्याच्या अनेक पाऊलखुणा दिसत आहेत ..!!*

*‘रायटर्स गिल्ड’ या अमेरिकेतील लेखकांच्या संघटनेने नुकत्याच काढलेल्या मोर्चाने हे दाखवून दिले. ‘चॅट जीपीटी’ कथा, पटकथा लिहून देणार असेल, तर ह्या लेखकांना कोण मानधन देणार ..??*

*परवाचीच बातमी आहे, की ब्रिटनमध्ये गुंतवणूक तज्ज्ञांच्या सल्ल्यापेक्षा ‘चॅट जीपीटी’ने गुंतवणुकीवर अधिक परतावा दिला ..!!*

*‘सोनी’च्या छायाचित्र स्पर्धेत प्रथम पारितोषिक जाहीर झालेल्या जर्मन छायाचित्रकाराने ते नम्रपणे नाकारले; कारण ती ‘एआय’ची कलाकृती होती ..!!*

*‘एआय’, ‘बिग डेटा’, ‘क्लाउड’ इत्यादींचा समुच्चय असणारी, २०१३मध्ये अस्तित्वात आलेली चौथी औद्योगिक क्रांती म्हणजेच ‘इंडस्ट्री ४.०’ किंवा ‘आय ४’ ..!!*

*ह्याला मागे टाकत, दहा वर्षांत ‘इंडस्ट्री ५.०’ उदयाला आली आहे. ह्यामध्ये मानव आणि यंत्र-तंत्र-रोबो एकत्र काम करतील. याला ‘कोबॉट’ म्हणतात. ‘कोबॉट’मुळे जीवन सुखावह (की आळशी ..??) झाले, तरी असंख्य नोकऱ्यांवर गदा येऊन, सामाजिक अस्थैर्य वाढेल ..!!*

*प्रख्यात मानववंश शास्त्रज्ञ युवल हरारी (‘सेपियन्स’चा लेखक) ह्याने एका ‘टेड टॉक’मध्ये म्हटले आहे की, ९० टक्के लोकांना भविष्यात काही कामच नसेल ..!!*

*यावर काहीसा उपाय म्हणून बिल गेट्स यांनी ‘एआय एथिक्स ग्रुप’ सुचवला आहे ..!! त्यांनी असेही म्हटले आहे की, एखाद्या उद्योगाने लोकांना काढून रोबोंना काम दिले तर, त्यांना ‘रोबो कर’ लावण्यात यावा ..!!*

*‘एआय’वरील संशोधन सहा महिने थांबवावे, असे अनेक तंत्रज्ञ, शास्त्रज्ञ, विचारवंत सुचवत आहेत ..!! तंत्रज्ञानाने केलेली कलाकृती वा काम, आणि मानवाने केलेले काम, ह्यांत फरक करता आला नाही तर, त्याला ‘ट्युरिंग टेस्ट’ म्हणतात ..!!*

*‘कोबॉट’ या ‘इंडस्ट्री ५.०’मधील तंत्रज्ञानात आपण तेथपर्यंत पोहोचलो आहोत. डॉ. जेफ्री हिंटन हे ‘ट्युरिंग पुरस्कार’ विजेते आहेत ..!!*

*एवढे सामाजिक अस्थैर्य, विध्वंस होणार असेल तर, ‘एआय’ करायचेच कशाला, असा प्रश्न मनात उद्भवू शकतो ..!! शेवटी ती मानवाचीच निर्मिती आहे, आणि त्याचे उत्तर दडले आहे लोभीपणात ..!!*

*‘एआय’मध्ये काम करणाऱ्या कंपन्यांना, त्यांच्या भागधारकांना उत्तम परतावा देऊन, स्वत:ची तुंबडी भरायची आहे. जगात अस्थैर्य निर्माण होईल वगैरे तात्त्विक गोष्टींत त्यांना रस नसून, त्यांच्यात ‘एआय’मधील अग्रणी होण्याची उघडी-नागडी स्पर्धा आहे, हे नि:संशय ..!!*

*या स्पर्धेत आपण टिकून राहण्यासाठी शिक्षण-पद्धतीत शिक्षकांनी ‘गूगल’ व्हावे आणि विद्यार्थ्यांनी ‘चॅट जीपीटी’ ..!! म्हणजेच शिक्षकांनी ‘गूगल’पलीकडचे ज्ञान द्यावे आणि, विद्यार्थ्यांनी ‘चॅट जीपीटी’चा वापर करावा; पण त्यावर पूर्ण अवलंबून न राहता स्वत:चा तरतम भाव वापरावा ..!!*

*ह्या पुढे आपली स्पर्धा ‘एआय’शी असणार आहेच; त्याहीपेक्षा ती ‘एआय’बरोबर काम करणाऱ्या मानवांशी अधिक असेल ..!!*

🙏🙏

*- अच्युत गोडबोले*

Address


Alerts

Be the first to know and let us send you an email when Life surgical and maternity home wadibhokar road posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

  • Want your practice to be the top-listed Clinic?

Share