27/05/2021
नमस्कार मित्रानो,
मला वैद्यकीय क्षेत्रात येऊन उणी पुरी 37 वर्षे झालीत, बघता बघता काळ सरत गेला, रोज येणारे रुग्ण, त्यांच्या अनेक व्यथा, ट्रीटमेंट, समुपदेशन, होम व्हिजिट इ करताना 37 वर्षे गेली हे खरंच वाटत नाही. त्या वेळेस संवाद साधण्यास सोशल मीडिया नव्हते, म्हणून अवघडले पण यायचे, मला एखादी समाजभिमुख गोष्ट माझे रुग्ण, मित्र, सहकारी, हितचिंतक यांना सांगावीशी वाटली तर काहीच करता येत नव्हते. पण ती उणीव आता सोशल मीडिया ने भरून काढली आहे. माझ्या शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय जडणघडणीत माझे डॉक्टर वडील (पप्पा ), माझे वैद्यकीय गुरु डॉ. हेमंत जोशी सर यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या मार्गदर्शना मुळेच मी यशस्वी झालोय. वैद्यकीय क्षेत्रात मला एक खंत अशी जाणवते की, सर्वसामान्य लोकांना Health awareness किंवा स्वास्थ शिक्षण याची कमी किंवा बेफिकिरी जाणवली.
त्यासाठी मी हि पोस्ट लिहून, आपल्या समाजाचे वैद्यकीय लोकशिक्षण, आरोग्य विषयी जागरूकता कशी वाढविता येईल याचा प्रयत्न करणार आहे.