18/07/2025
*पावसाळा आणि आयुर्वेदिक बस्ती पंचकर्म*
पावसाळ्यातील विचित्र वातावरणामुळे अनेक संसर्गाचं प्रमाण वाढतं. ते टाळण्यासाठी सर्वसामान्य माणसांनी बस्ती घ्यावी.
*बस्ती हि चिकित्सा* इन्फर्टीलीटी (वंध्यत्व), पाळीचे विकार, पाळीच्या वेळी होणारे त्रास, PCOD, Menopause च्या वेळी होणारे त्रास, पुरुषांचे शुक्रासंबंधी सर्व रोग, शुक्रसंग, शुक्रक्षय, थकवा, उंची वाढवणे, हाडांचे सर्व विकार, सांधेदुखी, आमवात, संधिवात, मणक्याचे विकार, नसांचे विकार, ब्रेन चे विकार, फिट येणे, पॅरालीसीस, जीर्ण ज्वर/ताप, पोटातील वायुगोळा, पोटातील जंत-कृमी, पोट फुगणे, मुळव्याध, रक्त पडणारे मुळव्याध, भगंदर, हर्निया, IBS, कोलाईटीस, अल्सरेटीव कोलाईटीस, सर्व पोटाचे विकार, पोट साफ न होणे, मलावरोध, जुनाट अतिसार-जुलाब, आव पडणे, अम्लपित्त, सतत ढेकर येत रहाणे, मूत्रविकार, मुतखडा, जुनाट जखमा, मांस-मेदातील वात, गाउट, जुनाट त्वचाविकार, डोळ्यांचे जुने रोग, दृष्टीदोष, शरीरावरील मेद कमी करणे, शरीरावरील मांस-मेद वाढवणे, केसांचे विकार, जुनाट खोकला, हृदयरोग अशा अनेक दुर्धर विकारांमध्ये उपयोगी ठरते. आजार अनेक असले तरी एकच प्रभावी उपाय अशी बस्तीची महती आहे.
हे रोग होऊ नयेत म्हणून आणि शरीर निरोगी, स्वस्थ राहावं (Prevention is better than Cure) म्हणून आयुर्वेदात याच काळात आयुर्वेदिक पंचकर्म यामधील बस्तीची उपचार पद्धती करावी असे सांगितलं जाते.
पंचकर्म चिकित्सा म्हणजे वमन, विरेचन, बस्ती, नस्य, आणि रक्तमोक्षण या पाच क्रिया होय.
साधारणपणे पाच हजार वर्षांपूर्वीपासून आयुर्वेद हे शास्त्र रुग्ण बरे करण्यासाठी वापरले जात आहे. भारतातील हवामानाला तर आयुर्वेद हा खूपच उपयोगी आहे. म्हणूनच त्यास स्वदेशी चिकित्सा पद्धती असेही म्हटले जाते. आयुर्वेदाने शरीराचे स्वास्थ्य टिकवणे आणि काही आजार झाल्यास ते बरे करणे हे दोन्ही उद्देश साध्य होतात. आयुर्वेदामध्ये आजारी न पडता स्वास्थ्य टिकवण्यासाठी आवश्यक असणारा आहार-विहार, व्यायाम, योग, रसायन, पंचकर्म-देहशुद्धी इ विषयी भरभरून मार्गदर्शन केलेले आहे. परंतु हे मार्गदर्शन तज्ञ आयुर्वेदीय वैद्याच्या सल्याने आमलात आणावे कारण प्रत्येक व्यक्तीची प्रकृती, वय, देश, काल, सहनशक्ती, इ अनेक गोष्टी वेगवेगळ्या असतात. अन्यथा दुष्परिणामही भोगावे लागतात अशी उदाहरणे आपण पाहत असतो.
आयुर्वेद चिकित्सेनुसार पंचकर्माचा वापर करून प्रत्येक व्यक्तीने त्या त्या ऋतूमध्ये आपल्या शरीरातील हानिकारक, वाढलेले दोष बाहेर काढले पाहिजेत. म्हणजेच Seasonal Ayurved Panchkarma Treatments करून घेणे असे म्हणता येईल. ज्याप्रमाणे आपण आपल्या वाहनांची काळजी वेळच्या वेळी सर्विसिंग, ओइलिंग इ करून घेतो, तसेच आपले शरीर स्वस्थ ठेवण्यासाठी सुद्धा वेळोवेळी त्याचे शुद्धीकरण, सर्विसिंग करणे गरजेचे असते. त्यासाठी आयुर्वेदीय पंचकर्म अवश्य करायला हवे.
*एनिमा* हा केवळ सफाईचं काम करतो. परंतु आयुर्वेदामध्ये दिलेली बस्ती ही शरीराचं पोषण, प्रतिकारशक्ती व आजार कमी करणं या गोष्टी एकत्रितपणे करते जे एनिमा करत नाही. एनिमामध्ये साबण-पाणी विष्ठेबरोबर बाहेर पडते. याउलट बस्तीत दिलेला पदार्थ आत राहून शोषला जातो. वर्षाऋतूमध्ये हवामानाच्या बदलानुसार शरीरात वात वाढून शरीर क्षीण होतं व आजाराची प्रबलता वाढते.
शरीरातील वातप्रधान विकारावर बस्ती चिकित्सा अतिशय उपयुक्त ठरते. शरीरामध्ये असणा-या वातासंबंधित सर्वसामान्य भारतीयांना माहीत आहेच. वात, पित्त, कफ यापैकी वात दोष हा प्रभावशाली व सर्व दोषांवर, शरीरावर नियंत्रण करणारा आहे. म्हणून बस्ती चिकित्सा ही अर्धी चिकित्सा वा परिपूर्ण उपचार पद्धती संबोधली जाते.
शरीराचं पोषण हे आतडय़ांमधून शोषित पोषक द्रव्यांद्वारा होत असतं. आतडय़ांचं आरोग्य चांगलं असेल तर पोषकद्रव्य जास्तीत जास्त प्रमाणात व त्वरित शोषण होतात. हे सर्व शरीराची पचनशक्ती जेव्हा व्यवस्थित असेल तेव्हाच शक्य होतं. या दोन्हीवर बस्ती पद्धती उत्तम काम करते. यात गुदमार्गातून सरळ आतडय़ांमध्ये तेलयुक्त औषधीद्रव्यं जाऊन ती त्वरित शोषली जाण्यास मदत होते. ही औषधीद्रव्य संपूर्ण शरीरात पसरतात व दोष बाहेर काढतात व शरीराचं पोषण करून आजार बरा करतात. म्हणूनच गुदमार्गाने दिलेली बस्ती त्वरित काम करते.
लहान मुलांमध्ये-अगदी नवजात अर्भकालाही बस्ती देता येते. अपुऱ्या दिवसांच्या नवजात बाळांची वाढ नियमित बस्तीमुळे सुधारते असा अनुभव आहे.
बस्ती म्हणजे तैलयुक्त औषधे गुदद्वारातून मोठया आतडयात सोडणे. तेथून तेल, काढा शरीरात शोषले जातात. या स्नेहनाने मऊपणामुळे आतडयातील कोरडे मळाचे थर सुटतात. तेल आतडयात शोषले जाऊन काही आवश्यक घटकांचा पुरवठा होतो. बस्तीमध्ये यासाठीच अनेक औषधांची मिश्रणे वापरली जातात. या पदार्थाच्या वापराप्रमाणे बस्तीचेही अनेक प्रकार पडतात.
*बस्ती देण्याचे प्रकार* – (बस्ती ही कोणत्या मार्गाने दिली जाते व त्यात असणा-या द्रव्यानुसार प्रकार पडतात)
*गुदमार्गगत बस्ती* – यामध्येआस्थापन बस्ती व अनुवासन बस्ती असे प्रकार आहेत. पोटापासूनचे रोग तसेच वाताचे रोग, सर्वांग गत रोग इत्यादींसाठी उपयुक्त
*मूत्रमार्गगत बस्ती* – मूत्रमार्गाद्वारे दिली जाणारी बस्ती – पुरुष व स्त्री. यालाच उत्तरबस्ती असं संबोधतात. पुरुष आणि स्त्रियांचे सर्व रोग, पुरुषांचे प्रजनन विकार, मूत्रविकार यासाठी तसंच स्त्रियांचे प्रजनन, मूत्रविकारासाठी आणि गर्भाशय विकारासाठी उपयुक्त ठरते. सद्य:स्थितीमध्ये याचा वापर अधिक होताना दिसतो.
*मन्या बस्ती* – मानेचे विकार
*कटी बस्ती* – कमरेचे विकार
*जानू बस्ती* – सांध्याचे विकार
*हृदय बस्ती* – हृदयाचे विकार
इत्यादी असे अनेक बस्तीचे प्रकार होतात.
अशा प्रकारे *स्नेहन- स्वेदन* (आयुर्वेदीय क्रिया) इ. करून नंतर बस्तीचा वापर केला जातो. तेव्हा कसलाही साइड इफेक्ट नसलेली बस्ती उपचार पद्धती तुम्हीही या वर्षी करून पाहा आणि शरीर स्वस्थ ठेवा. इतरांनाही सांगा, समाज जागरूक करा, आयुर्वेदाचा प्रचार करा, इतरांच्याही आरोग्य रक्षणास मदत करा.