Thotangare Paralysis Centre

Thotangare Paralysis Centre ayurvedic Paralysis centre .. ayurvedic treatment
physiotherapy centre
joint pain ,muscle pain,wome

*आरोग्य मंत्र - 47*                  ☘️ *ऋतुचर्या*☘️       🍂🍁  *शिशिर ऋतू*🍁🍂- माघ आणि फाल्गुन यांचा मिळून शिशिर ऋतू तयार...
11/10/2021

*आरोग्य मंत्र - 47*

☘️ *ऋतुचर्या*☘️

🍂🍁 *शिशिर ऋतू*🍁🍂

- माघ आणि फाल्गुन यांचा मिळून शिशिर ऋतू तयार होतो. साधारणपणे मकर संक्रांतीपासून शिशिराची सुरुवात होते.

- हा अतिथंडीचा काळ असला तरी रुक्षता देखील वाढलेली असते.थोडक्यात येथून पुढे उष्णतेचा प्रभाव वाढण्यास सुरुवात होणार असते.

- निसर्गात *पानगळ* बघण्यास मिळते.थोडक्यात वसंतात येऊ घातलेल्या नवनिर्मितेसाठी निसर्ग तयारी सुरू करत असतो.

- म्हणून आपनदेखील पुढे येऊ घातलेल्या उत्तरायनातील उष्णतेचा सामना करण्यासाठी स्निग्ध,प्रतिकार शक्तीवर्धक असा आहार घ्यावा.
उदा. च्यवनप्राश, तीळ, गूळ, मेथीचे लाडू, गाईचे तूप ,दूध ई.

- स्निग्ध व जड आहार पचण्यासाठी आणि कफ कमी करण्यासाठी गरम पाणी प्यावे.

- त्वचेवर कोरडेपणा आल्याने (तीळ)तेलाचा अभ्यंग करावा.

- अधिकाधिक व्यायाम करून शरीर दृढ करावे.

- पानगळ प्रमाणेच शिशिरात केसगळती देखील वाढते म्हणून *शिरोधारा* हा उत्तम पर्याय सांगितला आहे.

*DR NITESH PATIL
THOTANGARE PARALYSIS CLINIC
KHANIVALI
8983721292

29/03/2021

Patient recovery

🏥🚑🏨⚕️👨‍⚕️😷
10/11/2020

🏥🚑🏨⚕️👨‍⚕️😷

21/10/2020

☘️ *ऋतुचर्या*☘️

☀️☀️ *उत्तरायण* ☀️☀️

- शिशिर, वसंत, ग्रीष्म या तीन ऋतूंचे मिळून उत्तरायण तयार होते.(मकर संक्रांतीपासून ते मध्य जून पर्यंत)
- उत्तरायनामध्ये सूर्याचा प्रभाव असतो.म्हणून हा जास्त उष्णतेचा कालावधी असतो.
- म्हणून याकाळात आपला आहार-विहार शीत किंवा कमी उष्णतेचा असावा.
- या काळात पृथ्वीवरील सर्व प्राण्यांचे बल कमी असते.(low immunity)
- परिणामी या काळात आजारपण जास्त असते.

🌦️🌦️ *दक्षिणायन* 🌦️🌦️

- वर्षा, शरद, हेमंत या तीन ऋतूंपासून दक्षिणायन तयार होते.(मध्य जून ते मध्य जानेवारी)
- या काळात चंद्राचा प्रभाव असल्याने वातावरणात शीतलता अधिक असते.
- परिणामी उष्ण आहार-विहाराकडे आपला भर असणे अपेक्षित आहे.
- दक्षिणायनामध्ये निसर्गाची शक्ती आपल्या शरीरात साठवली जाते म्हणून हा जास्त immunity चा काळ असतो.
- परिणामी हा Healthy कालावधी असतो.

DR NITESH PATIL
8983721292

☘️ *ऋतुचर्या*☘️ *शिशिरोsथ वसंतः च ग्रीष्मवर्षाशरद हिमःl**शिशिराद्या क्रमात षड्ऋतवः स्मृतःll*- वर्षभरात एकूण 6 ऋतू असतात....
19/10/2020

☘️ *ऋतुचर्या*☘️


*शिशिरोsथ वसंतः च ग्रीष्मवर्षाशरद हिमःl*
*शिशिराद्या क्रमात षड्ऋतवः स्मृतःll*

- वर्षभरात एकूण 6 ऋतू असतात.ते पुढीलप्रमाणे,

- शिशिर , वसंत , ग्रीष्म , वर्षा , शरद , हेमंत

- प्रत्येकी 2 महिन्याचा मिळून एक ऋतू ठरलेला आहे . तो असा ,

*शिशिर* - माघ व फाल्गुन
*वसंत* - चैत्र व वैशाख
*ग्रीष्म* - ज्येष्ठ व आषाढ
*वर्षा* - श्रावण व भाद्रपद
*शरद*- अश्विन व कार्तिक
*हेमंत* - मार्गशीर्ष व पौष

- वरील प्रत्येक ऋतूचे विशेष महत्व आहे आणि निरामय आयुष्यासाठी त्याचा अभ्यास गरजेचा आहे.

8983721292
Dr NITESH PATIL

19/10/2020

☘️ *ऋतुचर्या*☘️

- चालू असलेल्या ऋतुनुसार आपला आहार आणि विहार करणे म्हणजे ऋतुचर्या होय.

- उदा.
आपण हिवाळ्यात स्वेटर घालतो पण उन्हाळ्यात घालणे शक्य नसते.
जसे उन्हाळ्यात आईस्क्रीम,शीतपेये घेतली जातात तसे थंडीत चहा ची ओढ लागते.

- परंतु ह्या खूप सध्या बाबी झाल्यात.ऋतुचर्या तसा खूप सखोल विषय आहे.

- साधारणपणे उन्हाळा,पावसाळा आणि हिवाळा असे 3 ऋतू आपण मानतो परंतु शास्त्रानुसार एकूण 6 ऋतू आहेत.

- आचार्यांनी हजारो वर्षांपूर्वी अत्यंत बारकाईने वातावरणाचा अभ्यास करून काही नीतिनियम सांगून ठेवले आहेत.आजही ते अत्यंत उपयोगी ठरत आहेत.

- परंतु Digital होण्याच्या नादात आपण मूळ शास्त्र आणि संस्कृती कडे दुर्लक्ष केले आहे.

- ऋतुचर्या आणि त्यानुसार दिनचर्या यांची सांगड घालून राहण्याचा प्रयत्न केल्यास कुठलाही व्याधी आपणांस होणार नाही याची खात्री आहे.

- यापुढे प्रत्येक ऋतूची लक्षणे,दिनक्रम,पथ्य आणि अपथ्य यांचा सखोल अभ्यास करूया.

Open after lockdown for patient....
10/10/2020

Open after lockdown for patient....

23/06/2020

🍀उद्गारशुद्धी उत्साह वेगोत्सर्ग यथोचित्तः।
लघुता क्षुत पिपासा च जीर्णाहारस्य लक्षणम।🍀

पुढील लक्षणे दिसली तर समजावे की अन्न व्यवस्थित पचले आहे म्हणून.....

1) स्वच्छ ढेकर येणे
2) उत्साह
3) लघवी, संडास स्वच्छ साफ होणे
4)हलके वाटणे
5)वेळेवर तहान, भूक लागणे

वरील गोष्टि जर घडत नसतील तर अपचन आहे असे समजावे.

DR NITESH PATIL
BAMS
8983721292

23/06/2020

*दही - शाप की वरदान*

- दही उष्ण, पचण्यास जड, कफ वाढवणारे, मेद वाढवणारे , पित्त वाढवणारे आहे.

- दही वातशामक असून ,शरीरबल्य आणि शुक्रबल्य आहे.

दही खाण्याचे नियम 👇🏻
- रात्री दही खाऊ नये.
- दही रोज खाऊ नये.
- दही तापवू नये.
- उष्ण ऋतू मध्ये( उन्हाळा आणि october heat- शरद ऋतू) दही खाऊ नये.

जर वरील नियम पाळले नाही तर,
रक्तविकार,आमलपित्त, त्वचाविकार,कुष्ठ,चक्कर येणे,अपचन इ आजार हाऊ शकतात.

बऱ्याच जणांना दही जीवापाड आवडते.पण तेव्हढेच ते त्रास दायक होऊ शकते.

तरीही दही खावेसे वाटलेच तर त्यासोबत मुगाचे वरण, मध, खडीसाखर, आवळा यापैकी एखाद्या पदार्थासोबत च खावे. 😊

Dr Nitesh Patil
BAMS
8983721292

25/05/2020

🍀 जेवणाच्या आधी व नंतर (अर्धा तास)जास्त पाणी पिऊ नये.जेवताना देखील केवळ घोट घोट च पाणी प्यावे.🍀

कारण -
- पाणी हे मुळात शीत गुणाचे असते.पचनाचे काम जठराग्नि करत असतो.जठराग्नि हा उष्ण गुणाचा आहे.जठराग्नि जेव्हढ़ा प्रदीप्त असेल तेव्हढे पचन चांगले होते.परंतु अति पाणी सेवनामुळे जठराग्नि मंद पावतो, परिणामी पचनाचे विकार होउ शकतात.
- शिवाय अन्नाची जागा पाण्याने घेतल्याने पोट भरल्यासारखे वाटते पण महत्वाची जीवनसत्वे भेटत नाही.थोडक्यात पोट भरते पण अंगी लागत नाही.

DR NITESH DAMU PATIL
THOTANGARE PARALYSIS CENTRE KHANIVALI WADA
MOB NO. 8983721292

🍀 सकाळी 15 ते 20 मिनिटे कोवळ्या उन्हात बसावे.(8am to 9 am)🍀फायदे-- अशाप्रकारे शरीरावर कोवळे ऊन पडले असता निसर्गत:च आपल्य...
24/05/2020

🍀 सकाळी 15 ते 20 मिनिटे कोवळ्या उन्हात बसावे.(8am to 9 am)🍀

फायदे-
- अशाप्रकारे शरीरावर कोवळे ऊन पडले असता निसर्गत:च आपल्या त्वचेखाली Vitamin D तयार होऊ लागते.
- Vitamin D हे शरीरात calcium शोषून घेण्यासाठी उपयुक्त असते.
- यामुळे हाडे,दात व केसांचे आरोग्य चांगले राहते.
- संधिवात, हाडे ठिसूळ होणे,मुडदूस, असे आजार टळतात.

DR NITESH PATIL
THOTANGARE PARALYSIS CENTRE KHANIVALI
MOB NO 8983721292

22/05/2020

IMPOTANCE OF INDIAN CULTURE
*1) अंत्यसंस्कार किंवा केशकर्तनावरून आल्यावर अंघोळीशीवाय कोणाला शिवायचीही परवानगी का नसायची ?*
*Infections spread टाळण्यासाठी.*

*2) चप्पल घराबाहेर सोडूनच घरात प्रवेश का?*
*Infections spread टाळण्यासाठी.*

*3) घरात मृत्यू झाल्यावर १२ दिवस घरातून बाहेर पडण्याची परवानगी का नसायची?*
*(यालाच होम क्वारंटाईन म्हणावे का?)*
*कारण मृत्यू समयी माणसाला काही ना काही आजार असतोच.*
*त्याची Immunity lowest level ला असते ,त्यामुळे ते deceased शरीर सर्व infective आजारांचे घर असते.*
*या infective आजारांपासून इतरांना दूर ठेवण्यासाठी इतर लोकांनी 12 दिवस अंतर ठेवावे.*

*काही ठिकाणी नवीन जन्म झाल्यावर काही दिवस बाळ आणि बाळाच्या आईला घरातल्याच एका खोलीत क्वारंटाईन करायचे.*
*त्या खोलीच्या दाराला कडुनिंबाच्या पाल्यांचे तोरण बांधायचे.*
*इथे कारण उलटे असते*
*कारण नवजात बालकाची* *immunity खूप कमी असते.* *बाहेरच्या जगातील आजार त्याला होऊ नयेत म्हणून घरातच राहणे,जसे आपण आता करत आहोत.*

*4) मयत झालेल्या घरात १२ दिवस अन्न शिजवायचे नाही अशी पद्धत का असावी? १२व्या नंतर घरात साफसफाई का करतात?*
*आलं का logic लक्षात.*

*5) शौचास बसून करण्याची भारतीय पद्धत का प्रचलित आहे? (आतड्यांना लॉक करणारे मसल्स अनलॉक झाल्याने मलाचा पूर्ण निचरा होतो, टॉयलेट पेपरची गरज नाही त्यामुळे इको-फ्रेंडली आहे,*
*पाश्चात्य कमोडच्या सीटवरच्या लाखो विषाणूंचा डायरेक्ट शरीराला संपर्क होतो तसा भारतीय पद्धतीत होत नाही.*

*6) हळद आणि मसाले युक्त अन्न शरीराच्या प्रतिकार शक्तीला आपसूकच बळ देतात. लग्नाआधी हळदी समारंभ का असतो?*
*आता western लोकही हळददूध प्यायला लागलेत, फरक एवढाच की ते त्याला turmeric latte म्हणतात. तुमच्या शहरातील कोणत्याही cafe shop वर जाऊन turmeric latte मागवून तर बघा.*

*7) घरात उद, कापूर जाळणे धूप फिरवणे यामागे काय कारण असावे?*
*Logic लक्षात घ्या.*

*8. ऋतुमानानुसार सणवार आणि अन्न नियोजन यामागे किती मोठा विचार असेल....?*
*उन्हाळा सुरू व्हायच्या आधीचा काळ हा वायरल इन्फेक्शनचा असतो.*
*या काळातच दारोदारी होळी का पेटवली जाते...?*

*9)*
*आपल्याकडे जनरली मृतदेह दफन करण्याऐवजी दहन करायची पद्धत का रूढ आहे? गुगल करा "cremate or bury". अनेक संशोधने मिळतील. तिकडे चीनने मृतदेहांना पुरण्या ऐवजी जाळण्याचे आदेश दिलेत.*

*10*
*जगातला सगळ्यात जास्त शाकाहारी असलेला देश भारतच आहे.*
*असे का...?*
*इथे भारतात आपण प्राण्यांत पण देव पाहतो. झाडांमध्ये, दगडांमध्ये, नद्यांमध्ये, पर्वतांमध्ये ही...!*
*आम्हाला जगाने इको-फ्रेंडली व्हा हे शिकवणे म्हणजे मोठा विनोद आहे.*
*आम्ही कुत्र्यात पण देव पाहतो, खंडोबा म्हणतो. तिकडे चीनच्या युलीन फेस्टिवल मध्ये कुत्र्यांना भाजून खातात.*

*11*
*एकाही व्हायरसचा जन्म भारतातून झाला आहे असे ऐकिवात का नाही?*
*कारण आम्ही इकडे वटवाघूळ, उंदीर, मांजर कुत्री, ऑक्टोपस, साप,रातकिडे, अळ्या असे बेछूट खात नाही. Nonveg खाण्यातही नियम आहेत ते पाळतो.*

*12*
*उठसुठ हात मिळवणे, मुके घेऊन अभिवादन करणे असे प्रकार आपल्याकडे नसून हात जोडून नमस्कार करायची पद्धत का आहे..?*

*हिंदू भारतीय पद्धतींचा logical विचार करा.*
*त्या बरोबर आहेत .👍*

*_आपली संस्कृती हजारो वर्षांपासून अस्तित्व टिकवून आहे. अनेक महामाऱ्या आणि संकटे झेलून अनुभव संपन्न झाली आहे. आमचीच संस्कृति किती वैज्ञानिक आहे याचा ढोल बडवायचा यात उद्देश अजिबात नाही. हे केवळ अनुभवातून शिकणे आणि कॉमन सेन्सचा भाग आहे. *

*यावर नक्कीच विचार व्हावा व पालन व्हाव*🙏
*घरातच रहा सुरक्षित रहा*🙏

17/05/2020

🍀आहार हा नेहमी षड् रसात्मक घ्यावा.🍀

- आहारात सहा रस (चव) असणाऱ्या पदार्थांचा समावेश असावा.

- हे सहा रस म्हणजेच मधुर(गोड),अम्ल (आंबट), लवण(खारट), कटु(तिखट), तिक्त(कडू), कषाय(तुरट).

- अशाप्रकारचा आहार हा शारीरिक बळ वाढवतो. रोगप्रतिकारक शक्ती देतो.

- याउलट आवड म्हणून केवळ एकाच चवीच्या अन्नपदार्थांचे सतत सेवन केले असता शरीरावायवांच्या पोषणाचे कार्य योग्य प्रकारे होत नाही, व बळ कमी होऊन रोगांना आमंत्रण मिळते.

DR NITESH PATIL
THOTANGARE PARALYSIS CARE CENTRE KHANIVALI WADA
8983721292

12/05/2020

☘️ *गायीचे तूप* ☘️

- गायीच्या तुपाचे नियमितपणे सेवन केल्याने स्मरणशक्ती, बुद्धी,आकलन शक्ती वाढते.

- जठराग्नी, शारीरिक बळ,आयुष्य व वीर्यवृद्धी होते.

- हे लहान मुले, वृद्ध, संतती या सर्वासाठी हितकर आहे.

- तुपाने त्वचेला कांती, कोमलता प्राप्त होते.

- स्वर (आवाज) चांगला होतो.

- चक्कर येणे,कापणे, भाजणे, नेत्र रोग,मनोविकार, यांमध्ये तूप चांगले औषध आहे.

- शरीर तरुण ठेवणारे व शीत असल्याने उष्णतेचे अनेक विकार तुपाने बरे होतात.

- बाजारात उपलब्ध चीझ इत्यादी गोष्टी पौष्टिक म्हणून मुलांना खाऊ घालण्यापेक्षा घरचे बहुगुणी तूप त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हातभार लावेल हे नक्कीच!

Dr Nitesh Patil
Thotangare clinic and Paralysis centre khanivali
8983721292

🍀मासिक पाळी हा स्त्रियांचा दागिना आहे.🍀- मासिक पाळी (Menstruel Cycle - MC ) हे स्री शरीराचे खास वैशिष्ट्य आहे.- ज्यांची ...
09/05/2020

🍀मासिक पाळी हा स्त्रियांचा दागिना आहे.🍀

- मासिक पाळी (Menstruel Cycle - MC ) हे स्री शरीराचे खास वैशिष्ट्य आहे.

- ज्यांची पाळी नियमित 28 दिवसाला येते आणि 4 दिवस नीट अंगावरून जाते त्यांचे शरीर नेहमी निरोगी राहते.

- खरे तर पाळी म्हणजे काही संप्रेरकांमुळे (hormones) निर्मीत एक चमत्कार च आहे.

- पाळी पुढे किवा मागे करण्याच्या गोळ्या घेऊन तिच्याशी खेळ करु नये.

- पाळीच्या 4 दिवसांमधे मेथी,गवार,वांगी,तुरडाळ,शेंगदाने, दही ई पदार्थ खाऊ नये.

- पाळी अनियमित असल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घेऊन ती नियमित करुण घ्यावी मात्र त्यासाठी hormones च्या गोळ्या घेणे टाळावे.

☘️ *सतत फ्रिजमधील थंड पाणी,coldrinks,Ice cream,बर्फ खाणे टाळावे*🍀कारण-- मुळात आपली पचनशक्ति जठराग्नि वर अवलंबून असते. स्...
09/05/2020

☘️ *सतत फ्रिजमधील थंड पाणी,coldrinks,Ice cream,बर्फ खाणे टाळावे*🍀

कारण-
- मुळात आपली पचनशक्ति जठराग्नि वर अवलंबून असते. स्वभावतः च अग्नि आणि थंड पाणी ह्या विरुद्ध गुणाच्या गोष्टी आहेत.
- अति थंड पदार्थ सेवनाने सतत आपल्या जठराग्नि ची हानि होत असते.
- परिणामी अन्नाचे पचन नीट न होता गॅसेस होणे, पोट फुगल्यासारखे वाटणे, भूक न लागणे ई. धोके उत्पन्न होऊ शकतात.
- तसेच कफ व वात वाढून वारंवार सर्दी-पडसे, वजन वाढणे,संधिवात दिसून येतात.

DR NITESH DAMU PATIL
THOTANGARE PARALYSIS CENTRE KHANIVALI
8983721292
niteshdpatil95@gmail.com

26/04/2020

Physical Exercise for paralisis patient ...
Please take consultation or suggestions from DOCTOR ON CALL or VISIT THOTANGARE PARALYSIS CENTRE before doing any physical exercise for paralisis patient

26/04/2020

आरोग्य मंत्र

🍀 रोज रात्री झोपताना गरम पाणी प्यावे.🍀

फायदे-
- पचनशक्ति सुधारते.
- चरबी कमी होते.
- पोट साफ होण्यास मदत होते.
- कफ विकार होत नाहीत

🍀 दुपारचे जेवण 12 च्या आत करावे.🍀

फायदे-
- जेवण चांगले पचते.
- ऍसिडिटी,डोकेदुखी हे त्रास होत नाही.
- मायग्रेन चा त्रास कमी होतो.

🍀 दुपारी जेवणानंतर झोपू नये.🍀

तोटे-
- छातीत जळ जळ होते.
- हातपाय डोके जड होते.
- पाळीच्या तक्रारी, स्थौल्य, दमा, त्वचा विकार वाढतात.

मुळात दुपारची झोप (दिवास्वाप) ही अनैसर्गिक असते.त्याने पित्त वाढून शरीरास हानीच होते.खुप थक़वा आल्यास खुर्चीत बसून आराम करावा पण सम्पूर्ण आडवे होऊन झोपू नये.

Address

Vada
421303

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm

Telephone

+918983721292

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Thotangare Paralysis Centre posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Thotangare Paralysis Centre:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram